संगणकाची A to Z माहिती आणि इतिहास | Computer Information In Marathi

संगणकाचा परिचय

संगणक (computer) हे एक इलेक्ट्राँनिक यंत्र आहे. जे डाटा प्रोसेस (process) करणे आणि स्टोअर (store) करणे यासाठी वापरले जातात.

काम्पुटर म्हणजे काय ? | What is the computer

What is computer हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी येत असतो. तर मित्रांनो कॉम्प्युटरला मराठीमद्ये संगणक असे म्हणतात.

कंप्युटर हा शब्द इंग्लिशच्या कम्प्युट ( compute ) या शब्दापासून बनलेला आहे. कंप्युटर म्हणजे आकडेमोड किंवा गणना करणे होय. याचा आविष्कार calculation (गणना) करण्यासाठी झाला होता.

५० वषार्पूवी जेव्हा काम्प्युटर हा शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यतः गणना करण्यासाठीच केला जात असे, अलिकडे संगणकाचा वापर तर अनेकप्रकारे होवू लागला आहे. उदाहरणामध्ये माहीती पाठविणे (sending information), तिचे वर्गीकरण करणे (classification of information), ध्वनी तयार करणे (making of sound), चित्रीकरण करणे (making video) इतर अनेक कामासाठी संगणकाचा वापर केला जातो.

थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक तेच काम करतात जे आपण त्याला सांगीत असतो. संगणकामध्ये विचार करण्याची क्षमता नसते. संगणक हे फक्त माहीती स्विकारणारे, दिलेल्या सूचनानुसार माहीती प्रक्रिया करुन अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रॉनिक्स यंत्र/Machine आहे.

संगणकाचे पिता कोण आहेत ? | Who Is Father Of Computer

चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचे पिता (जनक) म्हटल्या जाते तसेच .चार्ल्स बॅबेज (१७९१-१८७१) हे एक विलक्षण प्रतिभावान शास्त्रज्ञ, गणितज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि अभियंता होते. 1791 मध्ये लंडनमध्ये जन्मलेले बॅबेज हे एक उत्तम गणिती प्रतिभाशाली होते.

ते एक ( natural Inventor ) नैसर्गिक शोधक होते आणि त्यांनी सर्व प्रकारच्या नवीन उत्पादनांचा शोध लावला.होता. त्यांना विश्लेषणात्मक इंजिनचा (analytical engine ) शोधक म्हणून ओळखले जाते. विश्लेषणात्मक इंजिनमध्ये ALU (अंकगणित तर्कशास्त्र एकक), मूलभूत प्रवाह नियंत्रण आणि एकात्मिक मेमरी असते; जी पहिली सामान्य-उद्देशीय संगणक (first general purpose computer ) संकल्पना म्हणून विकसित झाली.

संगणकाचा इतिहास | History of computer

आपलया प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी (Number system) आपण शिकलो आहोत. आजही आपण मणी लावलेल्या पाट्याचा उपयोग करतो. प्राचीन काळी चीनमध्ये अंकमोजणीसाठी बॅबिलोनियन संस्कृतीत “अबॅकस ” (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता.

संगणकाचा जनक ‘चार्लस बैबेज’ {charles babbage} ला म्हणतात चार्लस बैबेजचा जन्म लंडनमध्ये झाला. लंडनमध्ये इंग्रजी भाषा बोलतात. इंग्रजीमधून कोणताही शब्द घेतला नाही कारण की इंग्रजी भाषा ही प्राचीन ग्रीक व लैटिन भाषा यावर आधारित आहे. इंग्रजीमधील शब्द हे ग्रीक व लैटिन भाषेमधून घेतलेले आहे. म्हणून कंप्यूटर (computer) अशी मशीन जी फक्त गणना करते. त्याच्यासाठी लैटिन भाषेमधील शब्द कंप्यूट (compute) हा घेतला गेला आहे.

१८८० साली डाँ. हमर्न होलेरिथ या अमेरिकन शास्त्रज्ञाने Punch card प्रणालीचा शोध लावला आणि या प्रणालीच्या साहाय्याने कोणतेही काम वेगाने पार पडू लागले. १९४७ साली अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठ व आईबीएम या कंपनीने संयुक्त जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला. त्याचे नाव इलेक्ट्रानिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कैलकुलेटर (Electronics numerical integretor and calculator) आहे.

संगणक फक्त किंवा हेच अंक समजू शकतो. २००० वर्षपूर्वी एंटीकाईथेरा तंत्र एक खगोलीय कैलकुलेटर होता. ज्याचा उपयोग प्राचीन यूनानमध्ये सौर आणि चंद्रग्रहणाला ट्रॅक करण्यासाठी केला जात असे. एटीकाईथेरा यंत्र २००० वर्ष जुना आहे. युनानी एटीकाईथेरा सिस्टीमला खगोलीय आणि गणितीय अंकाचा अनुमानलावण्यासाठी विकसित करण्यात आले होते.

पास्कलाईन काय आहे ? What is Pascaline

पास्कलाईन ( pascalaine ) – सन १६४२ अबेक्स नंतर पास्कलाईनचा निर्माण झाला. याला गणित विषयातील विशेषज्ञ ब्लेज पास्कल यांनी (१६४२) साली निर्माण केले. हा पहिला मैकेनिकल कैलकुलेटर होता जो अधिक चलद गतीने गणना करीत होता. या मशीनला एडिंग मशीन म्हटले जात असे आणि.याच मशीनला Pascalaine म्हटले जाते.

डिफरेंज इंजन म्हणजे काय ? | What is Difference Engine

डिफरेंज इंजन – सन १८२२ डिफरेंज इंजन सर चालर्स बैबेज यांनी तयार केला. असा यंत्र की तो अधिक सोयीस्करपणे गणना करीत होता. १८२२ साली डिफरेंज इंजन याची निर्मिती झाली. हा वाफेवर चालनारा computer होता. याच आधारावर आजही computer बनविले जातात. म्हणून चालर्स बैबेजला computor चा जनक म्हणतात.

