गुरु पौर्णिमा सनाबद्दल विशेष माहिती | guru purnima information in marathi

guru purnima (गुरु पौर्णिमा) information in marathi
guru purnima information in marathi

Guru Purnima Information In Marathi – नमस्कार मित्रांनो तर आज आपण या लेखामध्ये गुरुपौर्णिमा या सनाबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो गुरु पौर्णिमा ही अखिल भारतामध्ये साजरी करण्यात येत असते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. याचबरोबर गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन होय. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मॄती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जात असते.शीख समुजदयामध्ये सुद्धा गुरूला वंदनीय मानण्यात आलेले आहे. तर या लेखामध्ये गुरुपौर्णिमेचे महत्व, इतिहास, कथा, गुरुपौर्णिमा कधी व कशी साजरी करण्यात येत असते आणि व्यास पौर्णिमेविषयी सविस्तर माहिती देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

गुरु पूर्णिमा । Guru Purnima Information In Marathi

व्यासपौर्णिमा

भारतातील सणांमध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हिंदू,बौद्ध,जैन,शीख धर्मामध्ये गुरूला वेगळे स्थान आहे, या धर्मांमध्ये गुरूला सर्वात वरचे मनाचे स्थान देण्यात आलेले आहे. या लोकांच्या मान्यतेनुसार गुरुमध्ये अंधाराचे रूपांतर प्रकाशात करण्याची शक्ती असते.

एक कुंभार ज्याप्रमाणे सुबक रितीने मातीचे मडके घडवतो अगदी त्याच तऱ्हेने गुरू चांगल्या वाईट गोष्टींची पारख घडवुन अत्यंत परिश्रमाने शिष्याला घडवीत असतो. या गुरूला वंदन करण्याची संधी शिष्याला मिळावी त्याकरीता ’’गुरूपौर्णिमा ’’ हा दिवस निर्माण करण्यात आलेला आहे.

यावर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे सर्व सण कुटुंबियांसोबत घरी बसून साजरे करण्यात आले, त्याचप्रमाणे आता या रोगाचा प्रादुर्भाव कायम असल्याने घरीच राहून गुरुपौर्णिमा साजरी करणे योग्य ठरेल. गतवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा जुलै महिन्यात आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा कोट्स, Wishes, SMS, status,मराठीमध्ये

Guru Purnima Nibandh Marathi (गुरू पौर्णिमा निबंध मराठी)

गुरुपौर्णिमेचे अध्यात्मिक महत्व

महर्षी वेद व्यासांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला होता, महर्षी वेद व्यासांनी महाभारतासारखे महाकाव्य रचले होते, यासोबतच सर्व अठरा पुराणांची रचनाही गुरु वेद व्यासांनी केली होती, महाभारत सामान्य माणसाला धर्मशास्त्र, नितीशास्त्र, व्यवहारशास्त्र, आणि मानसशास्त्राची देखील ओळख करून देतो. अश्या महान आणि श्रेष्ठ ग्रंथाची निर्मीती करणारे महर्षी व्यास. त्यांच्या ऐवढा महान गुरू अद्याप झाला नाही, त्यांच्या श्रेष्ठत्वाची पुजा करण्याचा हा गुरूपौर्णिमेचा दिवस व्यासपौर्णिमा म्हणुन देखील ओळखला जातो.

भारतीय संस्कृतीचे मुलाधार आणि शिल्पकार महर्षी व्यासांना समजले जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्यावेळी ’ज्ञानेश्वरी ’ लिहीण्यास सुरूवात केली त्यावेळी सुरूवातीलाच ’व्यासांचा मागोवा घेतु’ असा उल्लेख करून व्यासांच्या श्रेष्ठत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आपल्याला पाहावयास मिळते.

