Christmas Information in Marathi – नाताळ आणि सांताक्लॉज विषयी माहिती

Christmas Information in Marathi
Christmas Information in Marathi

मित्रांनो, आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये ख्रिसमस सणाबद्दल माहिती सांगणार आहे, म्हणजेच आजचा आपला विषय ख्रिसमस या सणाविषयी आहे. लोकांना अजूनही या विषयाची संपूर्ण माहिती नाही, मी तुमच्यासाठी या पोस्टमध्ये ख्रिस्तमसची ( Christmas Information in Marathi ) सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Christmas Information in Marathi | ख्रिस्तमस सणाविषयी माहिती

ख्रिसमस – Christmas हा ख्रिश्चन धर्माचा मुख्य सण आहे. ज्याची प्रामुख्याने मुलं वर्षभर वाट पाहत असतात. ख्रिसमस – Christmas हा इसा मसिह किंवा प्रभू येशूच्या जन्माच्या आनंदात साजरा केला जाणारा सण आहे. हा सण २५ डिसेंबर रोजी संपूर्ण जगातील बहुतेक देशांमध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. शाळेत, मुलांना ख्रिसमसबद्दल १० वाक्ये किंवा ख्रिसमसवर निबंध लिहिण्यास सांगितले जाते.

ख्रिसमस डे ( Christmas Day) पहिल्यांदा रोममध्ये इ.स. ३३६ मध्ये साजरा करण्यात आला. ख्रिसमसच्या दिवशी लोक केक कापतात, एकमेकांना भेटवस्तू देतात आणि पार्टी करून हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. (Natal) ख्रिसमस हा असा सण आहे, जो केवळ परदेशातच मोठ्या थाटामाटात साजरा केला जात नाही, तर भारतातही या सणाबद्दल लोकांमध्ये खूप उत्साह असतो आणि लोक तो नवीन वर्षापर्यंत साजरा करतात. हा सण प्रेम आणि सौहार्दाचा आदर्श संदेश लोकांना देत असतो. तर चला मग जाणून घेऊया नाताळ (xmas information in marathi) का साजरा केला जातो.

ख्रिसमस का साजरा केला जातो? | Why WE Celebrate Christmas

ख्रिसमस (नाताळ) मागची कहाणी (कथा) – Christmas Story

ख्रिसमसचा इतिहास (Christmas History) – ख्रिसमस डे, हा प्रेम आणि सौहार्दाचा सण आहे आणि तो हजारो वर्षांपासून साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्माचे धार्मिक पुस्तक बायबलनुसार (Bibal) ख्रिस्ती धर्माचे प्रमुख प्रभु येशू ख्रिस्त यांचा जन्म या दिवशी मदर मेरीच्या गर्भातून झाला, म्हणून हा सण साजरा केला जातो.

त्याच वेळी, असे देखील मानले जाते की येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीच असे भाकीत केले गेले होते की पृथ्वीवर भगवंताचा एक पुत्र जन्माला येईल जो मोठा होऊन राजा होईल आणि त्याच्या राज्याला कोणतीही सीमा राहणार नाही.

याशिवाय, येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी असे भाकीतही करण्यात आले होते की, हा पुत्र संपूर्ण जगाला दुःखातून मुक्त करेल आणि लोकांना योग्य मार्गदर्शन करून योग्य मार्गावर चालण्यास शिकवेल आणि संपूर्ण जगाचा उद्धार करेल. काही काळासाठी, नंतर असे घडले की त्याने आपले जीवन इतर लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले.

इसा मसिहचा जन्म

तुम्हाला सांगतो की आई मरियम आणि युसूफ यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही जुडिया प्रांतातील ब्रेथलेहेम नावाच्या ठिकाणी राहू लागले. इथेच एका रात्री गोठ्यात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. असे म्हणतात की त्याच दिवशी आकाशात एक तारा चमकत होता आणि त्यामुळे लोकांना समजले की मशीहाने रोमच्या राजवटीतून मुक्तता करण्यासाठी जन्म घेतला आहे. याकारणास्तव लोक येशू ख्रिस्ताचा जन्म ख्रिसमस डे (christmas day) म्हणून साजरा करीत असतात.

