Nikhat Zareen Biography In Marathi | निखत जरीन यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र

Nikhat Zareen Biography In Marathi
Nikhat Zareen Information In Marathi
नावनिखत जरीन
जन्मतारीख१४ जून १९९६
जन्म स्थानतेलंगणा (निजामाबाद)
वडिलांचे नावमुहम्मद जमील अहमदनिखत जरीन
आईचे नावपरवीन सुलताना
व्यवसाय बॉक्सिंग
प्रशिक्षकइमानी चिरंजीवी यांना आरव्ही राव-द्रोणाचार्य पुरस्कार (२००८) मिळाल.

आपल्या देशात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांची नावे इतिहासात लिहिली गेली आहेत आणि ते सर्वांच्या लक्षात आहे. त्यांचे यश प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. आज आपण अशा एका मुष्ठीयोद्धा (बॉक्सर) विषयी या लेखात बोलणार आहोत जी एक महीला बॉक्सर आहे. तिने २०११ AIBA महिला युवा आणि ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. त्या महिला बॉक्सरचे नाव आहे Nikhat Zareen (निखत जरीन).

निखतने २०२२ च्या commonwealth games मध्ये महिलांच्या ५० किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आणि २०२२ cwg मध्ये निखत जरीनने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ५२ किलो वजनी गटात विजयासह भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.

तिला पाहून देशाला आता आणखी एक मेरी कोम मिळाली असे दिसते. आज आपण त्यांच्या जीवनातील काही पैलूंची माहिती घेणार आहोत. हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही कळेल की निखत जरीन कोण आहे आणि ती बॉक्सर कशी बनली.

निखत जरीन यांचे जीवन परिचय | Nikhat Zareen Biography

निखत जरीन यांचा जन्म १४ जून १९९६ रोजी तेलंगणामधील निजामाबाद येथे मुहम्मद जमील अहमद आणि परवीन सुलताना यांच्या घरी झाला. ती त्यांच्या घरात तिस-या नंबरची मुलगी आहे. त्यांना दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान बहीण आहे. त्यांचे वडील सेल्समन आहेत आणि आई गृहिणी आहे. 13 वर्षांची असतांना तिने बॉक्सिंगमध्ये पदार्पण केले. निखतने बॉक्सिंग प्रशिक्षक असलेल्या आपल्या काकांकडून शिकायला सुरुवात केली. या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांच्या वडिलांनीही खूप पाठिंबा दिला.

निखत जरीनचे प्राथमिक शिक्षण

Nikhat Zareen यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण निजामाबाद येथील निर्मला हृदय गर्ल्स हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यांनी हैदराबादमधून ए.ए. व्ही कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि त्याच कॉलेजमधून त्यांनी बॉक्सिंग करिअरला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीतील हे पहिले पाऊल होते.

  • २०११ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशन महिला युवा आणि ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.
  • गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या इंडिया ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत निखत जरीनने कांस्यपदक जिंकले.
  • २०१४ मध्ये बुल्गेरिया येथे झालेल्या युवा विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले.
  • यासह, त्यांनी आसाम येथे झालेल्या १६व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१५ मध्ये सुवर्णपदक जिंकले.
  • बँकॉक येथे झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत २०१९ मध्ये जरीनने रौप्य पदक मिळवले.

निखत जरीनचा कट्टरवाद्यांशी संघर्ष | Nikhat Zareen Struggle With Fundamentalism

एकवेळ अशी होती की निखत जरीनला हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली. त्यांना सांगण्यात आले की, मुस्लिम मुली शॉर्ट्स घालू शकत नाहीत. तिला पुरुषांसोबत बॉक्सिंगचा सरावही करता येणार नाही. पण निखत यांनी या कट्टरतावादी विचारसरणीचा लढा सुरूच ठेवला.

निखतने आयुष्यातील पहिला सामना निजामाबादमध्ये लढला. तोही अगदी लहान वयात. हा त्यांचा पहिला सामना होता समाजाविरुद्ध, मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात. ज्यांना अजूनही वाटते की मुस्लिम मुलींनी हिजाबमध्येच राहावे. त्यांनी बॉक्सिंग, शॉर्ट्स घालून खेळल्या जाणाऱ्या खेळात भाग घेऊ नये.

