फेसबुक (CEO) मार्क झुकरबर्ग यांची जीवन कहाणी

Mark Zuckerberg Information in Marathi – तर आज आपण मार्क झुकरबर्ग यांचे चरित्र आणि यशोगाथा मराठीमध्ये जाणून घेणार आहोत. जगात असे बरेच लोक आहेत आणि त्यांना असे वाटते की जे वयाने लहान असतात ते विचार करू शकत नाही किंवा काहीतरी मोठे करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. पण अशी एक व्यक्ती आहे ती म्हणजे मार्क झुकरबर्ग, त्यांनी लोकांची ही विचारसरणी बदलून तर टाकली आणि लहान वयातच अत्यंत प्रशंसा करण्यायोग्य मोठे कार्य केले.आणि त्यांनी आज जगभरातील लोकांना एकत्र आणण्यात महत्वाचे कार्य केले आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचे (Facebook) संस्थापक (founder) आणि सीईओ (CEO) मार्क झुकेरबर्ग हे आहेत.आज या लेखात आपण मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक कसे आणि केव्हा तयार केले आणि त्यांचे चरित्र व जीवनकथा जाणून घेणार आहोत

Mark Zuckerberg Information in Marathi
Mark Zuckerberg Biography In Mrathi

Mark Zuckerberg Information in Marathi

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मार्क झुकरबर्ग जीवनसंघर्षमय (Mark Zuckerberg Biography in Marathi) जीवनाची वाटचाल पाहणार आहोत.

मार्क झुकरबर्ग यांचे लहानपण (बालपण)

Mark Zuckerberg यांचा जन्म 14 मे 1984 रोजी न्यूयॉर्क मधील Dobbs Ferry येथे झाला. त्याचबरोबर मार्क झुकरबर्ग यांना तीन बहिणी आहेत आणि मार्क हे दुसऱ्या नंबरचे मुल आहेत. त्यांच्या घरामध्ये मुलगा म्हणून ते एकुलते एक आहेत. आणि मार्कच्या वडिलांचे नाव एडवर्ड झुकेरबर्ग असून ते दंतचिकित्सक (Dentist) आहेत, व त्यांच्या आईचे नाव कॅरेन झुकेरबर्ग आहे आणि त्या मानसोपचारतज्ज्ञ (psychiatrist) आहेत. त्यांच्या घराजवळ त्यांच्या वडिलांचा दंतचिकित्सालय दवाखाना (dental clinic) आहे. यामुळे मार्क यांना नेहमी रुग्ण बघायला मिळत होते.

ते लहानपणापासूनच एक अतिशय तेजस्वी आणि हुशार मुल होते. मार्क यांना शाळेत असल्यापासूनच प्रोग्रॅमिंगमध्ये जास्त रस येऊ लागला आणि त्यांचे वडील त्यांना Atari BASIC programming शिकवायचे. मार्क हे अभ्यासात फार हुशार होते. त्यांनी केवळ वयाच्या 12 व्या वर्षी एक मेसेंजर बनविला व त्याला “ZuckNet” असे नाव दिले. त्याचबरोबर या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांनी घरातील सर्व संगणक (computers) एकमेकांशी जोडले, आणि घरातील संदेश (messages) दंत चिकित्सालयात (dental clinic) Transfer करून वडिलांबरोबर बोलू लागले. त्यांच्या वडिलांनी हे सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल (install) करून ते आपल्या क्लिनिकमध्ये वापरले आणि त्यांची रिसेप्शनिस्ट (receptionist) मेसेंजरद्वारे त्यांना नवीन पेशंटच्या आगमनाची माहिती देत असे.

त्यांची ही क्षमता पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्यासाठी एका संगणक शिक्षकाला बोलावले, ते mark यांना प्रोग्रामिंग शिकवायचे. मार्क इतक्या वेगाने प्रोग्रामिंग शिकायचा की त्यांच्या शिक्षकांना खूप आश्चर्य वाटायचे. एवढ्या लहान वयात, जिथे मुलं अभ्यासाकडे फारसं लक्ष देत नाहीत आणि खेळात रस घेतात, तिथे मार्क आपल्या मित्रांसाठी फक्त मजा करण्यासाठी व्हिडिओ गेम्स बनवित असे.

