राजमाता जिजाबाई यांची माहिती (Rajmata Jijabai Information In Marathi)

Rajmata Jijau Information In Marathi
Rajmata Jijai image

Rajmata Jijau Information In Marathi – असे म्हटले जाते की जर एखाद्या आईने शूरवीराला जन्म दिला असेल तर ती आई विशेष असते. छत्रपती शिवाजी महाराज सारख्या योद्ध्याला जन्म देणार्‍या मातेला ‘जिजाबाई’ म्हणून ओळखले जाते. आज आपण या लेखात शिवरायांची आई ‘जिजाबाई’ यांच्या जीवनाबद्दल माहिती पाहणार आहोत. जिजाबाईंनी आपल्या आयुष्यातील अनेक टप्पे कसे पाहिले आणि सर्वस्व गमावूनही त्यांनी शिवाजी महाराजांना कसे शूर बनवले हे इथे वाचायला मिळेल. १७ वर्षांचा मुलगा (शिवाजी महाराज) कसे स्वराज्याचे निर्माते झाले, तर जाणून घेऊया आई ‘जिजाबाई’ यांच्या जीवनाबद्दल

राजमाता जिजाऊ यांचे जीवनचरित्र | Rajmata Jijau Biography In Marathi

नाव (Name)जिजाबाई शहाजी भोसले
इतर नवे (Other Name)राजमाता जिजाऊ, स्वराज्यजननी माता जिजाई
जन्म (Birth)१२ जानेवारी १५९८
जन्मस्थळ (Birthplace)बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र
वडिलांचे नाव (Father Name)लखुजी जाधव
आईचे नाव (Mother Name)म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई जाधव
पतीचे नाव (Husband Name)शहाजीराजे भोसले
मुलांचे नाव (Son)छत्रपती शिवाजी महाराज
मृत्यू (Death)१७ जून १६७४ रायगडाच्या पायथ्याशी पाचड, पुणे (महाराष्ट्र)

जीजाबाई यांचे जीवन | Rajmata Jijau Information In Marathi

जिजाबाई (जिजाऊ) यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झाल . त्यांचे वडील लखुजी जाधव हे सिंदखेड गावचे राजे होते. त्यांनी जिजाबाईचे नाव ‘जिजाऊ’ ठेवले. असे म्हणतात की जिजाबाई वडिलांसोबत फारच कमी राहत होत्या आणि त्यांचे लग्न अगदी लहान वयात झाले होते. त्यावेळी बालपणीच लग्न व्हायचे.

जिजाबाईंचा विवाह (लग्न)

Rajmata Jijau Information In Marathi – असे म्हणतात की, जिजाबाईंचा असाखरपुड त्या ६ वर्षांच्या असताना झाला होता. त्याच्याशी एक छोटीशी घटनाही सांगण्यात येते. हे. इतिहासात असे लिहिले आहे की, होळीच्या दिवशी लखुजी जाधव यांच्या घरी उत्सव साजरा केला जात होता, त्यावेळी मालोजी त्यांचा ६-७ वर्षांचा मुलगा (शहाजी) आले होते . या उत्सवात त्या दोघांनीही सहभाग घेतला. नृत्य पाहत असताना अचानक लखुजी जाधव यांनी जिजाबाई आणि मालोजींचा मुलगा शहाजी यांना एकत्र पाहिले आणि त्यांच्या तोंडून साठे सहजच बोलून गेले ‘व्वा काय’ जोडी आहे . हे ऐकून मालोजीसुद्धा म्हणाले तर मग या दोघांचा साखरपुडा करूया.

त्यावेळी मालोजीराजे हे अहमदनगर सल्तनतमध्ये सरदार होते आणि लखुजी जाधव हे निजामशाही सल्तनतमध्ये मोठे सरदार होते आणि ते सिंदखेडचे राजा देखील होते, तरीही त्यांनी आपली मुलगी जिजाऊ किंवा जिजाबाई हिचा विवाह मालोजींचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी केला.

जिजाबाई आणि शहाजीराजे यांचे जीवन

जिजाबाई आणि शहाजी यांच्या लग्नानंतर ते मोठे झाल्यावर शहाजी राजे हे विजापूर दरबारी सरदार झाले. विजापूरच्या सुलतानाने शाहजींच्या मदतीने अनेक युद्धे जिंकली, या आनंदात विजापूरच्या सुलतानाने त्यांना अनेक जहागीर भेट म्हणून दिल्या. शहाजीराजे आणि आई जिजाई पुण्याच्या जागिरीमध्ये वास्तव्याला होते, या जागीरदारीमध्ये शिवनेरी किल्ल्याचा समावेश होता. जिजाबाईंना एकूण ६ (4 मुली आणि 2 मुलगे) मुले झाले. शिवाजीराजे हे त्यापैकी एक होते.

नंतर काही वर्षानंतर विजापूरचा सुलतानाने शहाजीराजांना कर्नाटकातील तंजावरचे जागीरदार बनवले त्यामुळे शहाजीराज्यांना जिजाबाई आणि शिवरायांना पुण्याला ठेवून कर्नाटकात जावे लागले.

शिवनेरी गडावर शिवाजी राज्यांचा जन्म

चारही बाजूला शत्रू असल्यामुळे व शहाजी राज्यांना युद्धामध्ये जायचे होते म्हणू जिजाबाई आणि मुलांना त्यांनी शिवनेरी किल्ल्यामध्ये ठेवले. या शिवनेरी गडावरच शिवाजी महाराजांचा जन्म झाला. यावेळेला शहाजीराजे युद्धामध्ये असल्यामुळे ते शिवजन्मावेळी आई जिजाईबरोबर नव्हते.

