डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संविधान निर्माते) यांची सत्यावर आधारित माहिती

Babasaheb Ambedkar Information In Marathi
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi

जय भीम मित्रांनो , मागील पोस्ट मद्ये आपण स्वराज्याचे निर्माते आणि महाराष्ट्राचे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र अभ्यासिले आहे. तर आजच्या या पोस्ट मद्ये आपण महामानव, समाजसुधारक, सूर्यकोटी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi ) यांचा संपूर्ण क्रांतिकारक इतिहास पाहणार आहोत.

मित्रांनो, आजची ही पोस्ट वाचतांना तुम्ही भावुक होऊ शकता कारण या पोस्टमध्ये मी बाबासाहेबांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचा समावेश केलेला आहे. तर चला मग आजच्या पोस्ट ला सुरुवात करूया.

एकोणिसाव्या शतकात भारतीय समाजाला कलंक असलेल्या अस्पृश्यतेच्या निवारणाचे कार्य निरनिराळ्या समाजसुधारकांनी केले होते. तथापि, सर्वांपेक्षा अतिशय निष्ठेने,स्वानुभवाच्या आधारावर, अस्पृश्यांना गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी जागृत व संघटित करण्याचे, शिक्षणाच्या द्वारे त्यांच्यात नवविचारांचा प्रसार करण्याचे व आत्मसन्मानाचा नवीन मार्ग दाखविण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब यांनी केले.

उच्चविद्याविभूषित झाल्यानंतरही वैयक्तिक स्वार्थाच्या भूमिकेतून आर्थिक प्रलोभनाला स्वीकार न करता बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन दलित बांधवांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. आपल्या अस्पृश्य बांधवांना अत्याचार व गुलामगिरीतून मुक्त करून भारतीय घटनेनुसार त्यांना आपल्या आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करून देण्याचे अलौकिक कार्य भीमरावांनी केले.

मित्रांनो, अन्यायाविरुद्ध समर्थपणे लढण्यासाठी सज्ज करणारे बंडखोर नेते, अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले व सदैव विद्याव्यासंग व ग्रंथलेखन यात रममाण होणारे प्रगाढ विद्वान व प्रजासत्ताक भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणूनच डॉ. बाबासाहेबांचे कार्य वेगळे व असामान्य आहे.

Table of Contents

महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र | DR. Babasaheb Ambedkar Information In Marathi

DR. Babasaheb Ambedkar Biography

भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर १९५६), जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध होते, ते एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्यांवरील (दलित) सामाजिक भेदभावाविरुद्ध मोहीम चालवली. त्यांनी कामगार, शेतकरी आणि महिलांच्या हक्कांनाही पाठिंबा दिला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री, भारतीय संविधानाचे जनक आणि भारतीय प्रजासत्ताकाचे शिल्पकार होते.

आंबेडकर हे प्रचंड प्रतिभेचे विद्यार्थी होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हींमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आणि कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात संशोधन केले. यानंतर भीमराव भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार आणि चर्चेत सहभागी झाले आणि मासिके प्रकाशित करून, राजकीय हक्कांची वकिली करून आणि दलितांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि भारताच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.

१९५६ मध्ये, त्यांनी हिंदू पंथात अस्पृश्यता आणि क्रूरतेच्या प्रथेच्या रूपात बौद्ध धर्म स्वीकारला. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. १४ एप्रिल रोजी त्यांचा जन्मदिवस भारतासह जगभरात आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. डॉ. आंबेडकरांच्या वारशात अनेक स्मारके आणि लोकप्रिय संस्कृतीतील चित्रणांचा समावेश आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रारंभिक जीवन | EARLY LIFE OF BABASAHEB

आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी ब्रिटीश भारताच्या मध्य भारत प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) महू नगर येथील मिलिटरी कॅन्टोन्मेंट मध्ये झाला. ते रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई यांचे १४ वे आणि शेवटचे अपत्य होते. त्यांचे कुटुंब कबीर पंथाचे मूळ मराठी होते आणि ते सध्याच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे गावचे रहिवासी होते. भेदभाव सहन करावा लागला. ते हिंदू महार जातीचे होते, ज्यांना तेव्हा अस्पृश्य म्हटले जात होते आणि त्यामुळे त्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या खोल भेदभाव सहन करावा लागला होता.

भीमराव यांचे वडील रामजी सकपाळ हे भारतीय लष्कराच्या महू छावणीत कार्यरत होते. आणि येथे कार्यरत असतानाच ते सुभेदार पदापर्यंत पोहोचले. सैन्यामधून निवृत्त झाल्यानंतर त्यांना साताऱ्याला दुसरी नौकरी मिळाली. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण साताऱयालाच झाले. सातार्यालाच शिकत असतांना आपल्या प्रेमळ गुरूबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी भीमरावांनी आंबवडेकर हे पूर्वीचे नाव सोडून आंबेडकर आडनाव धारण केले.

भीमरावांचे शिक्षण

बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण

आंबेडकरांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा नगर येथील राजवाडा चौकात असलेल्या शासकीय हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) येथे इंग्रजीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. या दिवसापासून त्यांची शैक्षणिक कारकीर्द सुरू झाली, म्हणून महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी त्यांना ‘भिवा’ म्हणत.

त्यावेळी ‘भिवा रामजी आंबेडकर’ हे त्यांचे नाव हजेरी नोंदवहीत नमूद करण्यात आले होते. भीमरावांनी इंग्रजीत चौथीची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर अस्पृश्यांमध्ये एक सार्वजनिक सोहळा साजरा केला गेला, कारण अस्पृश्यांसाठी ते असामान्य होते आणि “बुद्धाचे जीवन ” हे पुस्तक त्यांचे कौटुंबिक मित्र आणि लेखक दादा केळुसकर यांनी लिहिले होते. हे वाचून त्यांना प्रथमच गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माची ओळख झाली आणि त्यांच्या शिकवणीने ते प्रभावित झाले होते .

