15 august bhashan In Marathi- स्वातंत्र्य दिवस २०२२

15 august bhashan In Marathi
Independence Day Speech In Marathi

15 august bhashan In Marathi :- या वर्षीचा स्वातंत्र्य दिन खूप खास असणार आहे. १५ ऑगस्ट २०२२ ला देश स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन विशेष पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याअंतर्गत देशभरात प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याची योजना (हर घर तिरंगा)आहे. त्याची तयारीही मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. हा सात दिवसांचा कार्यक्रम देशात स्वातंत्र्य दिनाच्या चार दिवस आधी म्हणजेच ११ ऑगस्टपासून सुरू होईल आणि तो दोन दिवसांपर्यंत चालेल.

१५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण करून भारत आपला ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे, या दिवशी आपल्याला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा हा दिवस. १५ ऑगस्ट या दिवशी शाळा, महाविद्यालयात भाषणे सांस्कृतिक कार्यक्रम इ.चे आयोजन केले जाते. आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले विचार मांडायचे असतील आणि स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाची तयारी करायची असेल तर तुम्ही आमच्याद्वारे लिहिलेले १५ ऑगस्ट भाषण (Independence speech In Marathi) वापरू शकता. मुलांच्या तयारीसाठी शाळेसाठी (Swatantra Dinache Bhashan) खास तयार करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट भाषण मराठीमध्ये इथे मिळेल.

Independence speech In Marathi – (१५ ऑगस्ट भाषण 1)

15 august bhashan

आदरणीय पाहुणे मंडळी, आदरणीय प्राचार्य, सर्व शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपणा सर्वांना माहित आहे की आज आपण आपल्या देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे. १५ ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे कारण सन १८५७-१९४७ पर्यंत स्वातंत्र्यलढा दिल्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला आणि एक स्वतंत्र राष्ट्र बनला. तेव्हापासून, सर्व भारतीय हा दिवस “स्वातंत्र्य दिन” म्हणून मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करतात.

१८५७ साली मंगल पांडेने ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत एका ब्रिटिश अधिकाराला गोळ्या घातल्या तेव्हापासून भारताच्या स्वातंत्र्य समराला सुरुवात झाली. आपल्याला आणि आपल्या देशाला हे स्वातंत्र्य इंग्रजांकडून इतक्या सहजासहजी मिळालेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, लाला लजपत राय इत्यादी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी महात्मा गांधींनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली आणि त्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले. पण त्यांनी हार मानली नाही. कारण ब्रिटीश राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते. अनेक स्वातंत्र्यवीरांनी अत्याचार सोसून आणि संघर्ष करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

स्वातंत्र दिनानिमित्त निबंध व गीत मराठीमध्ये वाचा

मी स्वातंत्र्यसैनिकांसाठी काही ओळी सांगू इच्छितो/इच्छिते –

खुशनसीब हैं वो जो वतन पर मिट जाते हैं
मरकर भी वो लोग अमर हो जाते हैं
करता हूँ उन्हें सलाम ए वतन पे मिटने वालों
तुम्हारी हर साँस में तिरंगे का नसीब बसता है

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. या दिवशी देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. तेव्हापासून दरवर्षी देशाचे पंतप्रधान लाल किल्यावर ध्वज फडकवतात, राष्ट्रगीत गातात आणि २१ तोपांसह सर्व शहीद स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहतात. दरवर्षी देशाचे पंतप्रधान आपल्या भाषणातून देशवासियांना संबोधित करतात आणि सैन्य आपला पॉवर शो आणि परेड मार्च करतात. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सर्व भारतीयांच्या मनात देशप्रेमाच्या भावना वाहत असतात. स्वातंत्र्यानंतर भारताने आजवर बरीच प्रगती केली आहे. स्वातंत्र्यदिनी सर्व शाळा, महाविद्यालये, संस्था, बाजार, कार्यालये आणि कारखाने इत्यादी बंद राहतात. या दिवशी सरकारी सुट्टी असते आणि ठिकठिकाणी ध्वज फडकवला जातो. शाळा, महाविद्यालये इत्यादींमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतात आणि देशभक्तीपर गीते गातात, काही कविता वाचतात तर काही सांस्कृतिक गाण्यांवर नृत्य करतात.

१५ ऑगस्ट हा भारताच्या अभिमानाचा आणि सौभाग्याचा दिवस आहे. हा सण आपल्या हृदयात नवी ऊर्जा, नवी आशा, उत्साह आणि देशभक्तीचा संचार करतो. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती क्रांतिकारकांनी बलिदान दिले, या देशाचे रक्षण आपल्याला कोणत्याही परिस्थितीत करायचे आहे, यासाठी भलेही आपल्याला प्राणाची आहुती द्यावी लागेल याची आठवण हा दिवस करून देतो. अशा प्रकारे आपण स्वातंत्र्यदिनाचा सण पूर्ण उत्साहाने, आवेशात आणि उत्साहाने साजरा करतो आणि राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व रक्षण करण्याची शपथ घेतो.

शेवटी जाता-जाता इतकच म्हणेन

ना पूछो ज़माने को
क्या हमारी कहानी हैं
हमारी पहचान तो सिर्फ ये हैं
की हम सिर्फ हिंदुस्तानी हैं

प्रश्न – भारताला स्वातंत्र्य कोणत्या दिवशी मिळाले?

उत्तर – १५ ऑगस्ट १९४७

प्रश्न – भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

उत्तर – पंडित जवाहरलाल नेहरू

प्रश्न – भारताच्या तिरंगी ध्वजामध्ये अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत?

उत्तर – २४

प्रश्न – भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

उत्तर – डॉ. राजेंद्र प्रसाद

प्रश्न – भारताचे पंतप्रधान स्वतंत्रदिनी राष्ट्रध्वज कुठे फडकावतात?

उत्तर – लाल किल्ला

प्रश्न – भारताचे राष्ट्रपिता कुणाला म्हणतात?

उत्तर – महात्मा गांधी

मित्रांनो इथे मी 15 august speech in marathi 10 lines दिलेल्या आहेत. मला आशा आहे स्वातंत्रदिनाचे हे भाषण तुम्हाला आवडले असेल. तुम्ही आपल्या मुलांना हे भाषण शाळेत म्हणायला सांगा जेणेकरून त्यांची पब्लिक स्पीकिंग चांगली होईल. तसेच तुम्ही ही पोस्ट आपल्या मित्रांना सोसिअल मीडियाच्या माध्यमातून (facebook,whatsapp,instagram,Twitter) share करा. या भाषण विषयी तुमच्या प्रतिक्रिया comment box मध्ये कंमेंट करून कळवा.

Written by – Mahajatra Team

Leave a Comment