नवरीसाठी /वधूसाठी / स्त्रियांसाठी अस्सल मराठी उखाणे

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

जेव्हा मुली लग्नासाठी तयार होऊन लग्नमंडपात जात असतात तेव्हा त्यांच्या मनात होणार भावनांचं काहूर हे सर्वांनी बघितले असेल, लग्नमंडपात ती आपल्या वराला पुष्पहार घालून वरीत असते, आपल्या पतीबरोबर सात वचनाचे फेरे घेऊन त्याची अर्धांगिनी होत असते, या वेळेस तिच्या मनात काय सुरु असते हे तिलाच ठाऊक कारण लग्नानंतर तिला तिचे माहेर (आई-वडील) सोडून नवऱ्याबरोबर सासरी जायचे असते. यावेळेस मुलीची आई वडिलांपासून होणारी ताटातूट आणि आपल्या नवऱ्याबरोबर नव्या संसाराची सुरुवात ही एकाच वेळी होत असते. प्रेम,अश्रू, आणि मायेने तयार झालेले ते वातावरण हे शब्दांच्या पलीकडले असते.

यानंतर नवरी ही आपल्या पतीसोबत सासरी जाते आणि ती आपल्या सासरचा व्हरांडा ओलांडणारच असते की त्यावेळेस पतीच्या बहिणी त्या दोघांनाही अडवतात आणि नववधूला नवऱ्याचे नाव घ्यायला सांगतात, तेव्हा नवरा-नवरीची होणारी गम्मत कमालच असते. तेव्हा नवरी हि आपली आपल्या पतीचे नाव उखाण्याच्या स्वरूपात घेत असते. कारण लग्न झालेली स्त्री आपल्या पतीचे नाव लोकांसमोर सरळसरळ घेत नसते. पण मराठी उखाण्याच्या स्वरूपात ती त्याचे नावही घेते आणि त्याचे आणि सासरचे मान ठेवीत असते.

या पोस्ट मध्ये Marathi Ukhane For Female नवरीसाठी मराठी उखाणे दिलेली आहेत त्याचा तुम्ही आनंद घ्या.

Marathi Ukhane For Female

Marathi Ukhane For Female
नवरीसाठी मराठी उखाणे

जुळल्या रेषा नशिबाच्या, येता हाती हात,——
आणि —— ची जोडी बघताच, सर्व म्हणतात क्या बात, क्या बात.


सर्वांना नमस्कारा साठी जोडते हो हात —— रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.


आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज,
—— रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.


लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती —— सारखे पती मिळाले भाग्य म्हणून मानू किती?


गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध, —— रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध.


मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर, —— रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.


मोगऱ्याचा सुगंध घेताना, झाले मी धुंद, —— रावांचे नाव घ्यायचा, लागला मला छंद.


शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी, —— राव माझे जीवनसाथी.


जडतो तो जीव, लागते ती आस, —— रावांसोबत सुरु झाला, माझा आयुष्याचा प्रवास.


घास घेण्यासाठी हातात घेतले पुरी श्रीखंड, —— ना लाभो आयुष्य उदंड.


नव्हत्या माहित मला, जन्मातरींच्या गाठी, —— देवाने बनवलंय तुला, माझ्याच साठी.


लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू, —— रावांना घास देताना,मला येई गोड हसू.


सातारा म्हंटल कि, फेमस कंदी पेढे, —— राव झाले, कोल्हापूरच्या पोरी मागे वेडे.


सागराला शोभते निळाईचे झाकण, ——- चे नाव घेऊन सोडते कंकण.


असंख्य तारे, नभात पहावे निरखून, —— रावांसारखे पती, वडिलांनी दिले पारखून.


जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, —— नाव घेते पत्नी या नात्याने.


चांगली पुस्तके आहेत, माणसांचे मित्र, —— रावांच्या सहवासात रंगविते, संसाराचे चित्र.


अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रुपाचा, —— रावाना घास भरवते वरण-भात-तुपाचा.


नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल, —— रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल.


आकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे, —— हेच माझे अलंकार खरे.


शब्द तिथे नाद, कवी तिथे कविता, —— रावांची जोड जणू, सागर आणि सरिता.


आकाशाच्या अंगणात ,ब्रह्मा ,विष्णू आणि महेश, —— रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश.


घरावर परड परड्यात गहू, तुमच्या आग्रहासाठी, —— रावांचे नाव, किती वेळा घेऊ.


शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा, —— रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा.


सासरी आहे माझ्या, सुंदर हिरवा मळा, —— रावांमुळेच लागला मला, त्यांचा लळा.


चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल, —— रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.


Simple Ukhane In Marathi For Female

Simple Ukhane In Marathi For Female
वधूसाठी मराठी उखाणे
आनंदाने भरला दिन हा लग्नाचा, …. रावांना घास देते,गोड जिलेबीचा.

जाईजुईच्या फुलांचा मधुर सुटतो सुवास,….चे नाव घेऊन देते घास.

चांदीच्या ताटात हळदी कुंकवाचा काला,….रावांच नाव घ्यायला आजच प्रारंभ केला

जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा, …. च्या सह संसार करीन सुखाचा.

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,….रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,….नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.

काचेच्या पेल्यात, सुख दुःखाचे पेय, ------ रावांना कीर्ती मिळावी, हेच माझे ध्येय.

संगमरवरी देवळात बसविली, साईंची मूर्ती,------- रावांशी लग्न झाले, झाली इच्छा पूर्ती.

रिम झिम झरती श्रावण धारा, धरतीच्या कलशात,------ रावांचे नाव घेते, राहुद्या लक्षात.

पंढरीच्या यात्रेत, विठ्ठल नामाचे गजर,------ रावांचे नाव घ्यायला, नेहमी मी हजर.

यमुना नदीवर पडली, ताजमहालाची सावली, ------ रावांची जन्मदाती, धन्य ती माउली.

श्रीविष्णूच्या मस्तकावर, सदैव असतो शेष, ------ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश.

सासू सासऱ्यांनी काम केले, एक पून्याचे, ------ रावांना दान दिले, मला जन्माचे.

देवाच्या देवळात, गोड सनई वाजते, तुमच्या आशीर्वादाने, ------ रावांचे नाव, महाराष्ट्रात गाजते.

Ukhane Marathi For Female

Ukhane Marathi For Female
स्त्रियांसाठी मराठी उखाणे

दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी, —— राव आले आयुष्यात, म्हणून आहे मी आनंदी.


राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात, —— चे नाव घेते —— च्या घरात.


आई वडिलांनी केले संस्कार, शिक्षणाने केले सक्षम, —— सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.


केळी देते सोलून, पेरू देते चोरून, —— रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून.


हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम, —— रावांचे चरण, हेच माझे चारही धाम.


शिवाजीसारखा पुत्र, जिजाईसारखी आई, —— चे नाव घेते —— घराण्याची सुनबाई.


पहिल्या पावसात, मातीचा छान आला सुगंध, —— राव माझ्या आयुष्यात आल्याने, भेटला मला आनंद.


केळीच्या पानावर गाईचं तूप, —— रावांचं कृष्णासारखं रुप.


मुंबई आहे सर्वांच्या, स्वप्नांची नगरी,—— मी सुखी आहे कारण, —— राव पडले माझ्या पदरी.


सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान,—— ची राणी झाले मी आहे भाग्यवान.


जेवणाला चव यायला, लागते मीठ, —— दिसते घाबरी, पण आहे खूप धीट.


सासुरवाशीण मुलीने राखावा थोरामोठ्यांचा मान,—— रावांना कन्या केली दान.


लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व, —— रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व ?


आई वडिलांपेक्षा, नाही मोठी कोणाची माया, —— रावांच्या सानिध्यात येऊन, भेटली मला छाया.


दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र —— रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र


कपाळाचे कुंकू, जशी चंद्राची कोर, —— च्या मदतीवर, सगळा माझा जोर


सात (७) ला म्हणतात, इंग्रजीमध्ये सेवन, —— रावांसाठी शिकेन, मी सर्व जेवण.


सर्व कार्याचा पाठीराखा, विघ्णहर्ता गणेश, —— राव हेच माझ्या, जीविताचे परमेश.


देवाला जे मागितले, ते सर्व मिळाले, खूप खुश आहे आज मी, कारण —— सोबत माझे लग्न जुळाले.


वाचा – Good Morning Quotes In Marathi (शुभ सकाळ सुप्रभात मराठी संदेश)

Traditional Ukhane In Marathi For Female

Traditional Ukhane In Marathi For Female
Traditional Ukhane In Marathi For Female

चालली सप्तपदीचे, सात पावले, —— रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधले.


लक्ष्मी माते वंदन करते, मनी श्रद्धेचे बळ, —— रावांच्या संसारी दे, समृद्धीचे फळ


रखरखत्या वैशाखात, प्रेमाचा धुंद वारा, जीवनाचा खेळ समजला, —— मुळे सारा


चांदीच्या नक्षीदार ताटाला, सोन्याचा गिलावा, —— रावांसारखा गुणी पती, जन्मोजन्मी मिळावा.


कपाळावरील कुंकू, मांगल्याची खूण, —— रावांची आणि माझे जुळले, ३६ गुण.


प्रेम काय आहे, हे माहित नव्हते मला, ते खूप सुंदर आहे, हे —— रावांमुळे कळले मला


कस्तुरीचा जन्म, सुगंधाकरिता, माझे जीवन अर्पण, —— रावांकरिता.


आषाढी कार्तिकी, पंढरपूरची वारी, —— च नाव घेतो, राम कृष्ण हरी.


चहा केला नेऊन दिला, दुधाने भरले कप, —— रावांसाठी केले, ५ वर्ष तप.


सासरे आहेत प्रेमळ, सासूबाई आहेत दयाळू, —— रावांचे नाव घेते, आहेत खूप मायाळू.


चांदीच्या ताटात अगरबतीचा पुडा, —— च्या नावाने भरला हिरवा चूडा.


आयुष्यात सु:ख-दुःख, दोन्ही असावे, —— रावांचे प्रेम, माझ्यावर सदैव असावे.


रात्रीच्या आकाशात, चमचमते तारे, —— रावांचे नाव घेते, लक्ष द्या सारे.


वडिलांची छाया, आईची माया, —— रावांच्या सुखासाठी, झिजवते काया.


लग्नासाठी मुले पाहिले, सतराशे साठ, अखेर —— रावांशी बांधली, लग्नाची गाठ


कृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन, —— च्या जिवावर आदर्श संसार करीन


गळ्यात मंगळसूत्र, ही सौभाग्याची खून, रावांचे नाव घेते ___ ची सून.


गुलाबपाकळीपेक्षा नाजूक दिसते शेवंती, —— राव सुखी राहोत हीच माझी विनंती.


आंबे वनात, कोकिळा गाते गोड, —— रावांचे नाव घेते, वैनी वाट माझी सोड


आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, —— चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.


सूर्याने दिली साडी, चोळी आणि गोफ, —— रावांच्या मांडीवर —— घेते झोप.


मंदिराच्या गाभाऱ्यात, विठ्लाची मूर्ती, —— रावांची होवो, सगळीकडे कीर्ती.


श्लोक रामदासांचे, आहेत किती छान, —— रावांच्या संसारात, हरवले मी भान.


भक्तासाठी वेडा झाला नंदन, —— नाव घेते सर्वांना करून वंदन


नको मोहन माळ, नको हिऱ्याचा हार, —— रावांच्या जीवनात, मी सुखी आहे फार.


संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष, —— रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष.


सोन्याचे मंगळ्सूत्र सोनाराने घडविले, —— रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी मला अडविले.


संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन, —— रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.


Ukhane In Marathi For Female

Ukhane In Marathi For Female
नवरीसाठी मराठी उखाणे

उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त, सगळे म्हणतात —— आणि —— ची जोडी आहे जबरदस्त.


दान दागीण्यापेक्षा शब्द हवा गोड, —— रावांच्या संसाराला —— ची जोड.


गुलाबाचे फुल, गणपती बाप्पाला वाहिले, —— च्या साठी, गाव पाहिले.


पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले, —— च नाव घेतल्यावर, चेहरा माझा खुले


जीवनाच्या प्रांगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी, —— चा उत्कर्ष होत राहो हेच मागणे देवापाशी.


सोन्याच्या बेसरीत, पाचूचा खडा, —— राव अन माझा, ७ जन्माचा जोडा.


चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप, —— रावांच समवेत ओलांडते माप.


दारा वरती काढली, लक्ष्मीची पावल, —— रावांचे साधे रूप, माझ्या मनाला भावल.


जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, —— रावांच नाव घेते पत्नी या नात्याने.


सासू सासऱ्यांच्या छायेत, मला नाही काही कमी, —— राव हेच माझ्या, सर्वस्वाचे स्वामी.


सागराला आली भरती, नदीला आला पूर, —— च्या सौख्याकरता आईबाप केले दूर.


रत्नागिरीला आहे देवस्थान, गणपतीपुळे, कोकणामध्ये सासर भेटले —— रावांमुळे


भरलेल्या पंक्तीत रांगोळी काढली चित्रांची, …. रावांसोबत घास देते पंगत बसली मित्रांची.


दादरला गेलो बांधायला, लग्नाचा बस्ता, —— रावांचे नाव घेते, आता सोडा माझा रस्ता.


सावित्रीने नवस केला, पती मिळावा सत्यवान, —— रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.


लग्नात हुंडा मागून, नाते करू नका घाण, —— रावांसारखे पती मिळाले, मला फार आहे त्यांचा अभिमान.


हरिश्चंद्र राजा, रोहिदास पुत्र, …. च्या नावाने घातले मंगळसूत्र.


देवाला भक्त करतो, मनोभारे वंदन, —— मुळे झाले, संसाराचे नंदन


पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात, —— रावांचे नाव घेते —— च्या अंगणात.


ताटभर दागिन्यांपेक्षा, माणसं असावी घरभर —— रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्यावा जन्मभर


देवाला भक्त करतो, मनोभारे वंदन, —— मुळे झाले, संसाराचे नंदन.


Marathi Ukhane For Female Romantic

Marathi Ukhane For Female Romantic
Marathi Ukhane For Female Romantic

आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे, —— रावांसाठी, सोडून आले मी सारे.


सोसायटी मध्ये बॅडमिंटन खेळताना, झाली होती सेटिंग, —— सोबत लग्नाची झाली, माझ्या घरी मीटिंग.


नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,….रावां सोबत आली मी सासरी


हळद लावण्यासाठी, बसली मी पाटावर, —— रावांच नाव काढलंय, मेहंदीने हातावर.


सासरचे निरंजन माहेरची फुलवात, —— चे नाव घेण्यास करते सुरुवात.


प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले, —— रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले


कुरुंदाची सहन चंदनाचे खोड, —— रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.


आई-वडिलांना काळजी होती, कसे मिळेल घर, —— रावांसारखे, शांत मिळाले वर.


शामकृष्ण कन्हैयाला राधेचा ध्यास, —— देते जिलबीचा घास.


चंदेरी चळिला सोनेरी बटन —— रावांना आवडते तंदूरी चिकन.


एकविरा आईच्या मंदिरात, नवसाच्या रांगा, —— रावांचे नाव घ्यायला, मला केव्हाही सांगा.