निखतच्या परिसरातील लोक त्यांच्या बॉक्सिंग खेळण्याच्या विरोधात होते. ते अनेकदा त्यांच्या पालकांना टोमणे मारायचे त्यांना सांगितले जायचे की आज जर त्यांनी आपल्या मुलीला बाहेर खेळायला पाठविले तर त्यामुळे त्या भागातील वातावरण बिघडेल. आणि त्यामुळे तिथे राहणाऱ्या इतर मुलीही हिजाब घालण्याच्या इस्लामिक पद्धतीला विरोध करू लागतील.

आजूबाजूच्या समाजाचा विचार असा होता की . निखतप्रमाणेच त्यांच्या मुलीही हिजाब घालण्यास नकार देतील. त्या सुध्दा बॉक्सिंगसारख्या खेळातही उतरतील मग ते काय करणार? म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला थांबवा. याला पूर्णविराम द्या. या पुराणमतवादी विचारसरणीचा निखतच्या कुटुंबावर काहीही परिणाम झाला नाही.

होणाऱ्या विरोधाला न जुमानता त्यांच्या वडिलांनी निखताचा धीर सोडू दिला नाही. एकेकाळी निखतवरही लग्नाचं दडपण येत होतं. पण तेव्हा निखतचे वडील म्हणाले होते की आम्ही आमच्या मुलीला असे बनवू. ज्यामुळे लोक आमच्या घराबाहेर रांगा लावतील.

निखत जरीनला सर्वात जास्त काय आवडते?

निखत जरीनची आवडती गोष्ट सुरुवातीपासूनच बॉक्सिंग आहे. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे. त्यांना नेहमी वाटायचं की, एक दिवस असा खेळ करून की जेणेकरून तिचा देशाला अभिमान वाटेल आणि त्यामुळे तिच्या आई-वडिलांनाही खूप आनंद होईल. म्हणूनच त्यांनी लहानपणापासूनच बॉक्सिंगची सुरुवात केली.

पी. टी. उषा यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र वाचा

निखत जरीनचे रिलेशनशिप

Nikhat Zareen २६ वर्षाची असून ती सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे तिच्या खेळाशिवाय सोशल मीडियावर कोणतीही बातमी दिसत नाही. कारण ती कोणाशीही रिलेशनशिपमध्ये नाही. असे काही घडले तर त्याची बातमीही सोशल मीडियावर व्हायरल होईल. कारण याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात.

निखत जरीनच्या कारकिर्दीत मिळालेले यश

2011 मध्ये, निखत जरीनने यूथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि तुर्कीमधील फ्लायवेट प्रकारात देखील एआयबीए महिला ज्युनियरमध्ये सुवर्णपदक जिंकले.

2014 मध्ये बुल्गेरिया येथे झालेल्या युवा विश्व बॉक्सिंग स्पर्धेत तिने रौप्य पदक जिंकले. त्याच वर्षी तिने ५१ किलो वजनी गटात तिसरा Nations Cup International स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

2015 मध्ये आसाममध्ये आयोजित करण्यात आलेल्या 16व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले.

2019 मध्ये बुल्गेरिया येथे झालेल्या स्ट्रॅन्डजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षी निखतने ज्युनियर नॅशनल मॅच जिंकली. त्यानंतर तिला सर्वोत्कृष्ट बॉक्सरचा पुरस्कार मिळाला.

2022 मध्ये निखतला जागतिक क्रमवारीत क्रमांक १ बॉक्सरचा किताब मिळाला. तिने थायलंडच्या बॉक्सरचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. हे विजेतेपद जिंकल्यानंतर ती भारताची पाचवी वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बनली आहे.

बर्मिंगहॅममध्ये ७ ऑगस्ट २०२२ रोजी ४८-५० किलो (लाइट फ्लायवेट श्रेणी) मध्ये नॉर्दर्न आयर्लंडच्या कार्ली मॅकनॉलचा ५-0 ने पराभव करून जरीनने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले.

