हार्डवेअर म्हणजे काय – प्रकार, उदाहरणे आणि त्यांची कार्ये

संगणक हार्डवेयर (computer hardware) एक रोजगारपुरक विषय आहे. संगणक सॉफ़्टवेयर शिकण्याबरोबर हार्डवेयरची माहीती असणे आवश्यक आहे. या पोस्टमध्ये संपूर्ण हार्डवेयरची माहीती दिलेली आहे. हार्डवेयर संगणकाचा मशीनरी भाग आहे. जसे की मॉनिटर (Monitor), कि- बोर्ड (Keyboard), माउस (Mouse), सी. पी. यू. (CPU) , यू , पी. एस. (UPS) इत्यादी ज्यांना आपण स्पर्श करुन पाहू शकतो. या मशीनरी भागापासून संगणकाचा बाहेरचा भाग तयार होतो. तशेच संगणकाच्या या भागांमुळे संगणकाची क्षमता निर्धारित केली जाते. आज या आधुनिक काळामध्ये सॉफ़्टवेयरला (software) संगणकामध्ये चालविण्यासाठी हार्डवेयरची आवश्यकता असते. सॉफ़्टवेयरच्या अनुसार संगणकामध्ये हार्डवेयर नसेल तर सॉफ़्टवेयरला संगणकामध्ये चालवू शकत नाही.

संगणक हार्डवेयर म्हणजे काय ? | What is Computer hardware in Marathi

जसे की तुम्हाला माहित आहे, संगणक (computer) एक मशीन आहे आणि संगणकाच्या हया मशीनरी भागांना संगणकाचा हार्डवेयर (hardware) म्हणतात. फक्त हार्डवेयर सर्व कामे एकटा करीत नाही तर त्याच्याजोडीला संगणकामद्ये सॉफ्टवॅरसुद्धा असतो. सॉफ़्टवेयरच्या मदतीने संगणकाच्या हार्डवेयरला निर्देश दिले जातात. त्या निर्देशाचे पालन करुन हार्डवेयर सर्व काम करीत असतो.

जर software संगणकाची आत्मा आहे तर hardware शरीर आहे. या दोघाचे असणे एकमेकांना पूरक (महत्वाचे)आहे. कोणतेही काम करण्यासाठी. संगणकाच्या बरोबर हार्डवेयरच्या रुपामध्ये असलेले सर्व भाग महत्वाचे असतात. ते आपले वेगवेगळे कार्य करीत असतात. जसे की किबोर्ड (keyboard) इनपुट देतो आणि प्रिंटर (printer) आउटपुट देतो.

संगणक हार्डवेअर ला दोन मुख्य भागांमध्ये विभागलेले आहे: Internal and External

Internal Hardware

अंतर्गत घटक सहसा आपल्याला दिसत नाहीत, कारण ते संगणकाच्या किंवा कॅबिनेट च्या आत असतात, ते पाहण्यासाठी आपल्याला संगणक उघडावा लागतो. अंतर्गत हार्डवेअरची यादी खाली दिलेली आहे –

 • Central Processing Unit (CPU)
 • Motherboard
 • RAM (Random Access Memory)
 • ROM (Read Only Memory)
 • Hard Drive
 • PSU (Power Supply Unit)
 • NIC (Network Card)
 • Heat Sink (Fan)
 • Graphics Card

External Hardware

बाह्य घटक, ज्यांना परिधीय घटक (peripherals components) देखील म्हणतात, ते बाहेरून संगणकाशी (computer) जोडलेले असतात. यामध्ये इनपुट (input) आणि आउटपुट (output) उपकरणांचा (Deivices) समावेश आहे. ज्यांची यादी खाली दिली आहे.

 • Monitor
 • Mouse
 • Keyboard
 • Printer
 • Scanner
 • Speaker
 • UPS (Uninterruptible Power Supply)

कॉम्पुटर हार्डवेअर चे प्रकार | Types of hardware

तुम्ही आधीच शिकलात की कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे संगणक बनवणाऱ्या भौतिक (physcial) भागांचा संदर्भ. याची अनेक उदाहरणे मी तुम्हाला वर दिलेली आहेत. उदाहरणादरम्यान, तुम्ही पाहिले असेल की ते बरेच आहेत, म्हणूनच ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये (category) विभागले गेले आहेत. खाली computer hardware चे चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहे, त्यामुळे तुम्हाला समजायला सोपे जाईल.

