Mobile phone root in marathi? | मोबाइल ला root कसे करावे?

Mobile Phone ला (मोबाईल ) रूट (root) कसे करावे असे अनेक प्रश्न रोज येतात. तर आज आपण या विषयावर बोलणार आहोत. आज प्रत्येकजण अँड्रॉईड फोनचा (Android phone) वापर करीत आहे, पण त्यांना फोन रूट (phone root) करण्याबाबत फार कमी माहिती आहे..

ज्यांना आपला फोन (root) रूट करायचा आहे आणि ज्यांच्याकडे computer आहे, ते आरामात रूट (root) करू शकतात, पण ज्यांच्याकडे कॉम्प्युटर (computer) नाही ते Android phone root रूट कसे करणार? आज मी तुम्हाला संगणकाशिवाय अँड्रॉईड फोन (Android phone) कसा रूट करायचा याविषयी माहिती देणार आहे?

mobile phone root
mobile phone root

मोबाइल phone root कसे करतात.

आज मी तुम्हाला तुमचा फोन computer ने आणि computer शिवाय रूट (root) कसा करायचा याबद्दल सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा फोन सहज रूट करू शकता. सर्वात आधी phone root कसे करतात हे बघणार आहोत.

Android मोबाईल PC शिवाय कसा रूट (root) करायचा

अँड्रॉइड रूट करण्यासाठी आपल्याला संगणक (computer) आवश्यक आहे परंतु ज्यांच्याकडे संगणक (computer) नाही ते आपला फोन रूट करण्यासाठी अँड्रॉइड रूट ऍप्लिकेशन (android root applications) वापरू शकतात.

तुमचा phone root करण्यासाठी इंटरनेटवर अनेक अॅप्लिकेशन्स (applications) इंटरनेटवर उपलब्ध आहेत, जी तुम्हाला गुगल प्ले (Google Play) स्टोअरवरून सहज सापडतील. मी तुम्हाला येथे 5 सर्वोत्कृष्ट Android रूटिंग अॅप्सबद्दल (best Android rooting apps) माहिती देत आहे., ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन सहज रूट करू शकाल.

अँड्रॉइड स्मार्टफोन (Android Smartphone) कसा रूट करायचा हे जाणून घेण्यापूर्वी काही महत्त्वाची माहिती

तुमचा फोन रूट करण्यापूर्वी, 50% पर्यंत charge ठेवा जेणेकरून तुमच्या मोबाईलची बॅटरी रूटिंग प्रक्रिये (rooting process) दरम्यान संपणार नाही.

तुमच्या फोनचा सर्व डेटा आणि फाइल्स (data,files) जसे की संपर्क (contacts), संगीत, फोटो, व्हिडिओ, अॅप्स इत्यादी रूट करण्याआधी, तुमचा डेटा गमावला जाणार नाही यासाठी बॅकअप (backup) घ्या. आणि रूट करण्यापूर्वी, फोनमधून SD कार्ड देखील काढा.

खाली नमूद केलेले कोणतेही app download करा आणि ते तुमच्या फोनच्या स्टोरेजमध्ये इंस्टॉल करा. इंस्टॉलेशन (installation) दरम्यान तुम्हाला एक चेतावणी संदेश (warning message) दिसेल, ऍप्लिकेशन (application, install) इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला फक्त ‘ yes’ पर्याय निवडावा लागेल.

शेवटी, तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन, तुम्हाला ‘डेव्हलपर पर्याय’ (Developer options) अंतर्गत ‘USB debugging’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.

5 सर्वोत्तम अॅप्स ज्याद्वारे तुम्ही PC शिवाय phone root करू शकता

कोणताही फोन रूट करण्यापूर्वी या सर्व महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, तरच फोन रूट करण्याची तयारी करा. चला आता जाणून घेऊया त्या अॅप्सबद्दल ज्याद्वारे आपण फोन रूट करू शकतो.

किंगरूट | KingRoot

Android फोन रूट करण्यासाठी KingRoot हा सर्वोत्तम Application आहे. King तुमच्या फोनमधील रूटिंग प्रक्रिया (process) सहज आणि सुरक्षितपणे हाताळतो. हे सर्व प्रकारच्या उपकरणांमध्ये (devices) खूप चांगले कार्य करते.

