२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी- 26 January Bhashan Marathi

Prajasattak Speech In Marathi

Prajasattak Din Bhashan Marathi (26 जानेवारी भाषण) – प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे आणि आपला देश नेहमी २६ जानेवारी रोजी गणतंत्र दिवस साजरा करीत असतो. यंदा भारत ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. (Prajasattak Speech In Marathi) भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याजवळ संविधान नव्हते. राज्यघटनेच्या निर्मात्यांनी २६ जानेवारी १९५० रोजी आपले संविधान अमलात आणले. या दिवशी आपली राज्यघटना संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आली होती म्हणून २६ जानेवारी या दिवशी देशभरातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम केले जातात.

प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात यापैकी एक म्हणजे भाषण . प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. २६ जानेवारीला दिल्लीमद्ये परेड होत असते यामध्ये प्रत्येक राज्याचे चित्ररथ यामध्ये भाग घेतात आणि प्रत्येक प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये विदेशी देशाचे प्रमुख पाहुणे (Chief Guest) असतात. या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२३ ला इजिप्त देशाचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी (Abdel Fattah al-Sisi) प्रमुख पाहुणे (Chief Guest) आहेत. प्रजासत्ताक दिवशी प्रत्येक राज्यामध्ये मुख्यामंत्री तिरंगा फडकवतात आणि सरकारी कार्यालयामध्ये झेंडावंदन केले जाते.

आज आपण या पोस्टमध्ये प्रजासत्ताक दिन भाषण (Prajasattak Speech In Marathi) मराठी मध्ये पाहणार आहोत. तर चला मग भाषणाला सुरुवात करूया

Prajasattak Din Bhashan Marathi | Prajasattak Speech In Marathi

26 जानेवारी भाषण 2023 Marathi

( भाषण )

जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधूंनो भगिनींनो आणि मातांनो मी ———- आपण सर्वांचे या प्रजासत्ताक दिनानिमित्त विनम्र अभिवादन करीत आहे.

मित्रांनो, मी इथे आपणासमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करणार आहे. प्रत्येक वर्षी २६ जानेवारीला आपण गणतंत्र दिन साजरा करण्यामागे दोन कारण आहेत, पहिले कारण आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० रोज लाहोर येथे झेंडा फडकावून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती तर दुसरे महत्वाचे कारण म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले.

बंधुनो- भगिनींनो तुम्हाला माहित आहे काय ? आपल्या भारताच्या राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार करण्याकरिता संविधान निर्मात्यांना तब्बल २ वर्षे, ११ महिने, १८ दिवस लागले इथे मी तुम्हाला प्रकर्षाने सांगू इच्छितो की, संविधानाचा मसुदा लिहिण्याचे काम संविधान सभेच्या मसुदा समितीला देण्यात आले आणि महाराष्ट्राचे रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले.

हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं

बाबासाहेब आंबेडकर

मित्रांनो काही जण म्हणतात की, संविधान बाबासाहेबांनी लिहिले तर काही जण म्हणतात की, संविधान संविधान सभेने लिहिले. खरे तर या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत कारण संविधान लिहिण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच लोकांच्या आणि सदश्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे महत्वाचे काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बाबासाहेबांना दिले व भीमरावांनी ते काम चोख पार पाडले म्हणून बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. अश्याप्रकारे महाराष्ट्राने आपल्या देशाला कायद्याचे राज्य बनविले आहे.

तुम्हाला कधी प्रश्न पडला काय, प्रजासत्ताक म्हणजे नेमक काय ? खरंच आपण प्रजासत्ताक राज्यात राहत आहोत काय ? काय आपण लोकशाही गणतंत्र राज्याचे नागरिक होण्याच्या योग्य आहोत ? आपल्यामध्ये संविधान निर्मात्यांना अभिप्रेत असलेली न्यायाची, समानतेची आणि बंधुतेची भावना आहे ? काय आपण जातीरहित, धर्मनिरपेक्ष आणि सर्वाना समान संधी मिळेल अश्या समाजाची स्थापना केली ?

