Best Happy Diwali Wishes In Marathi 2023 ( दिवाळीच्या शुभेच्छा )

Diwali Wishes In Marathi
Diwali Wishes In Marathi

Diwali Wishes In Marathi : – जसे की आपल्याला माहिती आहेच २४ ऑक्टोबर रोजी दिवाळीचा सण महाराष्ट्रासह भारतातील सर्व राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जाणार आहे आणि या दिवशी आपण आपल्या घरात लक्ष्मी व गणपतीची पूजा करतो. त्यानंतर आपण आपल्या नातेवाईक व मित्रांमध्ये प्रसाद वाटप करीत असतो. अशा या दिवाळीच्या दिवशी आपण सर्व मोबाईलद्वारे आपल्या मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali Greetings In Marathi), दिवाळी एसएमएस (Diwali Status In Marathi) पाठवीत असतो आणि तुम्हाला मित्रांकडून दिवाळीच्या शुभेच्छा देखील मिळत असतात. तुम्हालाही तुमच्या मित्रांना दिवाळीशी संबंधित मराठीत दिवाळीच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील. पण तुम्हाला व्हॉट्सअॅप (Whatsapp), इन्स्टाग्राम (Instagram), फेसबुकवर (Facebook) कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा पाठवता येतील हे समजत नाही. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दिवाळीच्या शुभेच्छा संदेश (Diwali Quotes In Marathi), जे तुम्ही कुठेही पाहिले किंवा ऐकले नसतील, जर तुम्हाला या सर्वांबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर हा संपूर्ण लेख वाचा. तर चला मग सुरुवात करूया-

Happy Diwali Wishes In Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Diwali Wishes In Marathi
Happy Diwali Wishes In Marathi

स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..


दिवाळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा


Deepavali wishes in Marathi

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दिवाळीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
शुभ दिवाळी!


चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!


Unique Diwali wishes in Marathi

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!


दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
शुभ दिपावली


दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


वाचानवीनतम दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये

Diwali Quotes In Marathi | Diwali Pahat quotes in Marathi

दिवाळी शुभेच्छा संदेश
दिवाळी शुभेच्छा संदेश

एक दिवा लावु जिजाऊचरणी।
एक दिवा लावु शिवचरणी।
एक दिवा लावु शंभुचरणी।
आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा…..
दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा….
आपल्या घरि सुख समाधान सदैव
नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना॥
।। जय शिवराय ।।
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा !!


सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!


Diwali best quotes in Marathi

सर्व मित्र परिवाराला …
दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!


यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा


Marathi Diwali Wishes Quotes

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!


फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!


वाचानवरात्री शुभेच्छा संदेश Navratri Quotes Wishes Status In Marathi

Diwali Greetings In Marathi

Diwali Greetings In Marathi
Diwali Greetings In Marathi

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…


फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!


Happy Diwali wishes in Marathi text messages

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!


दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!


Diwali quotes in Marathi language

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…


Diwali Status In Marathi | Diwali Message In Marathi

दिवाळीचे व्हाट्सअप मेसेज
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
ही दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.


उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली


Best Diwali message in Marathi

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!


धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !


Diwali wishes in Marathi status

एक करंजी.. आनंदाने भरलेली.. एक शंकरपाळी.. चौकस विचाराची.. एक चकली.. कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली.. एक दिवा.. मांगल्य भरलेला.. एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी.. एक कंदील.. यशाची भरारी घेणारा.. एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे.. एक सण.. समतोल राखणारा.. अन् एक मी.. शुभेच्छा देणारा… तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!


Marathi SMS Diwali Wishes

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा


आनंदाची मुक्तहस्तपणे उधळण करते ही दिवाळी . आप्तजणांच्या गाठीभेटी घडवून आणते ही दिवाळी . सर्वाना एकत्र जमवून प्रेम वाढवते ही दिवाळी . ईवल्या ईवल्या पणत्यांनी उजळून टाकते ही दिवाळी . सुंदर सुंदर आकाशदिव्यानी प्रकाशमय करते ही दिवाळी . लहानांसाठी मजाच मजा घेऊन येते ही दिवाळी . खमंग फराळाचा आस्वाद घ्यायला देते ही दिवाळी . भेटवस्तू आणि भेटकार्डांची देवाणघेवाण घडवते ही दिवाळी . अशी सर्वांचा आनंद द्विगुणीत करते ही दिवाळी . तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना . दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा


