गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा कोट्स, Wishes, SMS, status, मराठीमध्ये

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

Guru Purnima Quotes in Marathi – मित्रांनो आज गुरु पौर्णिमा (व्यासपौर्णिमा) आहे. या मंगलमय दिनी आपण सर्वांनी आपल्या प्रिय शिक्षकाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (Guru Purnima Wishes in Marathi) देऊन त्यांच्याविषयी मनापासून कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करू शकता..गुरू म्हणचे अशी व्यक्ती जी दगडासारख्या दिसणाऱ्या माणसाला मूर्ती बनविण्याचे महान कार्य करीत असते, जर आपल्या जीवनात आपण गुरूने सांगितलेल्या गोष्टींचे योग्य पालन केले तर आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग कळून जाईल आणि सोबतच जीवनातील समस्यांना अगदी हसत सामोरे जाता येईल.

गुरू हे आपल्या जीवनाला आकार देत असतात म्हणून त्यांना जीवनाचे शिल्पकार म्हणतात. लहानपणी गुरू आपल्याला शिक्षण देत असतात आणि आपल्याला चांगले मार्गदर्शन देऊन आपल्याला माणूस बनवतात. गुरू आपल्याला चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगले शिक्षण देतात. शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये आपले गुरू असतात. तसेच आपल्याला जन्म देणारी आई व बाबा हे सुद्धा आपले गुरू आहेत. जर ते नसते, तर आपण ह्या जगात पाऊलच ठेवले नसते. त्यामुळे सदैव त्यांचा आदर करायला पाहिजे.

तुम्हाला गुरुपोर्णिमेबद्दल माहिती हवी असेल तर गुरु पौर्णिमा सनाबद्दल विशेष माहिती हा लेख वाचा .

मित्रांनो तुम्ही आपल्या शिक्षकांना गुलाबाचं फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता. तर या लेखात गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश, Guru Purnima Quotes in Marathi, सुविचार, wishes, देण्यात आलेल्या आहेत . तर चला बघूया …..

Guru Purnima Quotes in Marathi | Guru Purnima Wishes in Marathi

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर…  गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः  गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

.गुरूशिवाय ज्ञान नाही
ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, संयम आणि कृती,
सर्व काही गुरूची देण आहे.

व्यासपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच, माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत… आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले, सर्वांचे धन्यवाद! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा
सर्वांना वंदन व शुभेच्छा…
जय गुरुदेव दत्त!


गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


जेव्हा गुरूंचा आशीर्वाद आणि शिकवणुकींचा प्रकाश असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात अंधार होणार नाही. गुरु पूर्णिमा शुभेच्छा!


Guru Purnima Nibandh Marathi (गुरू पौर्णिमा निबंध मराठी)

Srikrishna Quotes on Guru Purnima

महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन हा जेव्हा आपल्या समोर पितामह: भीष्म, गुरु द्रोणाचार्य, आचार्य कृपाचार्य, व आपल्या नातलगांना पाहतो तेव्हा त्याच्या मनामध्ये भावना भरून येतात आणि तो आपला गांडीव (धनुष्य) खाली ठेवतो. तेव्हा भगवान कृष्ण त्याला सांगतात की, अर्जुना तू जर महाभारताच्या (धर्म-अधर्म) युद्धातून माघार घेतली तर धर्माचा पराभव होईल. तेव्हा श्रीकृष्णाने रणांगनामध्ये अर्जुनाला कर्माचे सिद्धांत सांगितले. यालाच आपण गीता असे म्हणतो.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस

Srikrishna Quotes on Guru Purnima
Srikrishna Quotes on Guru Purnima

कर्म करणं हे मानवाच्या हाती आहे. ते निस्वार्थीपणे करावे. त्याच्या फळाची अपेक्षा करू नये. तसेच फळाची अपेक्षा न करता मी काम का करु? हा विचार देखील करू नये. म्हणजेच श्रीकृष्णाने मानवाला निस्वार्थीपणे काम करण्यास सांगितले आहे.

Happy Guru purnima

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा quotes

रागामुळे माणसाची मती भ्रष्ट होते तो मूर्ख होतो. मूर्ख माणसाच्या बुद्धीचाही काही उपयोग होत नाही. बुद्धीचाही नाश झाल्यानंतर आपोआपच मनुष्य स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे केवळ रागाच्या भरात हातातून सार्‍या गोष्टी गमावण्याआधीच रागावर नियंत्रण ठेवायला शिका म्हणजे विनाश टाळता येईल.