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात,
देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,
चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया

तर या सर्व प्रश्नांचे उत्तर घेण्याचे काम आज आपण करणार आहोत. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य असा सर्वसाधारण अर्थ काढला जातो. जेव्हा १५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश इंग्रजांच्या गुलामितीतून स्वतंत्र झाला तेव्हा स्वातंत्र्यसैनिकांना व राज्यघटनेच्या निर्मात्यांना प्रश्न पडला की या देशाचे राज्य कसे असावे आणि समोर या प्रश्नातूनच आपली राज्यघटनेची निर्मिती झाली.

संविधानाच्या निर्मितीच्या वेळेस लोकांद्वारे, लोकांमधून, लोकांच्या कल्याणासाठी लोकतांत्रिक शासन व्यवस्था आकारास आली आणि भारत एक लोकतांत्रिक राज्य असेल असे एकमताने मान्य करण्यात आले.

या लोकतंत्रामध्ये महत्वाचे दोंन घटक आहेत. एक म्हणजे देश (सरकार) आणि दुसरे सर्वात महत्वाचा घटक आहे नागरिक. आपण नागरिक आहोत प्रजा नाही म्हणून सरकारमध्ये बसलेले प्रतिनिधी लोककल्याणासाठी योग्य कार्य करतात की नाही ही पाहण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. तेव्हा मित्रहो आपल्यामधील नागरिकाला सदैव जागृत ठेवा ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे.

या सर्वांमधून तुम्हाला कळालं असेल की आपण सर्व भारताच्या लोकतांत्रिक राज्याचे नागरिक आहोत आणि आपला देश संघराज्य असून प्रशासनाच्या सोयीखातर राज्यांची स्थापना करण्यात आली आहे.

संविधानाच्या सरनाम्यामध्ये भारताचे एक सार्वभौम्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य तयार करून या देशातील लोकांमध्ये सामाजिक,आर्थिक, आणि राजकीय न्याय, स्वतंत्रता, समानता, बंधुता अनिर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की आपणास नागरिक म्हणून किती मोठी जबाबदारी पार पडायची आहे.

एकदा पंडित नेहरू यांना लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला की या देशामध्ये सर्वात वरच्या स्थानावर कोण आहे ? केंद्र सरकार, राज्य सरकार, निवडणूक आयोग, किंवा सुप्रीम कोर्ट. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देताना पंडित नेहरू म्हणाले, या देशातील लोक (नागरिक) या देशाची सर्वात शक्तिशाली आणि शेवटची सत्ता आहे आणि या देशाचे नागरिक या देशाचे मालक आहेत.

अशाप्रकारे मित्रांनो आपणा सर्वांना न्यायबुद्धी, विज्ञाननिष्ठा, समानता, लोकतंत्र या गोष्टींचा पुरुपुर विचार करून, विवेकाच्या आधारे आपल्यामधील सर्वोत्तम व्यक्तीला आपला प्रतिनिधी म्हणून निवडायचे आहे आणि एका सार्वभौम लोककल्याणकारी शासनाची निर्मिती करायची आहे.

माझा तुमच्यावर विश्वास आहे की, तुम्ही भारताचे लोक असा समाज आणि देश घडवाल की, जगालाही तुमचा हेवा वाटेल. मी आता तुमची जास्त वेळ घेणार नाही गणतंत्र दिन चिरायू होवो या घोषणेद्वारे मी आपले भाषण थांबवतो. आणि हो आपल्या पुत्राला आशीर्वाद द्या,

जय हिंद जय महाराष्ट्र

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण (Republic Day Bhashan Marathi)

FAQ

प्रश्न – ७४ वा प्रजासत्ताक दिन कोणत्या वर्षी आहे?

उत्तर – २६ जानेवारी २०२३

प्रश्न – भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात?

उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रश्न – २६ जानेवारी २०२३ साली प्रजासत्ताक दिनाचा कितवा वाढदिवस आहे ?

उत्तर -७४ वा

Written By – Mahajatra Team

Leave a Comment