P T Usha Biography In Marathi – पी. टी. उषा यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र

P T Usha information in marathi
udan pari ( P T Usha )
नाव (Name)पी. टी. उषा
पूर्ण नाव (Full Name)पिलावुलकांती टेक्केपरंपिल उषा
इतर नावे (Other Name)गोल्डन गर्ल, उड्डाण परी
जन्म (Birth)२७ जून १९६४
जन्मस्थान (Birth place)पयोल्ली, कोजीकोड (केरळ)
आई (Mother)टी वी लक्ष्मी
वडिल (Father)ईपीएल पैताल
पती (Husband)श्रीनिवासन
मुलगा (Son)उज्ज्वल
व्यवसाय (Profession)धावपटू

आपल्या भारताचे असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी भारताबरोबर इतर देशांमध्येही आपले नाव आणि भारत देशाचे नाव गौरवान्वित केले आहे. आज आपण अशा एका धावपटू खेळाडूबद्दल बोलणार आहोत जी महिला धावपटू आहे. या महिला धावपटूला “भारतीय ट्रॅकची राणी” (उड्डाण परी) असेही म्हणतात. हे सांगितल्यावर तुम्हाला समजले असेलच की मी कोणाविषयी बोलत आहे? होय! तुम्ही बरोबर ओळखलं मी भारतीय धावपटू P T Usha यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे.

आजच्या लेखात मी तुम्हाला पी. टी. उषा कोण आहेत हे सांगणार आहे? त्यांचे खरे नाव काय आहे? उषा यांचा जीवन चरित्र, अॅथलीट खेळाडू बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि इतर संबंधित माहिती. जर तुम्हाला पी. टी. उषा बद्दल संपूर्ण माहिती मिळवायची असेल, तर कृपया त्यांच्या जीवनावर लिहिलेला हा महत्त्वाचा लेख शेवटपर्यंत वाचा.

P T Usha तीन ऑलिम्पिक गाजवणारी ‘उड्डाण परी ‘ राज्यसभेवर

महान धावपटू पी. टी. उषा यांना राज्यसभेसाठी नामांकित करण्यात आले आहे. राष्ट्रपती कोट्यातून चार खासदारांची निवड जाहीर झाली आहे, चारही नावे दक्षिणात्य आहेत आणि दक्षिण भारताच्या सांस्कृतिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात अधिराज्य गाजवणारी मंडळी भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहेत.

P T Usha ह्या भारतातील अशाच एक महिला धावपटू आहेत, त्यांनी अनेकदा सुवर्णपदक मिळविले आहे. त्यांना हे स्थान मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला, आपल्या मेहनतीच्या जोरावर त्या संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत. अशा महान धावपटू पी. टी. उषा यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी नामांकन दिले आहे.

फेसबुक (CEO) मार्क झुकरबर्ग यांची जीवन कहाणी वाचा

पी. टी. उषा कोण आहेत?

पी. टी. उषा ह्या भारतातील महिला धावपटू आहेत. त्या केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत त्यांनी भारताचे नाव जगामध्ये प्रसिद्ध केले आहे. त्या एक कुशल धावपटू आहेत, भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात वेगवान धावणारी महिला ही पदवी P T Usha यांच्या नावावर आहे.

त्यांना उडाण परी, पय्योली एक्सप्रेस, असेही म्हणतात. त्यांनी आतापर्यंत अनेक खेळांमध्ये सहभाग घेतलेला आहे. उषा यांनी स्वत:साठी आणि आपल्या देशासाठी सुवर्णपदक पटकावले आहे.

P T Usha Full Name | पी. टी. उषा यांचे पूर्ण नाव

त्यांचे पूर्ण नाव “पिलावुंकांती टेक्केपरंपिल उषा” आहे. यासोबतच त्या गोल्डन गर्ल आणि उड्डाण परी या नावाने प्रसिद्ध आहेत.

जन्म आणि वैयक्तिक आयुष्य

भारताची शान P T Usha यांचा जन्म २७ जून १९६४ रोजी केरळ राज्यातील कोजीकोड जिल्ह्यात पयोल्ली या गावी झाला. पी. टी. उषाच्या आईचे नाव लक्ष्मी आणि वडिलांचे नाव ईपीएल पैताल आहे.