निखत जरीनची एकूण संपत्ती | Nikhat Zareen Net Worth

त्यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज लावला तर ती 1 लाखाच्या जवळपास असेल. मात्र त्यांच्या मालमत्तेशी संबंधित कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Controversy of Nikhat Zareen and Mary Kom

निखत जरीन मेरी कोम ला आपला आदर्श मानत होती. पण आता या दोघांमध्ये ३६चा आकडा आहे. वास्तविक हा वाद टोकियो ऑलिम्पिकपूर्वी सुरू झाला होता. हा सर्व वाद भारतीय बॉक्सिंग फेडरेशनमुळे निर्माण झाला.

मेरी कोमची टोकियो ऑलिम्पिकसाठी ५१ किलो वजनी गटात चाचणी शिवाय निवड झाली होती. त्यावर संघाचे तत्कालीन अध्यक्ष राजेश भंडारी यांनी अजब युक्तिवाद केला होता की निखतला भविष्यामध्ये खेळण्यासाठी वाचविले जात आहे. त्यांची ही गोष्ट निखतला खटकली त्यामुळे ती हताश होऊन गेली.

त्यावेळचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांना निखतने पत्र लिहून याला पूर्ण विरोध केला होता. या दरम्यान पत्रकार परिषद झाली. एका पत्रकाराला उत्तर देताना मेरी कोम म्हणाली की ‘ये निखत जरीन है कौन’. यानंतर निखत आणि मेरी कोम यांच्यात चाचणी (ट्रायल) घेण्यात आली. त्यामध्ये मेरी कोम विजयी झाली होती. दोघांमधील मतभेद इतके वाढले होते की ट्रायल नंतर त्यांनी एकमेकांकडे पाहिलेही नाही. इथे हस्तांदोलनाची चर्चा तर दूरच होती.

अशी अशा केली जात आहे. की निकतने आपला अपमान विसरून मेरी कोमशी असलेला वाद संपुष्टात आणावा. इस्तंबूलमध्ये पदक जिंकल्यानंतर निखतची पहिली प्रतिक्रिया होती.की “ट्विटरवर माझे नाव ट्रेंडिंग आहे का?”. निखत जरीनने मेरी कोम आणि बॉक्सिंग असोसिएशनला दिलेले हे उत्तर होते.

निखत जरीनच्या विजयानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर सर्वांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. देशाला आणखी एक मेरी कोम मिळाल्याचे सर्वांनी सांगितले. यामुळे देशाचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिच्या खेळाचे कौतुक केले आणि सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या.

निखत जरीनचे सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग | Nikhat Zareen Social Media

निखतच्या या परफॉर्मन्सनंतर तिच्या सोशल मीडिया फॅन फॉलोअर्समध्ये पूर्वीपेक्षाही वाढ झाली आहे. कारण प्रत्येकाला तिचे  अनुकरण करायचे आहे.  कारण त्यांना तिच्यासारखे व्हायचे आहे. आपल्या देशाच्या मुली काहीही करू शकतात, असा प्रत्येकाचा विश्वास आहे आणि त्यांनी ते सर्वत्र दाखवून दिले आहे.

निखत चा अर्थ

निखतचा अर्थ: (Meaning of Nikhat) सुगंध अशा आहे. त्यामुळे तेलंगणाची ही खेळाडू बॉक्सिंग रिंगमध्ये आणखीनच सुगंध आणि आनंद पसरवण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. निखत जरीन जागतिक पटलावर तिरंगा फडकत राहील. संपूर्ण देशाला निखताचा अभिमान आहे.

FAQ

प्रश्न- निखत जरीन कोण आहे?

उत्तर- निखत जरीन ही भारतातील पाचवी भारतीय महिला बॉक्सर आहे.

प्रश्न- निखत जरीन कुठे राहते?

उत्तर- निखत जरीन ही तेलंगणाची रहिवासी आहे.

प्रश्न- लोक निखत जरीनला कोणाच्या नावाने हाक मारतात?

उत्तर- आता लोक तिला दुसरी मेरी कोम या नावाने हाक मारतात.

प्रश्न- निखत जरीनने CWG 2022 च्या स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

उत्तर- निखत जरीनने CWG 2022 च्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले .

प्रश्न- निखतला सर्वात जास्त काय आवडते?

उत्तर- निखत जरीनला बॉक्सिंगची सर्वाधिक आवड आहे.

Leave a Comment