Rajmata Jijau Marathi Bhashan

Rajmata Jijau Bhashan
Rajmata Jijau Bhashan Marathi

Rajmata Jijau Bhashan, Rajmata Jijau Marathi Bhashan. राजमाता जिजाऊ मराठी भाषण. राजमाता जिजाऊ जयंती भाषण, राजमाता जिजाऊ भाषण, Rajmata Jijau Marathi speech, rajmata jijau punyatithi marathi Bhashan.

Rajmata Jijau Bhashan | राजमाता जिजाऊ मराठी भाषण

Speech 1

जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधुनो, भगिनींनो आणि मातांनो तसेच व्यासपिठावर असलेले मान्यवर यांना मी ——— या पावन दिवशी अभिवादन करीत आहे.

मित्रांनो . मी इथे आपणासमोर राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. राजमातेवर दोन ओळी बोलतांना काही राहील/चुकलं असेल तर छत्रपतींच्या या सेवकाला सांभाळून घ्या मी आपलाच मुलगा आहे.

तर मित्रांनो राजमाता जिजाई (Rajmata Jijabai Information In Marathi) ह्या स्वराज्याचे निर्माते अखिल मराठी बांधवांचे प्राण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब. राजमातेवर अनेक कथा, पुस्तके, लोकनाट्य आणि चित्रपट तयार करण्यात आले आहेत. तेव्हा आज आपण मासाहेबांचा जीवनातील महत्वाच्या ठळक गोष्टी जणू घेणार आहोत.

राजमाता जिजाबाई यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड राजा लखुजी जाधव यांच्या घरी झाला आणि ज्या माऊलीच्या पोटी त्यांनी जन्म घेतला त्या आईचे नाव म्हाळसाबाई जाधव होय. लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव हा धाडसी होता. त्यांच्यामधील नेतृत्वाचे गुण त्यांच्या आई-वडिलांना लहानपणीच दिसावयास पडले. तेव्हा त्यांचे लग्न एका प्रतापी राजकुमाराशी व्हावे अशी त्यांची इच्छा होती.

यातच मालोजीराजे भोसले हे पुण्याचे सुभेदार होते आणि त्यांनी शहाजीराज्यांसाठी लखुजी जाधवांना जिजाऊंचा हात मागितला. अशाप्रकारे जिजाबाई लहान असतांना त्यांचा साखरपुडा शहाजीराजे यांच्याशी झाला व नंतर त्यांचे लग्न लावण्यात आले. लग्नानंतर त्यांना ऐकून ६ मुले झाली त्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज एक रत्न होते. जिजाबाईंनी शिवनेरी गडावर महाराजांना जन्म दिला त्यामुळे त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.

जिजाबाई लहानपणापासून खंबीर,धाडसी आणि दूरदर्शी होत्या त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक शूर योध्याचे व ऊत्तम प्रशासकाचे गुण पाहायला मिळतात हे त्यांच्या जीवनकार्यात आपल्याला पाहावयास मिळते यासोबतच त्या आपल्या मराठी बांधवांच्या राजमाता झाल्या कारण इथे महत्वाचे आहे बरं का, त्यांनी शिवरायांना जन्म तर दिलाच पण महाराजांचे गुरुमूर्ती बनून त्यांनी लहान शिवबा मध्ये स्वराज्याची ज्योत प्रज्वलित केली.

काही जण म्हणतात संत शिरोमणी तुकाराम महाराज याना छत्रपतींचे गुरु मानतात तर काही लोक रामदास स्वामी यांना गुरु मानतात आणि काही जण हे दादोजी कोंडदेव यांना शिवरायांचे गुरु मानतात. प्रत्येकजण आपापल्या समजूतीनुसार हे ठरवत असतात. हे इथे नक्की की या तीनही मान्यवरांचा शिवरायांवर कधी ना कधी प्रभाव पडला परंतु त्यांना महाराजांचे गुरु म्हणणं योग्य नाही. कारण जिजाऊ आईने ने जीवनाच्या कठीण प्रसंगात असताना मा भवानीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना जन्म दिला.

शिवबा लहान असतांना त्यांना शिक्षण दिले. शिवाजी महाराजांमध्ये असे गुण बिंबविले की ते निर्भीड, साहसी, स्वराज्य निर्माते झाले. याचबरोबर त्यांनी शिवबाला रामायण आणि महाभारतातील कथा सांगून त्यांच्यामध्ये वीरता ,धर्मनिष्ठा आणि संयमाची प्राणप्रतिष्ठा केली.

यासोबतच त्यांनी शिवरायांना नैतिक मूल्यांचे महत्व पटवून दिले आणि महैलांचा आदर करायला शिकविले. त्यांनी शिवरायांना मातृभूमी, गाय आणि मानव जातीचे रक्षण क्रॅन्ह्याचे संकलप दिले. यादरम्यान शिवाजीमहाराजांना तलवारबाजी,भालाफेक, घोडेस्वारी, स्वरक्षण इत्यादी युद्ध कौशल्यात पारंगत केले.

हे सर्व जिजामातेचे कार्य बघता निसंदेह आपण म्हणू शकतो की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रथम आणि शेवटचे गुरु म्हणजे राजमाता जिजाऊ
अशा त्या दयाळू, निर्भीड, साहसी,उत्तम प्रशासक जिजाऊ आईला माझे वंदन

मा भवानी, राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आपले तर संत आणि समाजसुधारक यांना स्मरण करुं मी माझे भाषण समाप्त करीत आहे. मला धैर्याने एकल्याबद्दल धन्यवाद

राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी (Video)

Rajmata Jijau Bhashan

जय भीम जय शिवाजीजय महाराष्ट्र

तर आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला Rajmata Jijau Bhashan, Rajmata Jijau Marathi Bhashan. राजमाता जिजाऊ मराठी भाषण. राजमाता जिजाऊ जयंती भाषण, राजमाता जिजाऊ भाषण, Rajmata Jijau Marathi speech, rajmata jijau punyatithi marathi Bhashan याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मला खात्री आहे की तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्वाबद्दल योग्य ती माहिती मिळाली असेल. तुम्ही या पोस्ट विषयी आपले मत पाठवू शकता यासाठी आम्हाला कंमेंट द्वारे कळवा आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सोसिअल माध्यमातून या लेखाला ( Facebook, Twitter, Whatsapp, Instagram) Share करायला विसरू नका . या पोस्ट ला Like करून आमच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या.

written By – Mahajatra Team

Leave a Comment