Marathi Ukhane For Female Funny

Marathi Ukhane For Female Funny
Marathi Ukhane For Female Funny

लग्न म्हटलं की नवरीमुलीसाठी विनोदाची एक संधी घेऊन येते, ती म्हणजे मैत्रिणींमध्ये आपल्या रावांचे नाव विनोदी किंवा मिश्किल शैलीने घेणे. या पोस्टमध्ये मुलींसाठी, नवरीसाठी, वधूसाठी, लग्नामध्ये घेतली जाणारी मराठी विनोदी उखाणे (Marathi Ukhane For Female Funny) दिलेली आहेत, या विनोदी उखानाची मैफिल इथे दिलेली आहे तेव्हा हि पोस्ट वाचून या उखाण्यांची मजा घ्या.

Marathi Ukhane For Female Funny

उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन,
—— राव आहेत, माझे मोठे फॅन


सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय,
आमचे —— राव अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय


कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे गॉगल,
—— राव आहेत, माझ्यासाठी पागल.


अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
—— रावांचे घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका


तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे,
—— रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.


चांदीच्या ताटात फणसाचे गरे
—— राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे


आवाज ऐकू येत नाय तर, करा साफ कान,
—— रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान


आला आला उन्हाळा संगे घामाचा ह्या धारा
—— रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा


Funny Marathi Ukhane For Female

वधूसाठी मराठी उखाणे

उष्णता खूप वाढली म्ह्णून, ह्यांनी आणली कुल्फी,
—— रावांसोबत काढते आज, सर्वांसमोर सेल्फी.


बागेत बाग राणीचा बाग अन —— रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग


अर्ध्या वाटेत, काटा मला लागला,
—— रावांचे नाव घेते, त्यांच्या डोक्यावर कावळा हागला.


नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
—— रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा


—— रावांना आहे, नोकरी सरकारी,
म्हणून तर मी घेऊ शकले, उंच भरारी.


महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड्
—— रावांना डोळे मारण्याची लई खोड्


कोणाला आवडतो BJP, तर कोणाला SHIVSENA पक्ष,
—— राव मला आवडतात, कारण ते आहेत अपक्ष.


निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
—— रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास


कोकणात जाताना, गाडीत बसतात खूप हादरे,
—— रावांचे नाव घेते, आहेत खूप पादरे


नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
—— रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर


संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा,
मी केला पसारा तर तो, —— रावांनी आवरायचा.


जुईची वेणी जाईचा गजरा,
माझ्यावर आणि —— रावांवर सगळ्यांच्या नजरा


वाचा – नवरीसाठी /वधूसाठी / स्त्रियांसाठी अस्सल मराठी उखाणे (Marathi Ukhane For Female)

Funny Ukhane In Marathi For Female

भारताचा कर्णधार, विराट कोहली आहे ऑलराऊंडर,
—— आहेत डॉक्टर, आणि मी त्यांची कंपाऊंडर.


हजार कमी पडतात, लाखाशिवाय बात नाही,
—— रावांचा FB वर फोटो लाईक केल्याशिवाय, पोरी राहत नाही.


मटणाचा केला रसा, चिकन केले फ्राय —— राव भाव देत नाही किती केले ट्राय.


मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
—— हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर.


पाहुणे आहेत वरातीमदे, पिऊन तराट,
—— च नाव घेऊन, प्रवेश करते घरात.


हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ——
रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी.


बोलणे आहे ह्यांचे, मधापेक्षा गोड,
—— राव काढतात नेहमी, मुलींची खोड.


पाव शेर रवा पाव शेर खवा
—— चे नाव घेते दहा हजार रुपये ठेवा.


छान बनवतो, नाक्यावरचा अण्णा इडली डोसा,
—— राव आहेत बिनकामी, आता त्यांना आयुष्यभर पोसा.


नुकताच सचिन आलाय सेंचुरी मारून अन —— रावांचं नाव घेते पाच गडी राखून.


प्रत्येक नाक्यावर भेटते, सिग्रेट आणि चहा ची टपरी,
—— राव आहेत, एक नंबर चे छपरी.


नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
—— राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात.


Marathi Funny Ukhane For Female

Marathi Funny Ukhane For Female
वधूसाठी मराठी उखाणे

प्रेमाने भरवते मी, कोंबडी वड्याचा घास,
पण —— रावांना आहे, मुळव्याधाचा त्रास.


मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
—— च नाव घ्यायला मला नाही आळस.


चहा सोबत लागतो, चांगला मस्का पाव.
—— रावांची बाहेर किती लफडी, ते विचारू नका राव.


ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून भरला १०० रु दंड,
—— रावांना भरवते Ice-cream चा घास सांगा आहे की नाही थंड.


वाचा – नवरीसाठी आधुनिक मराठी उखाणे (Modern Marathi Ukhane For Female)

Ukhane Marathi For Female Funny

आंब्यामध्ये लोकप्रिय आहे, हापूस आंबा,
—— च नाव घेते, सगळ्यांनी थांबा.


नळावर पाणी भरताना, मारायचे लाईन,
—— रावांनी अखेर केले, कोर्ट मॅरेज करून पेपर साईन.


पुढे जाते वासरू, मागून येते गाय,
—— ला आवडते नेहमी दुधावारची साय.


