सुश्मिता सेन यांचे जीवनचरित्र – Sushmita Sen Biography in Marathi

नाव (Name)सुश्मिता सेन
जन्म (Birth)१९ नोव्हेंबर १९७५
जन्मस्थान (Birth place)हैद्राबाद
वडील (Father)निवृत्त विंग कमांडर सुबीर सेन
आई (Mother)सुभा सेन
मॉडेलिंग पुरस्कार (Modelling Award)फेमिना मिस इंडिया,
मिस युनिव्हर्स
व्यवसाय (Profession)अभिनेत्री, मॉडेल

सुश्मिता सेन (Sushmita Sen) ही एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि ब्युटी क्वीन आहे. सुष्मिता सेनने १९९४ मध्ये फेमिना मिस इंडिया युनिव्हर्सचा मुकुट जिंकला आहे. तिने या स्पर्धेमध्ये ऐश्वर्या रायचा पराभव केला. आणि नंतर तिने १८ व्या वर्षी मिस युनिव्हर्स १९९४ स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारी सुष्मिता ही पहिली भारतीय महिला आहे. सुष्मिताने तिच्या करिअरमध्ये हिंदी, तामिळ आणि बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर चला आज या लेखात आपण सुष्मिता सेन यांचे जीवनचरित्र बघणार आहोत.

सुश्मित सेनचे सुरुवातीचे आयुष्य | Early life of sushmita sen

सुश्मिताचा जन्म १९ नोव्हेंबर १९७५ रोजी हैदराबाद येथे झाला. त्या हवाई दलाचे निवृत्त विंग कमांडर सुबीर सेन आणि ज्वेलरी डिझायनर सुभा सेन यांच्या कन्या आहेत. १९९४ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर सुश्मिता सेन (Sushmita Sen) पहिल्यांदा चर्चेत आली होती. विशेष म्हणजे या विजेतेपदासाठी त्यांची स्पर्धा ऐश्वर्या रायसोबत होती. ऐश्वर्याला मागे टाकत त्यांनी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला. ऐश्वर्या रायने याच वर्षी ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला होता.

चित्रपट कारकीर्द

१९९७ मध्ये, सुष्मिता सेनने महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले, त्यामध्ये ती स्वतःचे पात्र जगली. ‘दस्तक’ हा चित्रपट यशस्वी झाला नाही. दुसरा चित्रपट ‘जोर’ सुद्धा यशस्वी झाला नाही. ‘सिर्फ तुम’ चित्रपटातील दिलबर दिलबर या गाण्यात तिला पहिले यश मिळाले, त्यामध्ये तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दिली.

डेव्हिड धवनच्या ‘बीवी नंबर 1’ या चित्रपटात सुश्मिता सेनने बीवी नंबर 2 ची भूमिका साकारली होती आणि हा तिचा पहिला हिट चित्रपट होता. आंखे, समय, मैं हूं ना, बेवफा, मैने प्यार क्यूं किया आणि ‘चिंगारी’ हे तिचे काही प्रसिद्ध चित्रपट आहेत.

सुश्मिता सेन मॉडेलिंग करिअर

फेमिना मिस इंडिया- १९९४ मध्ये सुष्मिताने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेऊन १९९४ च्या मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकून ‘फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स’ किताब पटकावला.

विश्वसुंदरी (मिस युनिव्हर्स)- मिस युनिव्हर्स स्पर्धेत सुष्मिता सेन सुरुवातीला तिसऱ्या स्थानावर होती. सुश्मिता सेन नंतरच्या फेऱ्यांमध्ये पाचवे, तिसरे आणि,दुसरे, स्थान पटकाविले आणि अखेरीस तिने मिस युनिव्हर्स १९९४ चे विजेतेपद आणि मुकुट जिंकला. विजेतेपद पटकावणारी सुश्मिता सेन पहिली भारतीय महिला ठरली.

मिस युनिव्हर्स २०१६- मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर Sushmita Sen २३ वर्षांनंतर २०१६ साली ६५ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेतील न्यायाधीशांपैकी एक होती. ही स्पर्धा ३० जानेवारी २०१७ रोजी फिलिपाईन्समधील मेट्रो मनिला येथील मॉल ऑफ एशिया एरिना, येथे झाली.

उपराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे जीवन चरित्र मराठीमध्ये वाचा

सन्मान आणि पुरस्कार

१९९४ मध्ये सुष्मिता सेनने मिस इंडिया आणि मिस युनिव्हर्सचा किताब पटकविला आहे.