राम सीता लक्ष्मण चालले वनात, —— रावांच्या मी आहे सहभागी जीवनात.


परिवार खुश राहील, जोडून नाती घट्ट, —— पुरवतील आता, माझा सर्व हट्ट.


गुलाबाचे फुल दिसायला ताजे, —— रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.


शेवटी आज आला, तो आनंदाचा दिवस, —— रावांसारखे पती मिळावे म्ह्णून, केला होता नवस


अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा, —— रावांच्या नावाने भरते लग्नचुडा.


गुलाबाचे फुल छान वाटते, मुलींच्या केसावर —— रावांचे नाव सदैव, माझ्या ओठावर.


साजूक तुपात नाजूक चमचा,….रावांचं नाव घेते आशीर्वाद असावा तुमचा.


Romantic Ukhane In Marathi For Female

Romantic Ukhane In Marathi For Female
Romantic Ukhane In Marathi For Female

गेल्या त्या आठवणी आणि गेले ते दिवस, —— आज आहे आपल्या आयुष्याचा, सुखाचा दिवस.


राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात्,…. नाव घेते नीट ठेवा लक्षात.


स्वप्नातला गुलाब, गालात हसला, —— रावांचे नाव घेण्यास, मान कसला


मुंबईला म्हणतात, स्वप्नांची नगरी, मी खुश आहे कारण मी पडली, —— रावांच्या पदरी.


संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, —— रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.


छान वाटतो नव्या नवरीला, साडीचा रंग हिरवा, —— आता मला ची सून लवकर बनवा.


राजहंस पक्षी शोभा देतो वनाला,…. चं नाव घेते आनंद माझ्या मनाला.


दिन दुबळ्यांचे गाऱ्हाणे, परमेश्वराने ऐकावे, —— रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागावे.


मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला, —— रावांचे आयुष्य वाढो हीच प्रथना तुला.


तुमच्या सर्वांच्या साक्षीने, घेतला हातात हात, —— रावांची लागली मला, सात जन्मासाठी साथ.


आईवडिलांनी दिला जन्म, ब्रह्मदेवाने बांधल्या गाठी, —— माहेर सोडलं —— रावांच्या सौख्यासाठी.


Marathi Ukhane For Bride

Marathi Ukhane For Bride
Marathi Ukhane For Bride

लग्न आटपले, आणि काढली वरात, —— सगळ्यांसमोर उचलून, न्या मला घरात.


कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास, —— ना घालते लाडूचा घास.शंकराचा सोमवार, गणपतीची चतुर्थी,माझ्या ह्रुदयांत कोरली, —— रावांची सुंदर मूर्ती.


कोकणचे समुद्र आहेत, निळे निळे गार, —— आहेत माझे, फेव्हरेट स्टार.


कलमी आंब्याला झारीने करते शिंपण, —— चे नाव घेऊन सोडते कंकण.


कृष्णा ने ठेवले गोकुळ खुश, वाजवून बासुरी, —— रावांच नाव घेऊन, आजपासून संसार सुरु सासरी.


अत्तराचा सूगंध दरवळला चहुकडे, —— रावांच्या नामाचा लौकिक होउ दे सगळिकडे.


चला सगळे घरी, संपली आमची वरात,—— रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते घरात.


इंद्राच्या नंदनवनात अप्सरा गातात गोड, भाग्याने लाभली —— जोड.


तलावात उगवतात सुंदर कमळ, —— रावांच नाव घेते, आहेत खूप प्रेमळ.


मंगल दिनी, सोनेरी क्षणी हार घालते एकामेका, —— रावांच्या सौभाग्याने नाव घेते ऐंका.


आई-वडिलांना इंग्लिश मध्ये बोलतात, पप्पा आणि मम्मी, —— तुमची साथ हवी, सात जन्मी.


