iPhone Vs Android Phone कोणता smartphone सर्वोत्तम आहे?

iPhone Vs Android Phone कोणता चांगला आहे? आपण सर्वजण आपल्या जीवनात सर्व लहान ते मोठ्या वस्तू वापरतो, कोणत्या वस्तूचा दर्जा चांगला आहे. हे आपण तपासून पाहतो, याचा अर्थ असा की आपण दररोज एका वस्तूची तुलना (comparison) दुसऱ्या वस्तूशी करतो. आणि आपण ज्या वस्तूची quality चांगली असेल व ती कमी किंमतीत मिळत असेल,अशी वस्तू आपण खरेदी करतो.

मी फक्त वस्तूबद्दल बोललो, परंतु आणखी एक गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. ती म्हणजे जेव्हा आपण स्वतःसाठी जीवनसाथी निवडतो. आपण सर्वजण त्यातही तुलना (comparison) करतो. तेव्हाही आपण त्या व्यक्तीची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी करतो. आपण स्वतःसाठी सर्वोत्तम असलेली एकाची निवड करतो.

iphone vs android
iphone vs android

अशाच प्रकारे दरवर्षी हजारो फोन लॉन्च (phone launch) केले जातात. आणि त्या सर्वांचे फीचर्स (features) एकापेक्षा एक असतात. त्यामुळे कोणता फोन घ्यायचा आणि कोणता नाही असा संभ्रम (confused) मनामध्ये निर्माण होतो.

वेगवेगळ्या कंपन्यां नवनवीन फोन करतात. तर काही phone वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे (platform) असतात. आपल्याला अनेक मोबाईल कंपन्यांचे phone बाजारात बघायला मिळतात.परंतु प्लॅटफॉर्म मात्र तीन आहेत ते म्हणजे iOS, Android आणि Windows. लोकांना विंडोज फोन फारसे आवडत नाहीत, म्हणून बहुतांशी लोक Android फोन किंवा iPhone घेत असतात.

पण स्मार्टफोन घेण्यापूर्वी प्रत्येकाच्या मनात सदैव एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे कोणता स्मार्टफोन सर्वोत्तम आहे, iPhone की Android फोन? आज या लेखात मी तुम्हाला या दोघांबद्दल माहिती सांगणार आहे, कोणत्या बाबतीत आयफोन हा Android फोनपेक्षा चांगला आहे. आणि कोणत्या बाबतीत Android फोन आयफोनपेक्षा चांगला आहे.

तर चला मग iPhone Vs Android Phone या लेखामध्ये आज आपण iphone आणि andriod phone यांच्या वैयशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

अँड्रॉइड फोन आयफोनपेक्षा का चांगला आहे?

1. customization

तर आता आपण या दोन फोनच्या काही वैशिष्ट्यांबद्दल माहिती पाहूया

या विषयातला पहिला भाग आहे Customization, म्हणजे तुम्ही आपला अँड्रॉइड फोन हवा तेव्हा customize करू शकता, म्हणजे तुम्ही त्याचा लूक सॉफ्टवेअरनुसार बदलू शकता.

जसे की तुम्ही तुमच्या फोनमध्ये Widget इंस्टॉल करू शकता, त्याची Theme बदलू शकता, wallpaper बदलू शकता, आयकॉन (icons) एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवू शकता, launcher बदलू शकता, lock screen बदलू शकता इत्यादी

2. Device option

बाजारात, तुम्हाला iphone पेक्षा जास्त Android device पाहायला मिळतील. 3000 रुपयांपासून ते 60,000 रुपयांपर्यंतची अँड्रॉइड उपकरणे दुकानांमध्ये किंवा ऑनलाइन उपलब्ध असतात, online द्वारें एखादी व्यक्ती त्याच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार Android फोन सहज घेऊ शकतो, परंतु iphone सारखे device चे option बाजारात उपलब्ध नसतात. दरवर्षी आयफोनचे फक्त दोन मॉडेल्स बाजारात येतात.आणि या फोनची रक्कम 40,000-50,000 पासून सुरू होते आणि हे फोन फक्त ऑनलाइन खरेदी केले जाऊ शकतात, त्यामुळे बरेच लोक आयफोन खरेदी करू शकत नाही.

त्यामुळे Device Option च्या बाबतीत, Android फोन आयफोनपेक्षा खूपच चांगला आहे कारण तुम्हाला प्रत्येक range मध्ये Android फोन सहज मिळू शकतो.

