Dasara Wishes and Quotes In Marathi 2022 – दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Dasara Wishes in  Marathi
Dasara Wishes in Marathi

Dasara wishes in Marathi 2022 :- दसऱ्याचा सणाला आपल्या या भारतवर्षात विजयादशमी असे म्हटले जाते. हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच दिवशी प्रभू रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. विजय दशमी किंवा दसरा हा सण अधर्मावर धर्माचा विजय आणि अन्यायावर न्यायाचा विजय म्हणून साजरा केला जातो.

हा सण प्रेम, बंधुता आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. यावेळी ५ ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. तुम्ही या पोस्टमधील शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes,Images किंवा अभिनंदन संदेश आपल्या मित्रांना, परिजनांना, भावंडांना, आई-वडिलांना (Share ) पाठवू शकता, दसऱ्याचे शुभेच्छा संदेश लोकांना status, dp किंवा wallpaper ठेवीत असतात.

Happy Dasara Wishes In Marathi

Happy Dasara Wishes in Marathi
Happy Dasara Wishes in Marathi

उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
शुभ दसरा


लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,
रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा,
रोज रोजचा दिवस फुलेल,
होईल सुंदर दसरा…

विजयादशमी शुभेच्छा मराठी | Vijayadashmi Wishes Marathi

Vijayadashmi Wishes Marathi
Vijayadashmi Wishes Marathi

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !


आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!


वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dasara Quotes In marathi – दसरा शुभेच्छा संदेश

Dasara Quotes In marathi
Happy Quotes For Dasara

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा नाश करून
आपण आज दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…


सीमा ओलांडून आव्हानांच्या, गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून, सर्वांमध्ये हे वाटायचे!!
दसरा शुभेच्छा!


सोनं घ्या…सोन द्या… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


दसरा मराठी शुभेच्छा

दसरा मराठी शुभेच्छा
दसरा मराठी शुभेच्छा

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


आपट्याच्या पानांची, होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा, करुनि दान..
आला आला दसरा
विजयादशमीच्या शुभेच्छा


सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात
दसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात
शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्रांसाठी दसऱ्याच्या शुभेच्छा – Dasara Wishes For Friends

Dasara Wishes For Friends
Dasara Wishes For Friends

प्रत्येक दिवस नवीन प्रकाशाने आणि नवीन स्वप्नांनी भरलेला जावो…..
श्री राम तुम्हाला तुमचे प्रत्येक स्वप्न साकार करण्याचे बळ देवो.
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा


माझ्या प्रिय मित्रांसाठी, दसरा सण तुमच्या घरात वाईटाच्या नाशासह नशीब आणि समृद्धी घेऊन येवो.
विजयादशमी तुमच्या जीवनात निरोगी आरोग्य, आनंद,आणि शांतता घेऊन येवो.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा


विजयादशमीच्या या पावन दिवशी मी देवाला प्रार्थना करतो की तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि तुम्हाला जीवनातील नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक शक्ती द्यावी. या सणाच्या निमित्ताने मी प्रार्थना करतो की तुम्ही समृद्ध व्हा आणि आयुष्यात पुढे जा.
Happy Dasara


देऊ-घेऊ सोनं-चांदी
आज एकमेकांस स्वचेच्छा
सदैव मिळावं यश उदंड
दसऱ्याच्या शुभेच्छा!


दसऱ्याच्या तुम्हाला आणि संपूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
प्रत्येक मार्गावर व्हा विजयी, हीच आहे देव चरणी प्रार्थना
हैप्पी दसरा


Dasara Quotes For Friends

Friend Wishes For Dasara
Dasara Quotes For Friend

तुमची चिंता रावणाच्या पुतळ्यासारखी जळो आणि
तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येवो
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा


अंधार नेहमी प्रकाशाने हरवला जाईल असा संदेश देण्यासाठी रोज सूर्याचा उदय होतो.
चला त्याच नैसर्गिक नियमाचे पालन करूया आणि धर्माचा अधर्मावर विजयाचा आनंद लुटुया.
दसऱ्याच्या शुभेच्छा


झाली असेल चूक तरी
या निमिनत्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा!
विजयादशमीच्या शुभेच्छा


नवऱ्यासाठी दसऱ्याच्या मराठी शुभेच्छा – Dasara Wishes in Marathi For Husband

Dasara Wishes in Marathi For Husband
Dasara Wishes in Marathi For Husband

दुष्ट रावणाचा वध करणार्‍या भगवान रामाच्या आशीर्वादाने
तुमचा आनंद द्विगुणित होवो आणि तुमच्या समस्या शुन्य व्हाव्यात हीच इच्छा ….
तुम्ही नेहमी हक्कासाठी लढत राहा आणि नेहमी यश मिळवत राहा….
दसऱ्याच्या माझ्या नवरोबाला शुभेच्छा.


