लोकमान्य टिळक यांची ऐतिहासिक माहीती | Lokmanya Tilak Biography in marathi

Lokmanya Tilak Information In marathi
Lokmanya Tilak Information In marathi
पुर्ण नाव (Name)बाळ (केशव) गंगाधर टिळक
जन्म (Birthday)23 जुलै १८५६
जन्मस्थान (Birthplace)चिखलगांव ता. दापोली जि. रत्नागिरी
वडिल (Father Name)गंगाधरपंत
आई (Mother Name)पार्वतीबाई
शिक्षण (Education)१८७६ मध्ये बी.ए. (गणित) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आणि १८७९ रोजी एल.एल.बी. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
पत्नीचे नाव (Wife Name)सत्यभामाबाई
मृत्यु (Death)१ ऑगस्ट १९२०
राजकीय पक्ष (Political party)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी

Lokmanya Tilak Information In Marathi – भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक हे भारताचे थोर राष्ट्रवादी नेते होत. त्यांच्या या घोषणेने स्वराज्य मिळविण्याच्या राष्ट्रीय आंदोलनात तरुणांच्या मनात उत्साह निर्माण केला होता. अशा क्रातींकारी विचारांचे बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी आज आपण या पोस्टमध्ये माहिती बघणार आहोत.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे राष्ट्रीय काँग्रेसच्या जहालमतादी गटाचे ख्यातनाम नेते होते. बाळ गंगाधर टिळक यांचा देशात जहाल विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात महत्त्वाचा वाटा आहे. ब्रिटिश अधिकारी लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे (अशांततेचे) जनक म्हणत होते. लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली. लोकमान्य म्हणजे लोकांनी मान्य केलेला नेता.

Lokmanya Tilak Information In Marathi | लोकमान्य टिळकांची माहिती

बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव केशव गंगाधर टिळक होते. नंतर ते बाळ या नावाने प्रसिध्द झाले. ते एक महान स्वातंत्रसैनिक,आदर्शवादी राष्ट्रीय नेते आणि प्रसिध्द लेखक होते. त्याचप्रमाणे ते एक महान विचारवंत होते.

इतिहास, संस्कृत, खगोलशास्त्र आणि गणित या विषयात त्यांना प्रभुत्व होते.  म्हणजेच लोकमान्य टिळक हे एक अष्टपैलूत्वाचे व्यक्तिमत्त्व होते. आणि ते जहालवादी विचारसरणीचे प्रवर्तक होते. टिळक म्हणायचे’’ धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळे नाही. फक्त संन्यास घेणे जीवनाचा मुख्य हेतु नसावा, जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजुन त्याकरिता कार्य करणे हा आहे. प्रथम आपण मानवतेची पुजा करण्यास शिकायला हवे तेव्हांच परमेश्वराची पुजा करण्यास आपण लायक बनु शकणार.  तसेच बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राजकीय चळवळीचे नेते होते.

लोकमान्य टिळक यांचा जन्म आणि परिवार | Birth and family of Lokmanya Tilak

लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरीत एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली हे होते. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक म्हणून शाळेत कार्यरत होते. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची बदली पुणे येथे झाली. टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. 1871 साली त्यांचा विवाह  झाला. लग्नाच्या  वेळी टिळक अवघे 16 वर्षांचे होते आणि त्यांच्या पत्नी  त्याहुनही पुष्कळ लहान होत्या. आणि त्यांच्या पत्नीचे नाव सत्यभामाबाई होते. टिळक अवघे 16 वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

लोकमान्य टिळक यांचे शिक्षण | Education information of Lokmanya tilak in marathi

इ. स. १८७२ मध्ये टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.  १८७७ साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातुन त्यांनी पदवी मिळवली. फार नगण्य लोक त्या काळी महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत होते, लोकमान्य टिळक त्यातुन एक होते ज्यांनी महाविद्यालयीन पदवी प्राप्त केली.  तर १८७९ मध्ये एलएल. बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. दोन वेळा प्रयत्न करून देखील ते एम.ए पुर्ण करू शकले नाहीत.

टिळक व आगरकर सहकार्याचे पर्व

डेक्कन कॉलेजमध्ये टिळक एलएल. बी. करीत असतांना  गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. हे दोघेही तरुण राष्ट्रसेवेच्या समान उद्देशाने प्रेरित होते. आणि या दोघांनी स्वतःला राष्ट्रोद्धाराच्या कार्यास वाहून घेण्याचा निश्चय केलेला होता. महाविद्यालयातील मित्र महादेव बल्लाळ नामजोशी, गोपाल गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर यांच्यासमवेत टिळकांनी इ. स. १८८० मध्ये पुणे येथे उच्च माध्यमिक शिक्षणाकरिता न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.