माध्यमिक शिक्षण

रामजींनी मुलाच्या शिक्षणासाठी मुंबईला स्थलांतर केले. तेथे एल्फिस्टन हायस्कूल मधून भीमराव मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. या काळातच अखंड वाचन व वडिलांच्या प्रौत्साहनामुळे त्यांचा इंग्रजी भाषेचा पाया पक्का झाला. १९०७ मध्ये भीमरावांनी मॅट्रीकची परीक्षा पास केली.

बॉम्बे विश्वविद्यालयात पदवीचे शिक्षण

पुढील शिक्षणासाठी त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तथापि, मिळणाऱ्या अल्प पेन्शनमध्ये बाबासाहेबांचे शिक्षण पुढे चालविणे व कुटुंबाचा चरितार्थ चालविणे रामाजीना अवघड होऊ लागले. तथापि, भीमरावांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी दरमहा २५ रुपयांची शिष्यवृत्ती दिल्याने ही समस्यादूर करणे शक्य झाले. सॅन १९१२ मध्ये भीमराव एल्फिस्टन कॉलेज मधून बी. ए. ची परीक्षा पास झाले.

कोलंबिया विद्यापीठात भीमरावांचा पदव्युत्तर अभ्यास

१९१३ मध्ये, वयाच्या २२ व्या वर्षी, आंबेडकर युनायटेड स्टेट्समध्ये गेले जेथे त्यांना सयाजीराव गायकवाड तिसरे (बडोद्याचे गायकवाड) यांनी स्थापन केलेल्या योजनेअंतर्गत न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तीन वर्षांसाठी $ ११.५० मिळाले. दरमहा बडोदा राज्य शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तेथे पोहोचल्यानंतर लवकरच ते पारशी मित्र नवल भटेना याच्यासोबत लिव्हिंगस्टन हॉलमध्ये स्थायिक झाले.

जून १९१५ मध्ये त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स (एमए) परीक्षा उत्तीर्ण केली, मुख्य विषय म्हणून अर्थशास्त्र आणि इतर विषयांसह समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान आणि मानववंशशास्त्र. त्यांनी पदव्युत्तर पदवीसाठी प्राचीन भारतीय वाणिज्य (प्राचीन भारतीय वाणिज्य) संशोधन कार्य सादर केले. आंबेडकरांवर जॉन ड्यूई आणि त्यांच्या लोकशाहीवरील कार्याचा प्रभाव होता.

१९१६ मध्ये, त्यांना त्यांच्या दुसऱ्या प्रबंधासाठी, नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया – ए हिस्टोरिक अँड ॲनालिटिकल स्टडीसाठी द्वितीय मास्टर ऑफ आर्ट्स देण्यात आला आणि अखेरीस ते लंडनला गेले. ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्त उत्क्रांती या त्यांच्या तिसर्‍या प्रबंधासाठी त्यांनी १९१६ मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी प्राप्त केली आणि त्यांचा प्रबंध प्रकाशित केल्यानंतर १९२७ मध्ये त्यांना अधिकृतपणे पीएचडी मिळाली.

9 मे रोजी त्यांनी मानववंशशास्त्रज्ञ अलेक्झांडर गोल्डनवेझर यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात भारतातील जाती, त्यांची व्यवस्था, उत्पत्ती आणि उत्क्रांती हा त्यांचा पहिला प्रकाशित शोधनिबंध सादर केला. त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर त्यांनी 3 वर्षांच्या कालावधीसाठी अमेरिकेतील अभ्यासक्रम अवघ्या दोन वर्षांत पूर्ण केला आणि 1916 मध्ये ते लंडनला गेले.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे भीमराव

डॉ. आंबेडकर अर्थशास्त्रात आणखी संशोधन करण्याची व लंडन विद्यापीठाची पदवी मिळविण्याची, बॅरिस्टरहोण्याची इच्छा होती. त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाडांना आणखी दोन वर्षे शिष्यवृत्ती वाढविण्याची विनंती केली. तथापि, एक वर्षाची मुदतवाढ मिळाली. “लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पॉलिटिकल सायन्स ” या संस्थेत त्यांना प्रवेश मिळाला. एकदम एम.एस.सी. ला बसण्यास त्यांना परवानगी मिळाली. त्यांनी विविध ग्रंथालयाच्या सहाय्य्यने सखोल अध्ययन सुरूकेले. तथापि, शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने त्यांना भारतात परत यावे लागले.

१९१७ मद्ये मुंबईला परत आल्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानातील नौकरी स्वीकारली. तथापि, या नौकरीत अस्पृश्य असल्याने त्यांना इतरांकडून अतिशय मानहानीचे वागणूक मिळाली. अवहेलना व अपमान सहंकाराव लागला. महाराज्यांच्या निदर्शनास ह्या गोष्टी आणून दिल्या, तरी त्यात बदल न झाल्याने डॉक्टर बाबासाहेबानी हि नौकरी सोडली. १९२१ मध्ये मुंबईच्या सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स मद्ये त्यांना अर्थशात्राचे प्राद्यापक म्हणून नौकरी मिळाली. याच काळात सातवाजनिक कार्यात ते भाग घेऊ लागले. माणगाव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला.

तथापि, इंग्लंडमध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची इच्छा होती. नौकरीतुन काही जमावलेला पैसा व शाहू महाराजांनी केलेले आर्थिक सहकार्य यांच्या आधारावर १९२० मध्ये डॉ . बाबासाहेब पुन्हा इंग्लंडला गेले. १९२१ मध्ये ते एम.एस.सी झाले. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा त्यांचा प्रबंध मान्य करून लंडन विद्यापीठाने त्यांना डी.एस.सी. हि पदवी दिली. १९२३ मद्ये बॅरिस्टर परीक्षेमद्ये ते उत्तीर्ण झाले.

लंडनमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भीमराव आंबेडकर तीन महिने जर्मनीत राहिले, तेथे त्यांनी बॉन विद्यापीठात अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू ठेवला. मात्र वेळेच्या कमतरतेमुळे ते विद्यापीठात जास्त काळ राहू शकले नाहीत. त्यांची तिसरी आणि चौथी डॉक्टरेट (LL.D., कोलंबिया विद्यापीठ, 1952 आणि D.L.D., उस्मानिया विद्यापीठ, 1953) मानद पदवी होती.

