Jyeshtha Gauri Puja Information 2022 – जेष्ठा गौरी पूजा,महत्व, विधी आणि शुभमुहूर्त

Jyeshtha Gauri Information In Marathi

Jyeshtha Gauri Puja Information 2022 :- यंदाचा गणेश चतुर्थीचा सण ३१ ऑगस्ट, बुधवारी साजरा होणार आहे. गणपती उत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे आणि देशात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवसभर चालणाऱ्या उत्सवादरम्यान, अनेक महाराष्ट्रीय घरामध्ये जेष्ठा गौरी किंवा महालक्ष्मी पूजा करतात, आणि देवी पार्वतीचे आशीर्वाद मिळवतात.

गौरीचे व्रत जेष्ठ नक्षत्रात येत असल्यामुळे या व्रताला जेष्ठ गौरीचे व्रत म्हणतात. गौरी हे माँ पार्वतीचे दुसरे नाव आहे. विवाहित महिला या व्रताची पूजा तीन दिवस करतात. या दिवशी महाराष्ट्रातील घरांमध्ये विशेष सजावट केली जाते आणि विवाहित स्त्रिया त्यांच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना उत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतात. हळदी-कुमकुम चा समारंभ हा दिवसातील महत्त्वाचा कार्यक्रम आहे. समारंभानंतर, पाहुण्यांमध्ये अनेक भेट वस्तूंचे वाटप केले जाते.

ज्येष्ठा गौरीचे महत्त्व

आदी शक्ती मा पार्वतीचा आशीर्वाद मिळावा म्हणून विवाहित स्त्रिया जेष्ठा गौरीचे व्रत पाळतात. मा गौरीची उपासना केल्याने त्यांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाईल आणि त्यांचे सर्व दुःख दूर होईल असा त्यांचा विश्वास आहे. अविवाहित मुली या दिवशी योग्य जीवनसाथी मिळण्यासाठी देवी पार्वतीची पूजा करतात. देवी पार्वती ही भगवान शंकराची पत्नी आहे. मा गौराई सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करीत असते. महाराष्ट्रामध्ये जेष्ठ गौरीला महालक्ष्मी ( Mahalakshmi ) म्हटल्या जाते.

देवी लक्ष्मी आणि महालक्ष्मी (Jyeshtha Gauri) यांच्यातील फरक

भारतातील आणि भारताबाहेरील लोकांच्या मनामध्ये देवी लक्ष्मी आणि महालक्ष्मी यांच्याविषयी प्रश्न असतो की त्या एकच देवता आहेत कि वेगवेगळी आहेत. तर मित्रांनो देवी लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी आहे आणि त्यांची उत्पत्ती महासागरातून सागरमंथनाच्या वेळी झाली. म्हणून त्यांना समुद्रदेवतेची कन्या म्हटले जाते. भारतातील काही भागामध्ये देवी लक्ष्मीला महालक्ष्मी म्हटले जाते. म्हणून त्या भागातील लोक जेष्ठा गौरी व्रताला देवी लक्ष्मीची पूजा करतात.

तर महाराष्ट्रामध्ये जेष्ठा गौरीला देवी पार्वतीची पूजा करतात. कारण मा पार्वतीचे दुसरे नाव गौरी हे आहे. महादेव (भगवान शिव) पार्वतीला गौरी म्हणायचे. म्हणून महाराष्ट्रातील माणसे पार्वतीला महालक्ष्मी म्हणतात. मा गौरीचे महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ आहेत. एक शक्तीपीठ कोल्हापूरला आहे. त्या शक्तिपीठाला महालक्ष्मी ( Mahalakshmi ) किंवा अंबाबाई म्हटले जाते.

वरील संदर्भावरुन असे कळते की भगवान विष्णूच्या पत्नीला लक्ष्मी म्हटले जाते तर भगवान शिव यांच्या पत्नीला पार्वती किंवा महालक्ष्मी म्हटल्या जाते .

जेष्ठा गौरी (Jyeshtha Gauri) तारीख २०२२

Jeshtha gauri puja vidhi and date 2022 – ज्येष्ठा गौरी पूजा हा तीन दिवसांचा सण आहे आणि तो प्रामुख्याने महाराष्ट्रातील मराठी समुदायाद्वारे साजरा केला जातो. तो १० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान येतो. महाराष्ट्रातील अनेक मराठी कुटुंबांमध्ये गणेश चतुर्थीचा सणादरम्यान जेष्ठ गौरी व्रताचे पालन केले जाते. महाराष्ट्रात गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात धूम असते, संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गणेशमूर्ती बसतात आणि लोक मोठ्या थाटात हा सण साजरा करतात. या दरम्यान तीन दिवसांकरिता गौरी पूजनाचा कार्यक्रम असतो

ज्येष्ठा गौरी पूजा हिंदू कॅलेण्डर नुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी (ऑगस्ट-सप्टेंबर) सुरू होते आणि अष्टमीला संपते. तीन दिवसांचा हा ज्येष्ठ गौरी पूजनाचा उत्सव गौरी आवाहनाने सुरू होतो, दुसऱ्या दिवशी गौरी पूजन होते, तर शेवटच्या दिवशी गौरी विसर्जन असते.