Diwali Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला दिवाळीच्या शुभेच्छा

नवऱ्याला दिवाळीच्या शुभेच्छा
नवऱ्याला दिवाळीच्या शुभेच्छा

दिवाळीच्या निमित्ताने मी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीला प्रार्थना करते की
तुम्हाला सदैव बुद्धी, आरोग्य, संपत्ती आणि आनंद मिळो. शुभ दिवाळी !!


माझी दिवाळी खास आहे कारण ती साजरी करण्यासाठी माझ्या आयुष्यात तू आहेस…
गणेश आणि लक्ष्मीने आमच्या लग्नाला आणि आमच्या घरावर सदैव आशीर्वाद द्यावा अशी माझी इच्छा आहे….
माझ्या प्रिय तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


दिवाळीचा हा प्रसंग तुमच्या जीवनात आनंद, यश, संपत्ती, समृद्धी, आरोग्य आणि भाग्य घेऊन येवो हीच सदिच्छा….
खूप प्रेमाने, तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


दिवाळीच्या या सणासुदीच्या निमित्ताने तुमचे आयुष्य लाखो दिव्यांनी उजळून जावो…
तुमचे जीवन आनंद, आरोग्य, यश आणि वैभवाने उजळून जावो अशी प्रार्थना करते.
या येणाऱ्या वर्षात तुम्हाला नवीन संधी मिळोत…
माझ्या प्रिय पती तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!


दिवाळीचा सुंदर प्रसंग आपल्या घरात शाश्वत आनंद, शांती, सौहार्द आणि भरभराट घेऊन येवो…
भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी आपल्या कुटुंबावर बुद्धी आणि वैभवाचा वर्षाव करोत.
दीपावलीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय…आपली दिवाळी आनंदाची आणि उबदार जावो!!!


दिवाळी हा तुमच्या आवडत्या लोकांशी जोडण्याचा खास काळ आहे….
कुटुंब आणि मित्रांसोबत तुमचा आनंद साजरा करण्याची ही वेळ आहे…
एकत्र हसण्याची, एकत्र खाण्याची आणि एकमेकांसोबत आनंदाचे क्षण शेअर करण्याची हीच वेळ आहे.
तुम्हाला जगातील सर्व सुखाची शुभेच्छा. दिवाळीच्या शुभेच्छा.


प्रिय पती, या मजकुराद्वारे तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.
मी तुमच्यासाठी दिवाळी भेटवस्तू आणि मिठाई पाठवते आणि तुम्हाला त्या आवडतील अशी आशा आहे.


Diwali Wishes For Wife In Marathi | बायकोला दिवाळीच्या शुभेच्छा

बायकोला दिवाळीच्या शुभेच्छा
बायकोला दिवाळीच्या शुभेच्छा

दिवाळीची चमक आणि झगमगाट तुझ्या आयुष्यात शाश्वत आनंद आणि शांती घेऊन येवो अशी माझी इच्छा आहे…. माझ्या सुंदर पत्नीला दिवाळीच्या शुभेच्छा.


माझ्या डोळ्यात चमक,
माझ्या ओठांवर हसू आणि माझ्या हृदयातील उबदारपणा प्रिये तुझ्यामुळे आहे …
तुला प्रेमळ आणि आनंदमयी दिवाळीच्या शुभेच्छा….
Happy Diwali my darling.


प्रत्येक अर्थाने मला पूर्ण करणार्‍या माझ्या प्रेमळ पत्नीशिवाय माझे दिवाळी साजरे करणे अपूर्ण आहे….
जगातील सर्वोत्तम पत्नीला दिवाळीच्या विशेष निमित्त हार्दिक शुभेच्छा.


Diwali wishes in Marathi for wife

तुझ्या सर्व समस्या नाहीशा होवोत आणि तुझे जीवन आनंदाने भरून जावो.
तुझे आयुष्य उत्तम आरोग्य आणि संपत्तीने प्रफुल्लित होवो.
माझ्या सर्वात अद्भुत पत्नीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


चला प्रेमाचे दिवे लावू या
आजूबाजूच्या नकारात्मकता संपवू या
सुंदर आणि समृद्ध जीवनाची आशा करूया.
उज्वल उद्यासाठी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्याची मी देवाला प्रार्थना करतो.
दिवाळीच्या शुभेच्छा.