वट पौर्णिमा व्रताचे (वट सावित्री व्रत) महत्व आणि पूजा विधी पद्धती बद्दल जाणून घ्या

गुरु पौर्णिमा का साजरी करण्यात येते

गुरूब्रम्हा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः।
गुरूसाक्षात् परब्रम्ह तस्मै श्रीगुरूवे नमः।।

मनुष्य आणि गुरु यांच्यात एक अतूट नाते असते. गुरुपौर्णिमा ही केवळ गुरूंचा आदर आणि आदरातिथ्य करण्यासाठी साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार, ऋषी वेद व्यासांचा जन्म आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता, म्हणून आज आपण हा दिवस गुरु पौर्णिमा सण म्हणून साजरा करीत असतो. भारतवर्षामध्ये भगवंतापेक्षा गुरूला अधिक महत्व देण्यात आले आहे कारण की आपल्याला आपल्या जीवनात भगवंताचे महत्त्व गुरूमुळेच कळत असते.

असे मानले जाते की संपूर्ण जगात चांगले-वाईट संस्कार, धर्म,अधर्म इत्यादींचे ज्ञान आपल्या शिष्यांना गुरूच देत असतात. म्हणून या उद्देशाने गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो आणि या दिवशी गुरुंची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जात असते.

गुरू हा ज्ञानाचा सागर आहे. शिष्याने विनम्र भाव अंगी बाणवल्याशिवाय या गुरूरूपी सागरातील जल त्याला प्राप्त करता येणार नाही त्यामुळे शिष्याने नेहमी विनम्र असावे. जीवन जगत असतांना प्रत्येक वळणावर आपल्याला नवनवीन माणसे भेटतात. त्यांच्याकडुन आपल्याला नविन काहीतरी शिकायला मिळतं. ज्यांच्याकडुन चांगले काहीतरी आपल्याला शिकायला मिळाले ते आपले गुरूच.

आपल्या मैत्रिणींना वट पौर्णिमा शुभेच्छा संदेश पाठवण्यासाठी हा लेख वाचा

गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाते?

दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, भारतामध्ये दरवर्षी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात साजरी करण्यात येते.

२०२३ मध्ये गुरु पौर्णिमा कधी आहे

पंचांगानुसार, या वर्षी आषाढ महिन्याची पौर्णिमा २ जुलै २०२३ रोजी रात्री ८:२१ वाजता सुरू होत आहे. तर दुसऱ्या दिवशी ३ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ५:०८ वाजता संपेल. उदय तिथीनुसार, या वर्षी गुरु पौर्णिमा ३ जुलै २०२३ ला सोमवारी साजरी केली जाईल.

गुरु पौर्णिमा वर्ष २०२३ तारीख आणि शुभ वेळ

२ जुलै २०२३रात्री ८ वाजून २१ मिनिटे सुरुवात
३ जुलै २०२३संध्याकाळी ५ वाजून ८ मिनिटे संपेल

गुरु किंवा व्यास पौर्णिमेची कथा

१. आपल्या सर्वांच्या जीवनात गुरूचे खूप महत्त्व आहे. आपल्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून आपल्यात ज्ञानाचा प्रकाश भरणारा गुरुच असतो. महर्षी वेद व्यासांचा जन्म अशाच एका पौर्णिमेच्या दिवशी झाला असे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या नावावरून या पौर्णिमेस व्यास पौर्णिमा म्हणतात.

त्यांनीच प्रथम संपूर्ण मानव जातीला वेदांचे ज्ञान दिले. प्रथमच मानवजातीमध्ये वेददर्शन घडवून आणल्यामुळे त्यांना प्रथम गुरूचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून या दिवशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

२. सनातन धर्माच्या शास्त्रानुसार भगवान ब्रह्मा आणि शिव यांना जगाचे पहिले गुरु मानले जाते. ब्रह्मदेवाने आपल्या मानस पुत्रांना शिकवले होते, तर शिवशंकराने आपल्या 7 शिष्यांना शिक्षण दिले होते, पुढे त्यांना सप्त ऋषी म्हटले जाऊ लागले. .

