गोपाळ गणेश आगरकर यांचे संपूर्ण जीवनचरित्र | Gopal Ganesh Agarakar Biography

पुर्ण नावगोपाळ गणेश आगरकर
जन्म१४ जुलै१८५६
जन्मगावटेंभू (कऱ्हाड जि. सातारा)
आईचे नावसरस्वती आगरकर
वडिलगणेशराव आगरकर
शिक्षण १८७५ साली मॅट्रिक परिक्षा उत्तिर्ण,
१८७८ साली बी.ए. परिक्षा उत्तिर्ण,
१८८० साली एम.ए पुर्ण केले
पत्नीयशोदाबाईं (१८७७)
पुस्तकेडोंगरी च्या कारागृहात १०१  दिवस, विकार विलसीत,
निबंधगुलामांचे राष्ट्र, गुलामगिरीचे शस्त्र
व्याकरण ग्रंथवाक्य विश्लेषण
मृत्यु १७ जुन १८९५

भारताचे एक महान समाजसुधारक, लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, ध्येयवादी सुधारक, विचारवंत आणि जीवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहिली अशा प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर यांचे जीवनचरित्र या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत. त्यांनी ब्रिटीश राजवटीत भारतीय समाजात पसरलेली जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांसारख्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले, त्यासोबतच ते विधवा विवाहाचे कट्टर समर्थक होते व त्यांनी स्वतंत्र भारताचे समर्थन सुद्धा केले.

आपल्या महाराष्ट्रात प्रबोधनाची महान परंपरा लाभलेली आहे. या कार्यात संतांबरोबर थोर समाजसुधारकांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. असेच एक महाराष्ट्राला लाभलेले थोर समाजसुधारक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. समाजामध्ये जागृती घडवण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.

गोपाळ गणेश आगरकर यांची माहीती

असामान्य स्वार्थत्याग, दीर्घकालीन उद्योगाची चिकाटी , संघटित लोकमताची शक्ती जागृत करण्यास आवश्यक असणारी मुत्सद्देगिरी आणि दुर्बल, भेकड ,स्वार्थी बनलेल्या लोकसमाजात स्वार्थत्याग, धैर्य आणि आत्मविश्वास जागृत करण्यास आवश्यक असणारे धाडस, दृढनिश्चय व स्वार्थत्याग या गुणांनी आगरकरांचे चरित्र होते. आगरकरांचे जीवन म्हणजे क्रांतिकारकांचे होते. त्यांनी आपल्या प्रभावी विचारांनी महाराष्ट्राला वळण लावण्याचा प्रयत्न केला. ते एक ध्येयवादी सुधारक होते. 

बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाज सुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.

गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म आणि परिवार 

अशा या थोर समाजसुधारकाचा जन्म इ. स. १४ जुलै १८५६ मध्ये एका ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणेश व आईचे नाव सरस्वती होते. आगरकरांचा विवाह यशोदाबाईं सोबत 1877 साली झाला. आगरकरांना यशवंत, माधव हे मुले व २ मुली होत्या. त्यांच्या घरात अठराविश्वे दारिद्रय होते. घरात दारिद्रय असले तरी त्यांचे आई-वडील आचरणाने सच्छील व सरळ मनाचे होते.

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण

घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे गोपाळरावांना मामाच्या घरी कराडला शिक्षणासाठी पाठविण्यात आले. प्राथमिक शिक्षण आगरकरांनी कराडलाच घेतले. घरची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे गोपाळराव शाळा शिकत असतांना ते एका कचेरीत मुन्सफाच्या हाताखाली काम करीत होते. आणि मिळालेल्या पैशातून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवत असत. पुढे त्यांनी कंपाउण्डरची नौकरी केली. नंतर त्यांनी नोकरीला रामराम ठोकला.

आगरकर पुढील शिक्षणासाठी अकोल्याला गेले. आणि तेथून आगरकर मॅट्रिक परीक्षा पास झाले. नंतर आगरकर शिक्षणासाठी पुण्याला गेले. मदत व स्कॉलरशिप मिळवून डेक्कन कॉलेज मधून त्यांनी १८७८ मध्ये बी.ए. ची पदवी मिळविली. त्यांनी एम.ए. ला इतिहास व तत्त्वज्ञान हे विषय घेतले. आणि १८८० मध्ये एम.ए. चा अभ्यास पूर्ण केला.

