वट पौर्णिमा व्रताचे (वट सावित्री व्रत) महत्व आणि पूजा विधी पद्धती

Vat Purnima Information In Marathi 2023 – नमसकार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये वट पोर्णिमेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.भारतात वट पौर्णिमेला वट सावित्री देखील म्हटले जाते. भारतात दोन प्रकारचे कॅलेंडर आहेत, ज्यानुसार तीज सण साजरे केले जातात. त्याचबरोबर भारतात शक संवत आणि ग्रेगोरियन ही दोन मुख्य कॅलेंडर आहेत, जे भारतातील लोक पाळतात. दोन्ही कॅलेंडर सारखीच असली तरी काही सणांमध्ये तारीख बदलली जाते. वट सावित्री आणि वट पौर्णिमा या व्रतामध्येही असेच काहीसे आहे, वेगवेगळ्या कॅलेंडरनुसार हा सण काही ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी साजरा करतात. याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

Vat Purnima Information In Marathi
वट पौर्णिमेचे (वट सावित्री व्रत) महत्त्व

वट सावित्री आणि .वट पौर्णिमा व्रताची संपूर्ण माहिती

vat pornima/vat savitri vrat full information वट पौर्णिमेविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

वट सावित्री व्रत म्हणजे काय?

शक संवत कैलेंडरनुसार वट सावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला साजरी केली जाते. शक कैलेंडरला उत्तर भारत प्रदेशामद्ये जसे की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब व हरियाणा मधील लोक पाळतात, म्हणून या प्रदेशामध्ये हा उत्सव प्रामुख्याने जेष्ठ महिन्याच्या अमावास्येला वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करतात. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.

वट पौर्णिमा व्रत म्हणजे काय?

वट पौर्णिमा व्रत हा वट सावित्री व्रता सारखाच आहे, परंतु ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार तो ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करतात, याला वट पौर्णिमा व्रत देखील म्हणतात. ग्रेगोरियन कॅलेंडर हा महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये पाळला जातो, म्हणून हा उत्सव या ठिकाणी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करतात. या भागातील सर्व विवाहित स्त्रिया हा उत्सव उत्तर भारतात साजरा झाल्यानंतर १५ दिवसांनी साजरा करतात. तथापि, उपवासामागील कथा/आख्यायिका दोन्ही कॅलेंडरमध्ये सारखीच आहे.

वाचा :- वट पौर्णिमा शुभेच्छा इन मराठी – Vat Purnima Wishes In Marathi

वट सावित्री व्रत किंवा वट पौर्णिमा व्रत २०२३ कधी आहे? | Vat savitri or Vat Purnima 2023 Date

ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला वट सावित्री व्रत पाळले जाते, जे यावेळी ३ जून २०२३ ३ जून २०२३ ला शुक्रवारी येत आहे. तर वटपौर्णिमा व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला असते.

वट सावित्री किंवा वट पौर्णिमा का साजरी करतात? |Reason of Vat savitri or Vat purnima

या दिवशी सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे (तिचा पती) प्राण परत आणले, असे म्हणतात आणि तेव्हापासून तिला सती सावित्री असे संबोधले जाऊ लागले. प्रत्येक विवाहित स्त्रीच्या जीवनात या सणाचे महत्त्व आहे. हे व्रत पतीच्या सुख आणि दीर्घायुष्यासाठी ठेवले जाते. यासोबतच असे मानले जाते की या व्रतामुळे आयुष्यात येणारे दुःख दूर होतात. यामुळे घरातील मुलांच्या जीवनात सुख-शांती राहते, आणि त्यांचा विकास होतो.

वट सावित्री किंवा वाट पौर्णिमेचे महत्व काय? | What is importance of Vat savitri or Vat purnima

वट म्हणजे वृक्ष, ते एक प्रचंड मोठे झाड आहे, ज्यामध्ये लटा असतात. त्याचबरोबर सावित्रीला देवीचे रूप मानले जाते. हिंदू पौराणिक कथांमध्ये, वटवृक्ष हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानले जाते.
या झाडाच्या मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि वरच्या बाजूला शिव राहतात. त्यामुळे या झाडाखाली बसून पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

वट सावित्री आणि वट पौर्णिमा व्रताशी संबंधित कथा

वट सावित्री आणि वट पौर्णिमा व्रताशी संबंधित कथा
वट सावित्री आणि वट पौर्णिमा व्रताशी संबंधित कथा

अश्वपती नावाचा एक सच्चा, प्रामाणिक राजा होता. त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या सुख-सुविधा, सुख-शांती होती. परंतु एक अडचण होती, त्याला मूल नव्हते. त्याच्या मनामध्ये एका मुलाची इच्छा होती, ज्यासाठी सर्वांनी त्याला सावित्री देवीची पूजा करायला सांगितले, ती त्याची इच्छा पूर्ण करेल. मुलाच्या इच्छाप्राप्तीसाठी त्याने संपूर्ण १८ वर्षे कठोर तपश्चर्या केली.