गुरू आणि शिष्य परंपरेची सुरुवात महादेवानेच (शिव) केली, त्यामुळे आजही तीच परंपरा समाजात नाथ, शैव, शाक्त आदी संत मंडळीमध्ये पाळली जात असल्याचे दिसून येते. प्रचलित समजुतीनुसार भगवान शंकराची ही परंपरा आदि शंकराचार्य आणि गुरु गोरखनाथ यांनी पुढे नेली.

भगवान दत्तात्रेय हे भगवान शंकरानंतरचे सर्वात मोठे गुरू मानले जातात. पौराणिक कथांनुसार त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्हींकडून दीक्षा आणि शिक्षण मिळाले होते. दत्तात्रेयाचा भाऊ ऋषी दुर्वासा हे महायोगी असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. दत्तगुरु हे ब्रह्मदेवाचा पुत्र अत्रि आणि कर्दम ऋषींची कन्या अनसूया यांचा पुत्र होते.

आचार्य शुक्राचार्य हे असुरांचे गुरु होते. धार्मिक दंतकथांनुसार शुक्राचार्यांना गुरूचे गुरू मानले जाते. प्रचलित समजुतीनुसार, प्राचीन काळी असे अनेक असुर झाले आहेत ज्यांचे गुरू शुक्राचार्य होते.

गुरु शिष्यांचे उत्तम उदाहरण

खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध,जी शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत. गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत.

उदाहरण : राम लक्ष्मण – विश्वामित्र, परशुराम – कर्ण, महर्षी व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी,अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य, चाणक्य- चंद्रगुप्त, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, निवृत्ती ज्ञानदेव, रामकृष्ण परमहंस – स्वामी विवेकानंद, जनार्दन स्वामी व एकनाथ.

भगवंत श्रीकृष्णांनी सांदिपनी ऋषींच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी आपले थोरले बंधु निवृत्तीनाथांनाच गुरू मानले, तर संत नामदेवांचे गुरू होते विसोबा खेचर… या गुरूपरंपेला पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की भारतीय परंपरेने गुरूला कायमच पुजनीय मानले आहे.

क्रिकेटप्रेमी सचिनला क्रिकेटचा देव मानतात. मात्र सचिनच्या व्यक्तिमत्त्वाला खरे पैलू त्याच्या गुरूंमुळे मिळाले. रमाकांत आचरेकर सरांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे सचिन तेंडूलकर हे नाव लोकप्रिय झाले. आजही असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत ज्यांच्या गुरूंमुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचू शकले. कलेच्या क्षेत्रात तर अनेक वर्षांची साधना गुरू आपल्या शिष्यासाठी पणाला लावत असतो. गायन क्षेत्रातही अनेक गायकांच्या गुरूंवरून त्यांच्या गाण्याचे घराणे ठरत असते. व्यवसायात देखील गुरूच्या मार्गदर्शनाप्रमाणे उद्योगधंद्यात प्रगती करणारे अनेक लोक आहेत. थोडक्यात जीवनात गुरूशिवाय तरणोपाय नाही हेच यावरून सिद्ध होते.

अश्या या गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण गुरूपौर्णिमेला गुरूचरणी नतमस्तक होत आदर व्यक्त करतो. पौर्णिमा म्हणजे प्रकाश ! गुरू नित्य शिष्याला ज्ञानाचे ज्ञानामृत पाजुन घडवत असतात अश्या गुरूची प्रार्थना करण्याचा हा दिवस.

गुरु पौर्णिमा कशी साजरी केली जाते?

१. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माणूस लवकर उठतो आणि आंघोळ करून स्वच्छ कपडे घालतो.

२. गुरूंची पूजा मंदिरात किंवा घरात बसून केली जाते.

३. गुरूंच्या पूजेसाठी अनेकजण त्यांच्या फोटोसमोर पूजा करतात, अनेकजण ध्यानस्थ राहून गुरु मंत्राचा जप करतात.

४. शीख समाजातील लोक या दिवशी गुरुद्वारामध्ये जाऊन कीर्तन आणि पठण करतात.