जुसे जेड -३

जुसे जेड-३ – सन १९४१ महान वैज्ञानिक ‘कोनार्ड जुसे’ यांनी ‘zuse – z’ नावाचा एक अद्भूत यंत्र तयार केला. जो द्वि-आधारी अंकगणित व चल बिंदू अंगणितांची गणना करीत असे.

.Eniac

.Eniac (Electronic numerical and computer) – सन १९४६ world war II मध्ये अमेरिकेच्या मिलिटरी ने तयार केले. eniac हा दहा अंकगणितीय प्रणालीवर कार्य करीत असे. नंतर हा संगणक पुढे आधुनिक संगणक म्हणून प्रसिध्द्व झाला.

मैनचेस्टर स्माल स्केल मशीन | SSEM

मैनचेस्टर स्माल स्केल मशीन – १९४८- ssem हा असा पहिला संगणक होता की जो कोणत्याही प्रोग्रामला वैक्युम ट्यूब [vacume tube] मध्ये सुरक्षितरित्या ठेवीत असे. याचे टोपणनाव baby ठेवण्यात आले होते. याची निर्मिती फ्रेडरिक विलियम्स आणि टॉम किलबर्न यांनी केली.

अशाप्रकारे आपण संगणकाचा इतिहास आपण कव्हर केला आहे.

COMPUTER चे पूर्ण नाव काय ? | Full Form of Computer in Marathi

संगणकाचा वापर असंख्य क्षेत्रात केला जातोय, त्यामुळे Computer या शब्दाचा एक निर्धारित Full Form असणे शक्य नाही. तरीही मी लोकप्रियतेच्या आधारे आणि अर्थाला मिळून एक Full Form खाली दिलेला आहे

.

C – Commonly
O – Operating
M – Machine
P – Particularly
U – Used In
T – Technology
E – Education and
R – Research

संगणकाच्या पिढ्यांचा इतिहास |Computer Generation History

संगणकांची पिढी मराठी मध्ये याची अगोदर थोडी माहिती पाहूया कॉम्पुटर सुरुवातीला खूप मोठे, वजनी, किंमतीला जास्त असायची. वेळेनुसार यांच्यामध्ये खूप बदल झाले. या बदलामुळे computer च्या नव्या पिढीचा जन्म झाला. प्रत्येक पिढीनंतर computer (कंप्यूटर) च्या आकार-प्रकारामध्ये तसेच कार्यप्रणाली आणि कार्यक्षमता यांच्यामध्ये बदल होत गेले. त्यामुळे आधुनिक काळातील नविन computer [कंप्यूटर] आपल्याला मिळायला सोपी झाले.

1. पहिल्या पिढीतील संगणक | first generation computer

पहिल्या पिढीतील संगणक (computer) :- टाईमलाईन [१९४२- १९५५] या पिढीच्या कंप्युटरमध्ये वैक्युम ट्यूबचा [vacume tube] उपयोग केला जात असे. त्यामुळे यांचा आकार मोठा होता व याला वीज सुद्धा जास्त लागत होती. हे ट्यूब जास्त गर्मी निर्माण करीत असत आणि या कॉम्पुटरमद्ये ऑपरेटिंग सिस्टिम नसायचे.(no operating system). यामध्ये असणाऱ्या प्रोग्रामांना पंचकार्डमध्ये (punch card) साठवून (store) ठेवले जात असे, त्यावर या कंप्युटरमध्ये डाटा साठवून ठेवण्याची क्षमता खूप कमी होती. या कंप्युटरमध्ये मशीनी भाषांचा (machine language) उपयोग केला जात असे.

2. दुसऱ्या पिढीचे कंप्यूटर | Second generation computer

दुसरी पिढी :- [ १९५६ ते १९६३] दुसऱ्या पिढीतील कंप्युटरमध्ये वैक्युम ट्यूबच्या जागी ट्रँजिस्टरचा (transistor) वापर करण्यात आला. ट्रँजिस्टर हा वैक्युम ट्यूबपेक्षा अधिक चांगला मानल्या जातो. याचबरोबर दुसऱ्या पिढीच्या कंप्युटरमध्ये मशिनी भाषांच्या जागी असेम्बली भाषांचा (assembly launguage) उपयोग केला जावू लागला. तरीसुद्धा डाटा साठवून ठेवण्यासाठी पंचकार्डचा उपयोग केला जात असे.

3. कंप्युटरची तिसरी पिढी | third generation computer

तिसरी पिढी – ( १९६४ ते १९७५ ) या पिढीमध्ये ट्रँजिस्टरची जागा इंटीग्रेटेड सर्किट (integrated circuit) याने घेतली आणि त्यामुळे कंप्यूटरचा आकार खूप लहान झाला. या कंप्यूटरची गती माइक्रो (micro)सेकंड ऐवजी. नॅनो (nano)सेकंड झाली. जी स्केल इंटीग्रेटेड सर्किट (scale integrated circuit) द्वारे तयार करण्यात आली, त्यामुळे Computer [ संगणक ] लहान व स्वस्त झाले. व त्यांचा उपयोग सहज शक्य झाला. या पिढीमध्ये उच्स्तरीय भाषा पास्कल आणि बेसिक यांचा विकास झाला. तरीसुद्धा बदल करण्यात येत असत.