ताटात होती जिलेबी, त्याला लागली मुंग्यांची रांग,
—— रावांचे नाव घेते, तुमच्या नानाची टांग.


सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
—— ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.


श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा,
—— ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.


व्हीस्की पेक्षा, छान आहे वोडका,
—— आपल्या लग्नानंतर, भाजी बनवेल मी दोडका.


शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड,
—— चे नाव घेते, आमच्या प्रेमाला नाही कधी एंड


गल्लीतील लोक, प्रेमाने हाक मारतात अंड्या,
——- आहे माझा, हार्दिक पंड्या.


स्टुलावर स्टूल बत्तिस स्टूल —— राव एकदम ब्यूटिफुल.


Ukhane In Marathi For Female Funny

Ukhane In Marathi For Female Funny

कारल्याची भाजी, लागते खूप कडू,
—— रावांचे प्रवचन ऐकून, लागतात कान सडू.


पाच बोटातुन होते कलेची निर्मीती, —— ची व माझी जडली प्रिती.


आय लायनर लावला कि, मुली दिसतात छान,
—— राव नेहमी, माझा मेकअप करतात घाण.


हळद असते पिवळी, कुंकु असते लाल,
—— रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल.


सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकून,
—— चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन.


दारूच्या नावाने, नेहमी असते बोंब,
अहो —— राव कमी प्या, नाहीतर येतील कोंब.


पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘मोरुची मावशी’,
—— चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.


दास चावला की अंगाला येते खाज —— रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.


नवरीसाठी विनोदी उखाणे

नवरीसाठी विनोदी उखाणे
मुलींसाठी विनोदी उखाणे

पिऊन आल्यावर, अंगात येतो खूप जोश,
मला बघताच, —— रावांचे उडतात होश.


Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी,
—— ला लागली ५०००० ची लॉटरी.


बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू,
—— राव दिसतात साधे, पण आहेत खूप चालू.


बिझनेसमध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा,
तरीपण —— रावांनी उडवल्या, लग्नात २००० च्या नोटा.


फालुदा छान लागतो, जेव्हा असतो त्यात सब्जा,
—— रावांच्या जीवावर, करेन मी मज्जा.


हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर, —— रावांची लग्न केले कारण आली लहर.


हाताची घडी , तोंडावर बोट,
—— राव डोकं नसेल चालत, तर मारा एक व्हिस्की चा घोट.


ईन मीन साडे तीन, ईन मीन साडे तीन,
—— माझा राजा आणि मी झाले त्याची QUEEN.


गाजर खायला, आवडते सशाला,
—— च नाव घ्यायला, आग्रह कशाला.


Funny Ukhane Marathi For Female

केस झाले पांढरे जवळ आली चाळीशी,
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत —— राव आहेत खूप हौशी.


हळदीमध्ये पाहुणे पिऊन, झाले आहेत टाईट,
—— राव कमी प्या, पोट वाढल आहे, आता जीन्स होईल टाईट.


नागाला पाजत होते दूध आणि साखर,
—— रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर.


——- राव आणि माझा, संसार होईल सुखर,
जेव्हा मी चिरेन भाजी, आणि ते लावतील कुकर.


पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात,
—— रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात.


मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण,
—— रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण.


नाग पंचमिला नाग, प्यायला येतो दूध,
—— राव पिऊन आले की, नसते त्यांना कसली सुध.


Vinodi Ukhane For Marrige | Funny Ukhane For Marrige

नवरात्रीमध्ये गरबा खेळताना, झाली पहिली भेट,
—— रावांची झाली, मी बायको सेट.


Facebook वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले,
—— राव आहेत खरच बिनकामी हे लग्न झाल्या नंतरच कळले.


चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
—— रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.


सर्व मिळून नाचू उडू, घालूया फुगड्या,
सासरच्या महिला रुसल्या, कारण
—— रावांनी नाही दिल्या, त्यांना लुगड्या.


टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी,
—— रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई.


Long Marathi Ukhane For Female Funny

वधूसाठी मराठी उखाणे
मुलींसाठी विनोदी उखाणे

लग्न किती पण चांगले करा, पण काही लोक ठेवतात नावे,
—— रावांची इच्छा आहे, अशा लोकांना २ कानाखाली ठेवून द्यावे.


डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया,
—– रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया.


खुर्चीत खुर्च्या, प्लास्टिकच्या खुर्च्या,
——- रावांच्या बहिणी, जशा खुरासणी मिर्च्या.


द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
—— चे नाव घेते राखते तुमचा मान.


Funny Ukhane In Marathi For Female Marriage

वधूसाठी मराठी उखाणे
नवरीसाठी विनोदी उखाणे

लग्न करण्याच्या आधी, खूप केले होते वादे,
—— राव दिसतात, तेवढे नाही आहेत साधे.


धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
—— च्या जीवावर करते मी मजा.


आघाडीत बिघाडी युतीत चाललये कुस्ती,
—— रावांची कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहे वस्ती.


गोव्याहून आणले काजू,
—— रावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु.


अंगणात पेरले पोतभर गहू,
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ.


नाही नाही म्हणता झाल्या भरपुर चुका,
—— चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका.


काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत,
—— राव गेले ऑफिसला मला नाही करमत.


इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
—— घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय ?


भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा.


नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व —— राव आहेत माझे सर्वस्व.


Leave a Comment