आषाढी एकादशीच्या शुभेच्छा संदेश कोट्स

Ashaddhi Ekadashi Wises Marathi
Ashadhi Ekadashi Wishes

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadhi Ekadashichya shubhecha in marathi) या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, आज आशाधी एकादशी आहे. या दिवशी महाराष्ट्रात विठ्ठल नामाचा गजर केला जातो. या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटले जाते कारण या एकादशीच्या दिवसापासून भगवान श्री विष्णूचा निद्राकाळ सुरू होतो. हा दिवस वैष्णव पंथीयांसाठी खूप महत्वाचा असतो. मराठी लोक या दिवशी २४ तास उपवास ठेवत असतात. या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या लोक कानाकोपऱ्यातून विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जाण्यासाठी पायी यात्रा काढतात. या यात्रेला दिंडी असे म्हणतात. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूऊन काढण्यात येते. वारकरी विठ्ठल नामाचा जयकार करण्याबरोबर संतांची अभंगे म्हणत असतात. या दिवशी लोकमानस एकमेकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा इंटरनेट किंवा मोबाइलला च्या माध्यमातून एकमेकांना देत असतात.

तर चला मग आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, Whishes, Quotes, संदेश बघूया.

Ashadhi Ekadashi Hardik shubhecha in Marathi

Ashadhi Ekadashi Hardik shubhecha in Marathi
Ashadhi Ekadashi Hardik shubhecha in Marathi

तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा, तूच रे माझ्या पांडुरंगा,
चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!


सुखासाठी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकवेळ,
मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी!
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।


रूप पाहता लोचनी, सुख जाले ओ साजणी,
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
बहुता सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठल आवडी,
सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर,
हरिष्यनी  एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!


आता कोठें धावे मन, तुझे चरण देखलिया,
भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे
इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची…
Happy Ashadhi Ekadashi


आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

“चैतन्याचा गाभा… विटेवर उभा
पालख्यांचा सोहळा नाही..वारकऱ्यांचा मेळा नाही
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान
पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा
रखूमाईवर, उभा विटेवर
कर कटेवर ठेऊनिया भगवंता,
तव तेज ह्या तिमिरात दे आता


देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!


जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि,
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पहिली शोधोनी अवघी तीर्थे,
देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा!


घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे,
तुम्ही घ्यारे डोळे सुख, पाहा विठोबाचे मुख
हरिष्यनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


आषाढी कार्तिकी भक्तजण येती,
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती (information) व त्याचबरोबर पालखी सोहळा वाचा

महाराष्ट्रातील 800 वर्ष जुनी पंढरपूरची वारी परंपरा (Pandharpur Yatra}

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi
Ashadhi Ekadashi Wishes in Marathi

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय


टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा, माऊली निघाले पंढरपूरा..,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा,


हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !


मित्रांसाठी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

मित्रांसाठी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
मित्रांसाठी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

पाणी घालतो तुळशीला
वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना,
हीच प्रार्थना पांडुरंगाला
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.


विठू माऊली तू
माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
 हरिष्यनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल |
करावा विठ्ठल जीवभाव ||
पद्म एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली..
हरिष्यनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


आई वडिलांसाठी Ashadhi एकादशीच्या शुभेच्छा

आई वडिलांसाठी Ashadhi एकादशीच्या शुभेच्छा
आई वडिलांसाठी Ashadhi एकादशीच्या शुभेच्छा

डोळे मिटता सामोरे
पंढरपूर हे साक्षात
मन तृप्तीत भिजून
पाही संतांचे मंदिर
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


पुढे परतूनी येऊ
आता निरोप असावा
जनी विठ्ठल दिसावा
मनी विठ्ठल रुजावा
पद्म एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


पाऊले चालती
पंढरीची वाट
हरिष्यनी  एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


मंदिरी उभा विठू करकटावरी
डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, चंद्रभागा
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


आषाढी एकादशीला स्टेटस (status)

आषाढी एकादशीला स्टेटस (status)
आषाढी एकादशीला स्टेटस (status)

विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


आषाढी कार्तिकी भक्तजण येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती….
पद्म एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


मुख दर्शन व्हावे आता, तू सकळ जगाचा दाता,
घे कुशीत या माऊली, तुझ्या चरणी ठेवतो माथा…
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


अमृताहूनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का ना बाघे
हरिष्यनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू,
डोळे निवतील कान, मना तेथेचि समाधान…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती…
Happy Ashadhi Ekadashi

आषाढी एकादशीचे मेसेज (Messages)

Ashadhi Ekadashi Message
Ashadhi Ekadashi Message

गुरू माता गुरू पिता, गुरू आमुची कुळदेवता,
थोर पडतां साकडे, गुरू रक्षी मागें पुढे
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव, ह्रदयी पंढरिराव राहतसे
विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


जाऊ देवांचिया गावां, देव देईल विसांवा,
ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संतसदनी राहिला
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


गुणा आला ईटेवरी, पीतांबरधारी सुंदर तो,
डोळे कानन त्याच्या ठायीं, मन पायीं राहो हें
हरिष्यनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला, कंठ हा सोकला आळविता
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणिकाचे काम नाही येथे…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


आषाढी एकादशीनिमित्त अभंग

आषाढी एकादशीनिमित्त अभंग
आषाढी एकादशीनिमित्त अभंग

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत


भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ।
देव बाजारचा.