अँड्रॉइड phone root करण्यासाठी या अॅपचा यशाचा दर (success rate) इतर Appsच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तुम्ही हे अॅप त्याच्या वेबसाइट किंवा गुगल प्ले स्टोअरवरून (Google play store) मोफत डाउनलोड करू शकता. आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमचा फोन कॉम्प्युटरशिवाय जलद रूट करू शकता.

फ्रेमरूट | FramaRoot

FramaRoot हे देखील एक उत्तम अॅप आहे जे फक्त एका क्लिकवर android phone root करण्यास मदत करते. तुम्ही हे google play store वरून डाउनलोड करू शकत नाही कारण ते तिथे उपलब्ध नाही.

ते download करण्यासाठी, तुम्ही त्याच्या वेबसाइटवर जाऊन त्याची apk फाइल विनामूल्य (free) डाउनलोड करू शकता. Framaroot एक सुरक्षित App आहे आणि ते वापरण्यास देखील खूप सोपे आहे. Framaroot अनेक उपकरणे (devices) रूट (root) करण्यात यशस्वी झाले आहे आणि हा अॅप कोणकोणत्या उपकरणांना रूट करू शकते हे फक्त त्याच्यावर अवलंबून आहे.

टॉवेलरूट | TowelRoot

TowelRoot अॅप देखील एक अतिशय चांगला रूटिंग (phone root) अॅप आहे जो खास KitKat आवृत्तीसाठी (version) डिझाइन केलेला आहे. हे अॅप फक्त एका क्लिकवर तुमचा फोन रूट करते आणि त्याचबरोबर तुम्हाला डिव्हाइस (device) रीस्टार्ट (restart) करण्याची गरज भासणार नाही.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून किंवा त्याच्या अधिकृत वेबसाइटवरून मोफत डाउनलोड करून वापरू शकता.

vरूट | phone root by vRoot

vRoot हे एक लोकप्रिय software आहे. जे computer शिवाय Android फोन रूट करण्यासाठी जगभरात वापरले जाते. याचा शोध चीनी विकासकांनी (chinese developers) लावलेला आहे. आणि तो अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

vRoot सॉफ्टवेअर 8000 पेक्षा जास्त अँड्रॉइड उपकरणांना (devices) समर्थन (support) देते आणि एका क्लिकवर त्यांना सहजपणे रूट करते.

Z4 रूट | phone root by Z4 root

Z4 Root हे Android फोनसाठी एक लोकप्रिय रूटिंग अॅप (popular rooting app) देखील आहे. हा एक हलका वजनाचा ऍप्लिकेशन (light weight application) आहे.
जो तुमच्या डिव्हाइसमध्ये खूप कमी जागा (space) घेतो. तुम्ही हे अॅप प्ले स्टोअरवरून अगदी मोफत डाउनलोड करू शकता आणि ते वापरण्यासही खूप सोपे आहे.

हे अॅप तुमच्या फोनच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देते त्यामुळे तुमच्या डिव्हाइसमध्ये कोणताही व्हायरस (virus) किंवा मालवेअर (malware) येत नाही. Z4Root देखील अनेक डिव्हाइसला समर्थन करतो. या अॅपमध्ये रूटिंगसाठी दोन प्रकारचे पर्याय आहेत, एक तात्पुरते रूटिंग (temporary rooting) आणि दुसरा कायमस्वरूपी रूटिंग (permanent rooting).

तात्पुरते रूटिंग (Temporary rooting) केल्याने, तुमचा फोन काही वेळपर्यत रूट होतो. एकदा फोन रीस्टार्ट झाला की तो अनरूट होतो. आणि कायमस्वरूपी रूटिंग केल्याने, तुमचा फोन कायमचा रूट होतो.

या 5 अॅप्सच्या सहाय्याने तुम्ही संगणक न वापरता तुमचा Android फोन सहज रूट करू शकता. तूम्ही फोन रूट करण्यासाठी हे अॅप्स एकदा वापरा. त्यांचा वापर करणे खूप सोपे आहे. आणि काही मिनिटांत तुमचा फोन रूट होतो.

त्यानंतर तुम्ही कोणत्याही सुरक्षिततेशिवाय (security) तूम्ही फोनची सर्व वैशिष्ट्ये (features) आरामात वापर करू शकता. तुम्हाला यापैकी कोणतेही अॅप आवडत नसल्यास, तुम्ही या अॅप्सद्वारे तुमचा फोन अनरूट देखील करू शकता.