हायस्कूल मध्ये असतांना उपलब्धी

मार्क हे high school मध्ये असतांना खूप हुशार आणि टॉपर विद्यार्थी होते.आणि त्यांना विज्ञान (science) आणि साहित्य विषयांमध्ये (literature subjects) अनेक पुरस्कारही मिळाले होते. मार्क हे हायस्कूलमध्ये असताना, त्यांनी एक MP3 मीडिया प्लेयर तयार केला, त्याला त्यांनी Synapse असे नाव दिले, हा एक असा प्लेअर होता. की तो स्वतः प्लेलिस्ट तयार करायचा. हा प्लेअर जो users वापरायचा तोच प्लेलिस्ट ऐकायचा. आयटी दिग्गज सॉफ्टवेअर (IT giant software) कंपनी Microsoft आणि AOLने या मीडिया प्लेयरमध्ये स्वारस्य दाखवण्यास सुरुवात केली आणि मार्कला ते विकत घेण्यासाठी भरपूर पैसे देऊ केले परंतु त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला.

फेसमॅशचा शोध लावला | FaceMash invented

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मार्कने पुढील शिक्षणासाठी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथेही मार्क त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे खूप लोकप्रिय झाले आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून ओळखले जाऊ लागले. 2003 मध्ये त्यांनी FaceMash नावाची website तयार केली. हे करण्यासाठी त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटी डेटाबेस हॅक केला आणि तेथून विद्यापीठात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रोफाईल पिक्चर चोरून ते त्यांच्या websiteवर टाकले. आणि असा एक program बनविला की तो आपोआप दोन मुलींचा फोटो किंवा दोन मुलांचा फोटो निवडायचा आणि त्याच्यापैकी कोण सर्वात सुंदर किंवा चांगला दिसतोय यावर Voting करायला सांगायचा.

या साइटवर आलेले लोक त्या विद्यापीठाचे विद्यार्थी असायचे आणि तेच मतदान करायचे, हळूहळू या साइटची लोकप्रियता इतकी वाढू लागली की अनेक विद्यार्थी या साइटवर येऊ लागले आणि जास्त traffic मुले विद्यापीठाचा सर्व्हर क्रॅश झाला. या घटनेनंतर मार्कला विद्यापीठातील शिक्षकांनी व प्राचार्यांनी चांगलेच फटकारले. आणि ती साईट बंद करायला सांगितली.

फेसबुकची सुरुवात कुठे झाली? | Where did Facebook start?

Facemashच्या घटनेपूर्वी, हार्वर्डचा एक विद्यार्थी दिव्या नरेंद्र सोशल नेटवर्किंग साइटची कल्पना घेऊन मार्ककडे आला होता आणि त्याच्यासोबत त्याचे आणखी दोन भागीदार आले होते. दिव्याने मार्कला सांगितले की त्याला आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ही site बनवायची आहे, त्या वेबसाईटचे नाव अगोदर “Harvard Connection” होते, नंतर त्या website चे नाव “ConnectU” ठेवण्यात आले. ते म्हणाले की, या साइटशी जोडले गेलेले सर्व सदस्य त्यांचे फोटो, वैयक्तिक माहिती आणि उपयुक्त लिंक्स इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी शेअर(share) करू शकतात. ही कल्पना ऐकून मार्कने लगेच होकार दिला. आणि त्याच्यासोबत काम करायला सुरुवात केली.

या प्रकल्पावर काम करत असतांना मार्कला स्वतःची सोशल नेटवर्किंग साइट सुरू करण्याची कल्पना सुचली. आणि वर्ष 2004 मध्ये, मार्कने “TheFacebook.com” नावाची नोंदणी केली, तिला आज जगभरातील लोक “Facebook” या नावाने ओळखतात. त्यावेळी त्यांच्या विद्यापीठातील विद्यार्थीच फेसबुक वापरत असत. आणि हळूहळू, 2005 साली, यूएसए मधील सर्व विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी फेसबुक वापरण्यास सुरुवात केली आणि फेसबुकमध्ये त्यांचे प्रोफाइल बनवण्यास सुरुवात केली. फेसबुकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती आणि हे पाहून मार्कने ठरवले की आता केवळ विद्यार्थीच नाही तर जगभरातील सर्वच लोकांना फेसबुक वापरता येईल. यासाठी मार्कने ग्रॅज्युएशनचा अभ्यास अर्ध्यावर सोडला आणि या प्रोजेक्टकडे पूर्ण लक्ष द्यायला सुरुवात केली.

फेसबुकचे वैशिष्ट्य म्हणजे येथे लोक नवीन मित्र बनवू शकतात आणि आपल्या जुन्या गमावलेल्या मित्रांशी पुन्हा बोलू शकतात आणि सर्व काही शेअर करू शकतात, त्यांचे मित्र जगात कुठेही असले तरी ते एकमेकांशी सहज बोलू शकतात. ही खासियत पाहून लोक फेसबुककडे ओढले जातात.आणि याच कारणामुळे फेसबुकची लोकप्रियता इतकी वाढली की आज जगभरात facebook चे 1 अब्ज वापरकर्ते झाले आहेत.