ज्योतीने ज्योत पेटते, प्रीतीने प्रीती वाढते, —— चे नाव तुमच्यासाठी घेते


अलिबागला जाताना , मज्जा येते होडीने, —— घरात प्रवेश करू जोडीने.


नवे घर ,नवे लोक, नवी नवी नाती संसार होईल मस्त —— राव असता सोबती.


इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात, —— रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते आत.


त्मरूपी करंडा देहरूपी झाकण, —— चे नाव घेऊन बांधते कंकण.


आकाशातून पडतो, तुटता तारा, —— मध्ये आहे, माझा जीव सारा.


हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी, —— रावांच नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी.


अमरीतसर वरून आणला, हातात घालायला कडा, —— रावांच्या नावाने भरते, लग्नचुडा.


कोणीतरी आठवण काढत होते, म्हणून मी शिंकले, —— रावांचे मन, मी पहिल्या भेटीतच जिंकले.


दारी होती तुळस, तिला घातले होते पाणी ,आधी होते आई बाबांची तान्ही,आता झाले —— ची राणी


आकाशात दिसतात, निळे निळे ढग, —— सोबत फिरेन मी, संपूर्ण जग.


Best Ukhane In Marathi For Female

Best Ukhane In Marathi For Female
Best Ukhane In Marathi For Female
 • खवळला समुद्र लाटा काठोकाठ, —— रावांचे नाव घेते —— च्या पाठोपाठ
 • कोकणाला जाताना, लागतो आंबा घाट, —— रावांच नाव घेते, सोडा माझी वाट
 • कमलदलांमध्ये उभी लक्ष्मी, —— चे नाव घेते —— घराण्याची सुनबाई
 • मला आवडते, सर्वांची काढायला खोड, —— रावांचे बोलणे, मधापेक्षा गोड.
 • लग्नात लागतात हार आणि तुरे, —— च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
 • कोशिंबीर बनवण्यासाठी, कांदे ठेवले कापून, —— रावंच नाव घेते, सर्वांचा मान राखून.
 • दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी, —— रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी.
 • काचेच्या वाटीत, गाजराचा हलवा, —— रावांच नाव घेते, सर्वांना बोलवा
 • हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, —— रावांच नांव घेते, —— दिवशी.
 • छान वाजवतात , कार्यक्रमात हलगी, ——– राव आहेत बिझनेसमन, आणि मी शेतकऱ्याची मुलगी
 • लावित होते कुंकु, त्यात पडला मोती, —— रावां सारखे पती मिळाले, भाग्य माझे किती.
 • भाजीत भाजी, गवाराची, —— आहेत कदमांचे, आणि मी आहे पवारांची.
 • महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकुन, —— रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.
 • सर्जेराव पाटलांची, आहे मी लेक, —— आहेत माझे, एकुलते एक
 • हळद घेतली, कूंकु घेतलं, घेतली निरंजन आणी काडेपेटी, —— रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा पोटी.
 • गाव माझे सातारा, आणि जिल्हा आहे कराड, ——- आपल्या लग्नात, खूप आहे व्हराड

Marathi Ukhane For Girls

Marathi Ukhane For Girls
मुलींसाठी मराठी उखाणे

पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला, —— रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला.


शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड, —— चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.


स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी घेतली उडी, —— रावांच्या नावाने घालते गळ्यात, मंगळ सूत्राची जोडी


मंद आहे वारा संथ चाले होडी, —— परमेश्वर सुखी ठेवो …. आणि माझी जोडी.


कोकिळाने लावला, झाडावर बसून सूर, —— रावांच्या आयुष्यात येऊदे, सुखाचा पूर.


दही,साखर, तूप, —— राव मला आवडतात खूप


लग्नानंतर सर्व स्त्रिया, होतात जबाबदार, —— राव दिसतात, फारच रुबाबदार.


फुलासंगे मातीस सुवास लागे, —— रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.


मखमली हिरवळीवर, पाखरांचा थवा, —— रावांच्या वंशात, लावीन दीप नवा.