4. कंप्यूटरची चौथी पिढी | fourth generation computer

चौथी पिढी :- [ १९६७ ते १९८९ ] चौथ्या पिढीमध्ये संगणकामध्ये चिप व माइक्रोप्रोसेसर आले. त्यामुळे संगणकाचा आकार लहान झाला आणि क्षमता वाढली. चुंबकीय डिस्कची (magnetic disk) जागा अर्धचालक मेमोरीने (memory) घेतली. आणि उच्चं गतीच्या नेटवर्कचा विकास झाला. ज्याला तुम्ही लॅन (LAN) आणि वॅन (WAN) नावाने ओळखता. तसेच आपरेटींगच्या रुपामध्ये आपल्याला युजर्सचा परिचय झाला. काही काळानंतर माईक्रोसाँफ़्ट विडोज संगणकांमध्ये आले. त्यामुळे मल्टीमिडीयाच्या विकासाला प्रारंभ झाला. याचवेळी ‘ C ‘ भाषेचा विकास झाला. म्हणून प्रोग्रामिंग करणे सोपे झाले.

5. कंप्यूटरची पाचवी पिढी | fifth generation computer.

पाचवी पिढी – १९८९- आतापर्यत हया काळामध्ये संगणकामध्ये युएलएसआई (ULSI), ऑप्टीकल डिस्क (optical disk) या वस्तुंचा उपयोग होवू लागला. यामद्ये कमीत-कमी जागेमध्ये जास्तीत-जास्त डाटा साठवून ठेवला जात असे. ज्यामुळे पोर्टेबल पीसी (portable PC) , डेस्कटॉप पीसी (desktop PC), टेबलेट (Tablet) यांची निर्मिती झाली आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली तसेच इंटरनेट (internet), ईमेल(email), www (world wide web) चा विकास झाला. तथापि, आपण windows-xp ला विसरु शकत नाही.

विकास आता सुद्धा चालू आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (artificial intelligence-AI) वर भर दिला जात आहे. उदाहरणामध्ये विंडोज कोर्टाना- (windows cortana) तुम्ही पाहतच आहात.

संगणकाचे प्रकार | Types of computer

संगणक एक असे उपकरण आहे जे डेटाचे अर्थपूर्ण माहितीमध्ये रूपांतर करते. ते वापरकर्त्याने (user) दिलेल्या सूचनांच्या (instruction) संचानुसार इनपुटवर (input) प्रक्रिया करते आणि इच्छित आउटपुट (output) देते. संगणक विविध प्रकारचे आहेत. त्यांचे आकार (size) आणि डेटा हाताळणी (data handling) क्षमतेच्या आधारे संगणकांचे दोन भागात वर्गीकरण केले जाऊ शकते.

तर, आकाराच्या आधारावर, संगणकाचे पाच प्रकार आहेत :-

 • Supercomputer
 • Mainframe computer
 • Minicomputer
 • Workstation
 • PC (Personal Computer)

आणि डेटा हाताळणी क्षमतेच्या आधारावर, संगणकाचे तीन प्रकार आहेत :-

 • Analogue Computer
 • Digital Computer
 • Hybrid Computer

सुपर कॉम्प्युटर | Supercomputer

जेव्हा आपण वेगाबद्दल बोलतो, तेव्हा संगणकाचा विचार करताना पहिले नाव लक्षात येते ते म्हणजे सुपर कॉम्प्युटर. ते सर्वात मोठे आणि वेगवान संगणक आहेत (डेटा प्रक्रिया करण्याच्या गतीच्या दृष्टीने). सुपरकॉम्प्युटर अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की, ते एका सेकंदात लाखो सूचना किंवा डेटावर प्रक्रिया करू शकतात. याचे कारण सुपर कॉम्प्युटरमधील हजारो इंटरकनेक्टेड प्रोसेसर. हे मूलतः वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी अनुप्रयोगांमध्ये वापरले जाते, जसे की हवामान अंदाज, वैज्ञानिक अनुकरण आणि आण्विक ऊर्जा संशोधन. हे प्रथम 1976 मध्ये रॉजर क्रे यांनी विकसित केले होते.

मेनफ्रेम कॉम्पुटर | Mainframe Computer

Mainframe अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की, ते एका सेकंदात लाखो सूचना किंवा डेटावर प्रक्रिया करू शकतात. त्यामुळे ते एकाच वेळी वेगवेगळ्या प्रक्रिया राबवू शकतात.ही सर्व वैशिष्ट्ये Mainframe संगणकाला बँकिंग, दूरसंचार क्षेत्र इत्यादीसारख्या मोठ्या संस्थांसाठी आदर्श बनवतात, जे सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणावर डेटावर प्रक्रिया करतात.

मिनी कॉम्प्युटर | Minicomputer

मिनी कॉम्प्युटर हा एक मध्यम आकाराचा मल्टीप्रोसेसिंग संगणक आहे. या प्रकारच्या संगणकात, दोन किंवा अधिक प्रोसेसर असतात आणि ते एका वेळी 4 ते 200 वापरकर्त्यांना समर्थन देतात. संस्था किंवा विभाग यांसारख्या ठिकाणी विविध कामांसाठी जसे की बिलिंग, अकाउंटिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इत्यादींसाठी मिनी कॉम्प्युटर वापरला जातो. तो Mainframe कॉम्प्युटरपेक्षा लहान असतो परंतु Micro कॉम्प्युटरच्या तुलनेत मोठा असतो.

वर्कस्टेशन | Workstation

वर्कस्टेशन (Workstation) तांत्रिक किंवा वैज्ञानिक अनुप्रयोगांसाठी डिझाइन केलेले आहे. यात एक वेगवान मायक्रोप्रोसेसर आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात RAM आणि हाय स्पीड ग्राफिक अडॉप्टर (high speed adapter) आहे. हा एकल-वापरकर्ता संगणक आहे. हे सामान्यतः विशिष्ट कार्य मोठ्या अचूकतेने करण्यासाठी वापरले जातात.