उषा यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्यांच्या वडीलांचा छोटा कापडाचा व्यवसाय होता आणि या व्यवसायावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा डोलारा उभा होता. अशा बेताच्या परिस्थितीत देखील उषा यांनी शिक्षण सोडले नाही. शिक्षण घेत असताना उषा यांना खेळामध्ये आवड निर्माण झाली. त्या सुरवातीपासूनच धावण्याच्या खेळामध्ये तरबेज होत्या. त्यांची प्रकृती लहानपणी खूप खालावली होती, परंतु पी. टी. उषा यांनी खेळ आणि शारीरिक व्यायामामुळे आपल्या प्रकृतीत बऱ्याच प्रमाणात सुधारणा केली.

शिक्षण

त्यांचे प्रारंभिक शिक्षण केरळ राज्यातील पायोली येथे असलेल्या प्राथमिक शाळेत झाले, शिक्षण घेत असताना उषा यांना खेळामध्ये आवड निर्माण झाली. P T Usha या सुरवातीपासूनच धावण्याच्या खेळामध्ये तरबेज होत्या. आणि त्यांचे मन खेळात जास्त रमत होते, त्यामुळे त्यांच्या आईने खेळासाठी त्यांना प्रेरित केले. आणि त्यांनी १९७६ साली शासनातर्फे आयोजित महिला क्रीडा खेळात सहभाग घेतला. या शर्यतीत पी. टी. उषा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर एक खेळाडूं म्हणून (एथलीट्स) त्यांची निवड झाली.

वैवाहिक जीवन

पी. टी. उषा यांनी अॅथलीट म्हणून करिअरची सुरुवात केली होती, त्यानंतर उषा यांनी १९९१ मध्ये श्रीनिवासन यांच्याशी लग्न केले. श्रीनिवासन यांच्याशी लग्न केल्यानंतर पी टी उषाचे आयुष्य खूप बदलले. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला, दोघांनीही आपल्या मुलाचे नाव उज्ज्वल ठेवले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे जीवन चरित्र एक आदिवासी महिला ते भारताची पहिली महिला (राष्ट्रपती) होण्याचा मान वाचा

लहानपणापासूनच धावण्याची आवड आणि घरच्यांचाही पाठिंबा होता

त्यांना लहानपणापासूनच धावण्याची आवड होती. लोक असे सांगतात की त्यांचे काका शाळेत शिक्षक होते त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला क्रीडा क्षेत्रात मुलाचे करिअर होते हे पटवून सांगणे सोपे झाले. उषा सांगतात की माझ्या यशात माझ्या कुटुंबाचाही मोठा वाटा आहे.

प्रशिक्षणादरम्यान त्याच्या पालकांनी त्यांना केवळ पाठिंबाच दिला नाही तर प्रोत्साहनही दिले. P T Usha सांगतात की, लहानपणी मैदानात धावण्याचा सराव करायला जायची तेव्हा तिचे वडीलही तिच्यासोबत यायचे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचे.

त्या सांगतात की, त्यांना समुद्रकिनारी धावण्याची आवड होती, म्हणूनच त्या बहुतेक धावण्याचा सराव समुद्रकिनाऱ्यावर करायच्या आणि तिथे येणारे लोक त्यांना धावताना पाहून दंग व्हायचे, ही गोष्ट १९७८ किंवा ७९ सालची आहे, जेव्हा त्या लहान पँट घालून समुद्रकिनाऱ्यावर धावायला जायच्या, तेव्हा त्यांना धावतांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. पी टी उषा सांगतात की, ती धुळीने भरलेल्या रस्त्यावरही धावायची, जिथे ती जाणाऱ्या ट्रेनशी रेस करायची.

बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी आणि संघर्षमयी जीवनचरित्र वाचा

P T Usha यांचे क्रीडा क्षेत्रामध्ये पदार्पण

पी.टी. उषा यांनी शालेय जीवनापासूनच अॅथलीट मध्ये करिअरला सुरुवात केली. नंतर शाळे अंर्तगत होणाऱ्या सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्ध्येमध्ये त्यांना यश मिळत होते. १९७६ साली केरळ सरकारने केरळमध्ये महिलांसाठी क्रीडा केंद्र सुरु केले. या केंद्रामधून उषा यांनी जिल्हा स्तरावर खेळण्यास सुरुवात केली. पी. टी. उषा अवघ्या बारा वर्षाच्या असताना त्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळविले आणि राष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखविले त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. खूप परिश्रम केल्यानंतर उषा ह्या आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी तयार झाल्या.