१. इनपुट डिवाइस (Input Device)

इनपुट उपकरणांना हार्डवेअर (hardware) उपकरण (device) म्हणतात जे संगणकाला इनपुट (data) देण्याचे कार्य करतात. त्यांचा वापर करून, वापरकर्ता (user) संगणकाशी संपर्क (connect) साधतो आणि त्याचे काम तो त्यांच्याकडून करून घेतो. एकंदरीत, त्यांचा वापर करून, तुम्ही संगणकावर नियंत्रण मिळवता आणि तुम्हाला कॉम्पुटरशी संवाद साधने सोपे होऊन जाते. याचे सर्वात सोपे उदाहरण म्हणजे तुमचा कीबोर्ड, जो वापरकर्त्याला Alphanumeric data आणि कमांड्स (commond) कॉम्प्युटरमध्ये इनपुट (input) करू देतो. कल्पना करा की कीबोर्ड हा त्याचा भाग नसता तर तुम्हाला संगणक वापरता आला असता. अनेक संगणक हार्डवेअर इनपुट उपकरणांतर्गत येतात.

उदाहरण:- Mouse, Keyboard, Scanner, and Microphone, etc.

२. आउटपुट डिवाइस (Output Device)

आउटपुट डिव्हाइसेसच्या (devices) प्रकारामध्ये computer hardware येतो, जे संगणकाच्या डाटाला (data) वापरकर्त्यांपर्यंत (user) पोहचविण्याचे किंवा त्याच्याशी जुळवून घेण्याचे कार्य करतात.

उदाहरणार्थ संगणक स्क्रीन (computer screen)ज्याला आपण मॉनिटर (monitor) म्हणतो. मॉनिटर हे संगणकाचे मुख्य आउटपुट device आहे. जे कोणताही डेटा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत असतात. म्हणजेच, आपण संगणकामध्ये जी काही सूचना feed करतो, त्याचे आउटपुट (output) आपल्याला त्याच्याद्वारे दिसत असते. केवळ आउटपुट (output device) डिव्हाइसद्वारेच संगणक, वापरकर्ते (user) आणि इतर हार्डवेअर (hardware) उपकरणे संवाद साधू शकतात.

उदाहरण:- Monitor, Printer, Headphones, Speaker, and Projector etc.

३. प्रोसेसिंग डिवाइस (Processing Device)

जेव्हा तुम्ही कीबोर्ड (keyboard) किंवा इतर कोणत्याही इनपुट डिव्हाइसद्वारे (input device) संगणकावर डेटा (data) पाठवता, तेव्हा तो डेटा आउटपुट डिव्हाइसवर (output device) पाठवण्यापूर्वी तो मध्यवर्ती टप्प्यातून जातो. ही अशी अवस्था आहे जिथे कच्चा डेटा माहितीमध्ये रूपांतरित (information transformation) केला जातो. प्रोसेसिंग डिव्हाईस (Processing Device) हे कॉम्प्युटरचे हार्डवेअर (hardware) चे भाग आहेत, जे ही मध्यवर्ती स्थिती हाताळतात. त्यांना अंतर्गत मेमरी उपकरणे ( Internal Memory Device) देखील म्हणतात.

उदाहरण:- CPU (Central Processing Unit), GPU (Graphics Processing Unit), and Network Card.

४. स्टोरेज डिवाइस (Storage Device)

हे असे हार्डवेअर आहेत जे डेटा राखण्याचे आणि संग्रहित (collect) करण्याचे कार्य करतात. स्टोरेज डिव्हाइस (storage device) कोणत्याही संगणकाच्या मुख्य घटकांपैकी एक आहे. हे संगणकावर सर्व प्रकारचा data आणि application संग्रहित करतात.

कॉम्पुटर स्टोरेज device दोन प्रकारचे असतात.

 • Primary storage device – हे स्टोरेज डिव्हाइस तात्पुरते डेटा ठेवण्यासाठी वापरले जातात. ते आकाराने अगदी लहान असतात. त्यामुळे ते कॉम्प्युटरच्या आत असतात. प्राथमिक स्टोरेज डिव्हाइसमध्ये सर्वात वेगवान डेटा (data) ऍक्सेस (access) करण्याची गती असते. यामध्ये RAM, ROMआणि cache memory यांचा समावेश आहे.
 • secondary storage device – या मेमरी डिव्हाइसेसमध्ये मोठ्या प्रमाणात साठवण (storage) क्षमता असते. तसेच, ते कायमस्वरूपी डेटा संग्रहित करीत असतात. ते संगणकाच्या आत किंवा बाहेर बघायला मिळतात. Hard disk drive (HDD), solid state drive (SLD), optical disk drive, flase memory आणि USB device ही त्यांची मुख्य उदाहरणे आहेत.