डॉ. भीमराव आंबेडकरांचे कार्य

शिवरायांनी शिकविला
तलवारीचा घाव आहे ।।
महात्मा फुल्यांनी सांगितला
ज्ञानाचा प्रभाव आहे |।
शाहू महाराजांनी दिला
आखाड्यातला डाव आहे ।।
माझ्या भीमरायाने रुजविला
प्रेम बंधू भाव आहे ।।

जय भीम

अस्पृश्यांना संघटित व संघर्षासाठी जागृत करण्याचे कार्य

अस्पृश्यांच्या बाबतीत उचवर्णीय समाजाच्या विचार व आचार प्रणाली काही बदल होण्याची शक्यता डॉ. बाबासाहेबांना वाटत नव्हती. त्यामुळे सामाजिक समतेच्या न्यायहक्कासाठी अस्पृश्यांना संघटित करणे व अहिंसक मार्गाने संघर्ष करण्यासाठी त्यांना जागृत करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे डॉ बाबासाहेबांना महत्वाचे वाटत होते. त्यामुळेच त्यांनी महाडच्या तळावरील सत्याग्रह व मंदिरप्रवेशाचा चळवळ हाती घेतली.

भारतात परतल्यावर त्यांनी देशातील जातीय भेदभावाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांना आयुष्यात अनेक वेळा अपमानाला सामोरे जावे लागले. देशात अस्पृश्यता आणि जातिभेद कसा पसरत आहे हे आंबेडकरांनी पाहिले, आजवर अस्पृश्यतेचा रोग खूप गंभीर झाला होता, त्याला देशाबाहेर काढणे हे आंबेडकरांनी आपले कर्तव्य मानले आणि म्हणूनच त्यांनी त्याविरोधात आघाडी तयार केली.

महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह

chavadar tare satygrah is done by babasaheb ambedkar in mahad maharashtra.
mahadche chavadar tare satyagrah

महाडचा सत्याग्रह म्हणजे क्रांतीचा प्रारंभ याग्रहाच्याद्वारे मुक्तीलढ्याचे निशाण रोवले गेले. आपल्या बांधवांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी हा सत्याग्रह केला. ४ ऑगस्ट १९२३ रोजी विधिमंडळात झालेल्या कायदेवजा ठरावानुसार महाडच्या म्युनिसिपालटीने सार्वजनिक पाणवठे, विद्यालये, धर्मशाळा इत्यादी ठिकाणी मुक्त संचाराला मान्यता देणारा ठराव पास केला. तथापि, अस्पृश्यांनी जाण्यांच्या भीतीने या तळ्यावर जाऊन पाणी भरण्याचे धाडस केले नव्हते. त्यामुळेच हे साहस करून अस्पृश्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे त्यांनी ठरविले.

डॉ. बाबासाहेबांनी आपल्या बहुसंख्य अनुयायासह चवदार तळ्याचे पाणी प्राशन केले. अन्यायी समाजव्यवस्थेविरुद्ध केलेले हे बंड होते. आपण माणूस असून माणसाप्रमाणे जगण्याचा आपणास हक्क आहे हे देशाला सांगणारी एक प्रतिकात्मक कृती होती. अस्पृश्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारी ही प्रेरणा होती. सर्वांनी यावेळी केलेल्या टीकेला ” बहिष्कृत भारत या पाक्षिकातून त्यानी उत्तरे दिली. भीक मागून किंवा रडून न्याय मिळत नाही, त्यासाठी आपल्यातील तेजाचेच साहाय्य घेतले पाहिजे या जाणिवेचा या सत्याग्रहामुळे जन्म झाला.

तथापि, पुढील काळात महाड नगरपालिकेने हा ठराव रद्द केला. तळ्याचे शुद्धीकरण केले गेले. त्यामुळेच डॉ. बाबासाहेबांनी २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे सत्याग्रह धण्याचे ठरविले. या परिषदेचा उद्देश स्पष्ट करताना त्यांनी विशद केले की,इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत

त्यामुळेच डॉ. बाबासाहेबांनी २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे सत्याग्रह धण्याचे ठरविले. या परिषदेचा उद्देश स्पष्ट करताना त्यांनी विशद केले की, आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी तळ्यावर जायचे आहे. म्हणजेच ही सभा समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी बोलावलेली आहे. महाडच्या तळावरील सत्याग्रहाने व तेथील परिषदेने अस्पृश्यांचा आत्मविश्वास वाढविला.

मनुस्मृतीचे दहन

महाड येथे भरलेल्या सत्याग्रह परिषदेतच हिंदू समाजाचा धर्मग्रंथ असलेल्या मनस्मतीचे दहन करण्याचा निर्णय घेतला गेला. या ग्रंथातील निरनिराळ्या वचनांनी जातिव्यवस्था व अस्पृश्यतेचे निर्बंध यांचे समर्थन करून हिंदू समाजपद्धती व जातिबंधने याना बळकटी प्राप्त करून दिली होती.

शूद्रांचे आत्मबल नष्ट करून राजकीय, सामाजिक व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी वचने या धर्मग्रंथात होती त्यामुळेच सामाजिक विषमता व उच्च नीच भेदभाव यांचे समर्थन करणाऱ्या या ग्रंथाविरुद्ध प्रतिकातमक कृती करण्याचा निर्णय घेतला गेला.

२५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. प्रस्थापित जातिव्यवस्था व उच्चनीचतेचे भेदभाव याविरुद्ध केलेली ही बंडात्मक कृती असून, अस्पृश्यांचा आत्मविश्वास वाढविणारी घटना होती.

मंदिर प्रवेशाची चळवळ । काळाराम मंदिर प्रवेशासाठी चळवळ

मंदिर प्रवेशाची चळवळ ही अस्पश्यांच्या सामाजिक गुलामगिरीची बंधने तोडण्यासाठी केलेली चळवळ होती. सत्याग्रहाच्याद्वारे निर्धारपूर्वक करण्यात आलेल्या या प्रयत्नांमागे माणूस म्हणून आपला हक्क प्रस्थापित करण्याची प्रेरणा होती.