पर्सनल कॉम्प्युटर | PC (Personal Computer)

पर्सनल कॉम्प्युटरला (PC) मायक्रो कॉम्प्युटर असेही म्हणतात. हा मुळात सामान्य-उद्देशाचा संगणक आहे आणि वैयक्तिक वापरासाठी डिझाइन केलेला आहे. यात सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU), मेमरी, इनपुट युनिट आणि आउटपुट युनिट म्हणून मायक्रोप्रोसेसर असतात. या प्रकारचा संगणक वैयक्तिक कामासाठी योग्य आहे जसे की असाइनमेंट करणे, चित्रपट पाहणे किंवा कार्यालयात कार्यालयीन कामासाठी उदाहरणार्थ, लॅपटॉप आणि डेस्कटॉप संगणक.

Analouge Computer

हे विशेषतः अॅनालॉग (analouge) डेटावर प्रक्रिया करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. अखंड डेटा जो सतत बदलतो आणि स्वतंत्र मूल्ये असू शकत नाहीत त्याला अॅनालॉग डेटा म्हणतात. तर, एक अॅनालॉग संगणक तिथे वापरला जातो जिथे आपल्याला अचूक मूल्यांची आवश्यकता नसते किंवा वेग, तापमान, दाब इ. सारख्या अंदाजे मूल्यांची आवश्यकता असते. ते यंत्रातील डेटा, नंबर आणि डेटा मध्ये रूपांतरित न करता थेट स्वीकारू शकतात. ते भौतिक प्रमाणात होणारे बदल सतत मोजतात, ते डायल किंवा स्केलवर वाचन म्हणून आउटपुट देतात. उदाहरणार्थ स्पीडोमीटर, पारा थर्मामीटर इ.

Digital computer

डिजिटल संगणक अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की. ते उच्च वेगाने गणना आणि तार्किक ऑपरेशन्स सहज करू शकतात. ते इनपुट म्हणून कच्चा डेटा घेतात आणि अंतिम आउटपुट तयार करण्यासाठी त्याच्या मेमरीमधील संग्रहित प्रोग्रामसह प्रक्रिया करतात. त्यांना फक्त बायनरी इनपुट 0 आणि 1 ओळखता येतात, म्हणून कच्चा इनपुट डेटा संगणकाद्वारे 0 आणि 1 मध्ये रूपांतरित केला जातो आणि नंतर निकाल किंवा अंतिम आउटपुट तयार करण्यासाठी संगणकाद्वारे त्यावर प्रक्रिया केली जाते. सर्व आधुनिक संगणक, जसे की लॅपटॉप, स्मार्टफोनसह डेस्कटॉप हे डिजिटल संगणक आहेत.

Hybrid Computer

नावाप्रमाणेच हायब्रिड म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून बनवलेले. त्याचप्रमाणे, हायब्रीड संगणक हे अॅनालॉग आणि डिजिटल दोन्ही संगणकांचे संयोजन आहे. हायब्रीड कॉम्प्युटर हे अॅनालॉग कॉम्प्युटरप्रमाणे वेगवान असतात व त्यांना मेमरी असते तसेच त्यांच्यामध्ये डिजिटल कॉम्प्युटरप्रमाणे अचूकता असते. तर, हायब्रिडमध्ये सतत आणि वेगळ्या डेटावर प्रक्रिया करण्याची क्षमता असते. काम करण्यासाठी जेव्हा ते अॅनालॉग सिग्नल इनपुट म्हणून स्वीकारतात तेव्हा ते इनपुट डेटावर प्रक्रिया करण्यापूर्वी त्यांना डिजिटल स्वरूपात रूपांतरित करतात. तर, हे विशेष ऍप्लिकेशन्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. जेथे अॅनालॉग आणि डिजिटल दोन्ही डेटावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. एक प्रोसेसर जो पेट्रोल पंपांवर वापरला जातो. जो इंधन प्रवाहाचे मोजमाप, प्रमाण आणि किंमतीमध्ये रूपांतरित करतो हे हायब्रीड संगणकाचे उदाहरण आहे.

सॉफ़्टवेयर आणि हार्डवेयर म्हणजे काय ?

हार्डवेयर

हार्डवेयर म्हणजे इलेक्टॉनिक्स भागानी जोडून केलेले संगणक होय. उदाहरणामध्ये मॉनिटर, कीबोर्ड, हार्ड डिस्क, मदर बोर्ड, कॅबीनेट, माउस, सीडी रोम, इत्यादी या इलेक्टॉनिक्स भागापासून कंम्प्युटरचा बाहेरचा भाग तयार तयार केला जातो. याच भागावरून computer ची क्षमता निर्धारीत केली जाते.

संगणक हार्डवेयर [ computer hardware ] एक रोजगारपुरक विषय आहे. संगणक सॉफ़्टवेयर शिकण्याबरोबर हार्डवेयरची माहीती असणे आवश्यक आहे येथे संपूर्ण हार्डवेयरची माहीती दिलेली आहे. हार्डवेयर संगणकाचा मशीनरी भाग आहे. जसे की मॉनिटर, कि- बोर्ड, माउस, सी. पी. यू. , यू , पी. एस. इत्यादी ज्यांना आपण स्पर्श करुन पाहू शकतो. या मशीनरी भागापासून संगणकाचा बाहेरचा भाग तयार होतो. तशेच संगणकाच्या या भागांमुळे संगणकाची क्षमता निर्धारित केली जाते. आज या आधुनिक काळामध्ये सॉफ़्टवेयरला संगणकामध्ये चालविण्यासाठी हार्डवेयरची आवश्यकता असते. सॉफ़्टवेयरच्या अनुसार संगणकामध्ये हार्डवेयर नसेल तर सॉफ़्टवेयरला संगणकामध्ये चालवू शकत नाही.

सॉफ़्टवेयर

संगणकाकडून एखादे काम करून घेण्यासाठी सूचना द्याव्या लागतात. अशा सूचनांच्या संचाला प्रोग्रॅम(Program)असे म्हणतात. आणि अशा प्रोग्रॅमचा संग्रह म्हणजेच सॉफ्टवेअर होय.सॉफ़्टवेयर म्हणजे संपूर्ण संगणकाचे चलन, वळण सॉफ़्टवेयरकडून नियंत्रित होत असते.

