बैल पोळा सणाची संपूर्ण माहिती- Bail Pola Information in Marathi

बैल पोळा सण २०२२ चे महत्व आणि माहिती, हा सण का, कधी आणि कसा साजरा केला जातो याची माहिती व तारीख, पूजा पद्धत (Bail Pola Festival Kevha aahe, Puja, Celebration, Date).

मित्रांनो भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, शेतीमध्ये चांगले पीक येण्यासाठी बैलांचे सुद्धा योगदान असते. त्यामुळे या बैलांची भारत देशात पूजा केली जाते. पोळा हा सण त्यापैकीच एक आहे, या दिवशी शेतकरी गायी आणि बैलांची पूजा करतात. पोळा सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात राज्यात साजरा केला जातो.

बैल पोळा २०२२ (Bail Pola Information In Marathi)

उत्सवाचे नावबैल पोळा
इतर नावेपिठोरी अमावस्या, मोठा पोळा, तान्हा पोळा
सण साजरा करण्याचे ठिकाणमहाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड
२०२२ मह्ये केव्हा आहे२६ ऑगस्ट ला बैलपोळा, २७ ऑगस्ट ला तान्हा पोळा
कुणाची पूजा केली जातेबैलांची

पोळा सण का साजरा केला जातो, त्याचे महत्त्व

पोळा हा सण बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला हा सण शेतकरी मोट्या उत्साहाने बैलांची पूजा करून साजरा करतो. बैलांना दीवशी कोणतेही काम करू दिले जात नाही. Bail Pola या दिवशी बैलांना शेतकरी नदीवर, बोरवेलच्या पाण्यानी किंवा किंवा ओढ्यावर स्वतःच्या हाताने आंघोळ घालीत असतो. त्याच्या शिंगाना रंगीबेरंगी बेगड लावतात, त्याचबरोबर तयांच्या अंगावर ठिपके लावतात, त्यांच्या पाठीवर मस्तपैकी झालर ठेवतात,आणि हो महत्वाचे सांगणे राहिले, बैलाला या दिवशी नावरदेवासारखे डोक्यावर बाशिंग बांधले जाते. म्हणजे या दिवशी बळीराजा आपल्या बैलाला नवरदेव करतो.

त्याला भाताचे व पुरणपोळीचे नैवैद्य दिले जाते. बैलांना पोळ्याच्या मिरवणुकीत नेण्यात येथे .तिथे सर्वर सुंदर सजवलेल्या बैलाला व त्याच्या मालकास बक्षिसे दिलॆ जाते. त्यानंतर तोरण कापून बैलपोळा फोडला जातो. नंतर शेतकरी त्यांना आमंत्रण देणाऱ्याच्या घरी घेऊन जातो, त्या गॅरी त्याची पूजा केली जाते आणि टोपलीमध्ये जेवण दिले जाते, आणि बैलाच्या मालकास बाजार दिला जातो.

२०२२ मध्ये पोळा सण कधी आहे (Pola Festival Date)

पोळा हा सण श्रावण महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो, या अमावस्येला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. Bail Pola सण हा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येत असतो. यंदा बैलपोळा २६ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. आपल्या महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तिथे हा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो. तिथे बैल पोळाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला (२७ ऑगस्ट) तान्हा पोळा म्हणतात.

बैल पोळा कथा (Bail Pola Story In Marathi)

Bail Pola Information in Marathi एकदा कैलासमध्ये शिव पार्वती सारीपाटाचा म्हणजेच चौरसाचा खेळ खेळीत होते. या खेळामध्ये मा पार्वती विजयी झाली परंतु शिव मात्र स्वतः जिंकल्याचे म्हणाले. तेव्हा तिथे उपस्थित फक्त नंदी होता.पार्वतीने नंदीला विचारले कि या खेळामध्ये कोण जिंकला. तेव्हा नंदीने शंकराचे नाव घेतले. त्यावर मा पार्वती क्रोधीत झाली आणि नंदीला शाप दिला की, मृत्युलोकीं (पृथ्वीवर) तुझ्या मानेवर सदैव नांगर राहील. तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल. ऐकून नंदी घाबरला आणि त्याने आपली चूक मान्य केली.