या मंदिर प्रवेशाने आमचे प्रश्न सुटणार नाहीत पण, आम्हास मानाने किंवा हक्काने रहावयास मिळणार आहे की नाही हे पाहावयाचे आहे, असा डॉ. बाबासाहेबांचा या चळवळींमागे विचार होता.

अस्पृश्यांच्या प्रवेशाने मंदिर भ्रष्ट होत नाही किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्ती अपवित्र होत नाही हे सिद्ध करण्याचा त्यांचा या चळवळीमागे हेतू होता. अस्पृश्यता निवारणासाठी सार्वजनिक व्यवस्था सर्वांना खुल्या असल्या पाहिजेत ही यामागे मागणी होती. ऑक्टोबर १९२९ मध्ये पर्वतीवरील मंदिरात प्रवेश करण्यासाठी पहिला सत्याग्रह केला गेला.

१९३१ साली नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी हजारोंच्या संख्येनी सत्याग्रह करण्यात आला. १९३५ पर्यंत निरनिराळ्या ठिकाणच्या मंदिरातून हे सत्याग्रह केले गेले. सत्याग्रह या प्रभावी शस्त्राच्याद्वारे संघर्ष करणाऱ्या अस्पृश्यांना या चळवळीतून आत्मिक बळ मिळाले.

पुणे करार | Puna Pact

pune karar is done bitween gandhi and ambedkar to save the life of mahatma gandhi and to protect the right of dalit community.
pune pact between Ambedkar and Gandhi

गोलमेज परिषदेत एकमत न झाल्याने पंतप्रधान रॅम्से मॅकडोनल याने १९३२ मध्ये “जातीय निवाडा’ प्रसिद्ध केला. त्यानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ दिले गेले. अस्पृश्यांना हिंदूपासून फोडण्याच्या या कृतीला विरोध म्हणून म. गांधींनी प्राणांतिक उपोषण सुरू केले.

गांधींच्या प्रकृतीची काळजी निर्माण झाल्याने श्रेष्ठ नेत्यांनी एक योजना तयार केली व डॉ. आंबेडकरांनी पुणे येथे या योजनेला मान्यता दिली. त्यानुसार स्वतंत्र मतदारसंघाचे कलम रद्द करून अस्पृश्यांना राखीव मतदारसंघ दिले.

पुणे कराराबद्दल डॉ.आंबेडकर म्हणतात, “काही दिवसांपूर्वी ज्या बिकट परिस्थितीत मी सापडलो होतो तशी बिकट परिस्थित कोणावरही आली नसेल.

एकीकडे भारतातील ज्येष्ठ नेत्याचा जीव वाचविण्याची जबाबदारी होती व दुसरीकडे अस्पृश्य बांधवांच्या संरक्षणाचा व कल्याणाचा कूट प्रश्न सोडविण्याची जबाबदारी होती. या करारामुळे मी एकीकडे महात्मा गांधींचे जीवनहीं वाचवू शकलो व दुसरीकडे सुसंगतपणे दलितवर्गाच्या कल्याणाचा व त्यांच्या हितसंबंधाच्या संरक्षणाचा प्रश्न सोडवू शकलो.

शैक्षणिक कार्य

अस्पृश्य समाजाची परंपरागत सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी त्यांना जागृत करणे डॉ. बाबासाहेबांना आवश्यक वाटत होते. त्यामुळेच प्रारंभीच्या काळापासून अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या कार्यावर त्यांनी भर दिला. संधीचा योग्य विनियोग केल्यास अस्पृश्य व्यक्तीही उच्चविद्याविभूषित होते हे तत्त्व त्यांनी आपल्या उदाहरणाद्वारे समाजासमोर मांडले.

अस्पृश्य समाजाचे योग्य शिक्षण झाल्यास तो समाज आपल्या हक्कांविषयी जागरूक राहील व ते हक्क प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करील असा त्यांचा विश्वास होता. आपल्या समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी २० जुलै १९२४ रोजी “बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेची स्थापना केली.

या संस्थेच्यावतीने वाचनालये प्रौढांसाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. शिक्षण घेण्यासाठी अस्पृश्य बांधवांना प्रोत्साहित केलेल्या संस्थांमध्ये शिक्षणाचे मानवतेच्या दृष्टीने मूल्य जाणवणाऱ्या, दलित विद्यार्थ्यांकडे सहानुभूतीने पाहणाऱ्या व त्यांच्या उन्नतीचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचीच नेमणूक केली.

दोनच राजे इथे गाजले
कोकण पुण्य भूमीवर
एक त्या रायगडावर
एक चवदार ताळ्यावर

जय भीम जय शिवराय

राजकीय कार्य

राजकीय जीवनाच्या बाबतीत डॉ. आंबेडकरांनी विशिष्ट धोरणात्मक कार्य केले. गव्हर्नरच्या कायदे कौन्सिलचे सभासद म्हणून काम करतांना, ब्रिटिश शासनाबरोबरचे धोरण ठरविताना, कायदामंत्री म्हणून काम करताना, भारतीय घटनेचा आराखडा ठरवितांना डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्कांविषयी असलेली वचनबद्धता कधीही सोडली नाही.

आपल्या अस्पृश्य बांधवांना त्यांचे न्याय हक्क कसे मिळवून द्यायचे हा एकाच विचार त्यांच्या डोळ्यासमोर असे. इंग्लंडहून शिक्षण घेऊन परत आल्यानंतर त्यांनी आपल्या बांधवांच्या मुक्ती संग्रामासाठी आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

१९२६ ते १९३६ या काळात मुंबईच्या विधिमंडळावर सदस्य म्हणून काम करताना त्यांनी अस्पृश्यांचे कल्याण, प्राथमिक शिक्षणातील दोष, दारूबंदीची आवश्यकता, अंदाजपत्रकातील त्रूटी इत्यादी विषयांवर आपले विद्वतापर्ण विचार मांडले.

सायमन कमिशनला दिलेल्या स्वतंत्र निवेदनाच्याद्वारे प्रातिक कायदेमंडळात अस्पश्यांचे हितसंबंध व हक्काचे रक्षण करण्यासाठी कोणत्या तरतूदी हव्या याची मागणी केली. याशिवाय अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय, त्यावर समान खर्च करण्याची तरतूद, सैन्य व पोलिसदलात अस्पृश्यांची भरती, अस्पृश्यांना नौकरीत अग्रहक्क देण्याची तीस वर्षांची तरतूद इत्यादी मागण्या त्यांनी केल्या.