प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही, ——- सारखा हिरा.


केस माझे कुरळे, सावली पडली गालावर, —— रावांचे नाव घेते, मैत्रिणींच्या बोलावर.


धरला यांनी हात वाटली मला भीती, हळूच म्हणाले —— राव अशीच असते प्रीती


श्रीमंत माणसांना असते, पैशाची धुंदी, —— चे नाव घेण्याची, हि पहिलीच संधी.


एका वर्षात असतात महिने बारा, —— च्या नावात समावलाय आनंद सारा.


मोर आहे भारताचा, राष्ट्रीय पक्षी, —— रावांचे नाव घेते, सर्वजण आहेत साक्षी.


यांचं आणि माझं नातं घट्ट आहे, जसं फेव्हीकॉल आणि ग्लू, आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट ची यांना नसते क्लू


स्त्रियांनी नवस केला, पती मिळावा सत्यवान, ——- राव भेटले म्हणून, आहे मी भाग्यवान.


मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार, —— च्या स्पर्शाने उमटले झंकार


जीवनात सदैव आई वडिलांचा, आशीर्वाद असावा पाठी, —— रावांसारखे पती मिळावे, साथ जन्मा साठी.


पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती, —— रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी


तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी, —— रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.


तसा मला शौक नाही पाहायचा क्रिकेट, पण बघता बघता —— रावांच्या प्रेमात पडली माझी विकेट.


कोकणातील जंगले आहेत, सुंदर आणि घनदाट, —— रावांसोबत बांधली अखेर, लग्नाची जीवनगाठ


सूर हवा तर ताल हवा, ताल हवा तर सूर हवा —— रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा


एका लग्न समारंभात, झाली आमची भेट, —— रावांनी २ महिन्यात, मला बायको बनवून घरी न्हेली थेट.


वाचा – श्रावण महिन्याचे महत्व, पूजा पद्धत, श्रावण सोमवार २०२३, धार्मिक कथा, मराठी माहिती

Latest Ukhane In Marathi For Female

Latest Ukhane In Marathi For Female
नवरीसाठी नवीन मराठी उखाणे

नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते —— च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते


देवापुढे मागते, सर्वाना चांगले भेटूदे आरोग्य, —— रावांच्या रूपात मिळाला, जीवनसाथी योग्य


हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा, —— रावांना घास घालायला वेळ कशाला हवा


शुभमंगल झाले, आणि अक्षता पडल्या माथी, —– राव आजपासून, माझे जीवनसाथी


सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात, सप्तरंगाची पखरण चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात,
सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात, —— रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात


चांदण्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात स्टार, —— रावांचे नाव घेऊन, करते सर्वाना नमस्कार


लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र, —— चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र


प्रेमळ लोकांना आवडते, लव्ह शायरी, —— रावांसोबत ओलांडते, मी घराची पायरी


चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची, —— रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची


पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशा आहेत चार, —— रावांनी घातला गळ्यात, मंगळसूत्राचा हार


नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, —— रावांना शेवटी अहोच म्हणायचे


वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल, —— रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.


घातली मी वरमाला हसले —— राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली


पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, —— रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.


गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरल, —— रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

मित्रांनो या लेखामध्ये मी तुम्हाला (Marathi Ukhane For Female) याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. हे वाचून नववधू , नवरीमुली, आणि स्त्रिया यांचा लग्नामध्ये घेतले जाणाऱ्या उखाण्यांचा शोध पूर्ण होईल अशी आशा आहे. मुलींनो तुम्हाला या लेखातील उखाणे कशे वाटले हे comment box मध्ये सांगा. ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर पोस्टला फेसबुक, whatsapp, Twitter वर share करा आणि आपल्या मित्र आणि मैत्रिणींना या पोस्टविषयी माहिती सांगा.

Written By – Mahajatra Team

Leave a Comment