तुमच्यामध्ये माझा जीवनसाथी मिळणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे…
विजया दशमीच्या सणानिमित्त, मी प्रार्थना करते की आम्ही दोघेही जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाऊ.
माझी इच्छा आहे की आपण नेहमी प्रेम आणि काळजीने एकमेकांना साथ द्यावी.
माझ्या पतीला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.


दसऱ्याच्या दिव्य प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमची पत्नी असल्याचा मला अभिमान आहे
कारण तुम्ही नेहमी चुकांना आव्हान देऊन बरोबरसाठी लढता.
मी देवाला प्रार्थना करते की तुम्हाला चांगले कार्य करत राहण्यासाठी अधिक शक्ती द्यावी.
तुम्हाला विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा.


बायकोसाठी दसऱ्याच्या शुभेच्छा – Dasara Wishes in Marathi For Wife

Dasara Wishes in Marathi For Wife
Dasara Wishes in Marathi For Wife

प्रिय पत्नी, तुझे धैर्य मला नेहमी खऱ्याच्या बाजूने उभे राहण्याची प्रेरणा देते….
भगवान रामाप्रमाणेच तू सुद्धा माझी प्रेरणास्रोत आहेस….
वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणाऱ्या या विशेष दिवशी मी तुझ्या आनंदासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतो.
माझी प्रिये तुला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.


मी प्रार्थना करतो की हा दसरा तुझ्या जीवनात नवीन संधी आणि नवीन ऊर्जा घेऊन येईल…
देवाचे आशीर्वाद तूला नेहमी तुझ्या ध्येयांचे अनुसरण करण्याची आणि तुझी स्वप्ने जगण्याची शक्ती देईल.
तुम्हाला खूप खूप आनंदी आणि अद्भुत दसऱ्याच्या शुभेच्छा.
हैप्पी दसरा प्रिये


प्रिय बायको, जसे तुझे माझ्या जीवनात येण्याने माझ्या पाषाणरूपी जीवनात नवचैत्यन्य आले.
त्याचप्रकारे दसऱ्याच्या या शुभप्रसंगी तुझ्या जीवनात यश, समृद्धी, आनंद आणि शांती यावी
हीच प्रभुरामचंद्राकडे मनोभावे प्रार्थना
Happy Vijayadashami my love


Dasara Wishes For Family in Marathi

Dasara Wishes For Family in Marathi
Dasara Wishes For Family in Marathi

शांतता आणि सत्याच्या या देशात
आता वाईटाला संपवायचं आहे
दहशती रावणाचं दहन करून
पुन्हा श्रीराम राज्य आणायचं आहे
शुभ दसरा शुभ विजयादशमी


दसऱ्याचा सण आणि सुवर्णाचे दान
सुर्वण म्हणून आपटयाा पानाचा मान,
झेंडुच्या फुलांनाही महत्व फार
त्याच्या तोरणांनी सजले प्रत्येकाचे दार…
दसऱ्याच्या शुभेच्छा!

Dasara Wishes For Family

कष्टाचं मोल सरत नाही
ते आयुष्यभर टिकतं
म्हणूनच कदाचित खरं सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं.
दसऱ्याच्या शुभेच्छा!


Dasara Shubhecha Images

Dasara Shubhecha Images
Dasara Shubhecha Images

अज्ञानावर ज्ञानाने, शत्रुवर पराक्रमाने..
अंधारावर प्रकाशाने, क्रोधावर प्रेमाने
विजय मिळवण्याचा सण म्हणजे विजयादशमी!
दसरा शुभेच्छा

Dasara Wishes For Family

परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच, सदैव असेच राहा
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

Happy Dasara Whatsapp Status In Marathi

Happy Dasara Whatsapp Status In Marathi
Dasara Whatsapp Status In Marathi

चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!!
तुमचा चेहरा आहे हसरा!!
म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा!