त्याची कठीण तपश्चर्या पाहून, सावित्री देवी स्वतः त्याच्याकडे आली आणि त्याला सावित्री नावाच्या मुलीचे वरदान दिले. ही मुलगी जेव्हा मोठी झाली आणि तारुण्यवस्थेत पोहोचली तेव्हा तिने स्वतःच एक चांगला जीवनसाथी शोधायला सुरुवात केली. त्यानंतरतिची भेट सत्यवानाशी झाली. पण सत्यवानाच्या कुंडलीनुसार त्याचे आयुष्य जास्त नव्हते, त्याच्या कुंडलीनुसार लग्नाच्या १ वर्षानंतर त्याचा मृत्यू होणार होता.

एकदा सावित्री पती सत्यवानासोबत एका वटवृक्षाखाली बसली होती. सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला होता, तेव्हा यमलोकाचा राजा यमराज सत्यवानाचा जीव घेण्यासाठी दूत पाठवतो. पण सावित्रीने आपल्या प्रिय पतीचे प्राण सोडण्यास नकार दिला. यमराज अनेकांना पाठवतात, पण सावित्री आपल्या पतीचा जीव कुणाला देत नाही. मग यमराज स्वतः त्यांच्याकडे जातात, आणि सत्यवानाचे प्राण मागतात.

त्याच दिवशी सावित्री सत्यावानाबरोबर अरण्यात गेली. लाकडे तोडून झाल्यावर श्रमामुळे त्याला ग्लानी आली. म्हणून वट वृक्षाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला नी त्याच वेळी सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम तेथे आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. सत्यवानाचे प्राण हरण केले आणि तो जाऊ लागला. सावित्री त्याच्या पाठोपाठ निघाली. यमाने तिला परत जाण्यास सांगितले परंतु तिने त्याचे ऐकले नाही. सावित्रीच्या पतीनिष्ठा, कर्तव्य व पतिव्रता धर्माच्या विवेचनामुळे यम प्रसन्न झाला. व तिला चार वर मागण्यास सांगितले.

तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्याची दृष्टी परत यावी हा वर मागितला. यानंतर मग दुसऱ्या वरात सावित्रीच्या राज्य भ्रष्ट सासऱ्याचे राज्य परत दिले. सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्र लाभ होण्याचा तिसरा वर मागितला. चौथ्या वरात सत्यवानाचे प्राण परत मागितले.

अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने आपल्या दोन्ही कुळाचा उद्धार केला. म्हणून जेष्ठ पौर्णिमेला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी स्रिया वटपूजा करतात. अशी ही वटपौर्णिमा साजरी करण्यामागील कथा आहे.

वट सावित्री आणि वट पौर्णिमा साजरी करण्याच्या पद्धती |Vat savitri or Vat purnima puja vidhi

या सणात स्त्रिया सावित्रीला देवी मानून पूजा करतात. त्यासाठीची पद्धत खालीलप्रमाणे आहे :-

भारतातील स्त्रिया वटपौर्णिमा या सणाला खूप महत्व देतात, या दिवशी त्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची मागणी करतात. त्यामुळे हा सन महाराष्ट्रात खूप जोरात साजरा केला जात असतो. या दिवशी स्त्रिया आपल्या हातावर मेहंदी काढतात, आणि तसेच नवीन साडी आणि शृंगार करतात. मग पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाजवळ सर्व स्रिया बारा वाजेपर्यंत पोहचतात.

ताटामध्ये तांदूळ किंवा गहू, पाच प्रकारची फळे, गोड पदार्थ, तुपाचा दिवा, अगरबत्ती, पाणी आणि दुर्वा हे सर्व घेऊन जातात. या दिवशी वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करतात. आणि असेही म्हंटले जाते की या दिवशी वडाची फांदी तोडू नये किंवा फांदी तोडून तिची पूजा करू नये.

सर्वात आधी स्त्रिया या वडाच्या झाडाजवळ जातात आणि मग त्यांनी आणलेले दुध आणि पाणी हे वडाच्या झाडाच्या पायथ्याशी घालतात. मग दुध आणि पाणी घातल्या नंतर स्त्रिया अगरबत्ती किंवा धूप हे तेथे लावत असतात आणि मग दिवा पेटवतात. त्यानंतर झाडाला आपण आणलेले पाणी हे तेथे ठेवतात आणि दोरा घेतात आणि मग वडाच्या झाडा भोवती सात फेऱ्या मारतात व तो दोरा झाडाला बांधतात.

या वेळेस स्त्रिया आपली पूजा करत असतना देवाकडे फक्त आपल्या पतीचे आयुष्य दीर्ध व्हावे आणि आरोग्य चांगले राहावे अशी प्राथना देवाकडे करीत असतात. तसेच इतर महिला या फक्त उपवासच करत असतात आणि देवाकडे प्रार्थना करीत असतात.