५. अनेक लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशीही उपवास ठेवतात, ज्यामध्ये एक वेळचे अन्न आणि एक वेळचे फळ इत्यादी नियम पाळले जातात.

६. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान दक्षिणेचे आयोजनही केले जाते.

७. विशेषत: गुरूंचा आदर करून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे.

गुरु पौर्णिमेसाठी भजन

तुम्हाला गुरुपौर्णिमेसाठी भजने ऐकायची असतील, तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये गुगलवर गुरुपौर्णिमा भजने सर्च करा, तेव्हा तुम्हाला याविषयी अनेक भजने दिसतील, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भजन ऐकू शकता. याशिवाय यूट्यूबवरही अनेक भजन उपलब्ध आहेत, तुम्ही तिथेही शोधू शकता.

अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमेचा सण साजरा करू शकता, अशाप्रकारे तुम्ही तुमच्या गुरूंना मान देऊन त्यांनी दिलेल्या शिक्षणाबद्दल त्यांचे धन्यवाद करू शकता.

Gurupurnima song lyrics in marathi | गुरुपौर्णिमा गीत

गुरु माझं गणगोत, गुरु हीच माउली
गुरु स्पर्श दूर करी, दुःखाची साउली

गुरुभेटी साठी झाली, जीवाची काहिली
भक्त तुझा गुरु देवा, पुरता अटल

भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल

गुरु एक
तूचि माझा विधाता अचल

गुरुविण सुने सारे
विश्व हे सकल

भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल

संगतीनं ओलांडला, अवघड घाट
संगतीनं ओलांडला, अवघड घाट

चुकलो जिथं मी तिथं
दाविली तू वाट

तुझामुळं उमगलो, मीच मला थेट
सुख दुःख, एका मेका
वाटलं वाटलं

भेटला विठ्ठल माझा,.भेटला विठ्ठल
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल


----------------------------
----------------------------

गीत: गुरुपौर्णिमा
चित्रपट: धर्मवीर
गायक : मनीष राजगीर
गीत: संगीता बर्वे
संगीत लेबल: झी म्युझिक मराठी

FAQ

प्रश्न: गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या महर्षींचा जन्म झाला?

उत्तर: महाभारताची रचना करणारे गुरु वेद व्यास.

प्रश्न: गुरुपौर्णिमा इतर कोणत्या नावाने ओळखली जाते?

उत्तर : व्यास पौर्णिमा

प्रश्नः हिंदू मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा कोणत्या दिवशी साजरी केली जाते?

उत्तर: आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला

प्रश्न: 2022 मध्ये गुरुपौर्णिमा कधी येत आहे?

उत्तर: १३ जुलै

प्रश्न: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाते?

उत्तर: इंग्रजी दिनदर्शिकेनुसार हा सण जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो.

प्रश्न: गुरुपौर्णिमा हा उत्सव कोणाचे स्मरण म्हणून साजरा केला जातो?

उत्तर: गुरुपुर्णिमा महर्षी वेद व्यास यांच्या स्मरणार्थ साजरी करतात.

नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चालायला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माचं कारण काय ह्याचेच मार्गदर्शन करणारे गुरु होय.

त्यामुळे पदोपदी मार्गदर्शक ठरलेल्या प्रत्येक गुरुला शतश: नमन. ही post वाचून तुमच्या मनात गुरूबद्दल आदर आणि कृतज्ञता निर्माण झाली असेल.

तर आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला Guru Purnima Information In Marathi (गुरुपौर्णिमा माहिती मराठी). याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मला खात्री आहे की तुम्हाला गुरुपौर्णिमा विषयी माहिती मिळाली असेल. तुम्ही या पोस्ट विषयी आपले मत पाठवू शकता यासाठी आम्हाला कंमेंट द्वारे कळवा आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सोसिअल माध्यमातून या लेखाला ( Facebook, Twitter, Whatsapp, Instagram) Share करायला विसरू नका . या पोस्ट ला Like करून आमच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या

Written by – Mahajatra Team

Leave a Comment