व्यासपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

युद्धात जर तुला वीरमरण आलं तर तू स्वर्गात जाशील, जर या युद्धात विजयी ठरलास तर धरतीवर हा विजय साजरा करू शकशील त्यामुळे अर्जुना उठ आणि निश्चयाने युद्धासाठी सज्ज हो. यामध्ये कृष्णाने प्रत्येकाला त्याच्या वर्तमानातील कर्मावर लक्ष्य केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. कारण मानवासाठी वर्तमानातील कर्मापेक्षा श्रेयस्कर अजून काही असू शकत नाही असा सल्ला दिला आहें.

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आत्मा अमर आहे. त्याला न शस्त्राने ठार करता येते, ना आगीने जाळू शकतो, पाण्याने न तो भिजू शकतो ना त्याला वार्‍याच्या झोक्याने सुकवता येते


Guru Purnima Quotes In Marathi for Teachers | शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा… आम्ही चालवू हा पुढे वारसा’ गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते.

Guru Purnima Quotes for Teachers,
Guru Purnima Quotes for Teachers

गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली
गुरू म्हणजे, तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो
.


जगासाठी आपण कदाचित एक शिक्षक असाल परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात! देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील.
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !


ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं,
लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे, असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे.
मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. अशा आपल्या सारख्या
लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
H
appy Guru purnima


गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा images

gurupurnimechya shubhecha marathi, गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!


Guru Purnima Quotes In Marathi For Brother

आदी गुरूसी वंदावे |
मग साधनं साधावे ||
गुरु म्हणजे माय बापं |
नाम घेता हरतील पाप ||
गुरु म्हणजे आहे काशी |
साती तिर्थ आहे तया पाशी ||
तुका म्हणे ऐंसे गुरु |
चरण त्याचे हृदयीं धरू ||
आजच्या दिवसानिमित्त सर्वांना माझ्याकडुन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !


तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला,
तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर
पुन्हा पुन्हा चालायला.


गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल,
लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल.


Guru Purnima Quotes for students | विद्यार्थ्यांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

वट पौर्णिमा गुरु पौर्णिमा येत असते. व्यासपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी (students) आपल्या गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (Guru Purnima Quotes for students) देत असतात. तसेच तुम्ही आपल्या शिक्षकांना गुलाबाचं फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा इमेज

Guru Purnima Quotes for students
Guru Purnima Quotes for students

अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान,
गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही कराल पार, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं
नाम घेता हरतील पापं,
गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा!


गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,
ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.


Guru Purnima Quotes In Marathi For Sister

गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,
लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


शांतिचा पाठ पठवून, अज्ञानाचा मिटवला अंध:कार,
गुरुने शिकवले आम्हाला, कसा मिळवावा रागावर प्रेमाचा विजय,
अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!


योग्य काय अयोग्य काय ते तुम्ही शिकवता,
खोटे काय खरे काय ते नीट समजावता,
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुविण कोण दाखविल
वाट हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,
अवघड डोंगर घाट, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा


जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!


विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रूतं ज्ञानम|
ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोध:|
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!


मित्रांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा | Guru Purnima Quotes for Friends

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

Guru Purnima Quotes for Friends in marathi
Guru Purnima Quotes for Friends

हजार चांदण्या शोधण्यापेक्षा
एकच चंद्र शोधा..
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा
एकच सूर्य जवळ ठेवा…


गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!


गुरू हे आपल्याला नेहमी जीवनात पुढे
जाण्याची दिशा दाखवत असतात..
आयुष्यात मेहनत कशी करायची,
ह्याचा मार्ग दाखवत असतात..
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

हा एक अतुलनीय प्रवास आहे जिथे गुरु आपल्याला दृश्यापासून अदृश्य, भौतिक ते दैवीकडे, अल्पकालापासून अनंतकाळपर्यंत नेतो. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

Guru purnima whatsapp Status in Marathi

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा… आम्ही चालवू हा पुढे वारसा’ गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते.
यादिवशी मराठी मानस, students, brothers, sisters एकमेकांना (guru purnima quotes in marathi text message) पाठवीत असतात.