मिल, स्पेन्सर यासारख्या विचारवंतांच्या ग्रंथाचे वाचन आगरकर विद्यार्थीदशेपासूनच करीत होते. आगरकरांच्या जीवनावर मिल, बेंथम, स्पेन्सर या विचारवंतांचा प्रभाव होता. या तत्वज्ञाच्या लिखाणाची ओळख इथेच झाली. त्यांच्या लिखाणातून प्रेरणा घेऊन त्यांनी भारतीय रुढीग्रस्त समाजावर ताशेरे ओढले. आणि भारतीय समाजामध्ये प्रबोधनाची मशाल प्रज्वलित केली.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आगरकरांनी मोठ्या पगाराच्या नोकरीची अपेक्षा न करता आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षकाची नौकरी पत्करली. आगरकरांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रावरून त्यांचे ध्येय स्पष्ट होते. ते लिहितात, “

आई, 

माझा शिक्षणक्रम संपला. मला मोठ्या पगाराची नोकरी मिळेल, आपले दारिद्रय संपेल असे तुला वाटले असेल. पण आई, मी तुला आताच सांगून टाकतो मी सरकारी नोकरी करणार नाही. अधिक संपत्तीची हाव न धरता मी पोटापुरते पैसे मिळवून त्यावर संतोष मानणार आहे. आणि बाकीचा सर्व वेळ समाजकार्यासाठी खर्च करणार आहे. आणि आगरकरांनी समाजसेवेचे व्रत धारण केले. 

आगरकर आणि टिळक यांची भेट 

गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक या दोघांची भेट पुण्यातच झाली. आगरकर पुण्यात आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करण्यासाठी आले होते. त्यावेळी तिथेच एम.ए. चे शिक्षण करतानाच त्यांची भेट लोकमान्य टिळक यांच्याशी झाली व दोघे मित्र झाले.

आगरकरांची पत्रकारीता 

पुण्यात एकत्र शिक्षण घेत असताना. आगरकर आणि टिळक या दोघांनी मिळुन केसरी नावाचे एक वृतपत्र देखील सुरू करण्याचे ठरवले. यामध्ये विष्णुशास्त्री चिपळणूकर यांनी देखील सहभाग घेतला होता. नंतर 1881 मध्ये टिळक आगरकर या दोघांनी मिळुन केसरी हे वृतपत्र सुरु केले. त्यापैकी आगरकर हे केसरीचे संपादक होते.

केसरी ह्या वृतपत्रातुन आगरकरांनी सामाजिक सुधारणांवर अनेक लेख लिहिले. आगरकरांची लेखणीची भाषा ही एक परखड अणि सडेतोड अशी होती. परिणामकारक लेखन व कुशल संपादन यांच्या जोरावर केसरीला अल्पावधीत यश व लोकप्रियता मिळाली.

आगरकरांनी केसरी ह्या वृतपत्राचे संपादक तब्बल सहा ते सात वर्ष सांभाळले. कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात टिळक व आगरकर यांना १०१ दिवसांची कारावासाची शिक्षा झाली. त्यांनी 1887 ते 1888 याकालावधीमध्ये केसरीचे संपादक पद सोडले. कारण पुढे टिळक आणि आगरकर या दोघांमध्ये वैचारिक मतभेद झाले होते.

देशाचे संविधान निर्माते आणि महाराष्ट्रातील घराघरात समाजसुधारणेची मशाल पेटवणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र वाचा.

आगरकरांची सामाजिक सुधारणेची चळवळ

आगरकरांनी आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांचा प्रचार-प्रसारासाठी ”सुधारक” हे वृत्तपत्र १८८८ मध्ये काढले.  या वृत्तपत्रामध्ये राजकीय व अर्थशास्त्रविषयक लेखही येत होते. 

या वृत्तपत्रातून आगरकरांनी अनिष्ट सामाजिक चालीरीती विरुद्ध आवाज उठविला. सुधारकातील लेखांविरुद्ध चहुबाजूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या.

खुनाच्या धमक्या, प्रेतयात्रा काढणे इ. प्रकार झाले; परंतु ” इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार “ या भूमिकेतून सामाजिक सुधारणांचा कडवा पुरस्कार त्यांनी आमरण चालू ठेवला. सुधारकातील लेखांतून त्यांचे समाज जीवनाच्या विविध अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन यांची माहिती मिळते.

देशाचे संविधान निर्माते आणि महाराष्ट्रातील घराघरात समाजसुधारणेची मशाल पेटवणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र वाचा.

