Bail pola Wishes In Marathi – बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Bail Pola Wishes In Marathi २०२२ – बैल पोळा हा सण महाराष्ट्रात दरवर्षी साजरा केला जातो. या सणाला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. बैल पोळा हा सण शेतकर्‍यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोक त्यांच्या विश्वासू सोबती, म्हणजे बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात आणि म्हणून बैलांना बैल पोळ्याच्या दिवशी सकाळी आंघोळ घालतात आणि सजवतात. बैल पोळ्याच्या दिवशी दोन मातीच्या बैलांना चणा डाळ आणि गूळ आणि पुरणपोळी अर्पण केली जाते आणि त्यांची शिंगे रंगवली जातात.

हा सॅन होळी किंवा दिवाळी इतका प्रसिद्ध नाही, हे दोन्ही सण देशभर साजरे केले जातात. बैल पोळा हा सण फक्त छत्तीसगड आणि महाराष्ट्रासारख्या काही राज्यांच्या ग्रामीण भागातच साजरा केला जातो. असे असले तरी, तो अद्वितीय आणि विशाल भारतीय संस्कृतीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे.

या वर्षी सरकारने पोळा सॅन साजरा करण्याची परवानगी दिलेली आहे त्यामुळे बैल पोळा देखील सर्व शासकीय नियमांचे पालन करून उत्साहाने साजरा केला जाईल.याच बरोबर तुम्ही , (Bail Pola Shubhecha) बैल पोळ्याच्या कोट्स, शुभेच्छा, संदेश आपल्या परिजनांना आणि मित्रांनापाठवून हा सण साजरा करू शकता.

Bail Pola Wishes In Marathi

Bail pola Wishes In Marathi
Best Bail pola Wishes In Marathi

आज बैलपोळा वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!


महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम जनतेला आणि बंधू भगिनींना
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा


जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा


Polyachya shubhecha Images

Polyachya shubhecha Images
Polyachya shubhecha Images

आज बैलपोळा वर्षभर बळीराजाच्या

खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट

करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती

सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!


हैप्पी बैल पोळा २०२२


सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !


बैल पोळा सणाची संपूर्ण माहिती मराठीमध्ये वाचा Bail Pola Information in Marathi

Pola Status In Marathi

Bail Pola Status In Marathi
Bail Pola Status In Marathi

बाई राबले राबले,
युरती सोन्याचे शिंपले,
बळीराजाच्या धाकुले,
कैसे सजले सजले.

bail pola sanachya sarvana hardik shubhecha

शेतकऱ्यांचा सखा हा,
काळ्या मातीचा राजा हा.
अशा या बळीराजाच्या बैलाला
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा


शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे..
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे..
सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

Bail pola Quotes In Marathi

Quotes on bail pola festival
Quotes on bail pola festival

गळ्यात कंडा पाठीवरती झूल,
आज तुझाच सण तुझाच मान,
तुझ्या अपार कष्टानं भरलं सर शिवार,
एका दिवसाच्या पूजेन कसे उतरतील तुझे उपकार.

Bail Polyachya Hardik shubhecha

तुझ्या कष्टाची साथ लाभते,
घरी सुख-समृद्धीची भरती येते,
आणि आख्या दुनियेचे पोषण होते.
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा


नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा,
दे वचन आम्हास आज या दिनी पोळा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा


Message On Bail Pola

pola mesage In Maratrhi
pola mesage In Maratrhi

कष्ट हवे मातीला
चला जपूया पशूधनाला
बैल पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा!


बैल यामाची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतीक
बैल माझ्या शिवारात काठी हिरवे स्वस्तिक

pola sanachya sarvana hardik shubhecha

बैल पोळा कविता (Bail Pola Poem)

poem for bail pola in marathi
poem for bail pola in marathi

Kavita 1

बळीराजाचा मित्र तू
त्यांच्या डोक्यावरचं छत्र
हरपू न देणारा तू…
शेतकऱ्यांचा राजा तू

सुखातल्या क्षणांचा
गाजावाजा करून देणारा तू…
शेतकरी राजांच्या मातीची
पायाभरणी करून पिक
उत्पादन मिळवून देणारा तू…

कॄषिप्रधान लोकांना
रुबाबदार ऐट मिळवून
देणारा सर्जा राजा तू…
तूझ्या शॄंगारासाठी नेहमी
शेतकरी राजा सज्ज असतो
असा हा सण बैल पोळा…

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Kavita 2

तू रे वाहान शिवाच, कोणी म्हणे तूला नंदी,
तूझ्या असन्याने आहे दारी चैतन्याची नांदी.

तूझी कवड्याची माळ त्याला घुंगराचा नाद,
तूझ्या हंबराला आहे बळीराजा चा आवाज.

तूझी झूल नक्शिदार जस भरल शिवार,
तूझ्या शिंगांचा रूबाब जनु कनिस डौलदार.

पिंजलेला जिव सारा कुणब्याची घुसमट,
तुझ्या असन्यान धिर तूझ्या असन्यान थाट.

तूझ्या साथीला नमन तुझ्या श्रमाला नमन,
तूस्या सवे रान सार राहो सदा आबादान.

बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!

मित्रांनो मी या पोस्टमध्ये बैलपोळा (Bail Pola Wishes in Marathi) शुभेच्छा संदेश जसे कि pola quotes, bail pola status, bail pola message दिलेले आहेत. हि पोस्ट तुम्ही मित्रांसोबत सोसिअल माध्यमातून Facebook, Instgram, whatsapp, Twitter share करू शकता. तुम्हाला पोळ्यासंबंधी शुभेच्छा संदेश पठावाचे असतील तर ते commment करून कळवा. मला आशा आहे तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल.

बैल पोळा सणाची संपूर्ण माहिती मराठीमध्ये वाचा Bail Pola Information in Marathi

Leave a Comment