Guru purnima whatsapp Status in Marathi
Guru purnima whatsapp Status in Marathi

गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही,
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ह्या सर्वच गुरुच्या देणंग्या आहेत.


शाळेत आम्हाला जग काय असते हे दाखवून दिले. जीवनात कोण कोणत्या समस्यांना कसे सामोरे जायचे हे सांगितले. ज्यामुळे आम्हाला आता ह्या मतलबी दुनियेत जगता येत आहे. माझ्या सर्व गुरूंना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


Guru Purnima Messages In Marathi

गुरु हा संतकुळीचा राजा।  गुरु हा प्राणविसावा माझा। गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु हा संतकुळीचा राजा।
गुरु हा प्राणविसावा माझा।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..


आजच्या निमित्त मी तुम्हाला माझ्या जीवनात आणून दिलेल्या चांगल्या बदलावांबद्दल धन्यवाद देत आहे. जर तुम्ही नसता तर हे होणे शक्य नव्हते. माझ्या लाडक्या सरांना गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!


सर्वोत्कृष्ट गुरू पुस्तकातून नव्हे तर मनापासून शिकवतात. गुरु पूर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


गुरुपौर्णिमेच्या आई वडिलांना शुभेच्छा | Guru Purnima Quotes In Marathi aai vadil

माझ्याआयुष्यातील पहिली गुरु म्हणजे आपली जन्मदात्री आई (माझी माय). लहानपानापाऊणचं आई (mom) आपल्याला चांगले संस्कार शिकवून आपल्याला एक आदर्श व्यक्ती बनण्यात मदत करीत असते. त्यानंतर पुढे आपले वडील आपल्याला एक यशस्वी मनुष्य बनविण्यासाठी खूप कष्ट घेत असतात. अशाप्रकारे आपले आई वडील आपल्या जीवनातले प्रथम शिक्षक होत. तुम्ही तुमच्या आई-वडिलांना खालील गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश (Guru purnima Quotes in marathi for parents) share करू शकता.

गुरुपौर्णिमेच्या आई वडिलांना शुभेच्छा
गुरुपौर्णिमेच्या आई वडिलांना शुभेच्छा

गुरुपौर्णिमा शुभेच्छा आई साठी

आयुष्यातला पहिला
गुरु आई.. आयुष्यातील
पहिली “मैत्रिण” आई
आयुष्यातल पहिला
“शब्द”आई…
आयुष्यातल पहिल प्रेम आई…
आणि सगळे “आयुष्य”म्हणजे आई….

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी

ज्यांनी मला जन्म दिला, ज्यांनी मला शिक्षण दिले, ज्यांनी मला मोठे केले, ज्यांनी मला माणुसकी काय असते, हे शिकवले, अश्या माझ्या आई वडिलांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!


Guru Purnima Quotes In Marathi For Father

Guru purnima Quotes for Mom and Dad
Guru purnima Quotes for Mom and Dad

आपल्या जीवनातील खरा मार्गदर्शक म्हणजे आपले वडील (Dad)
जे स्वतः वर्षानुवर्षे दोन जोडी कपड्यांमद्ये जीवन काढतात परंतु आपल्या मुलांसाठी प्रत्येक सणाला नविण कपडे घेऊन देतात
आपल्या मुलांना काही कमी पडू नये म्हणून रात्रीचे दिवस करतात.
सकाळी कामाला लवकर उपाशी पोटी जातात, आणि रात्री घरी आल्यावर मुलांना झोपलेले पाहून आईला विचारतात बाळाने जेवण केलं ना.
शरीर तापाने फणफणत असले तरी औषधी घेत नाहीं परंतु मुलाला साधी शिंक जरी आली ना तर डॉक्टरकडे घेऊन जातात.
ते शिकलेले नसतात तरी पण आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना यशस्वी मनुष्य बनवतात.
आयुष्याच्या वाटेवर ते आपल्यासोबत खंबीरपणे उभे राहतात.
मी सदैव आपल्या वडिलांच्या ऋणामध्ये राहून त्यांची सेवा करू इच्छितो.
अश्या माझ्या मनाने कोमल परंतु स्वभावाने ताठर माझ्या वडिलांना
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


Guru Purnima Quotes In Marathi For aai

आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.