कॉम्प्युटरच्या भागांचे उपयोग

Monitor Or LCD :- याचा उपयोग हा आहे की मोनिटर सर्व प्रोग्राम्सची disply (माहिती) दाखवितो. हा एक आउटपुट डिवाइस (outout device ) आहे.

Keyboard :- याचा उपयोग संगणकावर टाइपिंग करण्यासाठी केला जातो. हा एक इनपुट डिवाइस आहे. तुम्ही केवळ की-बोर्डच्या साहाय्याने संगणकाला ऑपरेट करु शकता.

Mouse :- माउसमुळे संगणकावर सहज कार्य करु शकतो. हा एक प्रकारचा रिमोट डिवाइस आहे. त्याचबरोबर हा इनपुट डिवाइस आहे.

CPU (central proccessing unit) हा संगणकाचा महत्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे आपला सर्व डाटा सुरक्षित राहतो. संगणकाचे सर्व भाग सी. पी. यू. ला जोडलेले असतात.

UPS (untrip power supply) :- हा हार्डवेयर किंवा मशीन संगणक वीज गेलयावर बंद होण्यापासून थांबवितो. ज्यामुळे आपला डाटा सुरक्षित राहतो.

hardware आणि software मध्ये काय फरक आहे?

आतापर्यंत आपल्याला माहित झाले आहे की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन्ही संगणकाचे सर्वात महत्वाचे भाग आहेत. हे संगणकासाठी विविध कार्ये करतात. त्यामुळे त्यांच्यात खुप अंतर आहेत. तर त्यांच्यात काय फरक आहे ते समजून घेऊया.

HardwareSoftware
हार्डवेअर हे एक भौतिक उपकरण (physcial device) आहे जे संगणकाशी शारीरिकरित्या संलग्न आहे.सॉफ्टवेअर हा सूचना किंवा प्रोग्रामचा एक संच आहे, जो संगणकाला विशिष्ट कार्य करण्यासाठी निर्देश देतो.
आपण computer hardware ला पाहू आणि स्पर्श करू शकतो.software पाहणे किंवा स्पर्श करणे शक्य नाही कारण ते एक प्रोग्राम आहे.
हार्डवेअर भौतिक साहित्य किंवा घटक वापरून बनवले जाते.सॉफ्टवेअर बनवण्यासाठी प्रोग्रामिंग भाषेत सूचना लिहिल्या जातात.
हे सॉफ्टवेअरच्या नियंत्रणाखाली चालते.हे संगणकाच्या ऑपरेशनवर नियंत्रण ठेवतात.
हार्डवेअर खराब झाल्यास, ते दुरुस्त केले जाऊ शकते, किंवा
रिप्लेसकेले जाऊ शकते.
सॉफ्टवेअर कधी खराब झाले तर, तुम्ही त्याची बॅकअप कॉपी Reinstall करून ते पुनः प्राप्त करू शकता.
कॉम्प्युटर व्हायरसमुळे हार्डवेअरवर काही फरक पडत नाही.तर संगणकाचे व्हायरस सॉफ्टवेअरवर वाईट परिणाम करू शकतात.
हार्डवेअरशिवाय संगणकाचे अस्तित्वात नसते, त्याशिवाय तो चालू शकत नाही.तुम्ही संगणक सॉफ्टवेअरशिवाय चालवू शकता, परंतु त्यात अनेक error निर्माण होतील आणि कोणतीही माहिती आउटपुट (output) होणार नाही.

FAQ

प्रश्न – हार्डवेयर काय आहे?

उत्तर- हार्डवेयर संगणकाचा मशीनरी (physcial) भाग आहे.

प्रश्न – संगणक हार्डवेअरला किती भागांमध्ये विभागलेले आहे ?

उत्तर- दोन

प्रश्न – कॉम्पुटर hardware चे भाग सांगा

उत्तर- internal आणि external

प्रश्न – कॉम्पुटर हार्डवेअर चे प्रकार सांगा?

उत्तर- इनपुट डिवाइस (Input Device), आउटपुट डिवाइस (Output Device), प्रोसेसिंग डिवाइस (Processing Device), स्टोरेज डिवाइस (Storage Device).

प्रश्न – RAM हा कोणता कॉम्पुटर हार्डवेअरआहे?

उत्तर- Primary storage device

प्रश्न – संगणकाचे सर्व भाग कोणाला जोडलेले असतात?

उत्तर – CPU (Central prccessing unit)

Leave a Comment