3. File sharing

फाईल शेअरिंगबद्दल बोलायचे झाले तर, आपण Android फोन वरून फायली बाहर आणि अंदर दोन्हीप्रकारे share करू शकतो, हे खूप सोपे आणि universal आहे, तुम्ही तुम्हाला हवे असेल तेव्हा File Share करू शकता.

जसे आपण एका Android फोनवरून दुसऱ्या Android फोनवर (Bluetooth) ब्लूटूथद्वारे फायली शेअर करू शकतो, तसेच SHAREit सारख्या Third Party app च्या मदतीने फोनमधील app वरून इतर फोन किंवा कॉम्प्युटर बरोबर File Share करू शकतो. तसेच फोन मधील एका अॅपवरून दुसऱ्या अॅपवर सहजपणे फाइल शेअर करू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारे उपलब्ध असलेले शेअरिंगचे पर्याय आयफोनपेक्षा अँड्रॉइड फोनमध्ये खूप जास्त आहेत.

4. Multitasking And Multi-Window

मल्टीटास्किंग (Multitasking) आणि मल्टी-विंडो (Multi-window) म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त कार्य करणे. जसे की आपण internate द्वारे browse करण्याबरोबर गाणी ऐकू शकतो, आपल्या मित्रांना संदेश (message) पाठवू शकतो.

अशा प्रकारे आपण अँड्रॉईड फोनमध्ये एकाच वेळी बरीच कामे करू शकतो परंतु आयफोनमध्ये आपण ते अजिबात करू शकत नाही. आयफोनमध्ये एका वेळी एकच गोष्ट करू शकतो, आयफोनमध्ये एकाच वेळी दोन गोष्टी करणे शक्य नाही. त्यामुळे मल्टीटास्किंगच्या (Multitasking) बाबतीतही अँड्रॉइड फोन (Android phone) आयफोनपेक्षा (iPhone) सरस आहे. या वैशिष्ट्यांमुळे Android आयफोनपेक्षा उत्तम आहे.

iphone android फोनपेक्षा चांगले का असतात?

1. Optimization

ऑप्टिमायझेशन हा यातील पहिला (point) भाग आहे. फोनचे हार्डवेअर स्वतः डिझाईन करणाऱ्या Appleला फोनमध्ये कोणते घटक (components) आणि वैशिष्ट्ये (specifications) आहेत हे माहीत आहेत. आणि आयफोनमध्ये असलेले सॉफ्टवेअरही त्यांनीच बनवले आहे, त्यामुळे ऑप्टिमिझशन करतेवेळी त्यामधील hardware चा पुरेपूर उपयोग होत असतो आणि बॅटरीचा वापरसुद्धा फार कमी होतो. अशाप्रकारे iphone मध्ये hardware आणि software यांचे उत्तम संयोजन करण्यात आले आहे.

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे एकत्र संयोजन करणे खूप चांगले आहे. कारण iphone मॉडेल्स फारच कमी आहेत.आणि त्या मॉडेल्सची वैशिष्ट्ये (specifications) पाहता, Apple त्यानुसार iOS तयार करीत असतो. त्यामुळे ही सर्व उपकरणे एकत्र काम करतात.आणि सुरळीत चालतात.

google ने Android ऑपरेटिंग सिस्टीम तयार केले आहे. परंतु गुगलने कोणत्याही एका विशिष्ट उपकरणाला टार्गेट न करता एक सामान्य ओएस (general operating system) बनवले. तसेच वेगवेगळ्या कंपन्यांची अनेक device असतात आणि त्यांचे specifiacationसुद्धा वेगवेगळे असतात, त्यामुळे अँड्रॉइडचे प्रत्येक मॉडेल याप्रमाणे smoothly चालवणे कठीण आहे. .

2. Software Updates

सॉफ्टवेअर अपडेट्सबद्दल सांगायचे झाले तर, iPhone आणि Android दोन्ही आप-आपल्या फोनसाठी दरवर्षी नवीन software launch करतात. परंतु Apple कडे मर्यादित Modelsआहेत आणि त्यांना माहित आहे की त्यांना त्या मॉडेल्ससाठी अपडेट्स द्यावे लागतील म्हणून त्या सर्व Modelsना लवकरच अपडेट्स मिळतात. ज्या दिवशी नवीन new version launce होतो त्याच दिवशी सर्व आयफोन्सना एकाच वेळी software update मिळतात. नवीन ते जुन्या iphone device मध्ये, सॉफ्टवेअर अपडेट्स एकाच वेळी दिसतात.