सॉफ़्टवेयर ऑपरेटींग सिस्टम [ os ] हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे. हार्डवेयर व सॉफ़्टवेयरशिवाय कुठलाच संगणक सुरु होत नाही. संगणक आणि त्यावर काम करणाऱ्या व्यक्तीमधील सुसंवाद सॉफ़्टवेयरमुळेच होतो.

विविध कारणासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरात आणले जातात. साधारणतः सिस्टिम सॉफ्टवेअर(System Software), अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर(Application Software) प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर(Programming Software) अशा तीन प्रकारात सॉफ्टवेअर विभागणी केलेली असते.

संगणकाची हार्डवेयर संरचना

संगणकाचे खालीलप्रमाणे काही भाग आहेत.

1.मॉनिटर (monitor) ex. एल. सी. डी
2.की – बोर्ड (Keyboard)
3.माऊस
4.मदर बोर्ड
5.सी. पी. यु. [ प्रोसेसींग ]
6.हार्ड डिस्क
7.डी. वी. डी. रायटर
8.सी. डी. रोम [ रैम ]
computer hardware stucture

मॉनिटर | Monitor

संगणकाच्या सर्व प्रकाराची माहीती मॉनिटरवर दिसते. की – बोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहीती दूरदर्शन संचासारख्या दिसणाऱ्या पडद्यावर दिसते त्याला ‘ मॉनिटर ‘ म्हणतात. हा भाग संगणकासाठी खूप महत्वपूर्ण व आवश्यक असतो. मॉनिटरशिवाय तुम्ही संगणकावर काम करु शकत नाही. मॉनिटर एक प्रकारचा आउटपुट डिवाइस होय. मॉनिटर तीन प्रकारचे असतात. [ १ ] CRT मॉनिटर [ cathode Ray tube ] , [ २ ] LCD [ Liquid Crystal Display ], [ ३ ] LED [ Light Emitting Diode ]

की – बोर्ड | keyboard

की – बोर्ड हा संगणकाचा इनपुट डिवाइस आहे. कि- बोर्डच्या सहाय्याने आपणास संगणकाशी संवाद साधने शक्य होते. संगणकाला माहीती देण्यासाठी, सूचना देण्यासाठी कि-बोर्डचा उपयोग होतो. कि- बोर्ड टाईपरायटर सारखा असतो. आपण कि- बोर्डवर टाईप करतो. तशीच अक्षरे पडदयावर येतात. कि – बोर्डमध्ये काही बटन विशिष्ट चिन्ह काढण्यासाठी असतात.

कि- बोर्डचे चार भाग पडतात.

१] फक्शनल की पेड
२] अलफा न्यूमरिकल की पेड
३] न्यूमरिकल की पेड
४] कर्सर की पेड

की -बोर्ड cpu [ central processing unit ] च्या मागील भागाला जोडले असते. की -बोर्ड नॉर्मल, पीस / २, युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध असतात.

विन्डोज xp मध्ये स्टार्ट मेनूवर क्लिक केल्यावर रन या ऑप्शनवर osk टाईप केल्यावर इंटर बटन दाबून नंतर एका विंडोवर एक की – बोर्ड येतो. असा की -बोर्ड ज्यावेळी आपला की – बोर्ड काम करीत नाही. किंवा काही कीज काम करीत नाही. त्यावेळी हा ऑनस्क्रीन की – बोर्ड कामाला येतो.

माउस | Mouse

Mouse की – बोर्ड सारखे आवश्यक इतके नसले तरी विंडोजच्या जगात अतिशय उपयोगात पडणारे माउस हे इनपुट उपकरण आहे. माउस हे दर्शक उपकरण आहे.

माउसला ३ बटन असतात. माउसमुळे डिझाईन, चित्र, आकृत्या काढता येतात. सध्याच्या माउसमध्ये २ बटन असतात. स्क्रोललीगसाठी व्हिल दोन बटनामध्ये असते.

माउसचे तीन प्रकार आहेत

१] मॅकेनिकल माउस
२] ओप्टिकल माउस
३] कॉर्डलेस माउस

माउस साधारणपणे खालील क्रिया करतो.

 • क्लिक – माउसचे डावे बटन एकदा प्रेस करुन लगेच सोडून देणे या क्रियेला क्लिक म्हणतात.
 • डबल क्लिक – डावे बटन लागोपाठ दोनदा प्रेस करुन सोडणे म्हणजे ‘डबल क्लिक’ होय. फाईल ओपन करण्यासाठी माउसमध्ये डबल क्लिक करतात.
 • राईट क्लिक – माउसचे उजवे बटन एकदा प्रेस करुन लगेच सोडून देणे या प्रक्रियेला ‘राईट क्लिक’ म्हणतात

मदर बोर्ड | Mother Board

मदर बोर्ड हे संगणकाचे हृदय आहे. याला सिस्टमचा मेनबोर्ड असे म्हणतात. संगणकामधील सर्व डिवाइस एकत्र आणण्याचे काम मदर बोर्ड करतो. मदर बोर्ड विकत घेताना जास्तीत जास्त प्रकारच्या इंटरफेस आणि स्टैण्डर्ड कंट्रोलस असलेला घेणे चांगले असते. मदर बोर्डमध्ये वेगळा सेट [ मेमरी चिप्स ] असतो. जो मेमरीपेक्षा वेगळा असतो. आणि प्रोग्राम सुरु होण्यासाठी उपयोगी पडतो. त्या अतिरिक्त मेमरीला ‘ बोयस ‘ म्हणतात.