नाताळ सणाविषयी वेगवेगळ्या अभ्यासकांची वेगवेगळी मते आहेत. त्याचबरोबर ख्रिश्चन धर्माच्या लोकांसाठी या सणाचे वेगळे महत्त्व आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सुरुवातीच्या काळात ख्रिस्ती धर्माच्या लोकांचे येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी एकसारखे मत नव्हते, कोणी १४ डिसेंबर, कोणी १० जून तर कोणी त्यांचा वाढदिवस २ फेब्रुवारीला साजरा करायचे. नंतर तिसऱ्या शतकात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस २५ डिसेंबर रोजी साजरा केला जाऊ लागला.

पूर्वी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन (कट्टरतावादी) आणि प्युरिटन (शुद्धतावादी) ख्रिश्चनांनी ख्रिसमस सण साजरा करण्यास नेहमीच विरोध दर्शविला.
त्याच वेळी, १६४५ मध्ये, ऑलिव्हर क्रॉमवेल आणि त्याच्या प्युरिटन सैन्याने इंग्लंडवर कब्जा केला तेव्हा त्यांनी प्रथम ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी घातली, परंतु काही काळानंतर जेव्हा चार्ल्स-द्वितीयने इंग्लंडवर राज्य आले तेव्हा जनतेच्या मागणीनुसार पुन्हा ख्रिसमस सण साजरा करण्यात आला.

बोस्टनमध्ये १६५९ ते १६८१ पर्यंत ख्रिसमस साजरा करण्यास कायदेशीर बंदी होती, ज्यांनी तो साजरा केला त्यांना ५ शिलिंगचा दंडही ठोठावण्यात आला होता, जो त्या काळानुसार खूप मोठा दंड होता. याशिवाय, अमेरिकन क्रांतीनंतर, इंग्रजी शिष्टाचार देखील वाईट मानले गेले. यानंतर, २६ जून १८७० रोजी अमेरिकेत पहिल्यांदा ख्रिसमसला फेडरल हॉलिडे (सार्वजनिक सुट्टी) म्हणून घोषित करण्यात आले.

अशा प्रकारे हळूहळू जगभरात नाताळचा सण साजरा होऊ लागला. त्याच वेळी, या दिवशी अनेक देशांमध्ये राज्य सुट्टी देखील घोषित करण्यात आली आहे.

२५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा करण्याबाबत वेगवेगळ्या कथा प्रचलित असल्या तरी. ख्रिसमस पासून १२ दिवस ख्रिसमस टाईड या पर्वाची देखील सुरुवात होत असते.

सांताक्लॉज कोण आहे? – Who is Snata Claus

आज ख्रिसमस सणाचा अर्थ सांता क्लॉज असा झाला आहे, लाल-पांढऱ्या रंगाच्या पोशाखात लांब पांढरी दाढी आणि लांब केस असलेला आणि खांद्यावर चॉकलेट आणि मुलांसाठी भेटवस्तूंनी भरलेली पिशवी आणि ख्रिसमसची घंटा हातात घेऊन येणारा Snata Claus. मग तो मुलांना भेटवस्तू देऊन त्यांना आनंदाने जीवन जगण्याचा आशीर्वाद देत असतो.

मुले वर्षभर सांताक्लॉजची वाट पाहत असतात, तर सांताला ख्रिसमस फादर असेही म्हणतात. कारण ख्रिसमसच्या शुभमुहूर्तावर त्यांचे लाडके सांता अंकल येऊन त्यांना चॉकलेट आणि भेटवस्तू देतील, यावर मुलांना पूर्ण विश्वास असतो. त्याचबरोबर यानिमित्ताने बहुतांश शाळांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याच वेळी, ख्रिसमसची कल्पना सांताक्लॉजशिवाय अपूर्ण आहे.