त्यांना राजीव गांधी पुरस्कार, आयफा पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार, स्टार स्क्रीन पुरस्कार आणि तीन झी सिने पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

लग्न आणि अफेअर्स

सेन तिच्या लग्न आणि अफेअर्सबद्दलही सतत चर्चेत असते. आँखे चित्रपटाच्या वेळी सुष्मिता आणि दिग्दर्शक विक्रम भट यांच्यामध्ये जवळीक वाढली होती अशा अफवा पसरल्या होत्या. उद्योजक साबीर भाटिया, अभिनेता रणदीप हुडा,आणि फिल्म निर्माते मानव मेनन, क्रिकेटर वसीम अक्रम यांसारख्या लोकांसोबत तिचे नाव जोडले गेले होते. सुष्मिता रोहमन शाॅल या माॅडेलला डेट करत होती. आता त्यांचा ब्रेकअप झाला आहे.

सुश्मिता सेन आणि ललित मोदी प्रेमप्रकरण

ललित मोदीने जुलै २०२२ च्या संध्याकाळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला, ललित मोदी यांनी त्यांचे सुष्मिता सेन हिच्याशी प्रेम असल्याचे सोशल मीडियावरुन सांगितले. ते आणि सुष्मिता परस्परांना डेट करत असल्याचं ट्विट त्यांनी twitter द्वारे केले. स्वत:च टि्वटरवर ललित मोदीने ही घोषणा केली आहे. ललित मोदी हे एक उद्योजकही आहेत.

समाज नियमांंना न मानणारी बिनधास्त अभिनेत्री

सुश्मिता सेनने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. सुष्मिता सेनने २००० मध्ये रेनीला दत्तक घेतले आणि २०१० मध्ये अलिशा ह्या मुलीला दत्तक घेतले. लग्न न करताही मातृत्व अनुभवता येते हे सुष्मिता सेन यांनी दाखवून दिले आहे.

प्रमुख चित्रपट

  • दस्तक, ज़ोर, सिर्फ तुम,
  • बीवी नंबर वन, हिंदुस्तान की कसम, आगाज, बस इतना सा ख्वाब है,
  • क्योंकि मैं झूठ नहीं बोलता, फिलहाल, तुमको न भूल पाएंगे, आंखें, लीला,
  • समय , पैसा वसूल , मैं हूं न, वास्तुशात्र, बेवफा , मैं ऐसा ही हूं ,
  • मैंने प्यार क्यों किया ,
  • चिंगारी, राम गोपाल वर्मा की आग, डू नॉट डिस्टर्ब,
  • दूल्हा मिल गया, नो प्रॉब्लम.

सुश्मिता सेन बद्दल थोडक्यात माहीती

ती तिच्या बालपणात एक टॉमबॉय मुलगी होती, कारण ती बहुतेक वेळ मुलांसोबत खेळत असे. सुष्मिता कल्याण ज्वेलर्स आणि असोटेक सारख्या मोठ्या ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ती P&G शिक्षण प्रकल्पाशी संबंधित होती, जी जगभरातील मुलांच्या गरजा आणि विकासावर काम करते. त्यांना राजीव गांधी पुरस्कार, आयफा पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार, स्टार स्क्रीन पुरस्कार आणि तीन झी सिने पुरस्कारांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २००६ मध्ये आलेला ‘आंखे’ हा चित्रपट सुष्मिता आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यातील नात्यापासून खूप प्रेरित होता. तिच्या आईने मीना बाजार येथील एका शिंपीसोबत सुष्मिताला मिस युनिव्हर्सच्या फिनालेमध्ये घातलेला गाऊन तयार करून दिला होता .वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत सुष्मिताला इंग्रजी अजिबात येत नसे, पण काही वर्षांपासून तिने हळूहळू इंग्रजी भाषा शिकून घेतली

FAQ

प्रश्न- सुश्मिता सेनेचा जन्म कुठे झाला?

उत्तर- हैद्राबाद

प्रश्न- सुश्मिता सेन यांनी १९९४मध्ये कोणती स्पर्धा जिंकली?

उत्तर- फेमिना मिस इंडिया, मिस युनिव्हर्स,

प्रश्न- सुश्मिता सेन यांचा पहिला चित्रपट कोणता?

उत्तर- दस्तक

प्रश्न- सुश्मिता सेन यांनी कोणत्या वर्षी मिस युनिव्हर्स स्प्सर्धा जिंकली?

उत्तर- १८

प्रश्न- सुश्मिता सेन यांच्या आई आणि वडील कोण आहेत?

उत्तर- आई- ज्वेलरी डिझायनर सुभा सेन, वडील- निवृत्त विंग कमांडर सुबीर सेन

Leave a Comment