सी. पी. यु. | CPU

सी. पी. यु. संगणकाचा महत्वाचा हा भाग असतो. यामध्ये सर्वांचा डाटा सुरक्षित असतो. संगणकाचे सर्व भाग सी. पी. यु. ला जोडले असतात. आपणाला अगोदर CPU प्रोसेसींग हा शब्द समजून घ्यावे लागेल. कम्प्युटरच्या भाषेमध्ये कोणताही काम जेव्हा केले जातात. तेव्हा त्या कामाला सुरु होण्यापासून तर शेवटपर्यत जी क्रिया होते. त्या क्रियेला प्रोसेसींग [ cpu ] म्हणतात.

हार्ड डिस्क | Hard Disk

या भागामध्ये संगणकाचा सर्व प्रोग्राम आणि डाटा सुरक्षित राहतो हार्ड डिस्कची मेमोरी स्थायी [ कायम ] राहते. त्यामुळे संगणकाला बंद केले तरी संग्रहीत प्रोग्राम व डाटा समाप्त होत नाही. १० वर्षापूर्वी हार्ड डिस्कची स्टोरेज क्षमता गिगाबाईट / जी. बी. मेगाबाईट किंवा एम. बी. पर्यत राहत होती. परंतु आज हार्ड डिस्कची स्टोरेज क्षमतेला टेराबाईट किंवा टी. बी. मध्ये मोजले जाते. आज आधुनिक काळात ५०० जी. बी. आणि १ TB व १००० GB चे क्षमतायुक्त पीसी लोकप्रिय झालेले आहेत. हार्ड डिस्कची क्षमता जेवढी जास्त तितकाच जास्त डाटा स्टोर संग्रहीत केला जावू शकतो.

डी. वी. डी. | DVD

डी. वी. डी. रायटर डिस्कमध्ये संग्रहीत डाटा (रीड) वाचतो. डीवीडी रायटरमध्ये डीवीडी राइट होते. डीवीडी ही ४ जीबी किंवा ८जीबी एवढया कैपसिटीमध्ये उपलब्ध आहे. संगणकाच्या डिविडीमध्ये असणारे फाइल, फोटो, मुव्हीज आपल्या डीवीडी प्ल्येअरमध्ये आपण रन [run] करु शकतो. ज्यावेळी डीवीडी रायटर नव्हता त्यावेळी डीवीडी रोम उपलब्ध होते. आणि त्याच्या अगोदर सीडी रायटर किंवा सीडी रोम होते आणि त्याच्या अगोदर फ़्लोपी डिस्क ड्राइव्ह होती. ज्यामध्ये ३, ४ एमबी डाटा एवढाच संग्रहीत केला जात होता. आता तर ब्लूरे डिस्कचा अविष्कार झाला आहे. ज्यामध्ये ४० जीबीपर्यत डाटा संग्रहीत करु शकतो त्यामुळे संगणकामध्ये ब्लूरे रायटर लावणे आवश्यक आहे.

रैम | Ram

RAM (रैम) चा पूर्णनाव रैण्डम एक्सीस मेमोरी (Random Access Memory) आहे. रैम संगणकाला कामाची स्पेस [ जागा ] प्रदान करते. ही एक प्रकारची अस्थायी मेमोरी राहते. यामध्ये कोणताही डाटा संग्रहीत केला जात नाही. ज्यावेळी आपण एप्लिकेशन संगणकाव्दारे करतो. त्यावेळी रैमचा उपयोग केला जातो. संगणकामध्ये कमी रैम झाला. त्यावेळी संगणक हॅन्ग झाल्याची समस्या आपल्या समोर येते. रैम वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. जसे की DDR, DDR १, DDR २, आणि DDR ३ आता आपण DDR ३ रैमचा उपयोग करतो. संगणक बंद करतो त्यावेळी राईममधून सर्व डाटा नाहीसा [ डिलीट ] होतो.

रैमचे तीन प्रकार आहेत.

 • डायनेमिक रैम [ Dynamic Ram ]
 • सिक्रोन्स रैम [ Synchronous Ram ]
 • स्टैटिक रैम [ Static Ram ]

इनपुट डिवाइस आणि आउटपुट डिवाइस

इनपुट डिवाइस | Input Device

आपण सर्वात जास्त ज्याचा उपयोग करतो. तो इनपुट डिवाइस म्हणजे की – बोर्ड (keyboard) होय. ज्याच्या मदतीने आपण संगणकावर टाइप करु शकतो. इनपुट डिवाइसचा विकास झालेला आहे. त्यामध्ये डाटाला टाइप करण्याची आवश्यकता पडत नाही. अशाप्रकारचे आणखी डिवाइस आहेत. जसे की माउस, लाईट पेन, ग्राफिक टैबलेट, जॉय स्टिक, ट्रैकबॉल, टच स्क्रीन आहेत. हे युजरला फक्त मॉनिटर स्क्रीनवर पॉइंट करुन सिलेक्ट [ निवडण्याची ] स्वतंत्रता देते. म्हणून इनपुट डिवाइसला pointing device म्हणतात.
आधुनिक काळामध्ये केवळ बोलण्यासाठी वाइस इनपुट रिकग्निशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने टाइप करु शकतो. हार्डवेयर डिवाइस असल्यामुळे संगणकाद्वारे कोणताही डाटा किंवा कंमाड इनपुट करु शकतो.

आउटपुट डिवाइस | Output Device

आपल्याद्वारे दिल्या जाणाऱ्या कंमाडच्या आधारावर प्रोसेस केलेली माहीतीचा आउटपुट संगणकाच्या माध्यमातून आपल्याला दिला जातो. तो आपल्याला आउटपुट किंवा output device च्या माध्यमातून प्राप्त होतो. Mostly आउटपुट डिवाइस हार्डवेयर असतात. आऊटपुटचा सर्वात उत्त्तम उदाहरण आपल्या संगणकाचा मॉनिटर आहे.