नंतर पुणे येथे इ. स. १८८४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश भारतात शिक्षणाचा प्रसार करणे व युवकांना नवी प्रेरणाशक्ती देणे हा होता. इ. स. १८८५ मध्ये महाविद्यालयीन शिक्षणाकरिता फग्र्युसन कॉलेजची स्थापना केली.

राष्ट्रीय विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी 1881 साली केसरी व मराठा हि वृत्तपत्रे सुरु केली.  आगरकर केसरीचे तर टिळक मराठा वृत्तपत्राचे संपादक होते. महाराष्ट्रातील तरुण वर्गात राष्ट्रवादी विचार रुजविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी त्या काळात केले. 

टिळक – आगरकर मतभेद  

परंतु पुढे ‘आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा’ या मुद्दयावर त्यांच्यात मतभेद होऊन दोघांचेही मार्ग भिन्न झाले. त्यानंतर आगरकरांनी ‘केसरी’ च्या संपादकपदाचा राजीनामा दिला. आणि टिळक ‘केसरीचे’ संपादक बनले.

लोकमान्य टिळक यांचे राजकीय कार्य | Lokmanya Tilak’s political career

परकीय सत्तेविरुद्ध जनजागृती 

लोकमान्यांनी परकीय सत्तेविरुद्ध भारतीय जनतेत जागृती  आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले. टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिला ‘शिवजयंती उत्सव’ १५ एप्रिल १८९६ साली रायगडावर साजरा करण्यात आला. हे उत्सव सार्वजनिक साजरे करण्याच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणणे आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी विचारांचे रोपण करता येईल अशी त्यांची धारणा होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास

भारतीय राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते

लोकमान्य टिळक हे भारतीय राष्ट्रवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. पुरातन वैदिक धर्म व भारताचा गौरवशाली इतिहास हे भारतीय राष्ट्रवादाचे  प्रमुख आधार होत. असे त्यांचे मत होते. 

टिळक हे कट्टर राष्ट्रवादी असल्याने त्यांना भारतातील इंग्रजी सत्तेचे अस्तित्व मान्य नव्हते. टिळकांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर मुळीच विश्वास नव्हता. मवाळ नेत्यांच्या अर्ज – विनंतीच्या मार्गाने भारतीयांच्या पदरात काहीही पडणार नाही असे टिळकांचे स्पष्ट मत होते. 

देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीला  इंग्रजांशी दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे टिळकांना वाटत होते. टिळकांच्या या जहालवादी विचारामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये मवाळ व जहाल असे दोन गट पडले. आणि जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्यांकडे आले.

बंगालच्या फाळणीविरुद्ध चळवळ

लॉड कर्झन याने इ. स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली. या फाळणीविरुद्ध संपूर्ण देशात आंदोलनाचा जो भडका उडाला त्याचे नेतृत्व लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल यांनी केले.  त्याचवेळी या तिघांना ‘लाल-बाल-पाल’ म्हणून प्रसिध्दी मिळाली. या चळवळीतुन टिळकांचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित झाले. या फाळणी विरुद्ध त्यांनी देशभर जबरदस्त प्रचार केला. व इंग्रजी सत्तेचे खरे रूप भारतीय लोकांपुढे मांडले. 

अशाप्रकारे टिळकांनी परकीय सत्तेच्या विरोधात जनजागृती घडवून आणण्याचे अत्यंत मोलाचे कार्य केले. याच काळात लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुःसूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार केला. 

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यत पोहोचविला.

राजद्रोहाचा खटला व शिक्षा

काँग्रेसमधल्या जहाल गटाचे नेते, स्वराज्य आणि राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते म्हणून टिळकांची ओळख होती. टिळकांवर 11 वर्षांच्या अंतराने दोन वेळा (सन 1897 आणि सन 1908) राजद्रोहाचा खटलाही चालवला गेला. 1908 सालच्या खटल्यानंतर टिळकांना 6 वर्षांची शिक्षा ठोठावली गेली. या खटल्यामध्ये ब्रिटीश सत्तेविरोधात लोकांना भडकविण्याचा आरोप करत टिळकांवर राजद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला.

