Mutual Fund Information In marathi

म्युच्युअल फंड म्हणजे काय – मित्रांनो, पैशाची गोष्ट या भागामध्ये आज आपण (Mutual Fund Information In marathi) म्युच्युअल फंडाचे प्रकार? म्युच्युअल फंडाचे फायदे आणि तोटे? म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी आणि त्यासाठी लागणारी fees, तसेच कशाप्रकारे आपण फसवणुकीपासून दूर राहून चांगली Wealth तयार करू शकतो, हे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

म्युच्युअल फंड म्हणजे काय
Mutual Fund Mhanje Kay

Mutual Fund Mhanje Kay | म्युच्युअल फंड म्हणजे काय ?

म्युच्युअल फंड ही एक अशी कंपनी आहे, जी अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते आणि स्टॉक, बान्ड आणि अल्पकालीन कर्जे यासारख्या सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवित असते. म्युच्युअल फंडाची एकत्रित होर्डींग्ज (Total Holding) त्याचा पोर्टफोलीओ म्हणून ओळखली जाते. गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या शेअर्स खरेदी करीत असतात, त्याला फंडांमध्ये UNIT म्हणतात. आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये unit मिळत असतात. हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया.

उदा. समजा राहुलने SBI च्या म्युच्युअल फंडामध्ये 5000 रुपये गुंतविले आणि SBI च्या MF ची NAV (Net Assel value) 50 रुपये आहे. तेव्हा त्याला 100 unit मिळतील.
गुंतवणूकीची रक्कम = रु.5000
फंडाची किंमत (NAV) = रु.50
मिळणारे UNIT = 100
UNIT =  Investment value / Net Assel value     

अशाप्रकारे आपण म्युच्युअल फंडातील UNIT च्या माध्यमातून शेअर खरेदी करतो. त्याचबरोबर प्रत्येक UNIT हा फंडातील गुंतवणूकदाराच्या मालकीचा भाग आणि त्यातूण निर्माण होणाऱ्या उत्पनाचे प्रतिनिधित्व करतो.

लोक कशासाठी म्युच्युअल फंड खरेदी करतात ?

म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय पर्याय आहेत कारण ते साधारणपणे खालील वैशिष्टये देतात.

व्यावसायिक व्यवस्थापन

fumnd Manager (विधी व्यवस्थापक) – तुमच्यासाठी संशोधन करतात, सिक्युरिटीज निवडतात आणि कामगिरीचे निरक्षण करतात.

विविधिकरण (diversification) – तुमची सर्व अंडी एका टोपलीत ठेऊ नका म्युच्युअल फंड विशेषतः अनेक कंपन्या आणि उद्योगांमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे एखादी कंपनी अयशस्वी झाली तर तुमची जोखीम कमी करण्यास मदत होते.

Affordability ( परवडणारी) – बहुतेक म्युच्युअल फंडाची value कमी ठेवलेली असते त्यामुळे प्रारंभिक गुंतवक किंवा त्यानंतरच खरेदी करणे सोपे जाते.

Liquidity (तरलता) – म्युच्युकुल फंड गुंतवतूकदार केव्हाही आपली शेअर / unit विकू शकतो. म्युच्युअल फंड गुंतवणूकदार कोणत्याही वेळेस चालू NAV (Net Asset Value) वर आपले share/ unit विकू शकतो, फक्त त्याला त्यासाठी Redemption Fees भरावी लागेल.

(Tip – एक वर्ष झाल्यानंतर कोणतेही Redemption Fees भरावी लागत नाही. हे आपण लक्ष्यात ठेवावे.)

म्युच्युअल फंडाचे प्रकार

बहुतेक म्युच्युअल फंड चार category मध्ये मोडतात. Money Market Fund, Bond Fund, Stock Fund, Target date Funds. आणि प्रत्येक म्युच्यअल फंडाचे वेगवेगळे वैशिष्ट्ये, Risk, Reward असतात.

a) Money Market Fund हे साधारणत कमी Risky असतात. ते फक्त ‘काही high quality, short term केंद्र, राज्य,लोकल
सरकारने जारी केलेले रोखे (tressory bills) आणि अल्पकालीन कर्ज, Corporation bond मध्ये Invest करतात.

b ) Bond Funds हे Money market fund पेक्षा जास्त जोखमीचे असतात, कारण त्यांना आपल्या गुंतवणूकदारांना जास्त परतावा द्यायचा असतो. वेगवेगळे Bonds असल्यामुळे Bond Funda मध्ये Risk and Reward नाटकीयरीत्या बदलत असतात.

c) Stock Funds हे शेअर मध्ये गुंतवणूक करीत असतात. प्रत्येक Stock Funds सारखे नसतात, त्याचे काही उदाहरण खाली दिलेले आहेत.

d) Target date Funds हे स्टॉक्स बॉड, आणि अन्य गुंतवणुकीचे मिश्रण असते. कालांतराणे, फंडाच्या रणनीतीनुसार मिश्रण बदलत असते. टार्गेट डेट फंड काहीवेळा लाइफसाइकल फंड म्हणून ओळखले जातात. कारण, विशिष्ट सेवानिवृत्ती तारखा लक्षात ठेववलेल्या व्यक्तींसाठी ते डिझाईन केलेले असतात.

म्युच्युअल फंडाचे फायदे

म्युच्युअल फंडाचे फायदे

१. Divident payment (लाभांश उत्पन्न) इथे आपणास स्टॉकवरील लाभांस (Divident) किंवा बॉडवरील व्याजातून उप्पन्न मिळते, त्याचबरोबर या प्रकारचे फंड आपल्याला जवळजवळ सर्व उपन्न कमी खर्चामध्ये मिळवून देतात.