आउटपुट डिवाइस :- मॉनिटर, स्पीकर, प्रिंटर, प्रोजेटर, हेडफोन

संगणकाची काम करण्याची (IPO) पध्दत | संगणकाची कार्य प्रणाली

संगणकाची काम करण्याची पध्दत (IPO) नियमानुसार होते.

 • इनपुट
 • प्रोसेसिंग
 • आउटपुट

इनपुट | Input

इनपुट – हा एक असा भाग आहे की त्यामुळे संगणकाला सॉफ़्टवेयरच्या माध्यमातून कंमाड दिली जाते. किंवा डाटा एंटर केला जातो. आपला सर्वात जास्त उपयोत येणारा इनपुट डिवाइस म्हणजे कीबोर्ड यामुळे तुम्ही संगणकावर सहजपणे टाईप करु शकता. याप्रकारची अन्य डिवाइसेंस आहेत ते म्हणजे माउस, लाईट पेन, ग्राफिक टैबलेट, जॉय स्टिक, ट्रैकबॉल, आणी टच स्क्रिन

प्रोसेसींग | Processing

प्रोसेसींग – हा या प्रक्रियेचा दुसरा भाग आहे. यामध्ये आपल्याद्वारे दिलेली कंमाड किंवा डाटाला प्रोसेसरच्या माध्यमातून सॉफ़्टवेयरमध्ये उपलब्ध असलेली माहीती आणि आदेशानुसार प्रोसेस करुन घेतले जाते. यामध्ये दोन भागांची मदत घेतली जाते. अर्थमेटिक लॉजीक युनिट (ALU) आणि कंट्रोल युनिट, नंतर डाटाचा आउटपुट देण्यात येतो. कंप्यूटरच्या मेंदूला प्रोसेसर [ processor ] म्हणतात. संक्षिप्तमध्ये यास सी. पी. यू. -सेंट्रल प्रोसेसींग युनिट म्हणतात.

आउटपुट | Output

आउटपुट – हा तिसरा आणि शेवटचा भाग आहे. आउटपुटमध्ये आपल्याद्वारे दिलेल्या कंमाडच्या आधारावर प्रोसेस केलेली माहितीचा आउटपुट संगणकाद्वारे आपल्याला दिल्या जातो. जो आपल्याला आउटपुट डिवाइसच्या माध्यमातून प्राप्त होतो. म्हणून याला संगणकाचे आउटपुट विभाग म्हणतात. उदाहरणामध्ये – मॉनिटर, प्रिंटर.

संगणकाची वैशिष्ट्ये

1. गती | Speed

जसे की तुम्हाला माहीत आहे की संगणक खूप लवकर काम करू शकतो. हे संगणकाचे मुख्य वैशिष्ट्ये आहे. गणनेसाठी फक्त काही सेकंद लागत असते. कम्प्यूटर प्रोसेसर स्पीड हर्ट्ज (Hz) मध्ये मापीत असते . तुम्हाला हे आश्चर्यचकित करेल की संगणक लाखो निर्देश काही सेकंदात प्रदर्शित करू शकतो.

2. अचूकता | Accurecy

संगणकाची अचूकता खूप जास्त आहे, प्रत्येक गणना समान अचूकतेने केली जाते. काही वेळा व्हायरसमुळे कॉम्प्युटरमध्ये चुकाही होतात.

3. कायमस्वरूपी साठवण क्षमता | Permanent Storage Capacity

संगणकामध्ये अंगभूत मेमरी असते जिथे तो मोठ्या प्रमाणात डेटा साठवू शकतो. तुम्ही फ्लॉपीज, सीडी/डीव्हीडी, पेन ड्राईव्ह सारख्या दुय्यम स्टोरेज डिव्हाइसेसमध्ये देखील डेटा संग्रहित करू शकता, जे तुमच्या संगणकाच्या बाहेर ठेवता येतात आणि इतर संगणकांवर हलवता येतात.

संगणकात साठवलेली माहिती बाईट (Byte) या एककात मोजतात.

‘0’ आणि ‘1’ या स्वरूपात असलेल्या ‘8’ Bits मिळून ‘1’ Byte तयार होते.

माहिती मोजण्याची आणखी काही एकके पुढीलप्रमाणे

 1 KiloByte (KB)1024 Byte
1 MegaByte (MB)1024 KB  
1 GegaByte (GB)1024 MB 
  1 TeraByte (TB) 1024 GB
computer unit

4. मेहनत | Diligence

संगणक कधीही थकणार नाही, सातत्याने अचूक परिणाम देत राहते. ते कोणत्याही त्रुटीशिवाय तासन-तास काम करू शकते. लाखो आकडेमोड करावयाची असल्यास, संगणक प्रत्येक गणना अचूकतेने करीत असते. या क्षमतेमुळे ते मनुष्याला नियमित कामात सक्षम बनविते. .

5. एकाग्रता | Concentration

संगणक हे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. म्हणून एकाच प्रकारचे काम केल्याने मानसिकदृष्ट्या थकवा किंवा कंटाळा येणे या गोष्टी होत नाही. एखादे काम करण्यासाठी आज्ञावली किंवा सूचना दिल्यास पुढील काम संगणक त्याच्या मेमरीनुसार व्यवस्थितपणे करीत असतो, त्याकडे वारंवार पाहण्याची गरजही भासत नाही.

6. अष्टपैलूपणा | Versatility

याचा अर्थ पूर्णपणे भिन्न प्रकारचे काम करण्याची क्षमता. पेरोल स्लिप तयार करण्यासाठी तुम्ही तुमचा संगणक वापरू शकता. पुढच्या क्षणी तुम्ही ते इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी किंवा इलेक्ट्रिक बिले तयार करण्यासाठी वापरू शकता.

संगणकावर एकाच वेळी एकापेक्षा जास्त कामे पूर्ण करता येतात. जसे – गाणी ऐकणे आणि इतर गोष्टी करणे.