संत निकोलस हे सांताचे जनक – Saint Nicholas

दुसरीकडे, सेंट निकोलस, ज्यांचा जन्म दीड हजार वर्षांपूर्वी झाला, ते तुर्कस्तानच्या मीरा शहराचे बिशप होते, त्यांनाही खरा सांता किंवा सांताचा जनक मानले जाते. खरंतर संत निकोलस यांनाही लहान मुले आवडायची आणि ते मुलांना भेटवस्तू देत असत. त्यामुळे लोकांना संत निकोलस यांचा आदर वाटू लागला. आणि त्याचवेळी त्यांच्या मनामध्ये सांताक्लॉजची कल्पना केली जाऊ लागली.

संत निकोलस आणि येशू यांच्या जन्माचा थेट संबंध नसला तरी सांताक्लॉज आजही ख्रिसमसचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्याशिवाय नाताळ सण अपूर्ण आहे.

विद्वानांच्या मते, सेंट निकोलसचा जन्म मायरा येथे तिसऱ्या शतकात, येशूच्या मृत्यूच्या २८० वर्षांनंतर झाला होता आणि ते एका सुखी आणि समृद्ध कुटुंबातून आले होते. त्यांनी लहानपणीच आपले आई-वडील गमावले आणि लहानपणापासूनच त्यांची प्रभु येशू ख्रिस्तावर गाढ श्रद्धा होती आणि याच कारणास्तव ते मोठे झाल्यानंतर ख्रिश्चन धर्मगुरू (पाजारी) आणि नंतर बिशप बनले.

येशू ख्रिस्त एक उदार आणि धार्मिक व्यक्ती होते, त्यांना गरजू आणि मुलांना भेटवस्तू देणे आवडायचे आणि तुम्हाला सांगतो की सेंट निकोलस बहुतेक भेटवस्तू फक्त मध्यरात्री देत ​​असत. कारण त्यांना कुणी भेटवस्तू देताना पाहावे असे वाटत नव्हते, म्हणजेच त्यांना गुपचूप मुलांना भेटवस्तू देणे आवडायचे, त्यामुळे तुम्ही अनेकदा पालकांना असे म्हणताना ऐकले असेल की जर ते लवकर झोपले नाहीत तर सांताक्लॉज त्यांना भेटवस्तू द्यायला येणार नाहीत.

सांताक्लॉज कुठे राहतो आणि त्याचा पत्ता – Where Santa Claus Live

लोक याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा मानतात, पण सांताक्लॉजच्या पत्त्याबद्दल असे म्हटले जाते की सांता उत्तर ध्रुवावर त्याच्या पत्नीसह अनेक बुटक्यांसोबत राहतो. तिथे एक खेळण्यांचा कारखाना आहे जिथे वर्षभर सांताचे बुटकी माणसे बरीच खेळणी तयार करीत असतात
.
असे देखी म्हटले जाते की, सांताचे जगभरात अनेक पत्ते आहेत, जिथे मुले त्यांची पत्रे पाठवतात, परंतु बहुतेक पत्रे त्याच्या फिनलँड पत्त्यावर पाठवली जातात.

त्याच वेळी, लोकांना या पत्त्यावर पाठवलेल्या प्रत्येक पत्राचे उत्तर देखील मिळते. त्याच वेळी, आपण खाली दिलेल्या पत्त्यावर सांताला आपले पत्र देखील पाठवू शकता.

सांताचा पत्ता – Santa Claus Address

सांता क्लॉज,
सांता क्लॉज विलेज,
एफआईएन 96930 आर्कटिक सर्कल,
फिनलैंड

तर अनेक ठिकाणी सांताचे पोस्टल स्वयंसेवक असतात, जे या पत्रांना सांताच्या नावाने उत्तर देतात. त्याचबरोबर या तांत्रिक आणि आधुनिक युगात देश-विदेशातील अनेक मुले संताला पत्रांऐवजी ई-मेल पाठवतात. ज्याचे उत्तर त्यांनाही मिळते. त्याचबरोबर नाताळच्या दिवशी त्यांच्या मनोकामनाही पूर्ण होतात.