Gurupurnima shayari in marathi | गुरू पौर्णिमा शायरी मराठी

आपल्या गुरुजनांचे महात्म्य सांगण्यासाठी काव्य आणि शायरींची रचना करण्यात आलेली आहे. आपल्या प्रिय गुरूबद्दल आदर दर्शविण्यासाठी गुरू पौर्णिमा शायरी (Gurupurnima shayari in marathi) share करीत आहोत.

Guru Purnima Quotes In Marathi Images

गुरू पौर्णिमा शायरी मराठी
Gurupurnima shayari in marathi

गुरूंच्या चरणी बसून, जीवन जाणा
एकाग्र मनाने मिळेल ज्ञान
चंचल मनाने मिळेल अज्ञान
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा


अक्षर हे फक्त ज्ञान नाही, गुरूने शिकवलं जीवन ज्ञान
गुरूमंत्र आत्मसात करा आणि भवसागर पार करा
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


गुरुपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा आई बाबा

गुरू आहे गंगा ज्ञानाची, करेल पापाचा नाश
ब्रम्हा विष्णू महेश समान, तुटेल भाव पाश
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा


अक्षरं आपल्याला शिकवतात, शब्दांचा अर्थ सांगतात
कधी प्रेमाने तर कधी ओरडून, जीवन जगणं शिकवतात
हॅपी गुरूपौर्णिमा


गुरूंचा महिना अपार आहे
गुरू उद्याचं अनुमान करतात
आणि शिष्याचं भविष्य घडवतात
गुरूपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा


Guru Purnima Messages In Marathi

संस्कारांच्या पायावर आहे गुरूची धार
नीर-क्षीर सम शिष्याने करावा आचार विचार
शुभ गुरू पौर्णिमा शुभेच्छा


गुरूकडे भेदभाव ठेवू नका
गुरूंपासून राहू नका दूर
कारण गुरूंशिवाय नाही पूर्ण जीवन
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा खूप खूप


गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी

मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू फुंकती प्राण
अपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमा
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


गुरू जणू पारस समान आहे
जो लोखंडाला सुवर्णात बदलतो
शिष्य आणि गुरू जगात केवळ दोनच वर्ण आहेत
शुभ गुरू पौर्णिमा


गुरू आहे गंगा ज्ञानाची, करेल पापाचा नाश
ब्रम्हा विष्णू महेश समान, तुटेल भाव पाश
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


Gurupornima Funny Quotes in marathi

आता आम्ही तुमच्यासाठी मराठीमध्ये गुरु पौर्णिमा जोक्स (Gurupornima Funny Quotes in marathi), घेऊन आलो आहोत. गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर, तुम्ही तुमच्या मित्रांना हे हलके फुलके गुरु पौर्णिमा जोक्स शेअर करून हसवू शकता. आई-वडिलांनंतर गुरूचे स्थान मानवाच्या जीवनात सर्वोच्च मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत.

Gurupornima Funny Quotes in marathi
Gurupornima Funny Quotes in marathi

माणसाची शेवटची गुरू ही त्याची पत्नी असते
नंतर त्याला कोणत्याही ज्ञानाची गरज नसते
आणि आता त्याला कोणतेही ज्ञान उपयोगी पडत नाही.


गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर
तुम्ही फ्लिपकार्ट, अॅमेझॉन वरून गुरु दक्षिणा पाठवू शकता…
मला हरकत नाही कारण
हसविण्यात मी तुमचा गुरु आहे ना?


पेगमध्ये पाणी किती घालायचे
आणि अल्कोहोल किती
हे सांगणारे सुद्धा गुरु आहेत.
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा


funny gurupurnima quotes in marathi
funny gurupurnima quotes in marathi

दिवस रात्र whatsapp, फेसबुक वर
ज्ञान देणाऱ्या गुरू घंटाळांना
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.


लिंबू मध्ये लोकांना बुडवून
युक्ती सांगणाऱ्या गुरु घंटाळांना
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.


आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट पासंडाळेली असेल..मनुष्याच्या जीवनात गुरूला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. या लेखामध्ये आपल्या आई वडिलांपासून ते आपले शिक्षक व आपल्या जीवनाच्या वाटेवर ज्यांच्यापासून आपण काहींना काही शिकत असतो अशा गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश ममराठीमध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपल्या मित्रांना हसविण्यासाठी हलके फुल्के गुरुपौर्णिमा शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर कंमेंट करा आणि आपल्या मित्रांना (whatsapp,फेसबुक) वर share करा.

Leave a Comment