7. संप्रेषण | Communication

संगणकाचा Communication क्षेत्रात खूप फायदा झाला आहे. संगणकाने संप्रेषण मध्ये अमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. आता आपण जगातील कोणत्याही व्यक्तीसोबत घरबसल्या बोलू शकतो. Video Call ने आपण कोणत्याही व्यक्तीला Live पाहू शकतो.

    मोबाईल फोन, टॅबलेट, यांच्या वापरामुळे Communication वाढले आहे. संगणकाने Calling, Video Chatting या सुविधा दिल्या आहेत, यांचा वापर आज प्रत्येक व्यक्ती आपल्या दूर असलेल्या नातेवाईक सोबत किंवा मित्रांसोबत बोलण्यासाठी करत आहे.

8. ज्ञानाचा श्रोत | Knowledge Source

संगणकाला ज्ञानाचे श्रोत बनवण्याचे श्रेय इंटरनेट ला जाते. इंटरनेट व संगणकाच्या एकत्रीकरण ने संपूर्ण मानवी जीवन बदलून टाकले आहे. इंटरनेट वरील वेबसाईट आपल्याला अफाट माहिती प्रदान करतात.

आपल्याला फक्त सर्च इंजिन वर जाऊन शोधायचे असते. संगणक आपल्याला हव्या त्या वेबसाईट वर नेऊन सोडते. आजच्या काळात इंटरनेट वर 1.7 अब्ज वेबसाईट आहेत.

9. स्वयंचलित यंत्र | Automation

संगणकाला एकदा नेमून दिलेले कार्य ते पूर्ण होईपर्यत तो करीत राहतो. आपण ज्याला प्रोग्रामिंग असे म्हणू शकतो.आणि हे कार्य खात्रीलायक असे असते. संगणक स्वयंचलित यंत्राप्रमाणे कार्य करीत असतो

10. पुनरावृत्ती

11. गोपनीयता

संगणकाचे तोटे

A. बेरोजगारी | Unemployment

आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की संगणकाचा वापर कंपन्या कारखान्यात खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि अजूनही वाढत आहे. कारखान्यातील मशीन संगणकाच्या तंत्रज्ञानाने स्वयंचलित झाल्या आहेत. त्यामुळे कामे कमी वेळेत पूर्ण होतात, तेथे माणसाची गरज राहिलेली नाही. यामुळे तरुणांच्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत.

    कामगारांची कामे संगणकाने हिसकावून घेतली आहेत. कंपन्यांमध्ये संगणक वापरण्याचा फायदा असा की संगणक पगार घेत नाही आणि विना थकता सतत काम करत राहते, पण दुसऱ्या बाजूने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे.

B. सुरक्षा | Security

आपण आपली वयक्तिक माहिती जसे फोटो, विडिओ, कागदपत्रे हे Computer मध्ये साठवून ठेवतो. आपल्याला वाटते की आपली माहिती सुरक्षित आहे, पण ती पूर्णपणे सुरक्षित नसते. याचे कारण म्हणजे Hackers.

    Hackers हे आपल्या संगणकातील माहिती चोरू शकतात, त्यांचा वाईट पध्दतीने उपयोग करू शकतात. राष्ट्रीय सुरक्षेचा डेटा सुद्धा हॅकर्स चोरू शकतात. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत संगणकावर विश्वास ठेवणे जरा जड वाटते.

C. सायबर गुन्हे | Ciber Crime

आजच्या सोशल मीडिया च्या युगात कोणती गोस्ट Viral होईल सांगताच येत नाही, पण नकळत यात काही वाईट गोष्टी पण Viral होतात आणि वयक्तिक पण आणि यातून Cyber गुन्हे निर्माण होतात.

    आज- काल सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर काही शेअर करताना विचार करून शेअर करावे, नाहीतर तुमच्यावर सुद्धा गुन्ह्याची केस होऊ शकते.

D. आरोग्याच्या समस्या | Health Issue

संगणकाचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, ई. यांचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. मोबाईल जास्त वेळ वापरल्याने आपल्या डोळ्यांना त्रास होतो आणि मग चष्मा लागतो. मोबाईल ची स्क्रीन डोळ्यांसाठी खूप हानिकारक असते.

    जास्त वेळ सलग मोबाईल बघत बसल्याने ब्रेन हेमरेज नावाचा आजार होतो. या आजाराने अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत, त्यामुळे अश्या गोष्टींपासून लांब राहिलेले चांगले असते.

E. वेळेची नासाडी | Wastage Of time

संगणकाचे जेवढे फायदे आहेत, तेवढे तोटे पण आहेत. संगणकात असलेल्या सोशल मीडिया, गेम्स, ई. यांचा अतिवापर होत आहे. कित्येक लोकांना सोशल मीडिया चे व्यसन लागले आहे. दिवसभर लोक सोशल मीडिया वर असतात.

    विद्यार्थ्यांच्या भविष्यावर याचा वाईट परिणाम होत आहे, त्यामुळे संगणकाचा वापर करू नका असे नाही, पण अतिवापर करू नका.

संगणक वापरण्याची ठिकाणे | Use Of Computer In Variety Of Places

 • विविध शाळा व संस्थामध्ये
 • विविध कार्यालयात ऑनलाईन मिटींगसाठी, ऑडियो-विडीयो कॉन्फरन्सिंगसाठी
 • सर्व बँकांमध्ये आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी
 • विमान, रेल्वे, बस यांचे तिकीट आरक्षणासाठी
 • सोशल मिडियासाठी मोठ्या प्रमाणात संगणकाचा वापर होतो.
 • दवाखान्यामध्ये एक्सरे, इसीजी, अल्ट्रासाऊंड सारख्या उपाय योजनांसाठी
 • सरकारी कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात संगणकाचा वापर होतो.
 • विविध ऑनलाईन सेवांसाठी संगणकाचा वापर होतो.

Written by- H.G.Shilpa

Leave a Comment