चला मंगळ वेढे पाहू …
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….|

वाड्याच्या पडक्या भिंती,
दामाची महती कथिती…
ती कथा मुखाने गाऊ…
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….

भर रस्त्यावरती साधी,
ती चोखोबाची समाधी…
आदराने सुमने वाहू…
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….

कान्होपात्रेच्या गुरूस्थानी,
आनंद मुनी महाज्ञानी…
ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ…
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ


ह्रदय बंदी खाना केला
आत विट्ठल कोंडिला
शब्दी केलि जड़ा जोड़ी
विट्ठल पायी घातली वेडी
धरिला पंढरीचा चोर..…


एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन । श्‍वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ॥१॥
ऎका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती ऎकती हरिकिर्तन । ते समान विष्णुसीं ॥२॥
अशुद्ध विटाळशीचे खळ । विडा भक्षितां तांबुल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥३॥
सेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥४॥
आपण नवजे हरिकीर्तना । आणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा तो महोमेरु ॥५॥
तया दंडी यमदुत । झालेस तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकाद्शी चुकलिया ॥६॥


तुला साद आली तुझ्या लेकरांची
लंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल


उंच पताका झळकती । टाळ मृदंग वाजंती । आनंदे प्रेमें गर्जती । भद्र जाती विठ्ठलाचे ॥१॥
आले हरिचे विनट । वीर विठ्ठलाचे सुभट । भेणें जाहले दिप्पट । पळती थाट दोषांचे ॥२॥
तुळसीमाळा शोभती कंठीं । गोपीचंदनाच्या उटी । सहस्त्र विघ्नें लक्ष कोटी ।बारा वाटा पळताती ॥३॥
सतत कृष्णमूर्ति सांवळी । खेळे ह्रुदयकमळीं । शांति क्षमा तया जवळीं । जीवें भावें अनुसरल्या ॥४॥
सहस्त्र नामाचें हतियार । शंखचक्राचे शृंगार । अति बळ वैराग्याचें थोर । केला मार षडूवर्गा ॥५॥
ऎसे एकांग वीर । विठ्ठल रायाचे डिंगर । बापरखुमादेविवर । तिहीं निर्धारीं जोडीला ॥६॥


पूर्वजन्मीं सुकृतें थोर केलीं । तीं मज आजि फ़ळासि आलीं ॥१॥
परमानंदु आजि मानसीं । भेटी झाली या संतासी ॥२॥
मायबाप बंधु सखे सोयरे । यांतें भेटावया मन न धरे ॥ ३॥
एकएका तीर्थहूनी आगळें । तयामाजी परब्रह्म सांवळे ॥४॥
निर्धनासी धनलाभु झाला । जैसा अचेतनीं प्राण प्रगटला ॥५॥
वत्स बिघडलिया धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा मिनली ॥६॥
हें पियुषा परतें गोड वाटत । पंढरीयाचे भक्त भेटत ॥७॥
बापरखुमादेविवरु विठ्ठले । संत भेटतां भव दु:ख फ़िटलें ॥८॥पंधरा दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो एका दिसें । फ़राळाच्या मिसें धनी घेसी ॥२॥
स्वहित कारण मानवेल जन । हरिकथ पूजन वैष्णवांचे ॥३॥
थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥४॥
तुका म्हणे कां रे सकुमार झालासी । काय जाब देसी यमदुतां ॥५॥

FAQ

प्रश्न- आषाढी एकादशीच्या पाच शुभेच्छा संदेश सांगा ?

१. तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा, तूच रे माझ्या पांडुरंगा,
चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!

२. देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!

३. आषाढी कार्तिकी भक्तजण येती,
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

४. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !

. पाणी घालतो तुळशीला
वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना,
हीच प्रार्थना पांडुरंगाला
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

या पोस्टमध्ये तुम्हाला आषाढी एकादशी शुभेच्छा संधर्भात माहिती दिलेली आहे. हे शुभेच्छा संदेश तुम्ही मोबाईल किंवा सोसिअल प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून आपल्या मित्रांसोबत share करू शकता. तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ते कंमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर या पोस्ट संबंधी काही सूचना असल्यास सांगा. त्याचा आम्ही नक्की विचार करू.

Leave a Comment