२. Capital gain Distribution (भांडवली नफा वितरण)
या फंडातील securites (रोख्यांची) ची किंमत वाढू शकते. जेव्हा एखादा फंड सिक्यूरिटीजला वाढलेल्या किमतीमध्ये विकतो तेव्हा त्या फंडाला भांडवली नफा होतो. वर्षाच्या शेवटी हे फंड भांडवली नफ्यातून भांडवली तोटा वजा करून मिळालेले उप्पन्न गुंतवणूकदारांना वितरीत करतात.

३. Incressed (NAV) – वाढलेली NAV
समजा फंडाच्या पोर्टफोलिओचे बाजारमुल्य वाढल्यास (market Value incressed) तेव्हा त्या फंडाचे मूल्य आणि त्याचे शेअर
म्हणजे UNIT वाढलात. उच्च NAV तुमच्या गुंतवणुकिचे उच्च मूल्य दर्शविते.

म्युच्युअल फंडाचे तोटे

सर्व फंडामध्ये काही प्रमाणात धोका असतो म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही गुंतविलेले काही किंवा सर्व पैसे गमावू शकता कारण फंडामधील सिक्युरिटीजचे मूल्य कमी होऊ शकते. बाजारातील परिस्थिती बदलल्यामुळे लाभांष किंवा व्याज देयके देखील बदलू शकतात.

फंडाची भूतकाळातील कामगिरी तुम्हाला वाटते तितकी महत्त्वाची नसते. कारण भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याचा अंदाज लावू शकत नाही. परंतु काही कालावधित फंड किती स्थिर किंवा अस्थिर आहे हे मागील कामगिरीवरून सांगता येते. फंड जितका अस्थिर असेल तितका गुंतवणुकिचा धोका आस्त असतो.

म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी

मुतुअल फंड इन्व्हेस्टमेंट

म्युच्यअल फंडाच्या खरेदीसाठी तुमच्याजवळ demat खाते असणे आवश्यक आहेत.  ते तुम्ही discount broker जसे की zeroda किंवा पारंपारीक Broker कडून  open करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या फायनानसिअल अडव्हाझर ची मदत घेऊ शकता. यानंतर तुम्ही कोणतेही MF खरेदी करू शकता.

गुंतवणूकदार म्युच्युअल फंडासाठी जी किंमत देतात ती म्हणजे फंडाचे प्रति शेयर निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) तसेच खरेदीच्या वेळी आकारले जाणारे कोणतेही शुल्क, जसे की विक्री लोड (sale load).

म्युच्युअल फंडाच शेअर्स / युनीट रिडीम करण्यायोग्य असतात, याचा अर्थ गुंतवणूकादार हे समभाग कधीही फंडाला परत विकू शकतो. फंडाने सहसा तुम्हाला सात दिवसांच्या आत पेमेंट पाठविले पाहिजे.

म्युच्युअल फंडातील शेअर्स / यूनीट खरेदी करण्यापूर्वी प्रॉस्पेक्टस काळजीपूर्वक वाचा. प्रॉस्पेक्टसमध्ये म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीची उद्दिष्टये, जोखीम, कामगिरी, आणि खर्च यांची माहिती दिलेली असते.

फी बदल माहीती (understanding Fees)

कोणत्याही व्यवसायाप्रमाणे, म्युच्युअल फंड चालवतांना खर्च होत असलो, हे शुल्क आणि खर्च Fund आपल्या गुंतवणूकदारांना हस्तांतरीत करतात. शुल्क आणि खर्च प्रत्येक फंडामध्ये वेगवेगळे असते.

तुमच्यासाठी समान परतावा वितरीत करण्यासाठी जास्त खर्च असलेल्या फंडाणे कमी किमतीच्या फंडापेक्षा चांगली कामगिरी केली पाहिजे.

Expence fee मुळे आपल्या परताव्यात किमी फरक पडू शकतो हे उदाहरणादवारे समजून घेऊया, शुल्कातील लहान फरकाचा अर्थ कालांतराने परताव्यात मोठा फरक दिसून येतो.

म्हणून ज्या फंडाचे expence ratio कमी असेल त्या मुच्युअल फंडांमध्ये तुम्हाला जास्त परतावा मिळेल.

फसवणूक टाळणे

कायद्‌यानुसार प्रत्येक म्युच्युअल फंडाने sebi कडे प्रॉस्पेक्टस आणि नियमित भागदारक अहवाल दाखल करणे आवश्यक आहे. तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी, प्रॉस्पेक्टस आणि आवश्यक शेअर होल्डर रिपोर्ट्स नक्की वाचा. याव्यतिरिक्त म्युच्युअल फंडाचे गुंतवणूक पोर्टफोलियो Sebi मध्ये नोंदनिकृत असावे, तसेच AMC म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थादवारे MF व्यवस्थापित केले जाते.

गुंवणूक करण्यापूर्वी नेहमी गुंतवगृक सल्लागार (Financial Advisor) नोंदणीकृत (Register) आहे का ते तपासा.

तर आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे काय, मुतुअल फंड इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड फायदे मराठी, याची माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, मला खात्री आहे की तुम्हाला Mutual Fund Mhanje Kay बद्दल योग्य ती माहिती मिळाली असेल. तुम्ही म्युच्युअल फंड मराठी या विषयावर आम्हाला मेसेज पाठवू शकता यासाठी आम्हाला कंमेंट द्वारे कळवा आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सोसिअल माध्यमातून या लेखाला ( Facebook, Twitter, Whatsapp, Instagram) Share करायला विसरू नका . या पोस्ट ला Like करून आमच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या.

Written By – Sumedh Harishchandra

Leave a Comment