स्नेहभाव वाढवू
अनं प्रफुल्लित करु मन…
सुवर्ण पर्ण वाटायचे..
अन् सुवर्ण क्षण साठवायचे..
मनामध्ये जपून आपुलकी
एकमेकांना भेटायचे
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


जसा रामाने केला रावणाचा वध
त्याप्रमाणेच तुम्हीही आपल्यातील वाईटाचा करा वध
शुभ दसरा शुभेच्छा, शुभ विजयादशमी


आज सोनियाचा दिनी… करु नव्या कामाची सुरुवात
दसरा आहे आज साजरा करु तो आनंदात,
विजयादशमी शुभेच्छा.


समृद्धीचे दारी तोरण
आनंदाचा हा हसरा सण
सोने लुटून हे शिलंगण
हर्षाने उजळू द्या अंगण
सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!


Dasara dp In Marathi

Dasara dp In Marathi
dp status for dasara in Marathi

दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने
या वर्षात लुटूयात
सद्विचारांचे सोने!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छ!


विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपशयाच्या सीमा उल्लंघन
यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!


झेंडुची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!


सत्याच्या मार्गावर असोत लाख काटे
न थांबता चालल्यास काट्यांचीही होतील फुले
शुभ दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा


रावणाप्रमाणे होवो मनातील विकारांचा नाश
प्रभू श्रीरामाचा होवो मनात सदा वास
शुभ दसरा


अधर्मावर धर्माचा विजय
अन्यायावर न्यायाचा विजय
वाईटावर चांगल्याचा जयजयकार
हाच आहे दसऱ्याचा सणावार
दसरा शुभेच्छा, शुभ विजयादशमी


Dasara Massege in marathi

Dasara Massege in marathi
Dasara Massege in marathi

सदैव गुणगुणत राहिले की,
त्याचे आपोआप गाणे होते,
जसे दसऱ्याच्या दिवशी
आपट्याचे सोने होते


त्रिभुवन भुवनी, पाहता तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु, न बोलवे काही
विजयादशमीच्या शुभेच्छा


तांबडं फुटलं, उगवला दिन,
सोन्यानी सजला, दसऱ्याचा दिन!

Happy Dasara

मराठी संस्कृतीचा ठेवुनिया मान
तुम्हाला सर्वांना देतो मी सोनियाचे पान…
सोने घेताना..ठेवा चेहरा ‘हसरा’
तुम्हाला सर्वांना शुभ दसरा


चेहरा ठेवा हसरा कारण सण आहे दसरा…
दसरा तुम्हा सर्वांचा हसरा जावो, ही देवाचरणी प्रार्थना
विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा!


आपट्याची पानं त्याला, ह्रदयाचा आकार
मनाचे बंध, त्याला प्रेमाची झंकार
आनंदाच्या क्षणांना,सर्वांचा रुकार
तुम्हा सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडून
विजयादशमी व दसरा निमित्त मन:पूर्वकशुभेच्छा!


Funny Dasara Quotes in marathi

Funny Dasara Quotes in marathi
Funny Dasara Quotes in marathi

बायको आपल्या जिभेवर कुंकू आणि भात लावत होती, हे पाहून नवऱ्याने बायकोला विचारले हे काय ?
तेव्हा बायको बोलली आज दसरा आहे म्हणून आपल्या शस्त्राची पूजा करीत आहे.
विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा
funny Quotes Dasara


एके दिवशी रावण डिस्कोमध्ये गेला आणि तिथे गेल्यावर बेशुद्ध पडला.
कारण तिथे लिहिले होते “पर हेड एन्ट्री – रु २०००”
तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा


दसऱ्याच्या निमित्ताने तुमचे जीवन आनंदाने भरून जावो अशी माझी इच्छा आहे
कारण तणाव आणि रागामध्ये तुम्ही फार भयंकर दिसता.

Dasara Funny Quotes

माझ्या प्रिय मित्रा, मी तुला विनंती करतो की कृपया घरीच रहा आणि सुरक्षित रहा
कारण आज दसरा आहे आणि मला तुला गमावायचे नाही….
तुला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.


मित्रांनो या लेखामध्ये आपण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा (Dasara wishes in Marathi) विषयी माहिती पाहिलेली आहे. या लेखाला आणखी माहितीपूर्ण/उपयोगी करण्यासाठी आपल्या सूचना comment box मध्ये सांगा. ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर पोस्टला फेसबुक, instagram whatsapp,Twitter वर share करा आणि आपल्या मित्रांना दसऱ्याबद्दल माहिती विचारा जेणेकरून त्यांच्या मनामध्ये विजयादशमी विषयी माहिती जाणून घेण्याची ईच्छा निर्माण होईल.आणि हो ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कंमेंटद्वारे कळवा.

Leave a Comment