संगणकाशिवाय अँड्रॉईड फोन रूट करण्याबद्दल आता माहिती पाहिलेली आहे, आता आपण संगणकाने फोन कसा रूट करायचा हे जाणून घेऊ. सर्व प्रथम, आपण त्या प्रक्रियेचे (procedure) अनुसरण केले पाहिजे ज्याबद्दल मी वर सांगितले आहे की फोन रूट करण्यापूर्वी, काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

पीसी (Computer) वरून phone root कसे करावे?

पीसी (Computer) वरून रूट कसे करावे?

अँड्रॉइड फोन Computer च्या साहाय्याने रूट करण्यासाठी इंटरनेटवर (Internet) अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. आणि किंगोरूट हे सॉफ्टवेअर (KingoRoot software) त्यापैकी सर्वोत्तम आहे, त्यामुळे या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही फोन रूट करू शकता.

step 1: सर्व प्रथम, आपल्या संगणकावर KingoRoot सॉफ्टवेअर डाउनलोड आणि स्थापित करा.

step 2: तुमच्या डिव्हाइसवर जा आणि USB डीबगिंगच्या (USB debugging) पर्यायावर टिक (tick) करा, जो तुम्हाला Device setting मधील developer option मद्ये सापडेल.

टीप: तुमच्या Device settingमध्ये developer option दिसत नसेल, तर तुम्ही तुमच्या सेटिंगमधील ‘about phone’ पर्यायावर जा आणि ‘बिल्ड नंबर’ (Build Number)’ वर तीन वेळा क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला developer option दिसेल.

step 3: सॉफ्टवेअर स्थापित (software install ) केल्यानंतर, USB केबलद्वारे तुमचा फोन संगणकाशी कनेक्ट करा. आणि लक्षात ठेवा की ही स्टेप करतांना संगणकाशी इंटरनेट कनेक्शन जोडलेले असावे. (computer internet connection).

step 4: एकदा का फोन संगणकाशी जोडला गेला की, तुमच्या संगणकावर तुमच्या device driver डाउनलोड होत असल्याचे तुम्हाला दिसेल. तुमचा driver instalettion संपल्यानंतर, तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर एक बॉक्स दिसेल ज्यामध्ये Root status No लिहिलेले असेल ज्याचा अर्थ तुमचे डिव्हाइस अद्याप रूट झालेले नाही हा होतो. त्यानंतर, त्याच बॉक्सच्या अगदी खाली, तुम्हाला ROOT चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल.

step 5: रूटिंग प्रक्रिया संपल्यानंतर, तुम्हाला फिनिशचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. फक्त तुमचा फोन रूट होईल.

phone root करणे किती सोपे आहे हे तुम्ही पाहिले आहे, परंतु तरीही प्रत्येक सूचनांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा तुमचा एक निष्काळजीपणा तुमचा फोन पूर्णपणे खराब करू शकतो.

FAQ

नाही. जर तुमच्याकडे नवीन मोबाईल असेल ज्यामध्ये तुम्ही तुमच्या अनेक महत्वाच्या गोष्टी सेव्ह केल्या असतील तर तुम्हाला कधीही फोन रूट करण्याची आवश्यकता नाही.
फोन रूट करून, तुम्ही फोनचे ते निर्बंध काढून टाकता ज्यात विकासकांनी तुम्हाला प्रवेश दिला नाही. आता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अनेक नवीन फीचर्स पाहू आणि वापरू शकता.
होय, रूटिंगमुळे मोबाईलची वॉरंटी रद्द होते.

आज तुम्हाला काय शिकायला मिळाले ?

अँड्रॉईड फोन कसा रूट करायचा आणि पीसीशिवाय मोबाईल कसा रूट करायचा, याची संपूर्ण माहिती आज आपण या लेखात पाहिलेली आहे. तुम्हालाही तुमचा फोन रूट करायचा असेल, तर त्याचे फायदे आणि तोटे या दोन्हींबद्दल चांगली माहिती मिळवा, त्यानंतरच तुमचा फोन रूट करण्याचा निर्णय घ्या.

written by H.G.shilpa

Leave a Comment