गोपाळ गणेश आगरकर यांचे शैक्षणिक कार्य  

न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना

०१ जानेवारी १८८० मध्ये चिपळणूकर, टिळक, व आगरकर यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना

२४ ऑक्टोबर १८८४ साली चिपळणूकर, टिळक, व आगरकर यांनी संयुक्तरित्या पुणे येथे ”डेक्कन एज्युकेशन सोसायटीची” स्थापना केली.

फग्युर्सन कॉलेजची स्थापना

२ जानेवारी १८८५ साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत पुण्यामध्ये ”फग्युर्सन कॉलेज’‘ स्थापन करण्यात आले. ”फग्युर्सन कॉलेज” चे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे हे होते. आपटे नंतर १८९२ ते १८९५ दरम्यान आगरकर हे ”फग्युर्सन कॉलेज” चे प्राचार्य होते.

गोपाळ गणेश आगरकरांची विचारसरणी  

बुद्धिप्रामाण्यवाद

आगरकरांनी शुद्ध बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. आगरकरांनी आपल्या लेखनातून तो अधिक स्पष्ट केला आहे. युक्त आणि हितकर गोष्टींचाच त्यांनी पुरस्कार केला. तार्किक विचारसरणीवर आधारलेला बुद्धिप्रामाण्यवाद लोकांना समजावून सांगणे हे आगरकरांचे मुख्य ध्येय होते. हे पटवून देण्यासाठी आगरकरांनी विविध विषय हाताळले.

अंधविश्वास, रूढीपरंपरा ऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त असे बुद्धिप्रामाण्य रुजविण्याचा आगरकरांनी खूप प्रयत्न केला. समाजातील अनिष्ट रुढींवर टीका करून समाजाला जागे करणे, बुद्धीला पटेल तेच कार्य करणे ती गोष्ट कितीही कष्टदायक असेल तरी ती स्वीकारणे. हे आगरकरांनी समाजाला शिकविले. एखादी गोष्ट रूढीसिद्धी असेल पण बुद्धीला पटत नसेल तर त्या गोष्टीचा त्याग करावा. अशा बाबी आगरकरांनी सांगितल्या आहेत.

आगरकरांची शिकवण

ज्याला लोककल्याणाची खरी तळमळ आहे. सत्य बोलणे व सत्यास धरून चालणे, यातच ज्याचे समाधान आहे. अशा व्यक्तींनी शूद्र लोकांच्या रागाला किंवा उपहासाला यत्किंचित न घाबरता आपल्या मनास योग्य वाटेल ते लिहावे, बोलावे व सांगावे ही आगरकरांची शिकवण होती. कर्म श्रुती किंवा शब्दप्रामाण्य व जातीयता ही बंधने झुगारून दिली पाहिजेत अंधश्रद्धेने कोणतीही गोष्ट स्वीकारण्याऐवजी डोळसपणे ती गोष्ट स्वीकारावी असे आगरकरांचे मत होते.

व्यक्तिस्वातंत्र्य

व्यक्तिस्वातंत्र्य हे आगरकरांच्या विचारसरणीचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय होय. व्यक्तिस्वातंत्र्यामुळे स्वार्थ आणि स्वैराचार फैलावण्याऐवजी समाजातील व्यक्ती परोपकारी आणि दुसऱ्याचे हित चिंतक होतील, असे आगरकरांना वाटत होते. उलट व्यक्तिस्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही, असे आगरकरांचे मत होते.

जन्मसिद्ध चार्तुवर्ण्य व्यवस्था ही व्यक्तिस्वातंत्र्याला विरोधी असल्याने आगरकरांना मान्य नव्हती. बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता, स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टी, इहवाद आणि मानवतावाद या सप्त:सूत्रीने आगरकरांचे सारे सामाजिक विचार व्यापलेले आहेत. आगरकरांचा, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर विश्वास नव्हता. मुला-मुलींस समान शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम व व्यवसायाभिमुख शिक्षण द्यावे, दुष्ट आचारांचे निर्मूलन करावे, सदाचाराचा प्रसार करावा, ज्ञानवृद्धी करावी, सत्यसंशोधन करावी, भूतदया राखावी यासाठी आगरकर प्रयत्नशील होते.

आगरकरांनी व्यक्ती हे एक स्वतंत्र मूल्य मानले आहे. व्यक्तीसाठी समाज असतो, समाजासाठी व्यक्ती नसते. व्यक्तीही समाजाची घटक असली तरी ती जिवंत व स्वयंपूर्ण आहे. समाजाला मात्र व्यक्तीशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही. व्यक्तीच्या हितासाठीच सामाजिक नियम असतात. समाजाचे व्यक्तिविकास हेच उद्दिष्ट असले पाहिजे. असे आगरकरांचे मत होते.