जेष्ठा गौरी आवाहन (Jyeshtha Gauri Avahana) :- ३ सप्टेंबर २०२२ ( शनिवार )

ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त : ३ सप्टेंबर २०२२, शनिवारी रात्री 10:56 पर्यंत


ज्येष्ठा गौरी पूजा तिथी (Jyeshtha Gauri Avahana) :- ४ सप्टेंबर २०२२, रविवार

ज्येष्ठा गौरी पूजा मुहूर्त : सकाळी ०६:०० ते संध्याकाळी ०६:३९ पर्यंत

ज्येष्ठा गौरी पूजा कालावधी: १२ तास ३९ मिनिटे


ज्येष्ठा गौरी विसर्जन तिथी (Jyeshtha Gauri Visarjana): ५ सप्टेंबर २०२२, सोमवार

ज्येष्ठा गौरी विसर्जन मुहूर्त : सकाळी ०६:०१ ते ०६:३८ पर्यंत

ज्येष्ठा गौरी विसर्जन कालावधी: १२ तास ३७ मिनिटे


ज्येष्ठा गौरी पूजेची सविस्तर माहिती

 • गौरी आवाहन किंवा स्थापना (Gauri Avahan)) – ज्येष्ठ गौरी पूजनाच्या पहिल्या दिवशी माता गौरीला घरात बसवले जाते. गणेशजी गौरीला बहीण म्हणून घरी आणतात, असे म्हणतात की त्यांना दोन बहिणी होत्या. म्हणूनच गौरींच्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती घरी आणल्या जातात. त्यांच्या पावलांचे ठसे घरोघरी रांगोळीने काढतात. घरातील विवाहित स्त्रिया घराची स्वच्छता करतात, ज्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करायची असते ती जागा व्यवस्थित स्वच्छ केली जाते.
 • गौरी पूजा – गौरीच्या मूर्तीची विशेष पूजा केली जाते. विवाहित महिला प्रथम गौरीला हळद आणि सिंदूर लावतात, त्यानंतर ते सर्व महिलांना लावले जाते. या पूजेमध्ये १६ क्रमांक शुभ मानला जातो, म्हणून १६ महिलांना बोलावले जाते. पूजेच्या वेळी १६ दिवे प्रज्वलित केले जातात. यामध्ये महिला १६ वेगवेगळे पदार्थ बनवतात, जेष्टा गौरीला अर्पण करतात आणि नंतर प्रसादाच्या रूपात सर्वांना वाटतात.
 • गौरी विसर्जन – दोन दिवसांच्या पूजेनंतर तिसर्‍या दिवशी गौरीच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केले जाते. सर्व भक्त नाचतात, गातात आणि पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी प्रार्थना करतात. माता गौरींचे विसर्जन करतांना गौरीची १०८ नावे मनात उच्चारली जातात.

ज्येष्ठ गौरी पूजनाची पद्धत

 • या व्रतामध्ये १६ क्रमांक हा मुख्य आहे, म्हणून त्याला षोडश उमा व्रत असेही म्हणतात. काही लोक महालक्ष्मी व्रत म्हणून साजरे करतात.
 • ज्येष्ठा व्रताची तयारी अगोदरपासून सुरू होते, तीन दिवस माता गौरीला घरात ठेवले जाते, त्यामुळे घराची नीट साफ सफाई केली जाते.
 • गौरी आवाहनाचा दिवशी पार्वतीची मूर्ती जोडीने गॅरी आणली जाते. माता गौरीची मूर्ती ज्येष्ठ – कनिष्ठ, सखी – पार्वती इत्यादी जोड्यांमध्ये आढळते.
 • माता गौरीच्या मूर्तीजवळ तेरडा रोप लावला जातो.
 • त्यांच्या जवळ ५-६ दगड देखील ठेवले आहेत.
 • १६ प्रकारचे पदार्थ तयार करून गौरीला अर्पण केले जातात, १६ दिवे लावले जातात.
 • अशा प्रकारची पूजा ३ दिवस केली जाते, त्यानंतर विसर्जन होते.
 • दरम्यान, महिलांना हळद-कुंकूसाठी घरोघरी बोलावतात आणि हळद-कुंकुम लावून भेट म्हणून काहीतरी देतात.
 • यावेळी माता गौरीने राक्षसाचा वध करून मानव जातीचे रक्षण केले असे सांगितले जाते.
 • तिसऱ्या दिवशी जवळच्या नदीत, तलावात विसर्जनासाठी नेले जाते. निघताना ढोल-ताशांच्या गजरात नाचगाणी होतात. यावेळेस अतिशय आनंदी, भक्तिमय वातावरण असते.

FAQ

प्रश्न – पार्वतीचे दुसरे नाव काय?

उत्तर – गौरी

प्रश्न – ज्येष्ठा गौरीला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखतात?

उत्तर – महालक्ष्मी

प्रश्न – गणेश चतुर्थी किती दिवसांनी ज्येष्ठ गौरी बसते ?

उत्तर – तीन दिवसानंतर

प्रश्न – २०२२ ला ज्येष्ठा गौरी (Avahan) कोणत्या तारखेला आहे ?

उत्तर – ३ सप्टेंबर

Leave a Comment