आंतर्राष्ट्रीय पदार्पण

१९८० मध्ये उषा यांनी आंतराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. आंतराष्ट्रीय स्तरावर P T Usha यांची पाकिस्तान ओपन नॅशनल मीट ह्या कराची येथे झालेल्या स्पर्धेमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.या स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले आणि भारतासाठी ४ सुवर्णपदके जिंकली.

पी. टी. उषा यांच्यासाठी हे खूप मोठे यश होते. ही सुवर्णपदके जिंकली त्यावेळी उषा फक्त १६ वर्षांच्या होत्या. उषा यांनी पाकिस्तान ओपन नॅशनल मीट ही स्पर्धा जिंकून भारताचे नाव जगामध्ये मोठे केले नंतर त्या पुढच्या वाटचालीसाठी तयार झाल्या. पी. टी. उषा यांनी लहान वयात आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली.आपल्या कलागुणांचे कौशल्य दाखवीत पी. टी.उषा यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले.

या यशानंतर, पी. टी. उषा यांनी सन १९८२ मध्ये “वर्ल्ड जुनिअर इन्व्हिटेशन मीट” मध्ये भाग घेतला. या स्पर्धेमध्ये पी. टी. उषा यांनी २०० मीटर शर्यतीत भारतासाठी सुवर्णपदक पटकाविले आणि त्यानंतर १०० मीटर शर्यतीत कांस्यपदकही मिळविले. त्यांनी या शर्यतीत प्रत्येकी दोन पदके जिंकली, त्यामुळे त्यांना भारतातील सर्वात वेगवान धावपटूचा किताब मिळाला.

“वर्ल्ड ज्युनियर इन्व्हिटेशन मीट” च्या बरोबर १ वर्षानंतर कुवैत मध्ये ‘एशियन ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिप’ स्पर्धा सुरु झाली. या शर्यतीत उषा यांनी सहभाग घेतला. त्यांनी या चॅम्पियनशिपमधील ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले व क्रीडाक्षेत्रात नवा विक्रम नोंदविला. छोट्याशा गावातून आलेली ही मुलगी पुढे भारताची सन्मान बनली.

पुढे त्यांनी कठीण परिश्रम घेत्तले व चिकाटीने सराव केला अशाप्रकारे त्या ऑलिम्पिकसाठी तयार झाल्या. त्यानंतर त्यांनी १९८४ च्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आपले जीवन समर्पित केले. लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये P T Usha यांनी उपांत्य फेरीच्या पहिल्या फेरीत 400 मीटरपर्यंत चांगला विक्रम केला.

त्यानंतर त्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली परंतु त्यांना थोड्या गुणांनी त्यांना हार पत्करावी लागली. संपूर्ण जगाच्या इतिहासात हि पहिलीच वेळ होती की एका महिलेने ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक दिली. अंतिम फेरीमध्ये पी.टी. उषा यांनी ५५. ४२ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. हा त्यांचा एक नवीन विक्रम आहे. अजुनपर्यत त्यांचा हा विक्रम कोणीही मोडलेला नाही.

P T Usha यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्व शर्यतींमध्ये नवे विक्रम प्रस्थापित केले. १९८५ मध्ये त्यांनी जकार्ता येथे झालेल्या आशियाई धावण्याच्या स्पर्धेत पाच सुवर्ण पदके जिंकली. १९९६ मध्ये सेऊल येथे झालेल्या 10 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी धावण्याच्या स्पर्धेत चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. पी. टी. उषा यांनी एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 6 सुवर्णपदके जिंकून विक्रम केला.

अॅथलीट्समधून निवृती आणि नंतर वयाच्या 34 व्या वर्षी पुनरागमन

पी.टी. उषा यांनी त्यांच्या लग्नाच्या १ वर्षानंतर अॅथलीट्समधून निवृत्ती घेतली. नंतर त्यांनी १९९८ मध्ये वयाच्या ३४व्या वर्षी अॅथलीटमध्ये पुन्हा पुनरागमन केले. त्या वेळी त्यांनी एका मुलालाही जन्म दिलेला होता. पी.टी. उषा ह्या पती व मुलाबरोबर पुन्हा परतल्या होत्या.