मानवाचे ऐहिक सुखसंवर्धन हे आगरकरांच्या सुधारणेचे तिसरे मूलतत्व होते. बदलत्या परिस्थितीनुसार समाजात परिवर्तन झाले पाहिजेत. समाजाची रचना भौतिकवादाच्या व बुद्धिवादाच्या निकषावर झाली पाहिजे असे म्हणणे होते.

समाजसुधारणेचा आग्रह

गोपाळ गणेश आगरकरांनी स्वतः ‘सुधारक’ नावाचे नवीन साप्ताहिक सुरू केले, त्यावेळी त्यांनी बालविवाह, जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्या विरोधात प्रचार केला आणि हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि दिखाऊपणा विरोधात आवाज उठवला, आगरकरांनी विधवा पुनर्विवाहाचे उघड समर्थन केले.

गोपाळ गणेश आगरकर यांचे मत होते की मुलांचे लग्न वयाच्या 20 ते 22 व्या वर्षी तर मुलींचे लग्न 15-16 वर्षांच्या वयात झाले पाहिजे. त्यामुळेच आगरकरांनी ‘संमती वय विधेयकास’ पाठिंबा दिला होता व त्याचे समर्थन केले होते. याशिवाय 14 वर्षांपर्यंतच्या सक्तीच्या शिक्षणाचेही त्यांनी समर्थन केले.

समाजातील अनिष्ट प्रथा बदलणे गरजेचे आहे. असे आगरकरांचे स्पष्ट मत होते. त्यांचे विचार सनातनी लोकांना फारसे रुचले नाही. त्यामुळे या सनातनी लोकांनी आगरकरांच्या जिवंतपणी त्यांची प्रेतयात्रा काढली. तथापि, समाज परिवर्तनसाठी वाटेल ते कष्ट सोसण्याची व अवहेलना सहन करण्याची आगरकरांची तयारी होती.

लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरक यांची जीवनशैली आणि विचारधारा

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे जवळचे मित्र होते, त्यांच्यात बरेच साम्य होते, दोघेही सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातुन आलेले होते, परंतु त्यांच्या विचारधारा काही मुद्द्यांवर भिन्न होत्या. 

टिळक स्वभावाने जहाल विचारसरणीचे होते, तर आगरकर उदारमतवादी विचारसरणीचे होते. लोकमान्य टिळक आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबातील होते, तर आगरकर गरिबीत वाढले. अशा रीतीने दोघांच्या जीवनशैलीत आणि विचारसरणीत बराच फरक होता आणि नंतर दोघांच्या विचारधाराही भिन्न झाल्या, त्यामुळे दोघे पुढे एकमेकांपासून वेगळे झाले.

आगरकरांची पुस्तके | Gopal Ganesh Agarkar Books

 • भारताचे थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांचे चरित्र ‘फुटके नशीब’ या पुस्तकात लिहिले आहे.
 • आकोल्यातील “ब-हाड समाचार” या वृत्तपत्रातुन लेखन.
 • “डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस” हे पुस्तक (१८८२)
 • “स्त्रीयांनी जाकीटे घातली पाहीलेत” हा महत्वपुर्ण लेख.
 • शेक्सपिअरच्या “हॅम्लेट’ या कादंबरीचे “विकारविलसीत” असे मराठीमध्ये रुपांतर (१८८३)
 • “हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी? ” हा महत्वपुर्ण लेख.
 • “गुलागिरीचे शस्त्र” हा महत्वपुर्ण ग्रंथ…
 • सेठ माधवदास, रधुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुर्नविवाह चरित्र्य.
 • वाक्य मिमांसा व वाक्याचे पृथ्थकरण हे व्याकरण विषक पुस्तक.क पुस्तक.

आगरकरांचे निधन

भारतीय समाजात महत्त्वाचे योगदान देणारे गोपाळ गणेश आगरकर यांचे अस्थमाच्या आजाराने १७ जून १८९५ रोजी वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यत फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले.

अवघ्या ३९ वर्षांच्या आपल्या अल्पशा जीवनकाळात त्यांनी महाराष्ट्रातील लोकांमध्ये शिक्षणाचा आणि मानवी मूल्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला आणि उच्च नैतिक चारित्र्याचा उत्तम नमुना दाखविला, ते खऱ्या निष्ठेने आणि दृढ निश्चयाने पुढे चालत राहिले आणि आपल्या जीवनातील ध्येय साध्य केलीत. त्यांचे आयुष्य खूप संघर्षमय होते.