राजकीय पक्ष संघटना

देशाच्या राजकारणात प्रत्यक्ष भाग घेऊन ते आपल्या ध्येयास नेल्याशिवाय दलितांना आपली दुःखे दूर करता येणार नाहीत याची जाणीव असल्यानेच बाबासाहेबांनी १९३५ च्या कायद्यानुसार होणाऱ्या निवडणूकांसाठी “ स्वतंत्र योजना ” स्थापना केली.या पक्षाचे कार्य कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी असल्यामुळे ‘दलित” ऐवजी त्यांनी ‘मजूर’ शब्द स्वीकारला.

१९३७ च्या निवडणूकीत या पक्षाने १३ जागा जिंकल्या. बाबासाहेब निवडून आले. १९३७ ते १९४२ च्या काळात मजूर पक्षाने कामगाराच्या प्रश्नाविषयी विधिमंडळात व बाहेर आवाज उठविला. औद्योगिक बिल व वतनदारी खोतीची पद्धत रद्द करण्यासाठी आवाज उठविला. मजूरांच्या कामाचे आठ तास केले. मजूरांना निवारा व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली.

त्यानंतर त्यांनी ” अखिल भारतीय शेडयुल्ड कास्टस फेडरेशनची” स्थापना केली. भारतातील सर्व अस्पृश्य वर्गाच्या संघटनांना या फेडरेशनमध्ये सहभागी होण्याचे व त्यामार्फत कार्य करण्याचे आवाहन केले. १९५२ च्या निवडणुकीत फेडरेशनने २२ जागांपैकी १३ जागा जिंकल्या. फेडरेशनला फार मोठ्या प्रमाणावर यश मिळाले नाही.

१९४२ ते १९४६ याकाळात क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन वेव्हेल योजना याद्वारे राजकीय तोडगा शोधण्याचे प्रयल झाले. तथापि, या योजनांमधून अस्पृश्यांचे हितसंबंध डावलले जात असल्याचे पाहून डॉ. आंबेडकरांनी ब्रिटिश मुत्सद्यांना स्वतंत्र निवेदने दिली.

१५ ऑगस्ट १९४७ च्या पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते कायदा मंत्री झाले. राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून प्रमुख जबाबदारी देण्यात आली व ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळेच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते. अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी त्यांनी घटनात्मक तरतूदी केल्या. दलित जाती व जमातींना राखीव जागा, सोई-सवलती, या तरतुदीच्या अंमलबजावणीचे स्वतंत्र कार्य व त्यांच्या मूल्यमापनाची सोय करून त्यांनी आपल्या बांधवांसाठी अनमोल कार्य केले.

डॉ. भीमराव आंबेडकरांची ग्रंथ आणि पुस्तके

  • पहिला प्रकाशित लेख – भारतातील जाती :- त्यांची प्रणाली, उत्पत्ती आणि विकास (Castes in India : Their Mechanism, Genesis and Development)
  • ईव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया ( Evoluation of provincial finance in British India )
  • हू आर द शुद्राज :- ( who are the shudraj )
  • जातीचा विनाश :- ( Annihilation of Caste )
  • द बुद्ध एंड हिज़ धम्म :- ( The Buddha and His Dhamma )
  • बुद्ध या कार्ल मार्क्स :- (Buddha Or Karl Marx)
  • द अनटचेबलस: ए थीसिस ऑन द ओरिजन ऑफ अनटचेबिलिटी :- ( The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables )
  • थॉट्स ऑन पाकिस्तान :- ( Thoughts on Pakistan )

डॉ. भीमराव आंबेडकरांना मिळालेले सम्मान आणि पुरस्कार

1990 मध्ये आंबेडकरांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल/अशोक हॉलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.

मानद पदव्या

डॉक्टर ऑफ लॉ (LLD), 1952 – कोलंबिया युनिव्हर्सिटी, यूएसए

डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.), 1953 – उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद, भारत

एक समाजक्रांतीकारक पत्रकार भीमराव

आंबेडकर हे यशस्वी पत्रकार आणि प्रभावी संपादक होते. वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजात प्रगती होईल, असा त्यांचा विश्वास होता. चळवळीत ते वृत्तपत्र अत्यंत महत्त्वाचे मानत. शोषित आणि दलित समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी अनेक शोधनिबंध आणि पाच मासिके प्रकाशित आणि संपादित केली. यामुळे त्यांची दलित चळवळ पुढे नेण्यात त्यांना मोठी मदत झाली.

त्यांनी म्हटले आहे की, “कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी वृत्तपत्र लागते, चळवळीचे वृत्तपत्र नसेल तर त्या चळवळीची अवस्था तुटलेल्या पक्ष्यासारखी होते.” डॉ. आंबेडकर हे दलित पत्रकारितेचे आधारस्तंभ आहेत कारण ते दलित पत्रकारितेचे पहिले संपादक, संस्थापक आणि प्रकाशक आहेत.

डॉ.आंबेडकरांनी सर्व पेपर/पत्रे मराठी भाषेतच प्रकाशित केली कारण त्यांचा कार्यक्षेत्र महाराष्ट्र होता आणि मराठी ही तिथली लोकभाषा आहे. आणि त्यावेळी महाराष्ट्रातील शोषित आणि दलित जनता फारशी शिक्षित नव्हती, त्यांना फक्त मराठी समजू शकत असे.

प्रकाशित वृत्तपत्रे

मूकनायक

३१ जानेवारी १९२० रोजी बाबासाहेबांनी अस्पृश्यांवर होणाऱ्या अत्याचारांवर प्रकाश टाकण्यासाठी “मूकनायक” नावाचे पहिले मराठी पाक्षिक सुरू केले. आंबेडकर आणि पांडुराम नंदराम भाटकर हे त्याचे संपादक होते. या वृत्तपत्राच्या वरच्या बाजूला संत तुकारामांचे वचन होते. त्यासाठी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून 25 हजार रुपयांची आर्थिक मदतही मिळाली.