पुरस्कार

वर्षबक्षीस
१९८४अर्जुन पुरस्कार
१९८५पद्मश्री
१९८५वर्ल्ड ट्रॉफी
१९८५आशियाई ऍथलीट्स मीट
१९८५स्पोर्ट्स पर्सन ऑफ द सेंचुरी आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द मिलेनियम
१९८६सर्वोत्कृष्ट ऍथलीटसाठी एडिडास गोल्डन शू पुरस्कार

P T Usha यांच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी

 • त्यांचे पूर्ण नाव पिलावुल्लाकांडी थेक्केपरंबी उषा आहे. मात्र, क्रीडाविश्वातील त्याच्या महान कामगिरीमुळे त्यांना फ्लाइंग एंजेल म्हणूनही ओळखले जाते.
 • याशिवाय त्यांना पायोली एक्सप्रेस, क्वीन ऑफ ट्रॅक अँड फील्ड अशी टोपणनावे देखील देण्यात आली आहेत.
 • गोल्डन गर्ल या नावाने पी.टी. उषा यांच्या जीवनावर १९८७ ला आत्मचरित्रही लिहिले गेले आहे.
 • P T Usha यांनी वयाच्या १४ व्या वर्षी आंतरराज्य ज्युनियर स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकली.
 • १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या पी.टी. उषा ह्या सर्वात तरुण धावपटू होत्या, त्यावेळी त्या फक्त १६ वर्षांच्या होत्या .
 • पी.टी. उषा यांनी स्वतःची शाळा उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्स नावाने सुरू केलेली आहे.
 • २००२ मध्ये कोइलेंडी, केरळ येथे स्वतःची अॅथलेटिक्स शाळा सुरू केली. या शाळेद्वारे देशभरातून १० ते १२ मुलींची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. जाते. २०१२मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या उपांत्य फेरीत ८०० मीटर शर्यतीत पात्र ठरलेली टिंटू लुकाही पी.टी. उषाला या कामात मदत करते.
 • १९८५ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये, P T Usha ने ५ सुवर्ण पदके जिंकून महिला खेळाडूंकडून सर्वाधिक सुवर्णपदकांचा विक्रम केला.
 • त्यांच्या जीवनावर बायोपिक चित्रपट बनवणार आहे. रेवती एस वर्मा हि या चित्रपटाचे दिग्कदर्शन करणार आहे.
 • पी.टी. उषा ऑलिम्पिक ट्रॅक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत.
 • मनात इच्छा असेल तर त्या इच्छेसमोर वेळ ,काळ, रंग, रूप , वय , उंची या सगळ्या मर्यादा नसतात. उषा यांनी आपल्या कारकिर्दितुन दाखवून दिले. भारतात क्रीडा क्षेत्रात त्यांचे नाव अव्वल आहे. प्रत्येक क्रीडाक्षेत्रात उषा यांनी तरुणांसाठी एक आदर्श निमार्ण केलेला आहे. आणि भारतामध्ये असे स्त्री रत्न जन्माला आले हे आपले भाग्यच आहे.

FAQ

प्रश्न- P T Usha यांचा जन्मकुठे झाला?

उत्तर- पयोल्ली, कोजीकोड (केरळ)

प्रश्न- P T Usha यांचे टोपण नाव काय?

उत्तर- गोल्डन गर्ल, उड्डाण परी

प्रश्न- उषा यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण कुठे झाले?

उत्तर- पाकिस्तान ओपन नॅशनल मीट

प्रश्न- आशियाई चॅम्पियनशिपमध्ये, P T Usha ने किती सुवर्ण पदके जिंकली?

उत्तर- सहा (कुवेत =१ आणि जकार्ता=५

प्रश्न- P T Usha कोणते राष्ट्रीय पुरस्कार मिळाले?

उत्तर- अर्जुन पुरस्कार, पद्मश्री

प्रश्न- ऑलिम्पिक ट्रॅक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणाऱ्या पहिल्या भारतीय कोण?

उत्तर- पी.टी. उषा

Leave a Comment