ख्रिसमस ट्री चा इतिहास – History of Christmas Tree

Christmas tree information in marathi – ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्रीला सर्वात जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी झाडांना सजवण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. त्याच वेळी, ख्रिसमस ट्रीबद्दल असेही म्हटले जाते की ख्रिसमस ट्री हे जीवनाच्या निरंतरतेचे प्रतीक आहे.

असाही एक समज आहे की ख्रिसमस ट्री सजवल्याने मुले दीर्घायुषी होतात, यासाठी नाताळच्या दिवशी ख्रिसमस ट्री सजवण्यात येत असते.

लोक नाताळ वृक्ष (Christmas Information in Marathi) सजविण्यासाठी अगोदरच तयारी करतात, ते या ख्रिस्तमस ट्री ला रंगीबेरंगी लाइटिंग लावून प्रकाशाने झगमगून टाकतात. याची सुरुवात युरोपमध्ये काही हजार वर्षांपूर्वी झाली होती.

काही भागांमध्ये जेव्हा नाताळच्या निमित्ताने सदाहरित वृक्षराजींची सजावट करण्यात येते आणि (christmas tree) त्यांना साखळीच्या मदतीने घराबाहेर टांगण्यात यायचे. काही माणसे ही झाडे महाग असल्यामुळे विकत घेऊ शकत नव्हते म्हणून ते लाकडाला पिरॅमिडचे आकार देत आणि त्यांना सुंदर सजवून christmas tree तयार करीत जे आपण नाताळमध्ये करीत असतो.

ख्रिसमस ट्री सजावण्यामागची एक आख्यायिका

ख्रिसमस (Christmas Information in Marathi) हा सदाहरित वृक्ष सजवून साजरा केला जातो, झाडाला सजवण्याची परंपरा जर्मनीपासून सुरू झाली, ज्यामध्ये आजारी मुलाला खूश करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला एक सुंदर सजवलेले सदाहरित झाड भेट दिले.

याशिवाय असेही म्हटले जाते की जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा सर्व देवतांनी आनंद व्यक्त करण्यासाठी सदाहरित झाडाची सुंदर सजावट केली आणि तेव्हापासून ते ख्रिसमस ट्री चे प्रतीक मानले गेले आणि ख्रिसमस ट्री सजवण्याची ही परंपरा रूढ झाली.

ख्रिसमस ट्री (Christmas Tree) सजवण्याची सुरुवात सर्वप्रथम बोनिफान्स टुयो नावाच्या इंग्रजाने १० व्या शतकाच्या मध्यात जर्मनीमध्ये केली होती.

आता आपण ख्रिसमस ट्री शी संबंधित काही खास गोष्टी पाहणार आहोत – (Facts about the Christmas Tree)

१) जर्मनीमध्ये प्रथमच ख्रिसमसच्या झाडावर सफरचंद लावण्यात आले

आपण बघितले आहेच ख्रिसमसला सजवण्याची परंपरा जर्मनीपासून सुरू झाली. त्याच वेळी, १९ व्या शतकात, नाताळ वृक्ष देखील इंग्लंडमध्ये सजवले जाऊ लागले, नंतर हळूहळू ख्रिसमस सजवण्याची परंपरा इतर अनेक देशांमध्ये पाळली गेली आणि अशा प्रकारे, ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्री (Christmas Tree) सजवणे हा एक ट्रेंड सुरु झाला.

ख्रिसमस ट्री सजवण्याची आणि त्यात खाद्यपदार्थ ठेवण्याची प्रथा सर्वप्रथम जर्मनीमध्ये सुरू झाली. त्यात सोन्याच्या पेपर मध्ये गुंडाळलेले सफरचंद, जिंजरब्रेडने साहाय्याने लावण्यात आले होते.