त्याने मा पार्वतीला क्षमा मागितली. त्यावर गौरीने त्याला सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव मानून तुझी पूजा करेल. त्या दिवशी तुझ्या मानेवर नांगर राहणार नाही. तेव्हापासून याच कारणात्सव Bail Pola हा सण साजरा करण्याची परंपरा पडली.

बैल पोळा सणाला पोळा असे नाव का पडले?

Tanha pola information In Marathi जेव्हा भगवान विष्णू कान्हाच्या रूपात पृथ्वीवर आले, जी आपण कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी करतो. श्रीकृष्णाच्या जन्मापासूनच त्याचा मामा कंस त्याच्या जीवाचा शत्रू राहिला होता. कान्हा वसुदेव-यशोदासोबत लहानपणी राहत असताना कंसाने अनेक असुरांना त्याला मारण्यासाठी पाठवले. एकदा कंसाने पोलासुर नावाच्या राक्षसाला पाठवले होते, ज्याला कृष्णाने आपल्या लीलेने मारले आणि सर्वांना आश्चर्यचकित केले. तो दिवस श्रावण महिन्यातील अमावास्येचा दिवस होता, या दिवसापासून या दिवसाला पोळा असे नाव पडले. या दिवसाला बालदिन म्हणतात, या दिवशी मुलांवर विशेष प्रेम केले जाते. महाराष्ट्र या दिवसाला तान्हापोळा म्हणतात. या दिवसाला लहान मुलांसाठी पोळ्याचे (Tanha Pola) आयोजन केले जाते. या वर्षी म्हणजे २०२२ ला तान्हा पोळा २७ ऑगस्ट ला आहे.

तान्हा पोळा हा खासकरून बालगोपालासाठी असतो. या दिवशी लहान मुले आपल्या लाकडी बैलाला सजवत असतात. त्या लाकडी बैलांची धावण्याची शर्यत भरवली जात असते जिंकणाऱ्या तान्ह्या बैलाला पारितोषिक दिले जाते. त्याचबरोबर जो कोणी सर्वात सुंदर आपल्या लाकडी बैलाला सजवितो त्याला सुद्धा बक्षिस दिले जाते. काही ठिकाणी लहान मुले आपल्या लाकडी बैलासोबत फिरत असतात. त्यांना मित्र परिवारातील लोक आपल्या घरी बोलावत आणि त्यानां बोजारा देतात.

पोळा सण कसा साजरा करायचा

पोळा हा सण मोठा पोळा आणि छोटा पोळा (Tanha Pola) अशा दोन प्रकारे साजरा केला जातो. मोठ्या पोळ्यामध्ये बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते, तर लहान पोळ्यामध्ये मुले खेळण्यातील बैल घरोघरी घेऊन जातात आणि नंतर त्यांना काही पैसे किंवा भेटवस्तू दिली जाते.

महाराष्ट्रात पोळा सण कसा साजरा करतात (Bail Pola Festival in Maharashtra)

महाराष्ट्र आणि कर्नाटकात या सणाला बैलपोळा किंवा बेंदूर म्हणतात. कर्नाटकाच्या काही भागात बैलपोळ्याला करुनूर्नामी म्हणून ओळखले जाते.