बहिष्कृत भारत

आंबेडकरांनी ३ एप्रिल १९२४ रोजी ‘बहिष्कृत भारत’ हे दुसरे मराठी पाक्षिक काढले. त्याचे संपादन डॉ.आंबेडकरांनीच केले होते. हा शोधनिबंध मुंबईहून प्रकाशित झाला. या पत्राच्या संपादकीय लेखनात त्यांनी लिहिले आहे की जर बाळ गंगाधर टिळक अस्पृश्यांमध्ये जन्माला आले असते तर त्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असा नारा दिला नसता तर ‘अस्पृश्यता निर्मूलन हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे म्हटले असते. या वृत्तपत्राच्या वरच्या भागावर संत ज्ञानेश्वरांचे वचन होते.

प्रबुद्ध भरात, समता, जनता ही तीन वृत्तपत्रे सुद्धा बाबासाहेबाईंनी प्रकाशित केली.
अशाप्रकारे मित्रांनो भीमरावांनी एकूण पाच वर्तमानपत्रे प्रकाशित केली.

बाबासाहेबांचे दुसरे लग्न

१९४० च्या उत्तरार्धात भारतीय राज्यघटनेचा मसुदा पूर्ण केल्यानंतर, त्यांना झोपेची कमतरता जाणवत होती, त्यांच्या पायांमध्ये न्यूरोपॅथिक वेदना होत होत्या आणि ते इन्सुलिन आणि होमिओपॅथिक औषधे घेत होते. ते उपचारासाठी बॉम्बे (मुंबई) येथे गेले आणि तेथे त्यांची भेट डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी झाली, ज्यांच्याशी त्यांनी १५ एप्रिल १९४८ रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या घरी लग्न केले होते.

डॉक्टरांनी त्यांची काळजी घेण्यासाठी उत्तम स्वयंपाकी असलेल्या आणि वैद्यकीय ज्ञान असलेल्या जीवन साथीदाराची शिफारस केली. बाबासाहेब, त्यांना प्रेमाने ‘माय’ किंवा ‘मायसाहेब’ म्हणत असत, २९ मे २००३ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी मेहरौली, नवी दिल्ली येथे निधन झाले.

व्यक्तिगत जीवनाची माहिती

आंबेडकरांच्या आजोबांचे नाव मालोजी सकपाळ, वडिलांचे नाव रामजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते. 1896 मध्ये आंबेडकर पाच वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे त्यांची मावशी मीराबाई यांनी त्यांची काळजी घेतली, जी त्यांच्या वडिलांची मोठी बहीण होती. मीराबाईच्या सांगण्यावरून रामजीने जिजाबाईंशी पुनर्विवाह केला, जेणेकरून मुलगा भीमरावांना आईचे प्रेम मिळावे.

भीमराव पाचवी इंग्रजी वर्गात शिकत असतांना त्यांचा विवाह रमाबाईशी झाला. रमाबाई आणि भीमराव यांनाही पाच मुले होती – (चार मुले) यशवंत, रमेश, गंगाधर, राजरत्न आणि एक मुलगी ( इंदू ) पण “यशवंत” वगळता सर्व मुले बालपणीच मरण पावली होती. प्रकाश, रमाबाई, आनंदराज आणि भीमराव ही यशवंत आंबेडकरांची मुले आहेत.

डॉ. भीमराव यांचे गुरु कोण?

भीमराव म्हणाले होते, तीन गुरूंमुळे त्यांचे जीवन सफल झाले आहे. त्यांनी ज्या तीन महान व्यक्तींना आपले गुरू मानले त्यात त्यांचे पहिले गुरू तथागत गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिराव फुले होते.

हिंदू कोड बिल म्हणजे काय.

१९५१ मध्ये, बाबासाहेबांनी संसदेत हिंदू कोड बिल मांडले. हिंदू कोड बिलाला विरोध झाल्यानंतर आणि ते संसदेत पारीत न झाल्यानंतर आंबेडकरांनी आपल्या मंत्रिमंपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिलाद्वारे भारतीय महिलांना अनेक अधिकार देण्याची चर्चा होती. या मसुद्यात स्त्रियांना अनेक अधिकार देण्याची व्यवस्था करण्यात येणार होती. उत्तराधिकार, विवाह आणि अर्थव्यवस्थेमध्ये कायद्यांत लैंगिक समानतेची मागणी करण्यात आली होती.

पंतप्रधान नेहरू, मंत्रिमंडळ आणि इतर काही काँग्रेस नेत्यांनी याला बिलाला पाठिंबा दिला असला, तरी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि वल्लभभाई पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने संसद सदस्य त्यास विरोध करीत होते.

बघा काय संयोग झाला तो , पंडित नेहरू यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी हिंदू कोड बिलातील स्त्रियांच्या सन्मानासाठी आणि त्याच्या अधिकारासाठी असलेले कायदे संसदेमधून पारित करून घेतले. आणि हिंदू स्त्रियांच्या सबलीकरणाचा मार्ग प्रशस्थ केला. अशाप्रकारे इंदिराजींनी पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब यांच्या कार्याला अभिवादन केले.

कलाम ३७० ला बाबासाहेबांनी विरोध का दर्शविला.

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणार्‍या आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध घटनेत समाविष्ट केलेल्या भारतीय संविधानाच्या कलम ३७० ला आंबेडकरांनी विरोध केला. बलराज मधोक यांनी सांगितल्याप्रमाणे, आंबेडकरांनी काश्मिरी नेते शेख अब्दुल्ला यांना स्पष्टपणे सांगितले होते: “तुम्हाला भारताने तुमच्या सीमांचे रक्षण करायचे आहे, तुमच्या हद्दीत रस्ते बांधले पाहिजेत, तुम्हाला धान्य पुरवले पाहिजे आणि काश्मीरला भारतासारखा दर्जा दिला पाहिजे. पण भारत सरकारला फक्त मर्यादित अधिकार असावेत आणि भारतीय जनतेला काश्मीरमध्ये कोणतेही अधिकार नसावेत. या ऑफरला संमती देणे, भारताचा कायदा मंत्री या नात्याने मी भारताच्या हिताच्या विरोधात विश्वासघात करणारी गोष्ट आहे, असे कधीही होणार नाही.

