द्रौपदी मुर्मू यांचे जीवन चरित्र । Draupadi Murmu Biography in Marathi

द्रौपदी मुर्मू यांचे जीवन चरित्र  (Draupadi Murmu Biography in Marathi)
Draupadi Murmu Biography in Marathi

द्रौपदी मुर्मू यांचे जीवनचरित्र [ जात, वय, पती, पगार, मुलगी, मुलगा, RSS, शिक्षण, अध्यक्ष, जन्मतारीख, कुटुंब, व्यवसाय, धर्म, पक्ष, करिअर, राजकारण, पुरस्कार, मुलाखत ] । Draupadi Murmu Biography in Hindi [caste, age, husband, income, daughter, rss, president, sons, qualification, date of birth, family, profession, politician party, religion, education, career, politics career, awards, interview, speech

द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला नेत्या आहेत,त्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मोदी सरकारची पहिली पसंती आहे.सध्या त्यांची झारखंडच्या पहिल्या महिला आदिवासी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, यावेळी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी 20 नावांवर पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि मुर्मू यांच्या कार्याची दखल घेत भाजपने राष्ट्रपतीपदासाठी त्यांची निवड केली आहे. निवडणूक जिंकल्यास राष्ट्रपती होणार्‍या त्या पहिल्या आदिवासी महिला थरातील. त्यांना भारत सरकारची Z+ सुरक्षा आहे.

भाजपमध्ये असताना द्रौपदी मुर्मू यांनी अनेक प्रमुख भूमिका पार पाडल्या आहेत, त्यांनी एसटी (ST) Scheduled Tribe मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाची भूमिका पार पाडली त्याचबरोबर मयूरभान जिल्ह्यामध्ये भाजपचे जिल्हाधक्ष्य म्हणून काम केले. मे 2015 मध्ये, भारतीय जनता पक्षाने त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी निवड केली. झारखंडच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. त्या ओडिशाच्या पहिल्या महिला आणि आदिवासी नेत्या ठरल्या. नंतर त्यांची ओडिशा राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

लोकमान्य टिळक यांची ऐतिहासिक माहीती वाचा

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म आणि जीवन प्रवास

मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला ओडिशा येथील मयुरभंज जिल्ह्यातील बैदोपोसी गावमध्ये एका आदिवासी कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरंची नारायण टुडू असे आहे. त्यांचे लग्न श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाले होते. श्याम चरण यांचे निधन झालेले आहे. त्यांना दोन मुलेही होते, पण ते आता या जगात नाहीत. मुर्मू यांनी देशासाठी आपले जीवन वाहून घेतले आणि मुलगी इतिश्री मुर्मू सोबत जीवन जगत आहे. .

पूर्ण नावद्रौपदी मुर्मू
जन्म२० जुन १९५८
जन्मस्थानबैदोपोसी गाव, मयूरभंज जिल्हा, उड़ीसा, भारत
वय (२०२२)६४
व्यवसायराजकारणी
वडिलांचे नावबिरंची नारायण टुडू
आईचे नावमाहित नाही
पतीचे नावश्याम चरण मुर्मू
मुलीचे नावइतिश्री मुर्मु
पदवीकलाशाश्त्र
जातीअनुसूचित जमाती
धर्महिंदू
कॉलेजराम देवी महिला कॉलेज, भुवनेश्वर,ओडिशा
वजन७४ किलो
उंची५ फूट ४ इंच

द्रौपदी मुर्मू यांचे शिक्षण

जेव्हा त्यांना थोडी समज आली तेव्हा त्यांच्या पालकांनी मुर्मू यांना आपल्या भागातील एका शाळेत दाखल केले, जिथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी भुवनेश्वर शहर गाठले.भुवनेश्वर शहरात गेल्यानंतर त्यांनी रमा देवी महिला महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि या महाविद्यालयातूनच पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना ओडिशा सरकारमध्ये विद्युत विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली. १९७९ ते १९८३ पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. यानंतर त्यांनी १९९४ साली रायरंगपूर येथील अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन सेंटरमध्ये शिक्षक म्हणून काम सुरू केले आणि १९९७ पर्यंत त्यांनी हे काम केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संविधान निर्माते) यांची सत्यावर आधारित माहिती

त्या पुष्कळ मोठया पदावर राहिलेल्या आहेत तरीसुद्धा त्यांच्यामद्ये अहंकार दिसून येत नाही. एके दिवशी त्यांनी शिव मंदिराला भेट दिली असता त्यांना मंदिरामध्ये अस्वच्छता दिसली तेव्हा त्यांनी स्वतः झाडू लावून तिथला परिसर स्वच्छ केला. तो विडिओ तुम्ही इथे बघू शकता.