थोडक्यात गोपाळ गणेश आगरकर यांचे मुख्य कार्य

 • 1880 साली विष्णुशास्त्री चिपळुणकर, लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी पुण्यात न्यु इंग्लिश हायस्कुल ची स्थापना केली.
 • 1881 ला टिळक व आगरकरांनी मराठी भाषेत ’केसरी’ आणि इंग्रजी भाषेत ’मराठा’ ही साप्ताहिकं सुरू केली. केसरी च्या संपादनाची धुरा आगरकरांनी सांभाळली.
 • दिवसेंदिवस दोन्ही वृत्तपत्रांची लोकप्रियता वाढली. कोल्हापुरचे दिवाण बर्वे यांच्या चुकीच्या कारभाराबद्दल वृत्तपत्रात लिहील्यामुळे बर्वे यांनी या दोघांवर मानहानिचा दावा ठोकला. बर्वे हा खटला जिंकल्याने टिळकांना व आगरकरांना 1882 साली 101 दिवसांची कैद झाली. मुंबईतील डोंगरी कारागृहात त्यांना ठेवण्यात आले. तिथे आगरकरांनी शेक्सपियरच्या ’हॅम्लेट’ या नाटकाचा मराठी अनुवाद ’विकार विलसित’ या रूपाने केला आणि कैदेतुन सुटल्यानंतर आलेल्या अनुभवांवर डोंगरी कारागृहातील आमचे 101 दिवस नावाचे एक छोटे पुस्तक लिहीले.
 • 1884 साली टिळक व आगरकरांनी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली पुढे 1885 ला या संस्थेच्या माध्यमातुन फग्र्यृसन काॅलेज स्थापन करण्यात आले.
 • केसरी आणि मराठा या साप्ताहिकांमधुन टिळक समाज जागृतीला जास्त महत्व देत तर आगरकर सामाजिक सुधारणांना महत्व दयायचे. दोघांच्या विचारसरणीतील मतभेदामुळे आगरकरांनी 1887 साली केसरी या वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजिनामा दिला.
 • 1888 साली आगरकरांनी ’सुधारक’ नावाचे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले. हे वृत्तपत्र इंग्रजी आणि मराठी या दोनही भाषांमधुन प्रकाशित व्हायचे. मराठी आवृत्तीची जवाबदारी आगरकरांनी आपल्या खांद्यावर घेतली तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक झाले गोपाळ कृष्ण गोखले. ’सुधारक’ या साप्ताहिकात आगरकरांनी समाज सुधारणेचे आपले विचार बरेच ज्वलंत भाषेत मांडले.
 • पुढे फग्र्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य वा.शि आपटे यांचा 1892 साली अचानक मृत्यु झाल्यानंतर आगरकरांची प्राचार्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली. ते त्यांच्या अखेरपर्यंत त्या पदावर राहिले.
 • आगरकरांनी भारतीय समाजातील बालविवाह, केशवपन, भेदभाव, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट परंपरा आणि चालिरीतींचा प्रखर विरोध केला.
 • चुकिचे होत असेल तर बोलणारच व जे पुर्ण होईल ते करणारच हे आगरकरांचे वाक्य होते.
  गोपाळ गणेश आगरकर हे एक आदर्श समाजसुधारक होते, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले. अशा थोर समाजसुधारकांमुळेच आज आपल्या समाजात बरेच काही बदलले आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या द्रष्ट्या समाजसुधारकांमध्ये आगरकरांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

FAQ

प्रश्न- गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला कुठे झाले?

उत्तर- आगरकर यांचा जन्म १४ जुलै १८५६ ला टेंभू (कऱ्हाड जि. सातारा) या गावी झाला.

प्रश्न- आगरकर यांनी कोणते साप्ताहिक सुरु केले?

उत्तर- सुधारक

प्रश्न- डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली?

उत्तर- टिळक, आगरकर व चिपळणूकर, यांनी संयुक्तरित्या पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

प्रश्न- शेक्सपिअरच्या “हॅम्लेट’ या कादंबरीचे मराठीमध्ये रुपांतर सांगा?

उत्तर- विकारविलसीत

प्रश्न- संमती वय विधेयकास कोणी समर्थन केले?

उत्तर- आगरकर

प्रश्न- पुण्यमद्ये जिवंतपणी कोणाची प्रेतयात्रा काढण्यात आली?

उत्तर- गोपाळ गणेश आगरकर

Leave a Comment