मार्क झुकेरबर्ग म्हणतो की | Mark Zuckerberg says

अब्जावधी लोकांना जोडण्यात मदत करणे हे खूप आश्चर्यकारक आणि आनंददायक आहे. आणि माझ्या आयुष्यातील ही महत्वपूर्ण गोष्ट आहे त्याचा मला सर्वात जास्त अभिमान आहे.

सर्वात मोठा धोका म्हणजे धोका न घेणे.
जग खूप वेगाने बदलत असते,
अयशस्वी होण्याची हमी देणारी एकमेव रणनीती
म्हणजे धोका न घेणे.

मी एक प्रश्न रोजच स्वतःला विचारतो, की
“मी सर्वात महत्वाची गोष्ट करीत आहे का?

आपण सर्व मानव आहोत. कोणीही कुशल नाही.
चुकांवर नाही तर तुम्ही निपूण बनण्यावर लक्ष केंद्रित करा
तुम्हाला यश मिळो किंवा अपयश, परंतू चुकांना घाबरू नका

अशी गोष्ट शोधा, ज्यामध्ये तुम्ही passionate आहात.

लोक म्हणतात मी फेसबुक बनवलं,
स्टीव्ह जॉब्सने ऍपल कंपनी बनवली पण ते खरे नाही.
एक माणूस हे सर्व करू शकत नाही.

तुम्ही काय बोलता याची लोकांना पर्वा नाही,
पण तुम्ही काय बनवता याची त्यांना काळजी असते.

तरुण उद्योजकांना माहित हे माहित असणे आवश्यक आहे की,
त्यांना काय माहित नाही याबद्दल स्वत: ची जाणीव असणे महत्वाचे आहे.

तुम्ही चांगले प्रयत्न करा आणि अयशस्वी व्हा
आणि त्यातून काहीतरी शिका, हे काहीही न करणाऱ्यांपेक्षा चांगले आहे.

प्रसारमाध्यमांपेक्षा एखाद्या समस्येवर पुस्तके चांगली असतात
ती सखोल समज निर्माण करतात.

Mark Zuckerberg Biography

Mark Zuckerberg success Story

FAQ

प्रश्न – मार्क झुकरबर्ग यांचा जन्म कधी व कुठे झाला?

उत्तर – मार्क झुकरबर्गचा यांचा जन्म 14 मे 1984 रोजी न्यूयॉर्क मधील डॉब्स फेरी येथे झाला

प्रश्न – मार्क झुकरबर्ग यांच्या आई वडिलांचे नाव सांगा.

उत्तर – मार्कच्या वडिलांचे नाव एडवर्ड झुकेरबर्ग असून ते दंतचिकित्सक आहेत,आणि त्यांच्या आईचे नाव कॅरेन झुकेरबर्ग आहे.

प्रश्न – फेसबुक चे संस्थापक कोण ?

उत्तर – फेसबुक चे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे आहेत.

प्रश्न – फेसमॅशचा शोध कोणी लावला?

उत्तर – 2003 मध्ये FaceMash शोध मार्क झुकरबर्ग यांनी लावला.

प्रश्न हा नाही की ‘आपल्याला लोकांबद्दल काय जाणून घ्यायचे आहे’ तर प्रश्न असा आहे की ‘लोकांना स्वतःबद्दल काय जाणून घ्यायचे आहे?

मार्कने जेव्हा फेसबुकची साईट तयार केली तेव्हा तो केवळ 19 वर्षांचा होता आणि इतक्या कमी वयात त्याने जगभरातील सर्व लोकांना एकत्र आणले. आणि आज तो जगातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहे. 2010 मध्ये त्यांना “Time person of the year” हा पुरस्कारही मिळाला होता. 2015 मध्ये फोर्ब्स मॅगझिननुसार, झुकरबर्ग जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत 7 व्या स्थानावर आहे. मार्क झुकेरबर्गच्या जीवनातून आणि यशाने प्रेरित होऊन त्यांच्यावर ‘द सोशल नेटवर्क’ नावाचा चित्रपटही तयार करण्यात आलेला आहे.

ही होती फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या चरित्राविषयी आणि यशोगाथेबद्दल माहीती (Mark Zuckerberg Information in Marathi) , मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला आवडेल.

written by – H.G. Shilpa

Leave a Comment