Diwali Wishes For Father In Marathi | बाबाला (Papa) दिवाळीच्या शुभेच्छा

बाबाला (Papa) दिवाळीच्या शुभेच्छा
बाबाला (Papa) दिवाळीच्या शुभेच्छा

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझा रुतबा,
आणि माझे मान आहेत माझे पापा,
मला सदैव हिम्मत देणाऱ्या माझ्या वडिलांचा
मला अभिमान आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा Daddy


जो स्वतःची स्वप्ने सोडून, मुलांची स्वप्ने करतो,
असे माझे वडील या विश्वात माझ्यासाठी अनमोल आहेत
साहेब तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा
हैप्पी दिवाळी Papa


रोषणाईचा पर्व दिवाळी आला आहे,
आपल्या सोबत आनंद घेऊन आला आहे,
दिवाळीचा खूप खूप शुभेच्छा पापा
तुमच्यामुळे हा सॅन माझ्यासाठी हा आला आहे.
Wishing you a very happy Diwali Papa.


माझ्या शब्दां मध्ये एवढी ताकत नाही
जे माझ्या वडिलांची स्तुती करतील
मला सांभाळण्यासाठी ते मर मर राबले
परंतु माझ्यामध्ये एकदातरी त्यांच्यासाठी जीव देण्याची ताकत नाही
Happy Diwali Dad!


दिवाळीचे तेज आणि सकारात्मकता एक नवा अध्याय उजळून टाको अशी मी देवाला प्रार्थना करतो.
नवीन वर्षाच्या आगमनाने तुम्ही नवीन सुरुवात करा.
बाबा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.


मला सावलीत ठेवून
स्वतः मात्र उन्हात जळत राहिले
मी पहिला आहे असा फरिश्ता
आपल्या वडिलांचा रूपामध्ये
I Love You Dad
Happy Diwali Papa


माझे वडील माझे सर्वात मोठे देव आहेत
ते सदैव आनंदी राहू दे
ही माझी एकच इच्छा आहे
हैप्पी दिवाळी साहेब (पापा)


दिवाळीमद्ये दिवा जसा जळत असतो,
त्याचप्रकारे तुम्ही सदैव हसत राहा,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,
तुम्ही सदैव आनंदाचे दीप प्रकाशित करीत राहा .
पप्पांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा


Diwali Wishes For Mother In Marathi | आईला (Mom) दिवाळीच्या शुभेच्छा

आईला (Mom) दिवाळीच्या शुभेच्छा
आईला (Mom) दिवाळीच्या शुभेच्छा

आई, तू या जगातील सर्वात गोड व्यक्ती आहेस,
तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.


माझ्यासाठी आईपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही.
प्रिय आईला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…


आई, तुझ्याकडे आल्यावर माझा माझं मन भरून येत
इतकं प्रेम मिळत की डोळे ओले होतात.
Love you and happy diwali


ती जमीन माझी, तीच माझं आकाश,
ती ईश्वर माझी, तीच भगवान,
का सोडून जाऊ तिला मी,
आईच्या चरणामध्ये तर सारे विश्व आहे.
Happy Diwali Mom


वरती ज्याच्या अंत नाही त्याला आकाश म्हणतात,
जिचे प्रेम कधीच संपत नाही, तिला आई म्हणतात.
आईला दिवाळीच्या शुभेच्छा


मुलाच्या आयुष्यात आईपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही.
नेहमी आनंदी राहा आई,
मला यापेक्षा मोठी इच्छा नाही.
Wishing You Happy Diwali Mom


दीपक हा दिवाळीचा प्रकाश आहे पण माझी आई माझ्या आयुष्याचा प्रकाश आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा आई
Very Very Happy Diwali aai


Diwali Wishes For Family In Marathi | Diwali Wishes For Parents In Marathi

Diwali Wishes For Parents In Marathi
कुटुंबाला- परिवाराला दीपावलीच्या शुभेच्छा

दिवाळीची रोषणाई, आयुष्यभर उजळू दे,
फराळाचा गोडवा, जिभेवर असू दे,
नात्यांची वीण अशी, कायम घट्ट राहू देत..
दीपावली च्या शुभेच्छांची, बरसात होऊ देत..
तुम्हां सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा….!


दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.
Wishing Very Happy Diwali


हसत राहा, हसता हसता दिपक लावा,
जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा
Happy Diwali To You


Diwali wishes in Marathi words

तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


शुभ दीपावलीच्या निमित्ताने सारे एकत्र येतात,
जुने हेवेदावे विसरतात,
सर्वांच्या संसारात राहो सुख-शांती आणि समाधान,
प्रत्येक घरावर होवो सुखांचा वर्षाव.
शुभ दिवाळी


दिवाळीत फक्त फटाकेच नाहीतर ईर्ष्येचाही होऊ दे नाश,
होऊ द्या मनातील नकारात्मक विचारांचीही सफाई,
तेव्हाच होईल खरी शुभ दिपावली.
हैप्पी दिवाळी संदेश

Diwali Wishes For Friends In Marathi | मित्राला दिवाळीच्या शुभेच्छा

मित्राला दिवाळीच्या शुभेच्छा
मित्राला दिवाळीच्या शुभेच्छा

आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


तुझा दिवा प्रज्वलित होवो,
सर्व जगाचे सुख तुझ्या घरी येवो,
तुझे मन गंगा आणि यमुनेसारखे निर्मळ होवो,
तुझे शरीर अंबर आणि पृथ्वीसारखे स्वच्छ होवो,
या नगरीत तुझा प्रकाश प्रकाशमान होवो.
दिवाळीच्या प्रकाशमय शुभेच्छा


दिवाळी हा दिव्यांचा सण आहे,
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू,
आनंद आणि समृद्धी घेऊन येवो,
तुमच्या प्रियजनांना सर्व आनंद आणि प्रेम घेऊन येवो,
या मंगल प्रसंगी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


रात्री लवकर झोपी गेलो,
सकाळी उठलो, दिवाळी आली,
वाटलं तुला दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्या,
त्याअगोदर तुझा मिस कॉल आधीच आला.
Happy Diwali To All My Lovely Friends


Diwali wishes for best friend in Marathi

हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!


जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


Diwali wishes in Marathi for boyfriend

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

वसुबारस शुभेच्छा मराठी | Vasubaras Wishes Marathi

वसुबारस शुभेच्छा मराठी
वसुबारस शुभेच्छा मराठी

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा!


गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.
वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!


आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस!
ही दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची
आणि भरभराटीची जावो..!


Diwali first day wishes in Marathi

गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी,
दुध-दुभत्याची सदा व्हावी वृद्धी,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी,
गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी !
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त,
आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!


स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..
परमपुज्य जी वंद्य या भारताला,
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..
Vasubaras Wishes Marathi..!


Dhantrayodashi Wishes in Marathi | Happy Dhanteras Wishes in Marathi

Dhantrayodashi Wishes in Marathi
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची.
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा


आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ..
धनत्रयोदशी शुभेच्छा


लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!


धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची..


आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!


धनत्रयोदशीने होते सुरुवात,
आज या दीपपर्वाची..
समस्त मित्रपरिवारांना,
ही दिवाळी जावो सुख-सम्रुद्धीची..
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा..!


आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो..
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो..
आप्तेष्ठांची सदैव साथ असो..
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो..
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!


Narak Chaturdashi Shubhechha Marathi

Narak Chaturdashi Shubhechha Marathi
नरक-चतुर्दशी शुभेच्छा

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो !
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !
आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !


जसा श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश केला
त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून दुःखाचा नाश होवो!
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !


Laxmi Pujan Wishes in Marathi | दिवाळी लक्ष्मीपूजा

Laxmi Pujan Wishes in Marathi
दिवाळी लक्ष्मीपूजा

महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!


उंबरठा ओलांडून आज,
लक्ष्मी येईल घरोघरी..
भक्तीभावे होईल लक्ष्मीपूजन,
घर चैतन्याने जाईल भरून..
लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा..!


दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा


समईच्या शुभ्र कळ्या लक्ष्मीपूजनी तळपती,
दिवाळीच्या पणतीने, दाही दिशा झळकती..
लक्ष्मीपूजनच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!


रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळू दे..
लक्ष्मीच्या पावलांनी,
घर सुख-समृद्धीने भरू दे..
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!


लक्ष्मी आली सोनपावली,
उधळण झाली सौख्याची..
धन-धान्यांच्या भरल्या राशी,
घरी नांदू दे सुख-समृद्धी..!
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!


तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर,
सदैव कृपा राहो..
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!


सुख आणि समृद्धी घेउनी,
आगमन व्हावे लक्ष्मीचे..
दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे,
भविष्य उद्याचे..
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!


Diwali Padwa Wishes in Marathi | दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी

Diwali Padwa Balipratipada Wishes in Marathi
दिवाळी पाडवा- बलिप्रतिपदा शुभेच्छा मराठी

ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..
सर्वांना बलिप्रतिपदा,
दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा!


Marathi messages for Diwali Padwa

आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा..
शुभ दीपावली!


Diwali Padwa messages in Marathi for husband

सुमुहूर्तावरी पाडव्याच्या..
एकात्मतेचे लेणं लेऊया..
भिन्न-विभिन्न असलो तरी..
मनाने एक होऊया..
दिवाळी पाडव्याच्या नवऱ्याला शुभेच्छा


आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा!
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा!
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो!
आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!


Diwali Padwa quotes in Marathi

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे,
उत्तम दिनाचे माहात्म्य आहे,
सुखात जावो तुम्हाला हा पाडवा,
असाच राहो नात्यातला गोडवा..
शुभ दिवाळी पाडवा!


Bhaubeej Wishes Marathi । भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

Bhaubeej Wishes In Marathi
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण..
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!


नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!


सण भाऊबीजेचा आला,
मनी आनंद फार झाला..
भाऊबीजेची ओवाळणी,
सुखी ठेव देवा भावाला..
Happy Bhaubeej!


जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीज निमित्त सर्वांना मनस्वी शुभेच्छा!


Funny Diwali wishes in Marathi | Diwali Funny Quotes

Diwali Funny Quotes In Marathi
Diwali Funny Quotes In Marathi

अनेकांच्या मनात हट्टीपणा असतो
फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यासाठी,
पण तुम्ही लक्षात ठेवा
आम्हीही तयार आहोत
तुमच्या खुर्चीखाली फटाके फोडण्यासाठी


फुलझडी सारखे हास्य
चिंगारी समान अदा
प्रत्येक दिवाळीत तुलाच जाळेण
कारण दिवाळीच्या रंगात तू दिसते बम


दिवाळीला एकाच काडी मधून ४-५ दिवे लावू नका
यामुळे वडिलांना शंका येते की,
मुलगा सिगारेट पीत आहे
जनहितार्थ जाहीर
दिवाळीच्या शुभेच्छा


Diwali Marathi comedy quotes

जर तुमच्या मैत्रिणीने तुमच्याकडून चंद्र आणि तारे मागितले,
तर आज रॉकेट विकत घ्या आणि त्यावर त्यावर तिला बसावा, व रॉकेटला पेटवा…
Wish you a Very Happy Diwali and Safe Diwali


डोळ्यातील अश्रू पुसून टाका,
मनापासून दु:खांना निरोप द्या,
मन कुठं लागत नसेल तर माझ्या घरी या
आणि
माझे घर स्वच्छ करा…आणि लक्षात ठेवा
ही ऑफर फक्त दिवाळीपर्यंत आहे


न्यायालयाने फटाके बंद केले, सरकारने दारू केली
आणि डॉक्टरांनी तूप आणि गोड बंद केले, आता एकच मार्ग उरला आहे
बटाट्याचे पराठे खा आणि दिवाळी साजरी करा..


Short Diwali quotes in Marathi

कृपया दिवाळीचे लांबलचक संदेश पाठवू नका, वाचक दिवाळीची सफाई करण्यात व्यस्त आहे.


दिवाळीत फटाके फोडू नका तर फटाके बनून इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करा.


Leave a Comment