पण अँड्रॉइड फोन्समध्ये फक्त Nexus फोनवरच नवीन updates लवकर मिळतात आणि इतर मॉडेल्समध्ये नवीन अपडेट्सची वाट पाहावी लागते,. म्हणूनच सॉफ्टवेअर अपडेट्सच्या बाबतीत आयफोन चांगला आहे.

3. App Quality and Availability

अँड्रॉइडच्या play store मध्ये आणि ऍपलच्या App स्टोअरमध्ये अनेक Application आहेत. iphone Apps अँड्रॉइड Apps पेक्षा दर्जेदार आहेत. असे अनेक अॅप्स आहेत जे आयफोनमध्ये androidपेक्षा जास्त फीचर्स देतात आणि त्यांची design सुद्धा खूप चांगली असते.

उदाहरणार्थ, समजा गुगलकडे यूट्यूब app आहे तर ते app अँड्रॉइड फ़ोन मध्ये जेवढे option देतात ,त्यापेक्षा जास्त option आयफोन बघायला मिळते. त्यामुळे अॅपच्या गुणवत्तेबद्दल बोलायचे झाले तर ते आयफोनमध्ये अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात.

4. Camera Quality

आयफोन आणि अँड्रॉईड स्मार्टफोनच्या कॅमेरा गुणवत्तेबद्दल बोलायचे झाले तर आयफोनच्या कॅमेराची गुणवत्ता खूप चांगली आहे. त्याची picture quality DSLR कॅमेऱ्याच्या गुणवत्तेइतकीच चांगली आहे.अँड्रॉईड फोनचा कॅमेरा 16 mp (megapixel)चा असला तरी तो आयफोनच्या 12 mp (megapixel) कॅमेराच्या qualityची बरोबरी करू शकत नाही. ऍपल आपल्या आयफोनच्या वैशिष्ट्यांपेक्षा गुणवत्तेकडे अधिक लक्ष देत असतो. त्यामुळे त्याची quality अँड्रॉइड फोनपेक्षा खूपच चांगली असते.

5. After Sales

after sale म्हणजे फोन विकल्यानंतर iPhone आणि Android तुम्हाला कशी मदत करतात.आयफोन हा Android फोनपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे, मग तो android phone कोणत्याही कंपनीचा असो. जर तुम्ही iphone घेतला असेल आणि पुढे जाऊन त्यात काही अडचण आली तर तुम्ही ऍपल स्टोअरवर जा.जर तो दुरुस्त करता आला तर ठीक किंवा तो दुरुस्त झाला नाही तर त्याऐवजी कंपनी तुम्हाला नवीन फोन देत असते.

मात्र अँड्रॉईड फोनमध्ये काही समस्या आल्यास customer केअरशी तुम्हाला बोलून योग्य तोडगा निघाला नाही तर तुम्हाला तुमचा फोन सर्व्हिस सेंटर किंवा रिपेअरिंग शॉपमध्ये न्यावा लागतो. मात्र apple आपला फोन विकल्यानंतर ग्राहकांना विसरत नाही. त्यामुळे ग्राहकाला अॅपलचा फोन आवडतो. म्हणून apple हा जगात प्रथम क्रमांकावर आहे.

FAQ

प्रश्न – अँड्रॉइड किंवा आयफोन या दोन फोन मधील कोणाची बॅटरी लाइफ चांगली आहे?

उत्तर- आयफोनची बॅटरी अँड्रॉइड फोनपेक्षा चांगली आहे.

प्रश्न – अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये कोणाची कामगिरी चांगली आहे?

उत्तर – अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये iphone कामगिरी चांगली आहे.

आज तूम्ही काय शिकलात?

मला आशा आहे की तुम्हाला या iPhone Vs Android Phone फोनचे सर्व मुद्दे समजले असतील. हा लेख वाचल्यानंतर तुमच्या मनातील संभ्रम नक्कीच दूर झाला असेल की कोणता स्मार्टफोन चांगला आहे Iphone की Android फोन. तुम्हाला या लेखाशी संबंधित काही शंका दूर करायच्या असतील, तर कमेंट करा.

Leave a Comment