टिळकांनी लिहिलेले ‘देशाचे दुर्दैव’ आणि ‘हे उपाय पुरेसे नाहीत’ हे दोन अग्रलेख या खटल्यासाठी आधार म्हणून घेतले गेले होते. आणि  टिळकांची ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. तेथे टिळकांनी ’गितारहस्य’ नावाचा अतुलनीय असा ग्रंथ लिहीला त्या खटल्यावेळची भारतातील परिस्थिती अत्यंत उलथापालथीची होती.

होमरूल लीगची स्थापना

1915 मध्ये तुरूंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर, लोकमान्य टिळक जेव्हा भारतात परत आले, तेव्हा त्यांना लक्षात आले की पहिल्या महायुद्धामुळे राजकीय परिस्थिती वेगाने बदलत होती, लोकमान्य टिळकांनी राजकीय कार्याला पुन्हा सुरुवात केली.

भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळाले पाहिलेत आणि भारतातील प्रातिनिधिक संस्था अधिक व्यापक बनल्या पाहिजेत असे टिळकांना वाटत होते.

तसेच इतर मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी लोकमान्य  टिळकांनी १ मे १९१६ रोजी मुबंई प्रातांत होमरूल लीगची स्थापना केली.टिळकांची होमरूल लीग आणि ॲनी बेझंट याची होमरूल लीग या दोन्ही संघटना पूर्णपणे स्वतंत्र होत्या. या दोन्ही संघटना मध्ये समन्वय होता इतकेच.

लखनौ करार  

इ. स. १९१६ मध्ये लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर जीना यांच्यात लखनौ करार झाला. या कराराने हिंदू – मुस्लिम ऐक्याचा नवा मार्ग दाखवून दिला. टिळकांनी सांस्कृतिक राष्ट्र्वादाचा पुरस्कार केला असला तरी इंग्रजी सत्तेच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी हिंदू व मुस्लिम यांनी एकत्र आले पाहिजे असे लोकमान्य टिळकांनी म्हटले होते.

लोकमान्य टिळकांचे सामाजिक विचार

लोकमान्य टिळकांनी राजकारणात जहाल विचारांचा पुरस्कार केला होता. परंतु टिळक हे सामाजिक प्रश्नाबाबत काहीसे नेमस्त होते. म्हणून टिळकांच्या या भूमिकेचे वर्णन राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्त असे केले जाते. टिळक म्हणायचे कि आधी देशाचे स्वातंत्र नंतर सामाजिक सुधारणा.

समाज सुधारणेच्या चळवळीला विरोध  

टिळकांच्या या भूमिकेमुळे त्यांनी समाजसुधारणेच्या चळवळीला अनेकदा विरोध केला. संमतीवय विधेयकाला विरोध करताना या विधेयकामुळे आमच्या धर्मात परकीयांचा हस्तक्षेप होतो. असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे पुरोगामी विचारांच्या लोकांनी लोकमान्य टिळकांना आपल्या टीकेचे लक्ष्य बनविले होते.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी | Lokmanya Tilak Death Reason In Marathi

लोकमान्य टिळक यांचा मृत्यू – जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेचा बाळ गंगाधर टिळकांवर अतिशय खोल परिणाम झाला, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि नंतर त्यांना मधुमेहाच्या आजाराने ग्रासले, त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली.

त्यानंतर लोकमान्य टिळकांनी मुंबई येथे १ ऑगस्ट १९२० रोजी अखेरचा श्वास घेतला, त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशात मोठा शोककळा पसरली, त्यांच्या अंतिम दर्शनासाठी लाखो लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

म्हणून दरवर्षी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी १ ऑगस्ट रोजी असते.