त्यानंतर अब्दुल्ला नेहरूंशी संपर्क साधला, त्यांनी त्यांना गोपाल स्वामी अय्यंगार यांच्याकडे निर्देशित केले, त्यांनी वल्लभभाई पटेल यांच्याशी संपर्क साधला आणि सांगितले की नेहरूंनी स्के चे वचन दिले होते. काश्र्मीरला विशेष दर्जा. हा लेख पटेल यांनी पास केला होता, तर नेहरू परदेश दौऱ्यावर होते. ज्या दिवशी लेख चर्चेसाठी आले, त्यावर आंबेडकरांनी प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर इतर लेखांवर भाग घेतला. काश्मीरच्या मुद्यावर सर्व युक्तिवाद कृष्ण स्वामी अय्यंगार यांनी केले.

समान नागरिक संहिता विषयी बाबासाहेबांचे काय म्हणणे होते

आंबेडकर प्रत्यक्षात समान नागरी संहितेच्या बाजूने होते आणि काश्मीरच्या बाबतीत कलम ३७० च्या विरोधात होते. आंबेडकरांचा भारत हा आधुनिक, वैज्ञानिक विचारांचा आणि तर्कशुद्ध विचारांचा देश आहे, ज्यामध्ये वैयक्तिक कायद्याला स्थान नाही. संविधान सभेतील चर्चेदरम्यान, आंबेडकरांनी समान नागरी संहिता स्वीकारण्याची शिफारस करून भारतीय समाज सुधारण्याची इच्छा व्यक्त केली

बाबासाहेबांनी बौद्ध धर्मांतरण का केले

डॉ. आंबेडकरांचे हे धर्मांतर म्हणजे त्यांनी जोपासलेल्या आप्रारंभीपासूनच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात डॉ. आंबेडकरांना अनुभव आले होते. त्यामुळेच हिंदू धर्मात अस्पृश्यांना माणूसकीचे अधिकार मिळणार नाहीत असे त्यांना जाणवू लागले होते.

अस्पृश्यांना मनुष्यपण मिळविण्यासाठी धर्मांतर अपरिहार्य आहे याची जाणीव झाली होती, म्हणून १३ ऑक्टोबर १९३५ मध्ये येवला येथील परिषदेत “मी हिंदू म्हणून मरणार नाही’ असे त्यांनी घोषित केलेले होते. ही प्रतिज्ञा त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी पूर्ण केली. नागपूर येथील ऐतिहासिक समारंभात आपल्या असंख्य अनुयायांसह त्यांनी बौद्धधर्माची दीक्षा घेतली.

डॉ.आंबेडकरांचे हे धर्मातर म्हणजे त्यांनी जोपासलेल्या आदर्श समाजरचनेच्या कल्पनेच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊलच होते. अस्पृश्यांना माणूसपण मिळवून देण्यासाठी त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला.

विसाव्या शतकात सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात असामान्य कार्य करणारी व्यक्तिमद्ये डॉ. आबेडकर यांचे नाव सर्वश्रेष्ठ मानले जाते. वर्षांनुवर्ष परावलंबी व असाह्य जीवन जगणाऱ्या अस्पृश्यांना माणूस म्हणून स्वतत्र जीवन जगण्याचा हक्क डॉ. आंबेडकर यांनी मिळवून दिला. या कार्यासाठी त्यांनी आपले सर्व जीवन व्यतित केले. अस्पृश्यांना समान हक्क, कोणाची सहानुभूती किंवा भूतदया म्हणून मिळावेत हे त्यांना मान्य नव्हते.

समान हक्काच्या व न्याय मागणीसाठी, अस्पृश्य समाज जागृत व संघटित व्हावा. स्वत:च्या पायावर उभा रहावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. अस्पृश्यांचा आत्मविश्वास वाढविला व त्यांना आत्मसंयमनाने जगण्यास शिकविले. माणूस म्हणून जगण्याच्या हक्कांसाठी त्यांनी समाजाला बौद्धधर्माचा संदेश दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याला भारतीय इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे. त्यांनी अस्पश्यांमधील माणूस जागा केला. व त्याला ताठ मानेने जगण्यास शिकविले. ही एक अतिशय महत्त्वाची परिवर्तनीय सामाजिक घटनाच होय. कोणत्याही प्रसंगी आपल्या बांधवांच्या हिताकडे दुर्लक्ष होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली.

भारताच्या घटनेच्या आधारे आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला. डॉ. आंबेडकरांबद्दल धनंजय कीर म्हणतात, ” या युगातील पहिल्या श्रेणीतील अलौकिक पुरुषांमध्ये त्यांचे स्थान आहे. जे आजवर जगात पददलिताचे रक्षणकर्ते व कैवारी होऊन गेले, मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार होऊन होऊन गेले. त्यात त्यांचे स्थान सर्वोच्च आहे.

डॉ. भीमराव आंबेडकर यांचे निधन

बाबासाहेब आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे फार चिंतीत असल्याचे. मधुमेह, अस्पष्ट झालेली दृष्टी , यांसारख्या अनेक आजारांमुळे त्यांची तब्येत खालावत गेली. दिर्घ आजारामुळे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील आपल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बौध्द धर्म स्विकारल्यामुळे त्या धर्माप्रमाणेच त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतीमदर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता.

चैत्यभूमी | Babasahebanchi samadhi

बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला मुंबईत (महाराष्ट्र) आणण्यात आले. कारण त्यांचे राहणे मुंबईलाअसायचे.
त्यांचे महापरिनिर्वाण चैत्यभूमीवर करण्यात आले. चैत्यभूमी ही दादर चौपाटीजवळ आहे. चैत्यभूमी हे आंबेडकरांच्या अनुयायांसाठी एक आदरणीय तीर्थक्षेत्र आहे, जे 6 डिसेंबर रोजी त्यांच्या पुण्यतिथी (महापरिनिर्वाण दिवस) रोजी लाखोंच्या संख्येने भेट देतात.

आंबेडकरवाद म्हणजे काय?