  • पोळ्याच्या पहिल्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांच्या मानेला आणि तोंडाला असलेली दोरी काढतात.
  • यानंतर, त्यांना हळद, बेसन पेस्ट लावून, तेलाने मालिश केली जाते.
  • यानंतर त्यांना गरम पाण्याने चांगले आंघोळ घातली जाते. जवळ नदी, तलाव असेल तर तिथे नेऊन आंघोळ केली जाते.
  • यानंतर बैलांना चांगले सजवले जाते, त्यांच्या शिंगांना रंग दिला जातो.
  • काही दाण्यांची खिचडी (घुगऱ्या) ,पुरणपोळी बैलांना जेवणासोबत दिली जाते.
  • त्यांना रंगीबेरंगी कपडे परिधान करतात, विविध प्रकारचे दागिने, फुलांचे हार घालतात. शाल चढवली जाते. .
  • या सर्वांसोबतच घरातील सर्व लोक नाचत-गात असतात.
  • बैलांच्या शिंगात बांधलेली जुनी दोरी बदलून नव्या पद्धतीने बांधली जावी हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • गावातील सर्व लोक एका ठिकाणी जमतात, आणि सजवलेले बैलआणतात. या दिवशी प्रत्येकाला आपले बैल पाहण्याची संधी मिळते.
  • त्यानंतर सर्वांचे पूजन करून संपूर्ण गावात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते.
  • या दिवशी घरात खास पदार्थ तयार केले जातात, या दिवशी पुरम पोळी, गुज्या, भाजी करी आणि पाच प्रकारच्या भाज्या एकत्र करून मिक्स भाज्या तयार केल्या जातात.
  • अनेक शेतकरी या दिवसापासून पुढील शेतीला सुरुवात करतात.
  • या दिवशी अनेक ठिकाणी जत्रेचे आयोजन केले जाते, येथे व्हॉलीबॉल, कुस्ती, कबड्डी, खो-खो इत्यादी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पोळा सण साजरा करण्याची पद्धत (Pola Festival in MP and Chhattisgarh)

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अनेक आदिवासी जाती आणि जमाती राहतात. तेथील गावात पोळा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. येथे खऱ्या बैलाऐवजी लाकूड आणि लोखंडी बैलाची पूजा केली जाते, बैलांशिवाय येथे लाकडी, पितळी घोड्यांचीही पूजा केली जाते.

  • या दिवशी घोडे, बैल यांच्याबरोबरच चक्कीचीही पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी जीवन चालवण्यासाठी घोडे, बैल हे मुख्य होते आणि चक्कीतूनच गहू दळला जायचा.
  • त्यांना विविध प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात, शेव, गुज्या, गोड खुर्मा इत्यादी बनवले जातात.
  • घोड्यावर थैली ठेवून त्यात हे पदार्थ ठेवले जातात.
  • मग दुस-या दिवशी सकाळपासून मुलं हे घोडे, बैल घेऊन शेजारच्या घरोघरी जातात आणि बहुतेक पैसे भेट म्हणून घेतात.
  • याशिवाय मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पोळ्याच्या दिवशी गेडीची मिरवणूक काढली जाते. बांबूपासून गेडी तयार केली जाते, ज्यामध्ये एक लांब बांबू एका लहान बांबूमध्ये 1-2 फूट वर ओलांडून ठेवला जातो. मग त्यावर संतुलन साधून तो उभा राहतो आणि निघून जातो. गेडी अनेक आकारांची बनलेली असते, ज्यामध्ये लहान मुले, वडीलधारी मंडळी उत्साहाने भाग घेतात. हा एक प्रकारचा खेळ आहे, जो मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा पारंपारिक खेळ आहे, भारतातील इतर प्रदेशांमध्ये, तुम्हाला कदाचित माहितही नसेल.

पोळा हा सण प्रत्येक माणसाला प्राण्यांचा आदर करायला शिकवतो. हा सण जसजसा येऊ लागतो, तसतसे सर्वजण पोळ्याच्या शुभेच्छा देत कष्टकरी लोकांचे अभिनंदन करू लागतात.

मित्रांनो मी या पोस्टमध्ये बैलपोळा (Bail Pola Information in Marathi) व तान्हा पोळा (Tanha Pola Information in Marathi) या सणाविषयी माहिती दिलेली आहे. हि पोस्ट तुम्ही मित्रांसोबत सोसिअल माध्यमातून Facebook, Instgram, whatsapp, Twitter share करू शकता. या पोस्टबद्दल तुम्हाला काय वाट आहे ते comment लिहून कळवा. मला आशा आहे तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल.

Leave a Comment