मुर्मू यांचे कुटुंब

त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू असून द्रौपदी मुर्मू ह्या संताल आदिवासी कुटुंबातील आहेत. त्याच्या पतीचे नाव पतीचे नाव श्याम चरण मुर्मू आहे. त्यांना दोन मुले होती. इतिश्री मुर्मु या द्रौपदी मुर्मू यांच्या कन्या आहेत. मुलीच्या पाठिंब्याने त्या राजकीय जीवनात यशस्वी झाल्या आहेत.

1997 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड

1997 मध्ये त्या ओडिशाच्या रायरंगपूर जिल्ह्यातून प्रथमच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. तसेच रायरंगपूरच्या उपाध्यक्षा बनल्या. याशिवाय 2002 ते 2009 या कालावधीत मयूरभंज जिल्हा भाजपचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. 2004 मध्ये त्या रायरंगपूर विधानसभेतून आमदार बनल्या आणि पुढे जाऊन 2015 साली झारखंडसारख्या आदिवासीबहुल राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारीही त्यांना मिळाली.

राजकीय कारकीर्द

  • द्रौपदी मुर्मू यांना 2000 ते 2004 या कालावधीत स्वतंत्र प्रभारासह ओरिसा सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून परिवहन आणि वाणिज्य खाते हाताळण्याची संधी मिळाली.
  • 2002 ते 2004 या काळात ओरिसा सरकारचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय खातेही सांभाळले.
  • 2002 ते 2009 पर्यंत त्या भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या.
  • सन २००६ ते २००९ या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एसटी मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले.
  • एसटी मोर्चासोबतच ते 2013 ते 2015 या काळात भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते.
  • 2015 मध्ये त्यांना झारखंडचे राज्यपालपद मिळाले आणि ते 2021 पर्यंत या पदावर राहिले.

द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून घोषणा

आतापर्यंत अनेकांना द्रौपदी मुर्मूबद्दल माहिती नव्हती, पण अलीकडे चार-पाच दिवसांपासून त्या खूप चर्चेत आहेत. लोक इंटरनेटवर शोधत आहेत की द्रौपदी मुर्मू कोण आहेत, तर सांगू इच्छिते की द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल होत्या. तसेचत्या एक आदिवासी महिला आहेत. त्यांना नुकतेच एनडीएने भारताच्या पुढील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

अशाप्रकारे, जर द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती होण्यात यशस्वी ठरल्या, तर त्या भारताच्या राष्ट्रपती होणार्‍या पहिल्या आदिवासी महिला असतील, तसेच त्या भारताच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारी दुसरी महिला ठरतील. याआधी प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या महिला राष्ट्रपती होत्या.

पती आणि दोन मुले यांची सुटली साथ

द्रौपदी मुर्मूचा यांचे लग्न श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाले होते, त्यांच्यापासून त्यांना एकूण 3 मुले होती, ज्यामध्ये दोन मुले आणि एक मुलगी होती. त्यांचे पती व दोन मुले हे जग सोडून गेल्यामुळे त्यांचे खासगी जीवन फारसे आनंदी नव्हते. त्यांना इतिश्री नावाची एक मुलगी आहे जिचा विवाह त्यांनी गणेश हेमब्रमशी केला.

पुरस्कार

द्रौपदी मुर्मू यांना 2007 मध्ये सर्वोत्कृष्ट आमदाराचा नीलकंठ पुरस्कार मिळाला होतो. ओडिशा विधानसभेने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

या पोस्ट मध्ये मी तुम्हाला द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी Authentic माहितीदेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पोस्टमुले तुम्हाला द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी माहिती तुम्हाला मिळाली असेल. या पोस्टविषयी तुमच्या प्रतिक्रिया कंमेंटद्वारे कळवा. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना share करा.

Leave a Comment