(आंबेडकरवाद) ही आंबेडकरांची विचारधारा आणि तत्वज्ञान आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि बौद्ध धर्मातील, विज्ञान, मानवतावाद, सत्य, अहिंसा इत्यादी विषय आंबेडकरवादाचे तत्व आहेत.

अस्पृश्यता नष्ट करणे, दलितांमधील सामाजिक सुधारणा, भारतात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार, आणि भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत अधिकार व मूलभूत हक्कांचे संरक्षण, नैतिक व जातिमुक्त समाजाची निर्मिती आणि भारताची प्रगती ही प्रमुख उद्दिष्टे आहेत. आंबेडकरवाद ही सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विचारधारा आहे.

बाबासाहेबांचे लोकप्रिय गीत | भीमगीत

तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे | Tujhya Raktamadhal Bhimrao Pahije Lyrics

ना भाला नां बरची ना घाव पाहिजे
ना भाला नां बरची ना घाव पाहिजे..

पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे..

नव्या भागीताचे स्वप्न ते हसुदे
तुझी भीम शक्ती जगाला डिसुदे
कुण्या गावकीचा दुआ साधला रे
आहे भीम युगाचा नवा दाखला रे

ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे
ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे..
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे।

असे कैक वैरी अचंबित केले
रुढीच्या नातीला रे तूच चीत केले
चाललो आम्ही पण शिखर वैभवाला
गरज आज नाही कुणाची आम्हाला

ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे
ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे..
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे

तुझा तू जपावा नवा वारसा तू
स्वतः ला स्वतः घडावं माणसा तू
नको मेजवानी अशी दुर्जनाची
भाकरी ती खाऊ आम्ही इमानाची

ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे

उसळू दे त्या लाटा तुझ्या शिरा वरती
आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती
सोडला आम्ही तो वाळवंट सारा
भीमाने दिला हा सुखाचा किनारा

ना दरीया ना सागर ना नाव पाहिजे
ना दरीया ना सागर ना नाव पाहिजे…
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे

तुझ्या रक्ता मधला…


Song: Naa Bhala Naa Barchi
Album: Top Bhimgeete
Singer: Anand Shinde
Music: Harshad Shinde
Lyrics: Sagar Pawar
Music Label: T-series

बाबासाहेबांवरील फिल्मे व धारावाईक

आंबेडकरांच्या जीवनावर आणि विचारांवर आधारित अनेक चित्रपट, नाटके, पुस्तके, गाणी, दूरदर्शन मालिका आणि इतर कामे आहेत. जब्बार पटेल यांनी सन 2000 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर या इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, ज्यामध्ये मामूट्टी मुख्य भूमिकेत होते. श्याम बेनेगल दिग्दर्शित भारताच्या संविधानाच्या निर्मितीवर आधारित टीव्ही मिनी-सिरीज (कॉन्स्टिट्यूशन) मध्ये सचिन खेडेकर यांनी आंबेडकरांची मुख्य भूमिका साकारली होती.

भीमसैनिकांचे महत्वाचे दिवस

१. १४ एप्रिल :- या दिवशी बाबासाहेबांचा जन्मदिवस असतो.

२. ६ डिसेम्बर :- बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस

३. दसरा :- हा दिवस भीम अनुयांसाठी फार महत्वाचा असतो या दिवशी बाबासाहेबांनी लाखो अनुयांसह दीक्षाभूमीवर धर्मांतरण केले आणि बौद्ध धर्मात प्रवेश केला.

डॉ. भीमराव आंबेडकर जयंती | 14 April

मित्रांनो लवकरच म्हणजे १४ एप्रिलला आपल्या सर्वांच्या भेटीला भीम जयंती येणार आहे. भीम जयंती का बर साजरी केली जाते? याचे कारण कि या दिवशी बाबासाहेबांचा जन्मदिवस असतो. भीमरावांचे अनुयायी या दिवशी खूप जिच्यात आणि आनंदात असतात. भारतामद्ये सगळीकडे भीमजयंती साजरी केली जाते.
महाराष्ट्रात तर भीम जयंतीचा उत्साह काही औरच असतो. महाराष्ट्राच्या गावागावात भीमरावांनी मिरवणूक काढण्यात येते. तसेच या दिवशी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येतात जसे की संविधानावर निबंध, रांगोळी स्पर्धा , गाण्याची स्पर्धा इतर.
संध्याकाळी गावजेवण देण्यात येई तर रात्री कव्वाली, ऑर्केस्ट्रा, संगीत, नृत्याचे कार्यक्रम होत असतात.

डॉ.भीमराव आंबेडकर यांची स्वाक्षरी | Dr. Bhimrao Ambedkar Signature

ज्या (signature) स्वाक्षरीमुळे दलितांची पिढ्यानपिढ्या चालत आलेली गुलामीची बेडी तोडण्यात आली ती स्वाक्षरी म्हणजे माझ्या भीमरायाची.
भीमरायांची ही स्वाक्षरी अनेकांचे जीवन बदलणारी होती. ह्या स्वाक्षरीमुळे भारतातील दलितांना स्वातंत्रेची, समानतेची, प्रेमाची, न्यायाची आणि आपला विकास करण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांनी अथक प्रयत्नांनी भारताचा संविधान लिहिला आणि याच संविधानामुळे भारत एक सार्वभौम्य गणराज्य झाले. आम्ही भारताचे लोक एक आहोत आपल्यामध्ये स्वतंत्रता, विज्ञानवाद, तर्कशुद्धता आणि राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण झाली आहे. भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉ. भीमराव आंबेडकर यांची स्वाक्षरी भारताच्या संविधान कोरली गेलेली आहे.

Dr. Bhimrao Ambedkar Signature

तर आजच्या पोस्टमध्ये आपण Babasaheb Ambedkar Information In Marathi याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, मला खात्री आहे की तुम्हाला बाबासाहेबांबद्दल योग्य ती माहिती मिळाली असेल. तुमच्या जवळ Babasaheb Ambedkar Information In Marathi 10 lines माहिती असेल तर आम्हाला कंमेंट द्वारे कळवा आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सोसिअल माध्यमातून ( Facebook, Twitter, Whatsapp, Instagram) Share करायला विसरू नका . या पोस्ट ला Like करून आमच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या.

Leave a Comment