वटपौर्णिमेचा उपवास कधी असतो ? | When is Vatpoornima fasting?

या दिवसाच्या आधी सर्व महिला ३ दिवस उपवास करतात. परंतु अनेकजण केवळ वट सावित्रीच्या दिवशीच उपवास करतात आणि पूजा झाल्यावर भोजन करतात.काही स्त्रिया ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला उपवास करतात.

वटपौर्णिमा उपवास हा काय असतो?

हिंदू धर्मात म्हणजेच हिंदू पौराणिक कथानुसार असे मानले जाते कि वटवृक्ष म्हणजेच “त्रिमूर्ती” होय, तर त्रिमूर्ती म्हणजे काय? तर भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांचे प्रतिक आहे. असे म्हटले जाते की ब्रह्मा या झाडाच्या मुलाशी वास करतात, मध्य भागी भगवान विष्णू आणि वरच्या बाजूला भगवान शिव हे वास करीत असतात. अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा केल्यास भाविकांचे भले होते.

खर तर या व्रताचे महत्व व वैभव कित्येक शास्त्रात आणि पुराणातही याचा उल्लेख केला गेला आहे. जसे कि स्कंद पुराना, भव्य पुराना, महाभारत यांच्यात याचा संपूर्ण पणे उल्लेख हा आपल्याला पाहण्यास मिळेल.

वटपौर्णिमा व्रत आणि पूजा हिंदू विवाहित महिला करीत असतात. जेणेकरून त्यांच्या पतीला दीर्घ आयुष्य आणि सुख व समृद्धी प्राप्त होवो अशी भावना असते.

वटपौर्णिमा व्रत साजरा करणे हे विवाहित स्त्रीने तिच्या पाटीवर भक्ती ,सत्य आणि प्रेमाचे प्रतिक म्हणून केलेले असते.

वटपौर्णिमाच्या दिवशी उपवासाला काय खाल्ले पाहिजे

वटपौर्णिमा या दिवशी सर्व स्त्रिया या उपवास करीत असतात, या दिवशी उपवासाला काय खावे हे बहुतेक कमी लोकांना माहित असेल या दिवशी फक्त स्त्रिया फक्त फळांचे सेवन हे करीत असतात. फळा व्यतिरिक्त काहीच ग्रहण करीत नाही. तसेच गायीचे दूध, दही, तूप, मुळा, आंबा, डाळिंब, मोसंबी, संत्री आणि केळी इत्यादी पदार्थ व्रताच्या वेळी खाण्यासाठी उपयुक्त आहेत.

आंबा :- तुम्हाला तर माहितीच असेल की जेष्ठ महिन्यात आंब्याचा सीजन असतो. त्यामुळे आपण आंब्याचे रस करून किंवा आंबा कापून खाऊ शकतो.

केळी :- या दिवशी केळी जास्त प्रमाणात ग्रहण केले जाते कारण या केळीचे छोटे-छोटे तुकडे करून त्यांना दुधात टाकतात, दुधात थोडी साखर टाकून आणि त्यात केळीचे छोटे पीस करून त्याला थोडा वेळ उकळून तुम्ही केळी आणि दुध खाऊ शकता.

वटपौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करू नये.

  • अनेकदा पाणी पिऊ नये.
  • क्षार, लवण, मध आणि मांस यांचे सेवन करू नये.
  • आपल्या शरिराला आणि मस्तकाला तेल लाऊ नये.
  • विडा खाऊ नये.
  • अंगाला उटी लाऊ नये.
  • ज्या गोष्टींच्या योगाने शारीरिक सामर्थ्य किंवा मनोविकार बळावतील अशा गोष्टी करू नये.
  • या दिवशी राग, लोभ, मोह अणि आळस या गोष्टी करू नये.
  • धूम्रपान, चोरी आणि दिवसा झोपणे या गोष्टी करू नये.

FAQ

जेष्ठ महिन्याच्यापोर्णिमेला वाट सावित्री पौर्णिमा असते. या वर्षी १४ जून ला आहे.
जेष्ठ महिन्याच्या अमावास्येला वट सावित्री अमावस्या असते.
विवाहित स्त्रिया पूर्ण दिवस उपवास करतात आणि पूजा झाल्यावर जेवण करतात.
ज्याप्रमाणे सावित्रीने यमराजापासून आपल्या पतीचे (सत्यवानाचे) प्राण आणले. त्याचप्रमाणे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी व्रत पाळतात.
वट सावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाची (वटवृक्ष) पूजा करतात.

या post मध्ये आपण वट सावित्री व्रताचे (Vat Purnima Information Marathi) विवाहित स्त्रियांसाठी महत्व जाणून घेतले आहे. या लेखामध्ये या व्रताविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला वट पोर्णिमेविषयी सुचवायचे असेल तर comment करा. ही पोस्ट उत्तम करण्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया कळवा. ही पोस्ट तुम्हाला
तुम्हाला आवडलेली असेल तर social siteवर share करा.

Leave a Comment