Read – Lokmanya Tilak Information In English

लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले पुस्तके

lokmanya tilak books in Marathi

 • ओरियन – 1893
 • दी आर्कटिक होम इन दी वेद – 1903
 • गीता रहस्य – 1915

थोडक्यात लोकमान्य टिळक यांची मुख्य कामे

 • १८८० मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना.
 • १८८१ मध्ये जनजागृतीसाठी ‘केसरी’ मराठी आणि ‘मराठा’ इंग्रजी अशी दोन वर्तमानपत्रे सुरू केली. आगरकर केसरीचे संपादक आणि टिळक मराठाचे संपादक झाले.
 • १८८४ मध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
 • फर्ग्युसन कॉलेज १८८५ मध्ये पुण्यात सुरू झाले.
 • १८९३ मध्ये ‘ओरियन’नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन.
 • लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ‘सार्वजनिक गणेश उत्सव’आणि ‘शिवजयंती उत्सव’सुरू केले.
 • १८९५ मध्ये ते मुंबई प्रांतीय नियमन मंडळाचे सदस्य म्हणून निवडले गेले.
 • १८९७ मध्ये, लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप होता आणि त्यांना दीड वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी टिळकांनी त्यांच्या बचावामध्ये दिलेले भाषण 4 दिवस आणि 21 तास चालले.
 • १९०३ मध्ये ‘द आर्कटिक होम इन द वेद’ या पुस्तकाचे प्रकाशन.
 • १९०७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात, जहाल आणि मवाळ या दोन गटांमधील संघर्ष खूप वाढला. परिणामी, मवाळ गटाने काँग्रेस संघटनेतून जाहल गटाची हकालपट्टी केली. जहालचे नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे होते.
 • १९०८ मध्ये टिळकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात त्याला सहा वर्षांची शिक्षा झाली आणि त्याची रवानगी ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात करण्यात आली. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी ‘गीतारहस्य’ नावाचे एक अमर पुस्तक लिहिले.
 • १९१६ मध्ये डॉ.अनी बेझंट यांच्या सहकार्याने त्यांनी ‘होम रुल लीग’ ही संस्था स्थापन केली. गृह राज्य म्हणजे आपण आपल्या राज्याचा कारभार केला पाहिजे. त्यालाच ‘स्वराज्य’असेही म्हणतात.
 • टिळकांनी सर्वप्रथम हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा असे सांगितले.

लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ स्मारक 

टिळक रंग मंदीर या नावाचे नाट्य सभागृह बांधले गेले आहे. याशिवाय २००७ मध्ये भारत सरकारने त्याच्या स्मरणार्थ एक नाणे जारी केले आहे.

यासोबत त्यांच्या जीवनावर आधारित लोकमान्य एक योगपुरुष हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

लोकमान्य टिळकांनी देशासाठी केलेला त्याग, बलिदान आपल्याला विसरता येणार नाही. त्यांच्या उपकाराचे आपले राष्ट्र सदैव ऋणी राहील. एवढा महान पुरुष (महाराष्ट्रात) भारतात जन्माला येणे अभिमानाची गोष्ट आहे.

Lokmanya Ek Yugpurush Movie

लोकमान्य एक युगपुरुष

FAQ

प्रश्न – लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव सांगा?

उत्तर – लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक आहे.

प्रश्न – लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान?

उत्तर – चिखलगांव ता. दापोली जि. रत्नागिरी.

प्रश्न – न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?

उत्तर – बाळ गंगाधर टिळक.

प्रश्न – लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरु केली?

उत्तर – केसरी आणि मराठा.

प्रश्न – केसरीचे आणि मराठा वृत्तपत्राचे प्रथम संपादक कोण?

उत्तर – केसरी संपादक – गोपाळ गणेश आगरकर तर
मराठा संपादक – बाळ गंगाधर टिळक

प्रश्न – कोणत्या मुद्यावर आगरकर आणि टिळकांचे मतभेत झाले?

उत्तर – आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा या मुद्दयावर त्यांचे मतभेद झाले.

प्रश्न – परकीय सत्तेविरुद्ध भारतीय जनतेत जागृती आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरु केले?

उत्तर – बाळ गंगाधर टिळक.

प्रश्न – राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांना कोणत्या तुरुंगात पाठवण्यात आले?

उत्तर – ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात.

प्रश्न – मुबंई प्रातांत कोणी होमरूल लीगची स्थापना केली?

उत्तर – लोकमान्य टिळक

प्रश्न – लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर जीना यांच्यात कोणता करार झाला?

उत्तर – लखनौ करार.

प्रश्न – संमतीवय विधेयकाला विरोध कुणी केला?

उत्तर – बाळ गंगाधर टिळक यांनी संमतीवय विधेयकाला विरोध दर्शिवला.

प्रश्न – तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?

उत्तर – गीतारहस्य.

मित्रांनो या लेखामध्ये मी लोकमान्य टिळक यांच्याविषयी (Lokmanya Tilak Information In Marathi) संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्ट मधील Bold अक्षरे/वाक्य लक्षात ठेवा कारण ते स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. या लेखाला आणखी माहितीपूर्ण/उपयोगी करण्यासाठी आपल्या सूचना comment box मध्ये सांगा. ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर पोस्टला फेसबुक, whatsapp वर share करा आणि आपल्या मित्रांना टिळकांविषयी माहिती विचारा जेणेकरून ते लोकमान्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.

Written By – Sumedh Ghodichor

Leave a Comment