जिजाबाई एक वीर आणि आदर्श माता

आपल्या दूरदृष्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या जिजाबाई केवळ एक योद्धा आणि खंबीर प्रशासकच होत्या असे नाही तर त्या एक वीर, नम्र आणि वंदनीय माता देखील होत्या, यांनी लहान शिवबाला शिकवले आणि त्यांच्यात असे गुण बिंबवले की ज्यामुळे ते शूर, निर्भय योद्धा.शिवाजी महाराज झाले.

हिंदू महाकाव्य रामायण आणि महाभारताच्या कथा सांगून, जिजाबाईंनी शिवाजीमध्ये वीरता, धर्मनिष्ठा, संयम आणि प्रतिष्ठा यांसारखे गुण विकसित केले, ज्यामुळे शिवरायांच्या बालहृदयात सुरुवातीपासूनच स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाली.

यासोबतच त्यांनी शिव्रयांमध्ये नैतिक मूल्ये रुजवली. याशिवाय त्यांना मानवी नातेसंबंधांचे महत्त्व पटवून दिले, महिलांचा आदर करायला शिकवले आणि त्यांच्यात देशप्रेमाची भावना रुजवली.

त्यामुळे त्यांच्या मनामध्ये स्वराज्याची तीव्र इच्छा जागृत झाली. एवढेच नाही तर वीरमाता जिजाबाईंनीही मातृभूमी, गाय, मानव जातीचे रक्षण करण्याचा संकल्प शिवाजी महाराजांकडून घेतला. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी, स्वसंरक्षण, युद्धकौशल्य यात पारंगत केले.

जिजाबाईंनी (Rajmata Jijabai Information In Marathi) दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजी महाराज समाजाचे रक्षणकर्ते आणि मराठी लोकांचे अभिमान ठरले. आणि त्यांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केले आणि एका स्वतंत्र व महान राज्यकर्त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे नाव तयार केले आणि ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले.

त्याच वेळी, छत्रपतींनी आपल्या सर्व यशाचे श्रेय आई जिजाबाई यांना दिले, मा जिजाऊ त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होते. जिजाबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य शिवरायांना लोकांच्या रक्षणासाठी स्वराज्याच्या स्थापनेसाठी समर्पित केली.

जिजाबाईंचा सती होण्याचा प्रयत्न

शहाजीराजे आपल्या कामात नेहमी जिजाबाईंची मदत घेत असत आणि दोघेही एकमेकांवर खूप प्रेम आणि आदर करीत असत. शहाजीराज्यांच्या निधनानंतर जिजाबाईंना खूप दुःख झाले आणि त्यांनी सती होण्याचा निर्धार केला तेव्हा शिवाजी महाराजांनी आपली शपत देऊन त्यांना सती होण्यापासून रोखले. शिवाजी राजे आईला आपला मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत मानत. यामुळेच शिवाजीला लहान वयातच समाजाबद्दलआपले कर्तव्य समजले. आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहान वयातच स्वराज्याची स्थापना करण्यास सुरुवात केली.

राजमाता जिजाऊ निबंध मराठी

Rajmata Jijau nibandh marathi

FAQ

प्रश्न – राजमाता जीजाबाई यांचा जन्म कुठे झाला?

उत्तर – बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र

प्रश्न – जीजाबाई यांचा जन्म कधी झाला?

उत्तर – १२ जानेवारी १५९८

प्रश्न – जीजाबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते?

उत्तर – लखुजी जाधव

प्रश्न – राजमाता जिजाऊ यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला?

उत्तर – राजमाता जिजाऊ यांचा विवाह सातव्या (७) वर्ष झाला

प्रश्न – राजमाता जिजाऊ यांच्या पतीचे नाव के आहे?

उत्तर – राजमाता जिजाऊ यांच्या पतीचे नाव शहाजीराजे भोसले आहे.

प्रश्न – जिजाबाईना एकूण किती मुले होती ?

उत्तर – सहा (६)

प्रश्न – जिजामतेने शिवजी महाराजांना कहते जन्म दिला?

उत्तर – शिवनेरी गडावर

प्रश्न – राजमाता जिजाऊ यांच्या माहेरचे आडनाव काय?

उत्तर – राजमाता जिजाऊ यांच्या माहेरचे आडनाव जाधव होते.

प्रश्न – राजमाता जिजाऊ यांची समाधी कुठे आहे?

उत्तर – राजमाता जिजाऊ यांची समाधी रायगडाच्या पायथ्याशी पाचड, पुणे (महाराष्ट्र) येथे आहे.

तर आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला राजमाता जिजाऊ मराठी माहिती (Rajmata Jijau Mahiti In Marathi) याविषयी सखोल आणि पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मला खात्री आहे की तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्या इतिहासाबद्दल (Rajmata Jijau History In Marathi) योग्य ती माहिती मिळाली असेल. तुम्ही या पोस्ट विषयी आपले मत पाठवू शकता यासाठी आम्हाला कंमेंट द्वारे कळवा आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सोसिअल माध्यमातून या लेखाला ( Facebook, Twitter, Whatsapp, Instagram) Share करायला विसरू नका . या पोस्ट ला Like करून आमच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या.

written By – Mahajatra Team

Leave a Comment