२) प्रभु येशूच्या जन्मानिमित्त देवदूताने मदर मेरीला सदाहरित वृक्ष भेट दिले होते

ख्रिसमस ट्री ख्रिश्चन धर्माचे प्रमुख प्रभु येशू ख्रिस्त यांच्या जन्माशी देखील संबंधित असल्याचे मानले जाते. त्याच वेळी, जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा तेथे देवदूत देखील होते त्यांनी येशूचे आई-वडील (मेरी आणि जोसेफ) यांचे अभिनंदन केले.

देवदूतांनी त्या दोघांना ताऱ्यांनी प्रकाशित केलेली सदाहरित झाड भेट दिले. तेव्हापासून सदाहरित christmas – ख्रिसमस ट्री म्हणून ओळखले गेले.

३) कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन ख्रिसमस ट्री सजवतात

ख्रिसमसच्या सणापासून, ख्रिश्चन धर्माचे अनुयायी लाकडापासून ख्रिसमस ट्री तयार करतात आणि नंतर ते सजवतात. त्याच वेळी, मुख्यतः मेणबत्त्या, टॉफी, घंटा आणि विविध रंगांच्या रिबन्सचा वापर करून ते सुंदरपणे सजवितात. सोबतच असे मानले जाते की याला घरात ठेवल्याने वाईट आत्मा दूर जातात आणि सकारात्मक असलेल्या आत्मांच्या ऊर्जेचा प्रवाह वाहतो.

ख्रिस्तमसची अनेक दिवस आधीपासून तयारी सुरू होते व त्याचबरीबर ख्रिश्चन समुदायाकडून कॅरोल गायले जातात आणि प्रार्थना केल्या जातात. यासोबतच जगभरातील चर्च या दिवशी खास सजवल्या जातात आणि जगभरातील चर्चमध्ये येशूची जन्मकथा प्रदर्शित केली जाते आणि भक्तिगीते गायली जातात.

christmas २४-२५ डिसेंबरच्या रात्रीच्या मध्यात म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच वाढदिवस साजरा करण्यात येते व चर्चमध्ये ख्रिसमस ट्री देखील सजवल्या जाते. या दिवशी चर्चमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्यामुळे इथे पुष्कळ गर्दी असते.

FAQ

प्रश्न – नाताळ (ख्रिस्तमस) कोणत्या तारखेला साजरे केल्या जाते?

उत्तर – २५ डिसेंबर

प्रश्न – येशूचा जन्म कुठे झाला?

उत्तर – ब्रेथलेहेम

प्रश्न – नाताळ हा कोणत्या धर्मियांचा सॅन आहे?

उत्तर – ख्रिश्चन

प्रश्न – ख्रिसमस ट्री (Christmas Tree) सजवण्याची सुरुवात सर्वप्रथम कुणी केली?

उत्तर – बोनिफान्स टुयो

प्रश्न – मदर मेरीला सदाहरित वृक्ष कोणी भेट दिले?

उत्तर -देवदूतांनी

प्रश्न – ख्रिसमस ट्री सजवण्याची प्रथा सर्वप्रथम कुठे सुरू झाली?

उत्तर -जर्मनी

प्रश्न – सांता santa claus कुठे राहतो?

उत्तर -उत्तर ध्रुव

प्रश्न – सांता santa claus चे जनक कोण?

उत्तर -संत निकोलस

अशाप्रकारे मित्रांनो आज आपण (Christmas Information in Marathi language) नाताळ या सणाविषयी जाणून घेतले आहे मला आशा आहे की ही पोस्ट तुमच्या ज्ञानात भर पाडेल आणि ख्रिस्तमस सनाविषयी तुमच्या मनात कुतुहूल आणि आदर निर्माण करेल. ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र आणि प्रियजनांसोबत सोसिअल मीडियावर ( Facebook,Twitter, Whatsapp, Instagram ) Share करायला विसरू नका, आणि हो हा माझा छोटासा प्रयत्न आहे, या पोस्टला आणखी सुंदर आणि माहितीयोग्य बनविण्यासाठी तुमच्या काही सूचना असतील तर commnet बॉक्समध्ये कंमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment